The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सद्दाम हुसेनचा मुलगा उदय एखाद्या सैतानापेक्षा किंचितही कमी नव्हता

by द पोस्टमन टीम
24 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसैनची क्रू*रता सर्व जगानं पाहिलेली आहे. इराकी जनतेच्या मनात त्याची इतकी द*हश*त होती की, मृत्यूनंतरचं इराकी जनतेनं सुटकेचा नि:श्वास टाकला. सद्दाम हुसैनच्या मोठ्या मुलानं देखील त्याच्याचं पावलावर पाऊल टाकलं होतं. सद्दामचा मुलगा उदय, क्रू*रतेच्या बाबतीत आपल्या वडिलांनाही मागे सोडत होता. शत्रूंपासून आपला जीव वाचवण्यासाठी उदय स्वत:चा बॉडी डबल वापरत असल्याच्या देखील चर्चा आहेत.

लतिफ याहिया, या व्यक्तीनं आपण उदयचा बॉडी डबल म्हणून काम केल्याचा दावा केलेला आहे. लतिफनं ५ जून २००३ रोजी ‘The Devil’s Double’ हे पुस्तक प्रकाशित केलं. त्यात त्यानं अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे आणि उदयवर अनेक गंभीर आरोपही केलेले आहेत.

लतिफ आणि उदयचा नेमका काय संबंध होता हे समजून घेण्याअगोदर या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे.

उदय सद्दाम हुसैन अल-तिक्रीती (उदय सद्दाम हुसैन) याचा जन्म १८ जून १९६४ रोजी बगदादमध्ये झाला होता. (उदयच्या जन्मतारखीविषयी गोंधळ आहे) तो सद्दाम हुसैन आणि सद्दामची पहिली पत्नी साजिदा तलफा यांचा मोठा मुलगा होता. उदयकडे अनेक महत्त्वाची पदं होती. त्यानं क्रीडा अध्यक्ष, लष्करी अधिकारी आणि उद्योगपती यासारख्या असंख्य पदांवर काम केलं. तो इराकी ऑलिम्पिक समिती आणि इराक फुटबॉल असोसिएशनचा देखील प्रमुख होता. त्यानं बगदाद विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मात्र, तिथे तो फक्त तीन दिवस राहिला. त्यानंतर त्यानं अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली.



‘Iraqi military strategy during the eight-year Iran-Iraq war’, या विषयावर उदयनं पदवीचा प्रबंध लिहिला. १९९८ मध्ये बगदाद विद्यापीठातून त्यानं राज्यशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली.

परंतु काहींच्या मते, उदयकडे इतकी शैक्षणिक क्षमता नव्हती. त्यानं पैसा आणि द*हश*तीच्या बळावर इतरांकडून आपले प्रबंध लिहून घेतले होते. शिक्षक देखील भीतीपोटी त्याला कमी गुण देऊ शकत नव्हते. मात्र, त्याच्या एका वर्गमित्राच्या सांगण्यानुसार उदय खरोखर हुशार होता. त्याच्या वडिलांपेक्षाही हुशार होता पण, तो तितकाचं वेडाही होता.

उदयवर ब*लात्कार, खू*न आणि छळाचे अनेक आरोप होते. अगदी ऑलिम्पिक खेळाडू आणि राष्ट्रीय फुटबॉल संघातील खेळाडूंवर अ*त्याचार करून तो मारहाण करत असे. उदय विद्यापीठात शिकत असताना त्याच्या भुकेल्या आणि वासनांध डोळ्यांपासून वाचण्यासाठी कित्येकदा भीतीनं टॉयलेटमध्ये लपून बसत. उदयच्या वासनेतून कोणीही सुटू शकलं नाही हे कटू सत्य आहे, अशी माहिती सद्दामच्या खासगी पायलची मुलगी जैनाब सल्बीनं दिली.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

२२ जुलै २००३ रोजी वयाच्या ३९व्या वर्षी अमेरिकन सैन्याच्या हातून उदयचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या आणि धोकादायक ठिकाणी उदय आपला बॉडी डबल वापरत असल्याचं म्हटलं जातं. लतिफ याहिया या व्यक्तीनं स्वत: जाहिरपणे सांगितलं आहे, तो उदयचा बॉडी डबल होता. लतिफ इराकी लेखक, व्यापारी, राजकीय टीकाकार आहे. इतकचं नाही तर त्यानं इराण-इराक यु*द्धात लेफ्टनंट म्हणून सेवा दिलेली आहे.

१४ जून १९६४ रोजी, या लतिफ याहियाचा जन्म झाला होता. त्याचं कुर्दीश वंशीय कुटुंब श्रीमंत होतं. इराण-इराक यु*द्धात तो लेफ्टनंट होता आणि त्याच दरम्यान सप्टेंबर १९८७ मध्ये त्याला उदय हुसैनचं बॉडी डबल करण्यात आलं. उदय आणि त्याच्या वयामध्ये फक्त चार दिवसांचा फरक होता. २३ वर्षीय लतिफला यु*द्ध सोडून अध्यक्षीय निवासस्थानी बोलवण्यात आलं आणि त्यानं आपला बॉडी डबल व्हावं, असा प्रस्ताव उदयनं ठेवला.

सुरुवातीला लतिफनं तो प्रस्ताव धुडकावून लावला होता. मात्र, त्याला तुरुंगात टाकून त्याचा छळ सुरू झाल्यानंतर त्यानं उदयसाठी काम करण्यास होकार दिला.

हुसैनच्या माणसांनी त्याला आठवडाभर तुरुंगात ठेवलं, त्याचा शारीरीक आणि मानसिक छळ केला. उदयनं लतिफच्या बहिणींवर अ*त्याचार करण्याची धमकी दिली. लतिफला खात्री होती. त्यानं उदयला पुन्हा नकार दिला तर तो काहीही करू शकतो. म्हणून तो बॉडी डबल म्हणून काम करण्यास तयार झाला. उदयच्या भाषण पद्धतीचं आणि इतर गोष्टींचं अनुकरण करण्यासाठी लतिफला सहा महिने प्रशिक्षण दिलं गेलं. काही शस्त्रक्रिया देखील केल्या.

कुवेतच्या ह*ल्ल्यादरम्यान, लतिफ याहियाचा वापर इराकी सैन्याचं मनोबल वाढविण्यासाठी करण्यात आला. सैन्याची भेट घेण्यासाठी त्याला बसरा येथे पाठवण्यात आलं होतं.

लतिफनं आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, मी अनेकदा उदयला बला*त्कार, छळ आणि ह*त्या करताना पाहिलं आहे. एकदा आम्ही इराक ऑलिम्पिक समितीच्या कार्यालयात बसलो होतो. उदयनं बला*त्कार केलेल्या मुलीच्या वडिलांना तिथं आणलं होतं. ती मुलगी ब्युटी क्वीन (मिस बगदाद) होती. तिच्या वडिलांनी सद्दामकडे उदयची तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून उदयनं मुलीवर अ*त्याचार करून बदला घेतला होता. त्यानं मला त्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी घालण्याचा आदेश दिला. मी गोळी घालण्याऐवजी माझं मनगट कापून घेतलं. मला तत्काळ दवाखान्यात दाखलं केलं. त्यानंतर मात्र, उदयनं मला कुणाचा जीव घेण्यास सांगितलं नाही.

उदय सायकोपॅथ होता. तो गर्भवती स्त्रियांसाठी वेडा होता. त्याची माणसं रस्त्यावरून चालणाऱ्या कुठल्याही गर्भवती स्त्रीला उचलून आणत. उदय तिच्यावर अमानुषपणे अ*त्याचार करी आणि नंतर तिला भुकेल्या लांडग्यांच्या जाळीत टाकून देई.

१९९० च्या उत्तरार्धात लतिफनं इराकमधून पलायन केलं. त्यानंतर पाच वर्षे समुपदेशन आणि मानसशास्त्रीय उपचारांमध्ये घालवली. एकदा त्यानं गोळ्या घेऊन आत्मह*त्या करण्याचा प्रयत्न केला तर, दुसर्‍या वेळी स्वत:ला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला.

लतिफ याहियानं आपण उदय हुसेनचा बॉडी डबल असल्याचा दावा केला असला तरी, अनेकांनी तो फेटाळून लावलेला आहे. विदेशी पत्रकारांनी एकदा उदय हुसेनलाही हा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यानं आपण बॉडी डबल वापरत नसल्यासं सांगितलं होतं. १९८९ ते २००३ या काळात सद्दामच्या राजवाड्यात काम करणाऱ्या एका खासगी सुरक्षा रक्षकानंही लतिफचा दावा नाकारला आहे. इराकमध्ये असलेल्या एका माजी सीआयए अधिकाऱ्यानं देखील कधीच याहियाबद्दल ऐकलं नसल्याचं सांगितलं आहे.

आता उदय हुसैन देखील हयात नाही. त्यामुळं लतिफ याहियाचे दावे कितपत खरे आहेत, हे सांगणं कठीण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या भारतीयानं १६१ वर्षांपूर्वीचं अवघड गणित सोडवत दहा लाख डॉलर्सचं बक्षीस मिळवलंय

Next Post

जगाला वेड लावणाऱ्या ‘क्वीन रॉक बँड’चा लीड सिंगर ‘फ्रेडी मर्क्युरी’ आपल्या साताऱ्यात शिकलाय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जगाला वेड लावणाऱ्या 'क्वीन रॉक बँड'चा लीड सिंगर 'फ्रेडी मर्क्युरी' आपल्या साताऱ्यात शिकलाय

तुर्कीतल्या आर्मेनियन लोकांच्या नृशंस शिरकानाविषयी कुठेच वाच्यता केली जात नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.