The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

याला मोसादच्या इतिहासातला आजवरचा सर्वात खतरनाक हेर म्हणून ओळखलं जातं

by द पोस्टमन टीम
7 August 2025
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गुप्तहेरांचं जग खूप रहस्यमय असतं. शत्रूच्या गोटात प्रवेश करून गुप्त माहिती आपल्या देशात पाठवण्याचं काम ते करतात. हेरांच्या गोष्ट सांगण्यासाठी खूप सोप्या असतात आणि रंजक वाटतात. मात्र, वास्तविक जीवनातही तितक्याच कठीण. शत्रूच्या देशात हेरगिरी करताना दिवसाचा प्रत्येक्ष जण त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. हेरगिरी करताना पकडलं गेल्यास तेथील कायद्यांनुसार त्यांना कठोर शिक्षा मिळते. मात्र, तरीही हेर हा धोका स्वीकारतात.

काही हेर इतके हुशार आणि धाडसी असतात की, सामान्य माणसांना त्यांच्या डोक्याचा ठाव लागणं कठीणचं होऊन जातं. आज तुम्हाला अशा एका गुप्तहेराबद्दल सांगणार आहे, ज्यानं दुसऱ्या देशात जाऊन फक्त हेरगिरीचं केली नाही तर, चक्क शत्रू देशाचा मुख्य संरक्षण सल्लागार म्हणून काम केलं! विश्वास नाही बसत ना? मात्र, ही गोष्ट खरी आहे.

एली कोहेन, असं या अवलियाचं नाव आहे. जगभरातील नावाजलेल्या गुप्तहेरांमध्ये एलीला अतिशय मानाचं आणि वरचं स्थान आहे. असं म्हटलं जातं की, एलीनं जी गुप्त माहिती मिळवली होती, त्या बळावरच १९६७च्या अरब-इस्त्राइल यु*द्धात इस्त्राइलला विजय मिळाला होता. 

असा हा एली कोहेन नेमका होता तरी कोण?

इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहरात ६ डिसेंबर १९२४ रोजी एली कोहेनचा जन्म झाला. त्याच पूर्ण नाव एलियाहू बेन-शौल कोहेन असं होतं. १९१४मध्ये एलीचे वडील अलेप्पोतून अलेक्झांड्रियामध्ये आले होते. पुढे १९४९ मध्ये एलीचे आई-वडील आणि तीन भाऊ इस्त्राइलला गेले. मात्र, एली अलेक्झांड्रियामध्येच राहिला. त्यानं ‘कैरो फॅरोक’ विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्सची पदवी घेतली. शिक्षण सुरू असताना ज्यूईश आणि जिओनिस्ट कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ ठेवण्याचं कामही एली करत होता.



१९५५ मध्ये एली कोहेन इस्राईलला गेला आणि तिथे त्यानं हेरगिरीचं प्रशिक्षण घेतलं. इजिप्तमधील ज्यू लोकांना मदत करण्याच्या हेतूनं तो इजिप्तला परतला. परंतु, इजिप्शियन अधिकाऱ्यांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी त्वरित एलीवर पाळत ठेवली. वर्षभरातच इजिप्त आणि इस्त्राईल दरम्यान ‘सिनाई’ वाद सुरू झाला आणि अलेक्झांड्रियातील सर्व ज्यू लोकांना हद्दपार करण्यात आलं. त्यांच्यासोबत एली इस्राईलला आपल्या कुटुंबाकडे परतला. १९५९ मध्ये एलीनं नादिया माजाल्द या इराकी-ज्युईश स्त्री सोबत लग्न केलं. नादिया ही सॅमी मिशेल या लेखकाची बहिण होती. नादिया आणि एली यांना तीन अपत्ये झाली, सोफिया, एरित आणि शाय.

प्रत्येक देशाची स्वत:ची एक गुप्तचर यंत्रणा असते. हे काम पाहण्यासाठी खास संस्था देखील असतात. उदाहरण सांगायचं झालं तर, भारताची रॉ, अमेरिकेची सीआयए. इस्त्राईलची देखील एक गुप्तचर संस्था आहे. ‘मोसाद’, असं या संस्थेचं नाव आहे. १९६०मध्ये मोसादनं एली कोहेनशी संपर्क साधला. सिरियातील एका मोहिमेसाठी अरबी शरीरयष्टी असणारी एका व्यक्तीची मोसादला आवश्यकता होती. एली कोहेन एखाद्या अरबी व्यक्तीप्रमाणच दिसत होता. शिवाय त्याला अरबी, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांचे उत्तम ज्ञान होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

त्यानं मोसादसोबत काम करण्यास होकार दिला. त्यानंतर त्याला पुन्हा प्रशिक्षण देण्यात आलं. त्याच्या मोहिमेचा पहिला टप्पा अर्जेंटीनातील ब्युनास आयर्समधून सुरू झाला होता. त्याठिकाणी तो कमाल अमीन टाबेत या नावानं एक सिरीयन स्थलांतरित बनून राहिला. 

१९६१ मध्ये नादिया त्याला विमानतळावर सोडण्यासाठी आली होती. ही त्यांची शेवटची भेट होती. एली इस्त्राईलच्या रक्षा मंत्रालयासाठी काम करत आहे, असं तिला सांगण्यात आलं होतं.

ठरल्याप्रमाणं एली कोहेन अर्जेंटिनामध्ये एक वर्ष राहिला. श्रीमंत व्यापारी म्हणून त्यानं अनेक राजकारणी आणि मुत्सद्दी लोकांशी आपले संबंध चांगले केले. १९६२ मध्ये तो सिरियाची राजधानी दमास्कसला गेला. दक्षिण अमेरिकेत प्रस्थापित केलेले संबंध वापरुन त्यानं ‘बाथ पक्षा’च्या सदस्यांशी मैत्री करण्यास सुरुवात केली. बाथ लोकांना सीरिया ताब्यात घेण्याची महत्त्वकांक्षा होती. कमाल अमिन(एली कोहेन)चं दमास्कसमधील घर सिरियन अधिकाऱ्यांसाठी हक्काचा ठिकाणा झाला होता.

‘बाई आणि बाटली’चा आस्वाद घेण्यासाठी अनेक सिरियन अधिकारी त्याठिकाणी येत. एकदा नशा चढली की, अधिकारी सर्व माहिती अगदी सहज बरळून जात. कोहेन हीच माहिती रेडिओ ट्रान्समिटरचा वापर करून इस्त्राईलला पाठवत असे. १९६४ मध्ये, सीरियानं जॉर्डन नदीचं पाणी किन्नरेट तलावापासून दूर वळविण्याच्या उद्देशाने एक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या तलावातूनच इस्राईलच्या बर्‍याच भागात पाणीपुरवठा होत असे. एलीला याची कुणकुण लागताचं त्यानं इस्त्रायली अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर इस्त्रायली वायुसेनेनं सीरियन प्रकल्पाच्या उपकरणांवर बॉ*म्ब ह*ल्ला करून ती नष्ट केली. पुढे हा प्रकल्प आपोआप बारगळला.

इस्त्राईल आणि सीरिया यु*द्धामध्ये ‘गोलान हाइट्स’ हा सिरीयन संरक्षण रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता. कारण, इस्त्रायली ह*ल्ल्यांना तो बळी पडत नव्हता. त्याठिकाणी फक्त सिरीयन सैन्य दलातील वरिष्ठ कर्मचार्‍यांना जाण्याची परवानगी होती. मात्र, एली कोहेन वरिष्ठ सीरियन कर्मचाऱ्यांसह या संरक्षण स्थानाला भेट देण्यात यशस्वी झाला. तिथे त्यानं आपली चाल खेळली.

सिरीयन तटबंदीच्या भोवती झाडं लावल्यास फौजांना झाडांची सावली मिळेल, अशी सूचना त्यानं केली. त्याची ही कल्पना सिरीयन सैन्य अधिकाऱ्यांना चांगली वाटली आणि त्यांनी ती मान्य केली. सैन्य तळांवर झटपट वाढणारी झाडे लावण्यात आली. १९६७ मध्ये इस्रायलनं जेव्हा गोलन हाइट्सवर ह*ल्ला केला तेव्हा या झाडांच्या मदतीनच सीरियन सैन्याला शोधण्यात यश मिळालं.

१९६२ ते ६५ या काळात एली फक्त तीनदा इस्त्राईलला येऊन त्याच्या कुटुंबाला भेटला. १९६४ मध्ये तो एकदा मायदेशी आल्यानंतर त्यानं सिरीयन गुप्तचर यंत्रणेचा नवीन कमांडर कर्नल अहमदबद्दल चिंता व्यक्त केली होती. कारण अहमदला एलीवर विश्वास नव्हता. ही मोहीम संपुष्टात आणण्याची सूचना एलीनं मोसादला केली होती. मात्र, मोहिमेचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा सिरीयाला पाठवण्यात आलं. जानेवारी १९६५ पर्यंत गुप्त माहिती बाहेर जात असल्याचं सिरीयन गुप्तचर अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ते सतर्क झाले होते. अत्याधुनिक रशियन तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाच्या बळावर माहिती कुठून बाहेर जाते हे शोधण्यात सिरीयाला यश आलं. २४ जानेवारी १९६५ रोजी माहिती ट्रान्समीट करत असताना एली कोहेनला रंगेहात पकडण्यात आलं आणि एक निष्णात गुप्तहेर शत्रूच्या जाळ्यात अडकला.

एली कोहेनवर अगदी थोडक्यात लष्करी न्यायाधिकरणात खटला चालविला गेला. त्याला त्याचा वकील नेमण्यास परवानगी दिली गेली नाही. ८ मे, १९६५ रोजी एली कोहेनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पोप पॉल सहावा यांच्यासह अनेक नेते आणि मुत्सद्दी लोकांनी त्याची शिक्षा कमी करण्यासाठी विनंती केली होती. मात्र, सीरियानं दया दाखवली नाही. मृत्यूपूर्वी आपल्या पत्नीला पत्र लिहिण्याची परवानगी कोहेनला देण्यात आली.

१८ मे रोजी त्याला १०हजारांपेक्षा जास्त लोकांच्या जमावासमोर फाशी देण्यात आली. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह आपल्याला मिळावा यासाठी कोहेनच्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केले. आजही त्याचे अवशेष मिळावेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. २००९मध्ये पोप बेनिडिक्ट सोळावे यांनी याप्रकरणात मध्यस्थी करावी, अशी विनंती कोहेन कुटुंबानं केली होती.

२०२०मध्ये ‘अल जझिरा’ या जगप्रसिद्ध मीडिया हाऊसनं एली कोहेनच्या आयुष्यावर एक माहितीपट तयार केला. त्यापूर्वी १९८७मध्ये ‘द इम्पॉसिबल स्पाय’ नावाच्या चित्रपटातून त्याची माहिती देण्यात आली होती. २०१९मध्ये ‘द स्पाय’ नावाची एक मिनीसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती.

कोहेनचं आयुष्य अनेकांना प्रेरणा देणारं ठरलं. देशप्रेम, धैर्य आणि चिकाटी यामुळं त्याला इस्त्राईलच्या इतिहासात अजरामर स्थान मिळालं. तेथील जनतेनं त्याला ‘Our Man in Damascus’ हा किताब दिलेला आहे. सिंहाच्या गुहेत जाऊन शिकार करणारा शिकारी, असं त्याला संबोधलं तरी वावग ठरणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

प्राचीन ‘रोम’मध्ये लोक नशा करण्यासाठी या माशाचं सेवन करायचे..!

Next Post

जिवंत गाडले जाऊनही हे लोक आपली स्टोरी सांगण्यासाठी पुन्हा परत आले होते..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जिवंत गाडले जाऊनही हे लोक आपली स्टोरी सांगण्यासाठी पुन्हा परत आले होते..!

एवढ्या प्रसिद्ध पत्रकाराला सौदीने असं काही गायब केलं की त्याचं नखसुद्धा सापडलं नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.