The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्पार्टाची राणी ट्रॉयच्या राजपुत्रासोबत पळाली आणि भीषण यु*द्धास सुरुवात झाली

by द पोस्टमन टीम
11 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


प्रेमात आणि यु*द्धात सगळं काही न्याय्य असतं असं म्हटलं जातं. पण यु*द्धच प्रेमासाठी केलं गेलं असेल तर? इतिहासात प्रेमासाठी लढल्या गेलेल्या एका यु*द्धाची गोष्ट आजही अनेकांना प्रेरणा देते. ग्रीक महाकवी होमरच्या इलियड या महाकाव्यात पहिल्यांदा या यु*द्धाचे वर्णन करण्यात आले. त्याआधी लोकांनी आपल्या बोलीसाहित्यातून या यु*द्धाचे अनेक किस्से जतन करून ठेवले होते.

इसवी सन पूर्व १२००च्या आसपास हे यु*द्ध झाले असल्याचे म्हटले जाते. त्याकाळी अजूनही लेखन कला प्रगत झाली नव्हती. लिहिण्या-वाचण्याचे काम फक्त सरकारी कार्यालायांपुरते मर्यादित होते. तेव्हा होमरने पहिल्यांदा या यु*द्धाची कर्णोपकर्णी कथा लिहून काढली. होमरच्या या महाकाव्यानेच पाश्चिमात्त्य संस्कृतीचा पाया रचला असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे रामायण आणि महाभारत समजून घेतल्याशिवाय सनातन संस्कृती समजून घेता येत नाही त्याचप्रमाणे इलियड समजून घेतल्याशिवाय पाश्चिमात्य संस्कृती समजून घेता येत नाही.

ट्रोजनच्या या यु*द्धाचे वर्णन केलेल्या या महाकाव्याने आजतागायत लोकांवर गारूड निर्माण केले आहे. या महाकाव्यावर आजपर्यंत अनेकांनी खूप काही लिहिले आहे.

कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट, मूर्ती, शिल्प अशा अनेक कलांना आजपर्यंत या महाकाव्याने प्रेरणा दिलेली आहे. आजही देत आहे. अमेरिकेत अनेक शहरांची नवे या महाकाव्यातील शहराच्या नावावरूनच ठेवण्यात आली आहेत.

स्पार्टाची राजकुमारी हेलन जगतसुंदरी असल्याचे म्हटले जात होते. ट्रॉयचा राजा परीस तर हेलनला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता. हेलनच्या विवाहाचे वय झाले. तिचे वडील आणि स्पार्टाचे राजे किंग टिंडारेस यांना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. कारण, आजूबाजूच्या राज्यातील अनेक राजकुमारांना हेलनचे रूप म्हणजे यु*द्धाचे निमंत्रण असे वाटत होते.



अशावेळी ओडीसीस पुढे आला आणि त्याने यावर एक तोडगा काढला की, हेलनचा विवाह कुणाशीही झाला तरी सारे ग्रीक सैनिक त्यांचे रक्षण करतील. ओडीसीसने घेतलेल्या या पुढाकारामुळे राजा टिंडारेसच्या डोक्यावरील खूप मोठे ओझे उतरले. राजकुमारी हेलन आणि राजकुमार मॅनिलस यांचा विवाह लावून देण्यात आला.

हेलनचे लग्न झाले तरी राजकुमार परीसच्या मनातून तिचा चेहरा अजिबात हटत नव्हता. काहीही करून हेलनला आपण जिंकायचेच असा पण त्याने केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

यासाठी परीस एक राजकीय दूत बनून स्पार्टामधे गेला. राजकुमार मॅनिलस काही कामानिमित्त त्यावेळी राज्यापासून दूर गेला होता. हेलनने परीसचे स्वागत केले. या एका भेटीतच हेलनही त्याच्यावर फिदा झाली असल्याचे या महाकाव्यात म्हटले गेले आहे.

परीसने हेलनचे अपहरण केले आणि तिला आपल्या ट्रॉय शहरात घेऊन आला.

मॅनिलस जेव्हा स्पार्टामध्ये परत आला तेव्हा या बातमीने खूपच दुःखी झाला. पण ग्रीक राजांनी या दोघांचे रक्षण करण्याचे वचन दिले होते. आपले वचन पूर्ण करण्यासाठी ओडिसीसने सर्व ग्रीक राजांना एकत्र केले आणि राणीला परत घेऊन येण्यासाठी ट्रॉयच्या दिशेने कूच केली.

या यु*द्धात युनानी यो*द्धा अचीलीसदेखील सहभागी झाला. अचीलसच्या जन्मावेळी केलेल्या भविष्यवाणीनुसार त्याच्या मदतीशिवाय ट्रॉयचा पाडाव करणे अशक्य होते.

ग्रीक राजे ट्रॉयला पोहोचले तरी कुणाचीही ट्रोजनच्या जमिनीवर उतरण्याची हिंमत झाली नाही. कारण एका आकाशवाणीनुसार, ट्रोजनच्या जमिनीवर पहिल्यांदा उतरणारा यो*द्धा हा या यु*द्धातील पहिला बळी ठरेल. मरणाची कल्पना कुणाला सहन होते?! शेवटी ओडिसीसने पहिल्यांदा स्वतः यु*द्धात उतरण्याचा निर्णय घेतला. पण ओडिसीसने उतरण्यापूर्वी जमिनीवर आपली ढाल फेकली आणि त्याने पहिले पाउल आपल्या ढालीवर ठेवले. त्याच्यामागून प्रोटीलॉस उतरला. जो ट्रोजनच्या जमिनीवर पाउल ठेवणारा पहिला यो*द्धा ठरला आणि भविष्यवाणीनुसार ट्रोजनचा राजकुमार हेक्टरच्या हातून प्रोटीलॉस सर्वांत आधी मारला गेला.

जवळजवळ नऊ वर्षे झाली तरी ग्रीक यो*द्ध्यांना ट्रॉयचा पाडाव करणे शक्य झाले नाही. ग्रीक सैनिक आता निराश झाले होते. ग्रीक सैनिकांनीच परत जाण्याची मागणी सुरू केली पण अचीलसने त्यांना आठवण करून दिली की, हे यु*द्ध जिंकणे हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यांना स्वतःच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे आणि राणी हेलनला आपल्यासोबत माघारी न्यायचे आहे. या जोडप्याचे रक्षण करण्याचे आपण वचन दिले होते आणि दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे.

दहा वर्षे झाली तरी ग्रीक सैन्याला ट्रोजनचा पाडाव करणे शक्य झाले नव्हते. उलट ट्रोजनने मात्र युनानी सैनिकांची जहाजे नष्ट करून टाकली होती.

ग्रीक सैन्य आता परतीची भाषा बोलू लागले होते. अचीलसच्या मरणानंतर तर त्यांचा आत्मविश्वास खचला होता. पण ओडिसीसने आपल्या सैनिकांना पुन्हा एकदा बळ दिले. त्याने सातत्याने आपल्या सैनिकांना यु*द्धासाठी प्रेरित केले.

सरळ मार्गाने यु*द्ध जिंकता येत नाही हे लक्षात आल्यानंतर ओडिसीसने एक योजना आखली ज्यात ट्रोजनवासियांना गाफील करून त्यांच्याही नकळत शहरात घुसायचे आणि एकेका सैनिकाला कापून काढायचे.

यासाठी त्यांनी लाकडाचा एक मोठा घोडा तयार केला. जो आतून पोकळ होता. या घोड्यात ग्रीक सैनिक लपून बसले होते. हा लाकडी घोडा ट्रॉय शहराच्या प्रवेशद्वाराशी आणला गेला. ट्रोजनवासियांना वाटले की आता ग्रीकांनी हार मानली आहे आणि त्यांनी भेट म्हणून आपल्याला हा घोडा दिला आहे.

ग्रीकांनी पराभव पत्करल्याच्या आनंदात राजाने त्या घोड्याला ट्रॉय शहरात आणण्याचे हुकुम दिले. राजाच्या आज्ञेवरून तो घोडा शहरात आणला गेला. यु*द्धात मिळालेला विजय साजरा करण्यासाठी त्या रात्री शहरात एक जंगी पार्टी ठेवण्यात आली. सगळे ट्रोजनवासी नशेत आणि आनंदात धुंद असताना, घोड्यात लपून बसलेल्या ग्रीक सैनिकांनी रात्री शहरात प्रेवेश केला. नशेत असलेल्या सैनिकांना मारणे खूप सोपे गेले.

या ह*ल्ल्यात मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला. असंख्य सैनिक मारले गेले. शेवटी ग्रीकांनी ट्रोजनचा पाडाव केलाच.

ज्या शहराने त्यांना दहा वर्षे झुलवत ठेवले त्या शहराला बेचिराख करण्याच्या उद्देशाने सर्वत्र आग लावण्यात आली. शहरातील मंदिरे, राजवाडे, महाल प्रत्येक सुंदर वास्तूची तोडफोड करण्यात आली.

यानंतर आलेल्या वादळात ग्रीक सैनिक आणि त्यांचे म्होरकेही मारले गेले. ग्रीक सैन्यातील मोजके लोकच कसबसे घरी पोहोचण्यात यशस्वी झाले. हेलन तर स्वतंत्र झाली पण ग्रीकांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागली. या यु*द्धाने कुणाचाच फायदा झाला नाही हे अंतिम सत्य असले तरी आजही या यु*द्धातील प्रसंग अनेकांना प्रेरणा देतात.

काही जणांच्या मते प्रत्यक्षात असे यु*द्ध घडलेच नसून ही फक्त होमरची कवी कल्पना आहे. तर काही जणांसाठी ही एका रोचक यु*द्धाची सत्यकथा आहे. काही असले तरी होमरच्या या महाकाव्याने पाश्चिमात्त्य संस्कृतीचा पाया भक्कम केला हे मात्र खरे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कर्णन आवडलाय? मग साऊथ इंडियन चित्रपटांची ही यादी खास तुमच्यासाठी..!

Next Post

गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी याने लाकडी खोक्यातून स्वतःला पार्सल केलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी याने लाकडी खोक्यातून स्वतःला पार्सल केलं होतं

भटकंती - वड-पिंपळाच्या मुळांपासून बनवलेले मेघालयचे जिवंत पूल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.