The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी कलम ३७० रद्द केल्यामुळे भारताचा निषेध केला होता

by द पोस्टमन टीम
4 March 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


कोरोनाच्या संकटातून सावरता सावरता जगाच्या नाकी नऊ आले होते. या दुष्काळात तेरावा म्हणजे २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर केलेला ह*ल्ला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी कणखर भूमिका घेत युक्रेनच्या नागरिकांना देशाला वाचवण्यासाठी एकत्र या असे आवाहन केले. हे व्लोदिमिर झेलेन्स्की नेमके आहेत तरी कोण? झेलेन्स्की युक्रेनचे राष्ट्रपती कसे बनले? आज या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊ..

वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा जन्म २५ जानेवारी १९७८ रोजी युक्रेनमध्ये झाला. व्लोदिमिर झेलेन्स्की यांचे वडील अलेक्सान्डर झेलेन्स्की हे प्राध्यापक आहेत, तर आई रायमा झेलेन्स्की इंजिनियर होत्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्लोदिमिर झेलेन्स्की यांना इस्राईलमध्ये पुढील शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती मिळाली होती पण वडील अलेक्सान्डर झेलेन्स्की यांनी परवानगी न दिल्याने त्यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी कीवमधील नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमधून ‘लॉ’ची पदवी प्राप्त केली आहे.

राजकारणात यायच्याआधी व्लोदिमिर झेलेन्स्की हे पेशाने कलाकार होते. त्यांनी बऱ्याच मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या. त्यांनी “क्वार्टल 95” ही चित्रपट, व्यंगचित्रे, टीव्ही शो तयार करणारी कंपनी स्थापन केली. क्वार्टल 95 प्रस्तुत “सर्व्हंट ऑफ द पीपल” ही त्यांची मालिका आणि या मालिकेतील त्यांची विनोदी भूमिका भरपूर गाजली. ही मालिका २०१५ ते २०१९ पर्यंत प्रसारित झाली आणि प्रचंड लोकप्रिय झाली.

मार्च २०१८ मध्ये व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी क्वार्टल 95 या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने “सर्व्हंट ऑफ द पीपल” हा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांनी ३१ डिसेंम्बर २०१८ रोजी २०१९ च्या युक्रेनियन अध्यक्षीय निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. त्यांना त्यांच्या अध्यक्षीय प्रचारादरम्यान युक्रेनचे सर्वात मोठे उद्योगपती इहोर कोलोमोईस्की यांचा पाठिंबा मिळाला.

२०१९ च्या युक्रेनियन अध्यक्षीय निवडणुकीत व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पेट्रो पोरोशेंनको यांचा पराभव केला. या निवडणुकीत त्यांना ७३% मते मिळाली. आज वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी, भ्रष्टाचारविरोधी आणि लोकप्रियतावादी नेता म्हणून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.



व्लोदिमिर झेलेन्स्की यांना त्यांच्या अध्यक्षीय प्रचारा दरम्यान युक्रेनचे सर्वांत मोठे उद्योपती कोलोमोईस्की यांचा पाठिंबा मिळाला. उद्योपती कोलोमोईस्की हे अगोदर व्लोदिमिर झेलेन्स्की यांचे राजकीय प्रतिस्पर्धी पोरोशेंको यांचे समर्थक होते. पोरोशेंको युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असताना कोलोमोईस्की यांनी स्थापन केलेली “प्रीव्हाट बँकेचे” राष्ट्रीयीकरण केले. याच प्रीव्हाट बँकेमधून अब्जावधी हिरविनिया चोरी केल्याचा आरोप कोलोमोईस्की यांचावर झाला. (हिरविनिया हे युक्रेनचे चलन आहे.)

कोलोमोईस्की यांनी झेलेन्स्की यांना त्यांच्या अध्यक्षीय प्रचारा दरम्यान पाठिंबा दिला कारण त्यांची ही अपेक्षा होती की झेलेन्स्की हे भविष्यात राष्ट्रीयीकरण झालेल्या प्रीव्हाट बँकेचे खाजगीकरण करण्यात आपल्याला मदत करतील. पण व्लोदिमिर झेलेन्स्की यांना कोलोमोईस्की यांचा डाव माहीत होता त्यामुळे व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी प्रीव्हाट बँकेचे खाजगीकरण करण्यास नकार दिला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

५ ऑगस्ट २०१९ रोजी भारत सरकारने जम्मू काश्मीरशी निगडित असलेले कलम ३७० रद्द केले. भारत स्वतंत्र झाल्यापासून हे सतत सांगत आला आहे की काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाद आहे, तरीही बरेच देश काही कारण नसताना यात ढवळाढवळ करत असतात. युक्रेनही याला काही अपवाद नाही.

इथे भारताने कलम ३७० रद्द केले आणि युक्रेनमधील झेलेन्स्की सरकारने याचा विरोध केला, बरं प्रकरण इथेच थांबत नाही, भारताने वारंवार सांगून देखील युक्रेन हे पाकिस्तानला प्रगत शस्त्रांचा पुरवठा करत आहे. तर या अशा गोष्टींमुळे झेलेन्स्की सरकार हे त्यांची भारत विरोधी भूमिका स्पष्ट करत आहेत आणि आज यु*द्धजन्य परिस्थितीत भारताने हस्तक्षेप करावा अशी युक्रेनची अपेक्षा आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या जगावेगळ्या भूमिकेमुळे कायम चर्चेचा विषय राहिले होते. २०२० च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांच्याबद्दल नकारात्मक प्रचार करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या झेलेन्स्की सरकारची आणि इतर देशांची मदत घेतली असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झाला होता यामुळे अमेरिकेत याला “ट्रम्प युक्रेन स्कँडल” असे म्हणतात. 

एका गोपनीय अहवालानुसार जर युक्रेनच्या झेलेन्स्की सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत मदत केली तर त्याचा बदल्यात भविष्यात अमेरीका ही युक्रेनच्या झेलेन्स्की सरकारला अद्यावत शस्त्रास्त्र देईल असे ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात ठरले होते. यावरून हेच सिद्ध होते की, युक्रेन हा दुसऱ्या देशांच्या व्यवहारात सतत ढवळाढवळ करत असतो.

व्लोदिमिर झेलेन्स्की हे युक्रेनियन भाषिक आणि रशियन भाषिक लोकांत ऐक्य स्थापन व्हावे या करता सतत प्रयत्नशील आहेत. ते त्यांच्या प्रशासनात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर(एक्स)सारख्या समाज माध्यमांचा पुरेपूर वापर करतात. ते “इ-गव्हर्नमेंट” या संकल्पनेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या अध्यक्षीय प्रचाराचा एक भाग म्हणून रशियासोबत युक्रेनचा प्रदीर्घ संघर्ष संपवण्याचे आश्वासन दिले आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पूर्वेकडील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी रशियाशी वाटाघाटी करण्याच्या व्लोदिमिर झेलेन्स्की यांचा प्रयत्नांना मर्यादित यश मिळाले.

व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियन आणि नाटो लष्करी युतीचे सदस्यत्व मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले, पण युक्रेनची ही भूमिका रशियाला पटली नाही. यु*द्धाच्या काळातही अध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी राजनैतिक समाधानाची आशा कायम ठेवली.

रशिया शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अग्रेसर असल्याने, सध्या युक्रेनला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण आज या यु*द्धजन्य परिस्थितीत युक्रेनियन लोकांना त्यांचे मनोबल वाढवणारा, माणसाच्या रुपात एक ४४ वर्षांचा कणखर नेता सापडला आहे. त्यामुळे व्लोदिमिर झेलेन्स्की कुशलतेने या समस्येवर तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आजही कित्येक देशांचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा ब्रिटिश म्युझियममध्ये कैद आहे..!

Next Post

मुलांना लहान वयातच कोडिंग शिकवणं खरंच आवश्यक आहे का..?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

मुलांना लहान वयातच कोडिंग शिकवणं खरंच आवश्यक आहे का..?

१९७२ साली आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराची ब्रिटनने २०१० साली माफी मागितली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.