The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉकडाऊनमध्ये स्वतःचे दागिने गहाण ठेऊन घरोघरी राशन पोहचवत आहे तृतीयपंथी समाज

by द पोस्टमन टीम
7 May 2020
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लॉकडाऊनमुळे तर देशात आणीबाणीची परिस्थिती ओढवली आहे. हातावर पोट असणारे मजूर असतील नाही तर बाहेरगावी शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची परिस्थिती अगदी दयनीय झाली आहे.

लॉकडाऊनमुळे अडकुन पडलेल्या कित्येक जणांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. तरी माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय देत अनेक सेवाभावी संस्था व कित्येक लोक स्वयंस्फूर्तीने या रोगाशी सामना करत अशा अडकलेल्या लोकांपर्यंत शक्य तेवढी मदत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या सगळ्यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा, अशी एक गोष्ट नुकतीच गुजरातमधील बडोदा शहरात पाहायला मिळाली. वर्षानुवर्षे छक्का, हिजडा म्हणून हिणवला जाणारा तृतीयपंथी समाज देखील लोकांना मदत करायला पुढे सरसावून आलेला पाहायला मिळत आहे.

एकतर सध्या अशी परिस्थिती ओढवली आहे की या समाजाकडे कमाई करण्याचा कोणताच मार्ग शिल्लक नाही तरी पुढे येऊन या समाजाने शहरात आधी गरजूंना जेवण पुरवले तर आता घरोघरी जाऊन धान्य वाटप करत आहेत.



तृतीयपंथी असणाऱ्या नूरी कुंवरने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,”एके दिवशी मी एका घरातून लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला, कानोसा घेऊन पाहिलं तर एक आई आपल्या ५-६ वर्षाच्या एका मुलाला मारत होती, नंतर कळाले की त्या मुलाला भूक लागली होती म्हणून तो खायला मागत होता. पण घरात काहीच नव्हते आणि ही परिस्थिती तेथील स्थानिक वस्तीमधील बऱ्याच घरांची होती”. म्हणून नूरी आणि तिच्या समुदायातील बाकी जणींनी ठरवले की आपण या लोकांची मदत करायची.

लॉकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात नूरी आणि तिच्या समूहाने आसपास राहणाऱ्या तब्बल ७०० कुटुंबाना एक आठवडा पुरेल इतके पीठ, गहू, तांदूळ, साखर, चहापत्ती, तेल आणि मसाल्यांचे वाटप केले.

एवढेच नाही, तर वस्तीमधील गरीब घरांमध्ये जाऊन तयार अन्न देखील लोकांना वाटप केले. नूरीने या सगळ्या लोकांना स्वतःचा व आपल्या बहिणींचे मोबाइल नंबर देखील देऊन ठेवले आहेत आणि सांगितले आहे की तुम्हाला व तुमच्यासारख्या अजून कोणी गरजू असतील त्यांना काही मदत लागली तर सांगा आम्ही अवश्य मदत करू.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

आपल्या समाजामध्ये तृतीयपंथीयांना कायमच तिरस्काराच्या नजरेने पाहिले जाते. कोणीही काम देत नसल्यामुळे या लोकांना ट्रेन, बस आणि सिग्नल वर भीक मागावी लागते. कोणाच्या घरी मूल जन्माला आलं तर तिथे आशीर्वाद देण्यासाठी बोलावलं जातं आणि त्या बदल्यात पैसे दिले जातात एवढीच काय ती त्यांची सन्मानाची कमाई.

लॉकडाऊन मुळे तर कमाईचे सगळेच मार्ग आता बंद पडले आहेत तरी यातून मार्ग काढून आज त्या लोकांची मदत करत आहे हे खरंच अभिमानास्पद आहे.

नूरीने सांगितलं की सोन्याचे दागिने आमच्या समाजात खूप प्रिय आहेत. पण आम्हाला अशा संकटाच्या काळात सोन्यापेक्षा गरजूंना मदत करणे जास्त महत्वाचे वाटले. रोज आम्हाला जगण्यासाठी मरमर करावी लागते. भुकेचे दुःख आमच्यापेक्षा चांगले कोण ओळखू शकतं, त्यामुळे अडचणीमधल्या लोकांना पाहून त्यांच्या मदतीसाठी सगळे दागिने गहाण ठेवायला आमच्यापैकी कोणालासुद्धा जरादेखील वाईट वाटले नाही. त्यातूनच ही सगळी मदत सुरू आहे, जेवढं आमच्याकडून शक्य होतंय आम्ही करत आहोत.

भारताचे पहिले समलैंगिक राजकुमार मानवेंद्र सिंग गोविल हे LGBT (समलैंगिक) समुदायासाठी भारतात व भारताबाहेरदेखील काम करतात. गुजरातमधील अशा लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी ‘द लक्ष्य’ नावाचे ट्रस्ट देखील चालू केले आहे.

गोविल सांगतात की तृतीयपंथीयांसाठी हे लॉकडाऊन इतर लोकांपेक्षा वेगळे आहे. इतर वेळी देखील हे लोक लॉकडाऊन सारखंच आयुष्य जगतात. सामान्य लोकांपासून अंतर राखून जगणे यांच्यासाठी सामान्य गोष्ट आहे.अशातच लोकांकडून सतत तिरस्कार व मानहानी झेलूनसुद्धा कोणाच्या मदतीशिवाय हा समाज आज गरीब गरजूंना जी मदत करत आहे ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे.

‘द लक्ष्य’ साठी काम करणाऱ्या शोभा सांगतात की, जेंव्हा नूरी व तिच्या सहकाऱ्यांनी आपल्या बचतीच्या पैशातून मदत करण्याचे ठरवले तेव्हा सगळ्याजणींनी  मिळून व्हिडिओ कॉलिंगद्वारे एक मिटिंग केली आणि नंतर प्रशासकीय परवानगी व पासेस मिळवले. नंतर रिक्षाद्वारे जाऊन अशा घरांची निवड केली की जिथे खाण्यासाठी काहीसुद्धा नाही.

पहिले १५-२० दिवस तर त्यांनी सर्वांना बनवलेल्या जेवणाचे वाटप केले, पण लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी जवळपास १००० पेक्षा जास्त रेशनचे पाकीट बनवून त्याचे वाटप केले. वाटप करताना त्यांनी सोशल डिस्टंसिंगची देखील काळजी घेतली. वस्तीमध्ये जाऊन नूरी व तिच्या मैत्रिणी मोठ्याने ओरडून सांगत की सामान तुमच्या दरवाज्यामध्ये ठेवले आहे त्यासाठी बाहेर यायची गरज नाही, जेणेकरून संसर्गाचा धोका टाळता येईल.

स्वतः उपेक्षितांसारखे जीवन जगणाऱ्या नूरी व तिच्या सहकाऱ्यांनी या कठीण काळात आपले दागिने गहाण ठेऊन जे योगदान दिले आहे त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला ‘द पोस्टमन’ टीमचा सलाम!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जगभरातील सरकारांना धडकी भरवणारा ‘द ग्रेट हॅकर’ जुलिअन असांज

Next Post

चेन मेसेजिंगमुळे आपल्या भारतात शैक्षणिक क्रांती झालीये

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

चेन मेसेजिंगमुळे आपल्या भारतात शैक्षणिक क्रांती झालीये

समाजातील ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत कबीरांनी मृत्यूसाठी मगहर हे ठिकाण निवडले

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.