The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकाचवेळी हा माणूस अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनचा गुप्तहेर म्हणून काम करत होता

by द पोस्टमन टीम
4 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्तीही आपल्यातील हुशारी, धाडस आणि चातुर्याच्या जोरावर खूप मोठी झेप घेऊ शकते, हे आपण आजवर अनेक उदाहरणांतून पाहिलं आहे, वाचलं आहे, ऐकलं आहे. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात असाच एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ब्रिटिशांसाठी गुप्तहेराचे काम करत होता. सुरुवातीला त्याने जेंव्हा ब्रिटीश अधिकाऱ्याकडे या कामासाठी चौकशी केली तेव्हा वारंवार त्याला नकार देण्यात आला. पण म्हणतात ना, “जब सिधी उंगली से घी ना निकले, तो उंगली टेढी करनी पडती हैं,” त्याने असंच काहीसं केलं. नंतर खुद्द ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला शोधून आपल्या गुप्तहेर खात्याचा डबल एजंट बनवला.

पहिल्या महायु*द्धात ब्रिटिशांच्या गुप्तहेराचे काम करणाऱ्या गार्बो या गुप्तहेराची ही रसभरीत कहाणी वाचल्यानंतर तुम्हीही आश्चर्याने थक्क व्हाल.

त्याचा जन्म १९१२ साली एका स्पॅनिश कुटुंबात झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने शाळा सोडली आणि हाताला मिळेल ते काम करू लागला. अनेक व्यवसाय करून पहिले पण त्याला कशातच यश मिळाले नाही. शेवटी गृहयु*द्धाच्या काळात सक्ती करण्यात आल्याने तो स्पॅनिश सैन्यात भरती झाला. एकीकडे हुकुमशाही राजवट आणि दुसरीकडे कम्युनिस्ट राजवट या दोन्हीतील फोलपणा लक्षात आल्याने काही काळ तो अगदी निराश झाला होता.

दुसरे महायु*द्ध सुरु झाले तेव्हा त्याने ठरवले की आपण ब्रिटिशांना मदत करायची. तीन वेळा तो ब्रिटनला गेला आणि आपण ब्रिटनसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले पण, प्रत्येक वेळी त्याला नकार देण्यात आला. दरवेळी नकार ऐकून त्याने एक वेगळीच शक्कल लढवली.



त्याने आपण एक ना*झी-समर्थक असल्याची वेगळी ओळख आणि त्यासाठी वेगवेगळे पुरावे तयार केले. आवश्यक त्या कागदपत्रांसह तो जर्मनीमध्ये पोहोचला. जर्मन अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्याने आपण जर्मनसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्यास तयार असल्याचे सांगितले.

त्याने सादर केलेल्या सर्व कागदपात्रांची तपासणी केल्यानंतर जर्मन अधिकाऱ्यांनी त्याला जर्मनसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्याची परवानगी दिली. त्याला आवश्यक ते सगळे प्रशिक्षणही जर्मनीत दिले गेले. शिवाय, त्याला पैसे आणि इतर आवश्यक त्या सुविधाही पुरवण्यात आल्या. त्याने स्वतःसाठी ॲलरिक हे सांकेतिक नाव घेतले.

इंग्लंडमध्ये जाऊन तिथे इंग्लंडची गुप्त माहिती काढून देणाऱ्या एजंटची साखळी बनवण्याचे त्याला आदेश देण्यात आले. खरे तर त्याला जर्मनीसाठी काम कारायचे नव्हतेच. ती त्याची फक्त एक खेळी होती. तो इंग्लंडला न जाता पोर्तुगालला गेला. तिथल्या पेपरमधून, रेडीओवरून सांगण्यात येणाऱ्या बातम्यांतून तो जर्मनीला इंग्लंडबद्दल काही ना काही माहिती देऊ लागला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

त्यामुळे त्यांचाही याच्यावर विश्वास बसला. त्यांना वाटले की हा खरोखरच इंग्लंडमध्ये आहे आणि हा इंग्लंडच्या खऱ्याखुऱ्या बातम्या आपल्याला पुरवत आहे. इकडे इंग्लंडलाही अशी माहिती मिळाली की कोणीतरी तोतया जर्मन गुप्तहेर बनून इंग्लंडविषयी जर्मनीला खोट्या बातम्या पुरवत आहे. पण त्यांना नेमक्या व्यक्तीचा शोध लागत नव्हता.

त्याने आपण इंग्लंडमध्ये एजंटचे जाळे निर्माण केल्याचा आभासही जर्मन सैन्याला करवून दिला होता. विशेष म्हणजे रेल्वेतून येणाऱ्या वर्तमानपत्रातून त्याला इंग्लडबद्दल जी काही माहिती मिळेल त्यावरच त्याच्या या सगळ्या खोट्या नाटकाचा डोलारा उभा होता.

शेवटी, १९४२ सालच्या सुरुवातीला तो लिस्बनमधील अमेरिकेच्या लष्करी कार्यालयाला भेट देण्यासाठी गेला. अमेरिकेचे नौदल अधिकारी पॅट्रिक डिमॉरेस्ट यांनी त्याला भेटताक्षणीच त्याची क्षमता ओळखली. त्याने केलेल्या सगळ्या कामाची माहिती घेतली आणि त्यांनी ब्रिटिशांना त्याच्याबद्दल सगळी माहिती दिली. यामुळे ब्रिटीश नेमके ज्याला शोधत होते त्या व्यक्तीबद्दल त्यांनाही माहिती मिळाली. त्यांना या जर्मन गुप्तहेराचा शोध लागताच तातडीने त्याला ब्रिटनला बोलावून घेतले आणि त्याच्या या भन्नाट योजनेबद्दल त्याचे कौतुक केले. शिवाय, त्याचे ॲलरिक हे जर्मन नाव बदलून त्याचे पुन्हा एकदा नवे नामकरण करण्यात आले. त्याला बोव्रील असे नवे नाव मिळाले.

ज्यासाठी त्याने इतके सगळे नाटक रचले आणि इतकी जोखीम पत्करली ते काम आता यशस्वी झाले होते. त्याच्या इच्छेनुसार त्याला ब्रिटीश सैन्यात गुप्तहेराचे काम मिळाले होते. नुसते गुप्तहेर नाही तर तो आता ब्रिटीशांसाठी डबल एजंटचे काम करणार होता. 

त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असे वाटले की त्याच्यातील उत्तम अभिनय क्षमतेला योग्य ठरेल असे काही तरी वेगळे नाव त्याला दिले पाहिजे. शेवटी सुप्रसिद्ध अभिनेत्री ग्रेटा गार्बो हिच्या नावावरून त्याला गार्बो हे नाव देण्यात आले.

ब्रिटनमध्ये राहूनच तो जर्मन सैन्याला ब्रिटनबद्दल चुकीची माहिती पुरवत राहिला. त्याने उभी केलेली तोतया गुप्तहेरांची एजन्सी इतकी किचकट होती की जर्मनीला देखील त्याच्या मदतीसाठी आणखी एखादा अधिकारी पाठवण्याची गरज वाटली नाही. त्याने जर्मन अधिकाऱ्यांचाही पूर्ण विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्याच्या या आभासी गुप्तहेर एजन्सीचे कामही सुरळीतपणे चालत राहिले. १९४४ साली त्याने दुसऱ्या महायु*द्धाच्या अंतिम टप्प्यात संपूर्ण यु*द्धाला कलाटणी देणारे काम केले.

१९४४ साली जर्मनीला एका मोठ्या ह*ल्ल्याची बातमी लागली. आणि त्यांनी गार्बोला म्हणजेच जर्मनीचा ॲलरिक या ह*ल्ल्याची सगळी माहिती पुरवण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी गार्बोने या ह*ल्ल्याची चुकीची माहिती देणारे ५०० संदेश जर्मनीला पाठवले. इतकी सारी चुकीची माहिती सातत्याने भरावाल्याने जर्मनीलाही त्यावर विश्वास बसला. याला त्याने ऑपरेशन फोर्टीट्युड असे नाव दिले.

त्याने जर्मनीला अशी माहिती दिली की हा ह*ल्ला ‘स्ट्रेट ऑफ डोव्हर’ येथे होणार आहे. या सगळ्या माहितीची विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्याने नॉर्मंडी येथे झालेल्या जुन्या ह*ल्ल्याची माहिती दिली. जर्मन सैन्य त्याच्या माहितीवरच विसंबून राहिले. त्याने जर्मनीला असे भासवले की त्याने दिलेला अहवाल वेगवेगळ्या गुप्तहेरांच्या माहितीवर आधारलेला आहे.

त्याने जर्मनीला फ्रांसमधील कॅले येथे होणाऱ्या ह*ल्ल्याची माहिती दिली.

इथे अमेरिकेचे तोतया सैनिक जर्मनीशी भिडले जर्मन सैन्याला कळले देखील नाही की हे खरे सैनिक नाहीत. त्यांना वाटले की त्यांची सरशी झाली. यामुळे त्यांना खरा ह*ल्ला परतवून लावण्यास वेळच मिळाला नाही.

पण जेव्हा यु*द्ध संपले तेंव्हा जर्मन आणि ब्रिटीश दोन्ही सैन्यांनी गार्बोचे कौतुक केले. संपूर्ण यु*द्धात गार्बो एकटाच असा असेल ज्याचे दोन्हीकडूनही कौतुक झाले. परंतु जेव्हा यु*द्ध संपले तेंव्हा ना*झी सैनिकांच्या भीतीने तो परागंदा झाला आणि त्याने आपल्याच मृत्यूची खोटी अफवा पसरवली.

शेवटी रुपर्ट ॲलसन या एका ब्रिटीश लेखकाला अशी शंका आली की गाब्रो मेलेला नाही, तो जिवंत आहे. त्याने गार्बोचा शोध घेण्यास सुरुवात केली. १९८० मध्ये गार्बोची खरी ओळख पटली. त्याचे खरे नाव होते जुआन पुजोल गार्सिया. व्हेनेझुएलातील एका खेड्यात तो स्वतःचे छोटेसे पुस्तकाचे दुकान आणि गिफ्ट शॉपी चालवत होता. १९८८ साली व्हेनेझुएलाच्या कॅराकस या ठिकाणी त्याचे निधन झाले.

गार्बोच्या धाडसाची ही कथा वाचल्यानंतर खरोखरच आवाक व्हायला होते. यु*द्ध संपेपर्यंत तो जर्मन सैन्याला गुंगारा देत राहिला. त्याच्या साहसाचे आणि बुद्धीमत्तेचे कौतुक करावे तेवढे कमीच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘कॅप्टन मॉर्गन’चा हा इतिहास अट्टल बेवड्यांनासुद्धा माहिती नसेल !

Next Post

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

एवढे आधुनिकीकरण झाले तरीही अजून कच्च्या तेलाचे सर्व व्यवहार 'बॅरेल'मधेच होतात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.