The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

by द पोस्टमन टीम
15 January 2026
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


दिल्लीमधील अनेक सरकारी कॉलन्यांना नव्याने निर्माण करण्याची योजना सरकारने तयार केली असून या डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी सरकार त्या भागातील १४ हजार झाडे तोडण्याचा तयारीत आहे. परंतु सरकारचे मत आहे की नवीन प्रोजेक्ट अंतर्गत सरकार ग्रीन कव्हरेज झोन तीनपट मोठं करणार आहे.

सरकार इतक्या मोठ्या संख्येने वृक्षतोड करण्याची योजना राबवते आहे, यामुळे अनेक पर्यावरण प्रेमी चवताळून उठले आहेत. पण त्या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सरकारने त्या रिडेव्हलप केल्या जाणाऱ्या कॉलनीत आधी होते त्यापेक्षा अधिक झाडे असणार आहेत.

मंत्रालयाचे म्हणणे आहे की जेव्हा हा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा २३, ४७५ झाडे असणार आहेत. रिडेव्हलपमेंट प्रक्रियेदरम्यान २१ हजार ६८३४ झाडे वाचणार आहेत, त्यापैकी १२१३ झाडांचे पुनर्रोपण  करण्यात येणार आहे. परंतु ही पुनर्रोपण अथवा ट्रान्सप्लांटची प्रक्रिया कशी राबविली जाणार आहे, याबाबत संभ्रमावस्था अजूनही कायम आहे.

ट्रान्सप्लांट म्हणजे काय?

कृषी आणि बागकाम क्षेत्रात ट्रान्सप्लांट करणे म्हणजे एखाद्या वृक्षाला अथवा रोपाला नुकसान पोहचवता त्याची दुसऱ्या ठिकाणी पुन्हा लागवड करणे.

एक झाड मूलस्थानावरून उखडून टाकत दुसऱ्या जागी त्याचे पुनर्रोपण  करता येते का?

सर्वच झाडांच्या बाबतीत ही प्रक्रिया शक्य नाही. अनेक झाडांची मुळे ही फार मोठया परिघात पसरलेली असतात. त्या झाडांची एकमेकांमध्ये गुंतागुंत जास्त असते, अशा झाडांचे पुनर्रोपण करणे अशक्य असते. परंतु काही झाडांमध्ये आपण झाड पुन्हा लावून त्याला सफलतापूर्वक पुनर्जीवित करू शकतो. ट्रान्सप्लांटच्या प्रक्रियेत झाड मरण्याची शक्यता जास्त होती, त्यामुळे झाडाची काळजी घेणे फार गरजेचे होते.



एखाद्या झाडाचे पुनर्रोपण  करण्यासाठी वर्षातील कुठला काळ उत्तम असतो?

झाड आणि वृक्षांना पुनर्रोपित करण्यासाठी वसंत ऋतूच्या आधीचा काळ सर्वोत्तम असतो. या काळात मोठ्या वेगाने मुळांचा विकास होतो. मुळांचा उत्तम विकासासाठी त्यांची स्थिती देखील अत्यंत नॉर्मल व उत्तम असणे आवश्यक असते. ज्या मातीत पुनर्रोपण  करण्यात येणार आहे ती ओलसर असावी व झाडाच्या मुळांमध्ये देखील ओलसरपणा असणे आवश्यक असते.

आजपर्यंत पुनर्रोपण  करण्यात आलेले सर्वात मोठे झाड कोणते?

गिंगको बायलॉबा या जातीचे याँगगिरी जिनको हे ७५० वर्ष जुने झाड त्याचा मूळस्थानावरून दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपित करण्यात आलेले सर्वात मोठे झाड आहे. हे झाड २९ मीटर ( ९५ फूट १.७३ इंच) इतके उंच असून, त्याचा मुळांचा विस्तार हा ३३ मीटर ( १०८ फूट ३.२१ इंच) इतका आहे. या वृक्षाचे वजन १२५० मॅट्रिक टन इतके असून त्याचा खोडाचा विस्तार १३ मीटर इतका आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

झाडाच्या आसपासच्या किती मोठ्या भागाला पुनर्रोपित करणे शक्य आहे?

झाडाची उंची जर साधारण ३ फूट इतकी असेल तर त्याच्या आसपासच्या १ इंच जागेची ( ज्याची मातीच्या स्तरावर ६ इंच मोजणी करण्यात येते) कुठल्याही रूट बॉलची निर्मिती न करता सहजपणे स्थलांतरीत करून पुनर्रोपन पुनर्रोपण  करता येते. ३ आणि ४ वर्ष वय असलेल्या झाडांना रूट ट्रान्सप्लांट पद्धतीने एका ठिकाणाहून दुसरीकडे सहजपणे स्थलांतरीत करण्यात येते.

जर झाड जुने अथवा जास्त वयाचे असेल तर त्याचा स्थलांतर व पुनर्रोपण करण्यासाठी रूट बॉल पद्धतीचा अवलंब करण्यात येतो.

ट्रान्सप्लांट (पुनर्रोपण) करताना काय काळजी घ्यायला हवी?

ट्रान्सप्लांटच्या मदतीने उखडलेल्या झाडाला वाचवता येणे सहजशक्य आहे. फक्त त्याचा मुळांमध्ये ओलावा टिकायला हवा व रूट बॉल तसाच असायला हवा. रूट बॉलचे अस्तित्व झाडाच्या वयावर अवलंबून असते. ट्रान्सप्लांटनंतर ५ ते १० वर्षांच्या झाडांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

२० वर्षाहून अधिक वयाचे झाड नव्या पर्यावरणाशी सुसंगत होण्यासाठी सक्षम नसतात. अनेक वर्षांपासून तिथेच असलेली झाडे दुसऱ्या जागेवर विकसित होऊ शकत नाही आणि त्यातून काही उत्पन्न होण्याची शक्यता कमी असते. स्थान, मातीचा प्रकार, खोडाची रचना, झाडाचा विस्तार यावर देखील पुनर्रोपणाची प्रक्रिया अवलंबून असते.

पुनर्रोपणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मूळ ओलसर आहेत की नाही हे सुनिश्चित केले जाते. नव्या मुळांचा विकास होईपर्यंत त्यांच्या संगोपनासाठी खते, कीटकनाशके आणि जौविक उत्प्रेरके यांचा वापर करत रहायला हवा.

पंगम, मंथराई, पुरासू, भारतीय मूग, कैसुरीना, आंबा, पिंपळ, नारळ, नेटलींगम, सीताफळ, रामफळ, इत्यादी झाडांचे ट्रान्सप्लांट (पुनर्रोपण) करता येते.

भारतातील वनस्पती पुनर्रोपण-

दिल्लीमध्ये ट्रान्सप्लांट करताना झाडाचा मृत्यू होऊ नये यासाठी ही प्रक्रिया सिंगापूरच्या एका खास मशीनच्या मदतीने पार पाडली जाणार आहे. दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देताना म्हटले होते की जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

सिंगापूरमध्ये झाडांच्या पुनर्रोपणासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा ही विश्वविख्यात असून या यंत्रणेमुळे झाडांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील अत्यल्प असते.

मुंबईमध्ये ट्रान्सप्लांट करण्यात येणाऱ्या झाडांची जीवनक्षमता ७० हुन ९० टक्क्यापर्यंत वाढवायला ही मशीन वापरली जात असून या मशिनचा खर्च १५ कोटी रुपये इतका आहे.

सिंगापूरच्या पद्धतीनुसार सुरुवातीला झाडांच्या फांद्या व मुळांच्या संख्येत घट केली जाते आणि त्यानंतर त्याला प्रत्यारोपण करण्यासाठी वापरले जाते. याच कारणामुळे सिंगापूरमध्ये झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण भारतातील पुनर्रोपण पद्धतीपेक्षा काही जास्त प्रमाणात आहे. सिंगापूरमध्ये झाडाच्या रूट बॉललाच नाहीतर आसपासच्या मोठ्या भूखंडालाच दुसरीकडे पुनर्रोपित करण्यात येते. ह्या प्रक्रियेत झाडाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

Next Post

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

अवघ्या विसाव्या वर्षी मृत्यूला कवटाळण्याआधी या तरुणाने गणिताला नवीन सिद्धांत दिला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.