The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सतरा वर्षाचा ‘विली’ दोनवेळा मृत्युदंडाला सामोरा गेला होता..!

by द पोस्टमन टीम
21 June 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मृत्यूदंडाची शिक्षा असावी की नाही याबाबत जगभरात मतभेद असले तरीही गुन्हेगाराला दोनदा या शिक्षेला सामोरं जाण्याची वेळ क्वचितच येते. कॅन्सस येथील विली फ़्रान्सिस या सतरा वर्षीय तरूणाला दुर्दैवानं दोनदा मृत्यूला सामोरं जावं लागलं आणि त्याहून दुर्दैव म्हणजे त्याच्या गुन्हेगार असण्यावर प्रश्नचिन्ह होतं.

तुम्हीपण चक्रावले ना? नक्की काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा!

१९४४ साली कॅन्सस येथे अशी एक विचित्र फाशीची घटना घडली की सार्‍या जगाचं लक्ष तिने वेधून घेतलं. १७ वर्षीय विली फ़्रान्सिस हा लुझियाना येथील कृष्णवर्णीय फ़्रान्सिस कुटुंबातील तेरा अपत्यांपैकी सर्वात धाकटा मुलगा होता.

लुझियाना येथील सेंट मार्टिनव्हिलेमधल्या ५३ वर्षीय ॲण्ड्र्यू थॉमस या फ़ार्मसिस्टचा खू*न केल्याचा गंभीर गुन्हा या कोवळ्या तरूणावर दाखल केला गेला. थॉमस त्याच्या घराबाहेरच मृतावस्थेत आढळला. त्याला पाच गोळ्य़ा घालून निघृणपणे ठार मारलेलं होतं.

त्याच्या या खु*नात संशयीत म्हणून विलीला अटकही झाली आणि नंतर त्याचा गुन्हा सिध्द होऊन त्याला शिक्षाही करण्यात आली.



विलीला खुर्चीत बसवून विजेचा झटका देऊन मृत्यू देण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. मात्र विचित्र योगायोग असा की दोन्ही वेळेस काही तांत्रिक कारणांमुळे तो अक्षरश: मृत्यूच्या जबड्यातून परतला.

यातली पहिली शिक्षा ३ मे १९४६ रोजी करण्यात आली. विलीला एका खुर्चीवर बसविण्यात आलं आणि त्याच्या या शिक्षेची अंमलबजावणी करणारा डेप्युटी विलीला म्हणाला की, ”विली काळजी करू नकोस. तुला काहीही वेदना होणार नाहीत. तुला काही जाणवणारही नाही.” यावर नंतर विलीनं सांगितलं की, ”त्यावेळेस मला वेदना होतील किंवा नाही याची मला पर्वाही नव्हती. मला एकाच गोष्टीची काळजी वाट होती की, हे लोक मला खरोखरच मृत्युदंड देणार आहेत का? नंतर आढळून आलं की ज्या खुर्चीवर मला बसविण्यात आलं होतं ती योग्यप्रकारे ठेवलीच नव्हती.”

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ही जबाबदारी ज्या दोन अधिकार्‍यांवर होती ते कॅप्टन फ़ोस्टर आणि त्यांचे सहकारी इलेक्ट्रिशियन असणारे विंन्सेंट व्हेनेझिआ हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. हातातून बटण सटकल्यानं विली खुर्चीवर थरथरू लागला. ही घटना फ़्रान्सिसनं अशी वर्णन केलेली आहे, ”फ़ोस्टरनं बटण दाबण्यापूर्वीच मला अत्यानंदानं गुडबाय विली म्हणून अखेरचा निरोप दिला. मलाही खरंतर कॅप्टन फ़ोस्टरला अखेरचं गुडबाय म्हणायचं होतं. मात्र मी प्रचंड घाबरलो होतो त्यामुळे माझ्या तोंडून गुडबायच काय पण एक शब्दही फ़ुटला नाही. माझे हात खुर्चीला अतिशय घट्ट बांधले होते. बटण दाबल्यानंतर क्षणात माझ्या शरीरात स्फ़ो*ट झाल्यासारखं मला वाटलं आणि हजारो सुयांनी कोणीतरी टोचतंय असं वाटू लागलं.

माझा डावा पाय ब्लेडनं कोणीतरी कापत आहे अशा वेदना मला होऊ लागल्या. माझे हात अक्षरश: थडथड उडत होते. हातच काय पण क्षणार्धात माझं संपूर्ण शरीरच खुर्चीत थडाथड उडायला लागलं होतं ज्यावर आता माझं काहीही नियंत्रण उरलं नव्हतं. काही सेकंदांसाठी हे सगळं झाल्यावर सगळं शांत झालं आणि मी खुर्चीवर शांत बसलो होतो. मला खात्री पटली होती की मी मेलो होतो. त्यानंतर माझ्या कानावर कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज आला- मला आणखीन थोडा ज्युस द्या आणि त्यानंतर कोणीतरी ओरडलं की, जितकं होतं तितकं मी दिलं आहे.

हे सगळं घडत असतानाच तो नव्हताच हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि खुर्चीत काहीतरी बिघाड असल्यानं हे घडलं असावं असा अंदाज लावत त्यांनी फ़्रान्सिसला खुर्चीवरून सोडवलं. त्यानंतर फ़्रान्सिसला आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आलं.

 त्यावेळेस कॅप्टन फ़ोस्टर फ़्रान्सिसकडे बघून ओरडला की यावेळेस तुझी सुटका झालेली असली तरीही पुढच्यावेळेस मी तुला सोडणार नाही.

यानंतर चवताळलेल्या फ़ोस्टरनं फ़्रान्सिसला ज्या खुर्चीवर मृत्यूदंड द्यायचा होता ती खुर्ची दुरुस्त करुन शिक्षेची अंमलबजावणी तातडीनं केली असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही घडलं नाही. अर्थात सुरवातीची योजना तीच होती मात्र यावेळेस फ़्रान्सिसचे वडील, फ़्रेडरिक समस्या बनून समोर उभे ठाकले. ते या एकूणच न्यायप्रक्रियेबाबत असमाधानी होते. आपल्या मुलाचा खटला योग्य पध्दतीनं लढला गेला नसल्याची त्यांची तक्रार होती. फ़्रेडरिक यांनी एक वकिल शोधला- बेट्राण्ड दे ब्लान्च जो ॲण्ड्र्यू थॉमस यांचा चांगला मित्रही होता.

फ़्रेडरिक आणि फ़्रान्सिसकडे वकिलाची फ़ी देण्याइतके पैसे नव्हते मात्र त्यानं त्याबदल्यात आपल्या बगिच्यातून ताजा भाजीपाला आणि फ़ळं घेण्याची गळ वकिल महाशयांना घातली. पुढे हा खटला वर्षभर चालला. बेट्राण्डनं हा खटला स्वीकारण्याचं कारण फ़्रान्सिसचं निरपराध असण्याची शक्यता मानणं नव्हतं तर त्याला हे पटत नव्हतं की एखाद्या जिवंत माणसाला दोनदा विजेच्या खुर्चीवर बसवून मरण यातनांतून जायला लागावं. ही पूर्णपणे यंत्रणेची आणि अधिकार्‍यांची चूक होती त्याचा परिणाम फ़्रान्सिसनं का भोगायचा? हा त्याचा सवाल होता. अशा प्रकारच्या भयकारक आणि निर्दयी विचित्र शिक्षा एखाद्याला भोगायला लावणं मानवतेविरोधात असल्याचं त्याचं म्हणणं होतं.

जसजशी केस पुढे सरकू लागली. या गुन्ह्याचा फ़ेरतपास होऊ लागला तेव्हा धक्कादायक सत्य समोर येत गेलं.

यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की सुरवातीला पोलिसांनी विलीला ॲण्ड्र्युच्या खु*नाच्या गुन्ह्यासाठी अटक केलेलीच नव्हती. गुन्हा घडला त्या ठिकाणाहून १५० मैलांवरून विलिला या खु*नाशी संबंध नसणारं कारण देत अटक करण्यात आली होती.

विली त्याच्या बहिणीला भेटायला चालला होता आणि फ़्रान्सिसकडे एक सुटकेस होती. त्या प्रवासात त्याला ड्र*ग्ज बाळगल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. चौकशीअंती हे सिध्द झालं की फ़्रान्सिस हा ड्र*ग्ज ट्राफ़िकर नाही.

पण आता त्याला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्याला कायदेशीर आधार नसल्यानं पोलिसांनी त्याची कसून चौकशी चालू केली आणि काही मिनिटांतच फ़्रान्सिसनं दरोड्याच्या कबुली जबाबावर सही केली होती. दुसर्‍या दिवशी त्यात खु*नाचाही समावेश झाला आणि अवघ्या चोवीस तासात फ़्रान्सिसनं एक खू*न आणि एक दरोड्याची कबुली देणार्‍या जबाबावर सही केली होती. सुरवातीला फ़्रान्सिसनं त्याच्यासोबत आणखीन दोघेजण यात सहभागी असल्याची कबुली दिली होती मात्र नंतर त्यानं हे कृत्य एकट्यानंच केल्याची कबुली दिली.

विलीच्या कबुली जबाबानंतर केसचा निकाल लागलाच होता. मात्र विलीचं वय लक्षात घेता त्याच्या कबुलीजबाब आणि त्याची करण्यात आलेली तपासणी हे लक्षात घेणं महत्त्वाचं होतं. दुर्दैवानं आधी विलीला वकीलच नसल्यानं या कोणत्याच गोष्टी लक्षात न घेता गुन्हा सिध्द करून त्याला मरणाच्या दाढेत ढकलं होतं. मात्र आता परिस्थिती बदलली होती. विलीला वकील मिळाला होता जो त्याच्या कामात निष्णात होता. आता मुळापासून पुरावे हादरण्यास सुरवात झाली. ज्या पिस्तुलानं खू*न केल्याचा आणि ती चोरल्याचा गुन्हा विलीवर होता त्या पिस्तुल चोरीची नोंद, तिच्या तारखा यात घोळ होता.

पिस्तुल पुन्हा एकदा फ़िंगरप्रिंट तपासाला पाठविली गेली, थॉमसच्या शरीरातल्या गोळ्या आणि पिस्तुलातील गोळ्या यांची तपासणी करण्याचे फ़ेरआदेशही देण्यात आले. पहिल्या तपासात पोलिसांनी यात ढिसाळपणा करत चौकशी केलेली नव्हती. आश्चर्याची गोष्ट ही की जी पिस्तुल खु*नाच्या दिवशी सकाळी विलीनं चोरली आणि त्याच दिवशी ॲण्ड्र्युचा खू*न केल्याची कबुली दिली होती त्या पिस्तुलाच्या चोरीची तक्रार पोलिसठाण्यात महिनाभर आधीच करण्यात आलेली होती.

ज्या पद्धतीनं ॲण्ड्र्युला गोळ्या घालण्यात आलेल्या होत्या त्या पिस्तुल चालवता येणार्‍या एखाद्या सराईताकडून घालण्यात आल्या होत्या याचं कारण त्या अचूक वेध घेणार्‍या होत्या. फ़्रान्सिससारख्या सतरा वर्षाच्या मुलाला, ज्यानं कधी पिस्तुल हातातही धरलं नव्हतं, त्याला हे करणं अशक्य होतं. आता केसमधले अनेक धागे समोर येऊ लागले होते. जसं की, ॲण्ड्र्युच्या घरातून चोरी केलेला माल विलीनं जिथे विकला त्या दुकानदारानं विलीला ओळखलं नाही, ॲण्ड्र्युच्या शेजार्‍यांनी खु*नाच्या आदल्या रात्री एक अनोळखी कार त्याच्या घराबाहेर रात्रभर संशयास्पदरीतीने बघणं आणि खुनानंतर ती गायब होणं.

आता या केसची चर्चा होऊन तिला प्रसिध्दी मिळाली आणि फ़्रान्सिस गुन्हेगार नसल्यानं त्याच्या मृत्यूदंडावर स्थगिती आणण्याची याचिका दाखल करण्यात आली. फ़्रान्सिस शहरात अनेकांच्या परिचयाचा होता कारण तो असंख्य प्रकारची कामं करत असे. मनमिळावू आणि स्वभावानं अतिशय चांगला अशीच त्याची ओळख होती.

फ़क्त तो सतत खोड्या करून लोकांना फ़सवत असे मात्र हा त्याचा वयानुरूप असणारा खोडकरपणा होता त्यानं त्याची गुन्हेगारीवृत्ती सिध्द होत नाही असं त्याला ओळखणार्‍यांचं मत होतं. 

एकूणच विलीन केलेल्या कथित गुन्ह्याभोवतीचं प्रश्नचिन्ह विरत जाऊन त्याच्या दोषी नसण्याकडे जनमत झुकू लागलं होतं. विलीची मत्यूदंडाची शिक्षा रहित करुन त्याची सुटका करा किंवा किमान त्याला जन्मठेप द्या, मात्र मृत्यूदंड करणं हे विलीवर अन्याय करणारं आहे अशी मागणी लोक रस्त्यावर येऊन जाहिरपणे करू लागले. आता पाच जणांच्या जज पॅनलकडे ही केस आली चार विरुध्द एक अशी मतं पडली आणि विलीची शिक्षा पक्की झाली. ब्लान्सनं आपल्यापरीनं खूप प्रयत्न केले. त्यानं विलीलाही समजावण्याचा प्रयत्न केला की तू तुझा जबाब मागे घे मात्र विलीनं त्याचा जबाब मागे घ्यायला नकार दिला.

अखेर त्याच्या अठराव्या वाढदिवसादिवशी त्याला मृत्यूदंड देण्यात आला. 

विलीच्या गुन्ह्याबाबत नंतरही प्रश्नचिन्हं उपस्थित केली गेली. त्यानं खु*नाचं कारण कधीही न सांगणं, कारागृहाच्या भिंतीवर मी खु*नी नाही लिहिणं आणि ॲण्ड्र्युचं पाकिट जे पोलिसांना त्याच्या खिशात आढळलं ते त्यानं विनाकारण बाळगणं याची समाधानकारक उत्तरं कधीच मिळाली नाहीत. आपल्या कुटुंबाला यातनांतून जाऊ लागू नये म्हणून त्यानं मौन पाळल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

युट्युबवरचा पहिला व्हिडीओ कोणता असा प्रश्न कधी पडलाय का..? तर हे घ्या उत्तर..!

Next Post

परिसा तब्रीज – ‘गुगल’ला हॅकिंगपासून वाचवणारी प्रिन्सेस

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

परिसा तब्रीज - 'गुगल'ला हॅकिंगपासून वाचवणारी प्रिन्सेस

ज्या बेटावरून श्रीराम लंकेवर चाल करून गेले होते ते बेट कॉंग्रेसने श्रीलंकेला देऊन टाकलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.