The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमसारखे प्लॅटफॉर्म्स कमाई कसे करतात?

by द पोस्टमन टीम
15 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


२०२०-२१ मध्ये कोरोनामुळे सगळी सार्वजनिक ठिकाणं बंद होती. एकूणच सगळ्या व्यवसायांवर आणि साहजिकच अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा वाईट परिणाम झालेला दिसून आला. टीव्हीवरील मालिकांचेही चित्रीकरण थांबवण्यात आले होते. चित्रपटगृहदेखील बंद असल्याने बरेच दिवस नवीन चित्रपट प्रदर्शित झाला नाही. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा कल ऑनलाइनच चित्रपट आणि मालिका बघण्याकडे झुकला.

अशा वेळी नेटफ्लिक्स, ॲमेझोन प्राईम, डिस्ने हॉटस्टार इत्यादी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट प्रदर्शित होत होते. त्यावेळी यांवर शकुंतला देवी, दिल बेचारा, गुंजन सक्सेना आदी चित्रपट प्रदर्शित झाले.

फक्त भारतातचच नाही तर इतर देशातही या प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट प्रदर्शित झाले. अर्थात इथे १०० करोड, ५०० करोड, बॉक्स ऑफिस अशा भानगडी नाहीत.

पण मग हे प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेले चित्रपट कमाई कसे करतात?

तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर अर्थातच त्यांना चित्रपट प्रदर्शित करण्याचे राईट विकावे लागतात. प्रत्येक प्लॅटफॉर्मचे रेट्स वेगवेगळे असतात. आता तुमचा चित्रपट जर का वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध असेल तर प्रत्येक व्हर्जनची किंमतही वेगवेगळी असते.



आता काही चित्रपटांच्या सुरुवातीला लिहून येतं बघा “Netflix Original” असं किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघत असाल त्याचं नाव आणि पुढे ओरिजिनल. मग ही काय भानगड आहे?

तर, बरेचदा काय होतं हे प्लॅटफॉर्म निर्मात्यासोबत चित्रपट बनवण्यासाठी डील करतात. म्हणजे एक रकम ठरवायची आणि त्यात चित्रपट बनवायचा या प्लॅटफॉर्मच्या नावाने. आता यातील चित्रपट बनवण्यासाठी किती वापरायचे आणि नफा किती काढायचा हे त्या निर्मात्याच्या स्किल्सवर अवलंबून असतं.

हे झालं निर्मात्यांचं. पण मग निर्मात्याला द्यायला हे प्लॅटफॉर्म पैसे कुठून आणतात? तुम्ही समोरच्याला तेव्हाच नफा मिळवून देऊ शकता जेव्हा तुम्हाला स्वतःला नफा मिळत असेल.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

यासाठी तीन मार्ग असतात.

SVOD (सब्स्क्रीप्शन व्हिडिओ ऑन डिमांड)

यामध्ये प्रेक्षकांकडून एक विशिष्ट रक्कम दर महिन्याला किंवा वर्षाला घेतली जाते. त्या बदल्यात त्यांना या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले व्हिडिओ बघायला मिळतात. यातही वेगवेगळे पॅक्स उपलब्ध असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईम.

AVOD (ऍडव्हर्टाइसिंग व्हिडिओ ऑन डिमांड)

याचं उदाहरण म्हणजे युट्यूब. युट्युबच्या व्हिडीओमध्ये ज्या जाहिराती लागतात त्या जाहिरातींमधूनच त्यांची कमाई होते.

TVOD (ट्रान्सॅक्षनल व्हिडिओ ऑन डिमांड)

यामध्ये तुम्हाला फक्त जे व्हिडीओ तुम्ही बघणार आहात त्याच व्हिडीओसाठी पैसे भरावे लागतात. उदाहरणार्थ, गुगलप्ले आणि आयट्युन्स.

एकूणच या प्लॅटफॉर्म्सचं बिझनेस मॉडल खूप साधं, पण काम फार हेक्टिक आहे.

जी मजा मोठ्या पडद्यावर चित्रपट बघण्यात आहे ती मजा हातात फोन घेऊन त्यावर बघण्यात नाही कारण इथे लोकांची कमेंट्री, शिट्ट्या ऐकू येत नाही ना!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या अधिकाऱ्याचे शौर्य बघून लाल बहादूर शास्त्रींनी “जय जवान जय किसान”चा नारा दिला होता

Next Post

जेम्स बॉण्डने कॅडबरी जेम्सला कोर्टात खेचलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जेम्स बॉण्डने कॅडबरी जेम्सला कोर्टात खेचलं होतं

लई भारीसारखा रेकॉर्डब्रेक चित्रपट करूनही या मराठी दिग्दर्शकाचं नाव फार कुणाला माहिती नव्हतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.