The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इटलीत एका शालीच्या तुकड्यावर जिझसच्या चेहऱ्याचा ठसा सापडलाय

by द पोस्टमन टीम
26 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काही गोष्टींना वादग्रस्तता इतकी चिकटून असते की ती संपता संपत नाही. अशा वादग्रस्त गोष्टीमागील सत्य जितके शोधण्याचा प्रयत्न होईल तितकी त्याबाबतच्या संदिग्धतेत भर पडत जाते.

इटलीच्या ट्यूरीन शहरातील ‘कॅथेड्रल ऑफ सेंट जॉन द बाप्टीस्ट’मध्ये ठेवण्यात आलेल्या एक शालीचा छोटासा तुकडाही असाच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. अर्थात या छोट्याशा तुकड्यात जितके धागे नसतील त्यापेक्षाही जास्त त्यावरचे संशोधन अहवाल प्रसिद्ध झाले आहेत आणि या प्रत्येक संशोधनाने याबाबतचा गोंधळ कमी करण्याऐवजी त्यात भरच घातली आहे.

या शालीच्या छोट्या तुकड्याचा जन्म कधी झाला इथपासून ते हा तुकडा नेमका कुणाच्या शालीचा आहे इथपर्यंत आणि त्यावर जे चित्र उमटले आहे त्यातून कोणता विशिष्ट अर्थ ध्वनित होतो का? असे कित्येक प्रश्न या शालीच्या तुकड्याशी जोडलेले आहेत.

तर, हा शालीचा तुकडा जिझसच्या शेवटच्या प्रवासातील आहे, म्हणजे त्याच्या मृत्युच्या समयी (किंवा दफन समयी) त्याच्या अंगावर जी शाल होती त्यातील हा तुकडा असल्याचे म्हटले जाते. परंतु इतक्यावेळा इतक्या लोकांनी संशोधन करून देखील दुर्दैवाने यामागचे सत्य शोधण्यात संशोधक अपयशी ठरले आहेत.

एखादी वस्तू किंवा उत्खननात सापडलेले अवशेष कोणत्या काळातील आहेत हे शोधण्यासाठी कार्बन डेटिंग केले जाते, हे तुम्हाला माहित असेलच. तर अशाच पद्धतीने या शालीचीही जर कार्बन-१४ तपासणी करण्यात आली. यात हा तुकडा सुमारे १२६० ते १३९० या काळातील असल्याचे स्पष्ट झाले. शास्त्रज्ञांच्या मते हा तुकडा जीझसच्या शालीचा नसून यासोबत जोडलेली माहिती म्हणजे मध्ययुगीन काळात कुणीतरी उडवून दिलेली राळ आहे असा खुलासा केला.



पण, काही लोकांना हा खुलासा मान्य झाला नाही. आता हे न पटण्यामागचे कारण काय हे जर समजून घ्यायचे असेल तर त्यापूर्वी या कपड्याचा थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे.

तर तो इतिहास असा आहे, १३५३ साली फ्रेंच सरदार जॉफ्रे दि चर्नी याला हा तुकडा सापडला आणि त्याने तो फ्रांसमधील लिरे या चर्चमध्ये जमा केला. आता यापूर्वी हा तुकडा कुठे होता त्याचा काहीही मागमूस लागत नाही. त्यानंतर १३८९ च्या दरम्यान ट्रॉइजच्या बिशपने पोप सातवा क्लीमेंट याला एक संदेश पाठवला. ज्यात लिहिले होते की, शालीचा हा तुकडा चुकीचा आहे आणि त्याच्यावर उमटलेली प्रतिमा देखील. 

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

एका कलाकाराने हा तुकडा आणि ती प्रतिमा स्वतःच तयार केल्याचे मान्य केले. मग पोप सातवा क्लीमेंटने ही शाल जिझसची नसल्याचे जाहीर केले. परंतु हा तुकडा जिझसची एक प्रतिमा म्हणून लिरेच्या धर्मपीठातच ठेऊन देण्यात यावा असाही आदेश त्याने दिला. म्हणजे हा तुकडा जरी जिझसच्या शालीचा तुकडा नसला तरी त्याची प्रतिमा म्हणून चर्चमध्ये राहिल.

१४५३ साली जॉफ्रे दि चर्नीची नात मार्गारेट हिने हा तुकडा सेवॉयच्या राजघराण्याला विकला आणि या बदल्यात तिने त्यांच्याकडून दोन किल्ले घेतले. तिच्या या कृत्याने चर्चच्या भावना दुखावल्या गेल्या आणि चर्चने तिच्यावर बहिष्कार टाकला.

१५३२ साली हा तुकडा फ्रांसच्या चॅम्ब्रे शहरात हलवण्यात आला. इथे चर्चला लागलेल्या आगीत या शालीलाही थोडीशी झळ पोचली. मग चर्चमधील नन्सनी तो जळलेला तुकडा काढून त्या ठिकाणी नवे ठिगळ जोडले. म्हणूनच कार्बन-१४ च्या या चाचणीत घेतलेला तुकडा कदाचित सोळाव्या शतकात त्या नन्सनी जोडलेल्या तुकड्याचाही असू शकतो असे म्हणत, कार्बन-१४ चाचणीवरही अविश्वास दाखवण्यात आला.

शेवटी १५७८ साली हा तुकडा इटलीच्या ट्युरीन शहरात हलवण्यात आला आणि आजतागायत तो तिथेच आहे. सेवॉय इटलीच्या गादीवर आल्यानंतर त्यांनीच हा तुकडा कॅथेड्रल ऑफ सेंट जोन द बाप्टीस्ट इथे ठेवला.

१८९८ साली इटलीतील प्रसिद्ध फोटोग्राफर सेकंडो प्या याने कॅथेड्रल मधील या शालीचा फोटो घेतला आणि त्याने जेव्हा या फोटोची निगेटिव्ह बघितली तेव्हा त्यामधे त्याला एक जखमी झालेला दाढीवाला मनुष्य दिसत असल्याचे लक्षात आले. इथूनच त्या शालीबाबतच्या संशोधनाला सुरुवात झाली. १९६९ साली याची पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्यात आली. त्यानंतर १९७८ साली या शालीच्या तुकड्याचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांची एक विशेष टीम स्थापन करण्यात आली आणि त्यांना याची तपासणी करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला.

पण इतका सगळा खटाटोप करूनही ती शाल कुठून आली, ती नेमकी कुणाची, त्यावर उमटलेले चित्र बायबलमधील संदेशाची मिळते-जुळते आहे, ते कसे काय या सगळ्या रहस्यांचा उलगडा मात्र झाला नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे व्हॅटिकन चर्चने ही शाल जिझसची असल्याचे मान्य केलेले नाही. मात्र त्यावर उमटलेली दाढीवाल्या जखमी मनुष्याची प्रतिमा म्हणजे जिझसच असल्याचे त्यांना मान्य आहे.

तर, अशा पद्धतीने या शालीसंदर्भातील वाद मागील पानावरून पुढे चालूच राहणार आहे. पण, ती शाल जिझसही नसून त्यावरील प्रतिमा जिझसची असल्याचे मान्य केले तर या वादावर कदाचित पडदा पडू शकतो.

सध्या हा तुकडा कॅथेड्रल चर्चने सांभाळून ठेवला आहे. एखादी पुरातन वस्तू किंवा अवशेष जसे जतन होण्यासाठी ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते तशीच काळजी या शालीबद्दलही घेतली जाते. एका हवाबंद काचेच्या पेटीत ही शाल ठेवली असून त्यावर प्रकाशाचा किंवा हवेचा परिणाम होऊ नये म्हणून त्या पेटीत ९५% आर्गन आणि ०.५% ऑक्सिजन भरला आहे. शिवाय काचेची ही पारदर्शक पेटी बुलेटप्रुफ आहे.

भविष्यात कधीतरी याबाबतचे सत्य समोर येईल किंवा याबाबतच्या जिज्ञासा संपूनही जाईल. जे प्रश्न सुटत नाहीत त्यांना काळावर सोडून दिलेलेच शहाणपणाचे ठरेल. बरोबर ना?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

व्हिस्की, स्कॉच आणि बर्बनमध्ये नेमका ‘फरक’ काय आहे ?

Next Post

पाकिस्तानने या मंदिरावर ३००० बॉ*म्बगोळे फेकले होते, पण एकही बॉ*म्ब फुटला नव्हता !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

पाकिस्तानने या मंदिरावर ३००० बॉ*म्बगोळे फेकले होते, पण एकही बॉ*म्ब फुटला नव्हता !

दुर्दैवाने या हिंदू राजाच्या पराक्रमाचा इतिहास आज आपल्याला माहिती नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.