The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रहांच्या प्रदक्षिणेचे नियम योहान्स केप्लरने मांडले पण संशोधन टिको ब्राहचे होते..!

by द पोस्टमन टीम
25 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


खगोलशास्त्राचा अभ्यासक आणि ज्यानं अत्यंत महत्त्वाची आणि अचूक निरिक्षणं नोंदवून खगोलशास्त्राला दिशा देण्याचं काम केलं तो टिको ब्राह म्हणजे एक रसायन होतं. अत्यंत विद्वान मात्र तितकाच विक्षिप्त असा हा माणूस या क्षेत्रात महान योगदान देऊन गेला आहे. स्वत:च्या मालकीचं बेट असणारा टिको आणि त्याच्यासोबत आणखीन एक नाव इतिहासात अजरामर झालं आणि ते म्हणजे योहान्स केपलर. या जोडगोळीनं सोळाव्या शतकात या विषयाला गती देणारे महत्त्वाचे शोध लावले.

टिको ब्राहचा जन्म १५४६ साली एका कुलीन आणि सधन कुटुंबात झाला. डेन्मार्कचा राजा फ़्रेडरिक दुसरा याचा जीव वाचविण्यासाठी ज्यानं आपल्या प्राणांचं बलीदान दिलं त्या जर्गेन ब्राह याचा टिको पुतण्या होता. खरंतर टिको दोन वर्षांचा असतानाच जर्गेन त्याला आपल्याकडे सांभाळायला घेऊन गेला होता. जर्गेनला स्वत:चं मूलबाळ नसल्यानं त्यानं टिकोचा पोटच्या अपत्याप्रमाणे सांभाळ केला. जर्गेन डॅनिश राजाच्या मर्जीतला माणूस होता. त्यामुळे राजाची पहिल्यापासूनच ब्राहवरही राजाची मेहेरनजर होती. या उदार राजाची त्याच्यावर इतकी मर्जी होती की त्यानं ब्राहला हेव्हन नावाचे बेटच भेटीदाखल देऊन टाकलं होतं. हे बेट ब्राहनं त्याच्या स्वत:च्या मालकीच्या छोट्या देशात रुपांतरीत करुन टाकलं.

इथे त्यानं एक छोटेखानी किल्लेवजा वाडा बांधला आणि या देशाला आकाशादेवी युरेनियावरून युरेनबर्ग असं नाव दिलं. या बेटावर त्यानं स्वत:च्या मालकीची वेधशाळा बांधली. वीस वर्षांहून अधिक काळ या बेटावर वास्तव्य केलं आणि याच वेधशाळेत अहोरात्र अभ्यासात गढून जात ब्राहनं महत्वाची निरिक्षणं नोंदविली.

खगोलशास्त्रात प्रचंड काम करून भविष्यातील अभ्यासकांसाठी अनेक महत्वपूर्व शोध जरी ब्राहनं लावले तरी गंमतीचा भाग असा की त्याला सुरवातीला या विषयात फ़ारसा रस नव्हता. कोपेनहेग विद्यापिठात त्यानं त्याच्या काकांच्या मर्जीनुसार कायद्याचा अभ्यास करण्यास सुरवात केली. इतर अनेक विषय शिकत असतानाच खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासही सुरवात केली आणि हळूहळू या विषयातली त्याची रूच वाढत गेली. ती इतकी की पुढे जाऊन त्यानं कायद्याचं शिक्षण सोडून पूर्णवेळ खगोलशास्त्र शिकण्यात घालविण्यास सुरवात केली.

या अभ्यासादरम्यान त्यानं काही निरिक्षणं करून त्यांची नोंद ठेवण्यासही सुरवात केली. यापैकीच एक महत्त्वाचं टिपण – जे  पुढे जाऊन त्याच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग बनलं- गुरू आणि शनी यांच्यातला संबंध.



१५९७ साली मात्र डॅनिश राजाची खप्पमर्जी झाली आणि ब्राहला असणारा पाठींबा राजानं काढून घेतला. यानंतर आज जर्मनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या काळातल्या वॅण्डेस्बॅचमधे रहायला गेला. काहीकाळ येथे वास्तव्य करून तो प्रागमधे वास्तव्यास गेला आणि आपलं खगोलशास्त्रीय संशोधन त्यानं चालू ठेवलं.

कोपरनिकसनं पूर्वीच मांडलेल्या हेलिओसेंट्रिक सिध्दांताचं समर्थन त्यानं केलं. त्यानं ही निरिक्षणं करताना केवळ एक कंपास आणिस एक सेक्स्टंट वापरला होता. ब्राहेनं एक हजाराहून अधिक तारे कॅटलॉग केले, त्यानं हे सिध्द केलं की, धूमकेतूस हा केवळ पृथ्वीच्या वातावरणातला घटक नसून अंतराळातून प्रवास करणारी एक वास्तविक वस्तू (ऑब्जेक्ट) आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

त्यानं चंद्राच्या कक्षेतील अनियमितताही निदर्शनास आणली तसेच कॅसिओपियाच्या निर्मितीत एक नवा तारा शोधला. इतकंच नाही तर ब्राहनं ‘टायकोनियन क्वाड्रंटसारख्या अनेक साधनांचाही शोध लावला. 

१६०० साली ब्राहनं योहान्स केपलरला आपला सहाय्यक म्हणून नेमलं. योहान्स केपलर यांचा जन्म २१ डिसेंबर १५७१ च्या जर्मनीत झाला. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी एका विचित्र रोगानं ग्रासलं आणि दृष्टीवर त्याचा परिणाम होऊन ती क्षीण बनली. इतकंच नाही तर हात आणि शरीरतली चेतना क्षीण झालेली होती. यामुळे केपलरचं बालपण खडतर गेलं. हे कमी होतं म्हणून की काय त्याचे वडील कायम मद्यधुंद असत तर आईचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत रहात असूनही केपलर प्रचंड हुशार होता. पहिल्यापासूनच तल्लख बुध्दीच्या केपलरनं सर्व कमतरतांवर मात करुन आपली बुध्दी हेच आपलं जगण्याचं साधन बनवलं.

केपलरला चर्चनी सहाय्य केलं आणि धर्मविज्ञानाचं अध्ययन करण्यासाठी त्याला ख्रिश्चन गुरूकुलात पाठविण्यात आलं. टिबिगन विद्यापीठातून शिष्यवृत्ती मिळवत त्याने स्नातक ही उपाधि मिळविली. याठिकाणी अध्ययन करत असतानाच तो कोपरनिकसच्या सहवासात आला आणि खगोलशास्त्रातली त्याची रूची वाढली. अल्पावधीतच ते जर्मनीचे महान वैज्ञानिक आणि गणितज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा महत्वाचा शोध म्हणजे, केपलर यांनी प्रथमच असं सिध्द केलं की सूर्याच्या भोवती प्रदक्षणा घालण्याचा ग्रहांचा मार्ग गोलाकार नसून अंडाकृती आहे. प्रत्येक ग्रहाचा आणि नक्षत्राचा फ़िरण्याचा वेग, वेळ यांचा सूक्ष्म अभ्यास करू त्यांनी काही निरिक्षणं सिध्द केली.

सुर्याच्या जवळ जवळ जाताना नक्षत्रांची गती वाढत असल्याचंही त्यांनी सिध्द केलं. प्रत्येक नक्षत्राला सूर्याला प्रदक्षणा घालायला किती वेळ लागतो हेदेखील केपलरनं अचूकी सांगितलं. याशिवाय अनेक शाखांत त्यांनी अत्यंत महत्वाची निरिक्षणं नोंदविली. यात गुरुत्वाकर्षण, समुद्रात येणारी भरती आणि चंद्राचा संबध, कॅलक्युलस आदींचा समावेश आहे.

अत्यंत तीक्ष्ण बुध्दीच्या ब्राहचा मृत्यू मात्र निसर्गाच्या विरोधात गेल्यानं झाला. एका मेजवानीसाठी ब्राह गेला असता त्याला लघवी लागली मात्र मेजवानीच्या मधून उठून जाणे हे शिष्टाचाराचे उल्लंघन झाले असते त्यामुळे ब्राह विनम्रपणे लघवी तटवून तसाच बसून राहिला. घरी परतल्यावर लघवीला गेले असता मुत्राशयावर ताण आल्यानं कशीबशी थोडीफ़ार लघवी झाली आणि त्यानंतर तो आजारी पडला.

तो शिष्टाचार पाळल्याचे दुष्परिणाम लवकरच शरीरावर दिसायला सुरवात झाली आणि त्यानंतर अकरा दिवसांनी ते मरण पावला. ब्राहसमवेत दीर्घकाळ काम करणार्‍या केपलरने ब्राहच्या मृत्यूपश्चातही त्याच्या निरिक्षण आणि नोंदींवर संशोधन कार्य चालूच ठेवलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

उत्तम वास्तुकलेचा नमुना असूनही हे शहर आज ओस पडलंय..!

Next Post

एकदा सचिनने पाकिस्तानकडून फिल्डिंग केली होती, त्यातच कपिलचा कॅचही सोडला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

एकदा सचिनने पाकिस्तानकडून फिल्डिंग केली होती, त्यातच कपिलचा कॅचही सोडला होता

गोदरेजच्या या साबणाची जाहिरात लागली की पालक पोरांना पाणी आणायला पाठवायचे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.