The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोनाल्डो हे फुटबॉलप्रेमींच्या लाडक्या खेळाडूचं आडनाव नाहीये!

by द पोस्टमन टीम
24 April 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आपल्या देशात दोन खेळांना प्रचंड प्रेम मिळालं आहे. एक आहे क्रिकेट आणि दुसरा म्हणजे फुटबॉल. भलेही आपल्याकडे फुटबॉलची व्याप्ती क्रिकेट इतकी नसेल पण रोनाल्डो, नेमयार, पेले, मेस्सी या प्लेयर्सचे आपल्याकडे कोट्यवधी चाहते आहेत. या दिग्गज फुटबॉलर्सपैकी एक खेळाडू असा आहे, ज्याचं संपूर्ण नाव त्याच्या कित्येक चाहत्यांना माहितीच नाही! हा खेळाडू म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो.

‘रोनाल्डो’ हे क्रिस्टियानोचं आडनाव आहे, असा बहुतेकांचा समज आहे. मात्र, रोनाल्डो हे त्याचं आडनाव नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ज्याप्रमाणं आपल्याकडे काही सेलिब्रेटी आडनाव न वापरता आई किंवा वडिलांचं नाव लावतात तसंच काहीसं रोनाल्डोनं केलं आहे? तर याचं उत्तर आहे, नाही! क्रिस्टियानो आणि रोनाल्डो ही दोन्हीही त्याचीच नावं (फर्स्टनेम) आहेत.

सीआर ७ नावानं प्रसिद्ध असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. रोनाल्डो हा निःसंशयपणे जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉलपटू आहे. आयुष्यात असंख्य अडचणींचा सामना करून त्यानं जगातील महान फुटबॉलपटू होण्याचा मान मिळवला आहे. चांगल्या शिक्षणाचा अभाव, हृदयविकाराचा गंभीर आजार, गरिबी आणि गुंडगिरीचा सामना करून, त्यानं फुटबॉलमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या स्ट्रगलिंग पिरियडबद्दल जाणून घेण्यासोबतच आपण त्याच्या दोन-दोन नावांचा काय किस्सा आहे, हेही पाहुयात…

क्रिस्टियानो रोनाल्डोडॉस सँटोस एवेरो असं पूर्ण नाव असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी पोर्तुगालमधील मदेइरा येथे अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील, जोस एका फुटबॉल क्लबमध्ये माळी आणि किट मॅन म्हणून अतिशय कमी पगारावर काम करत  होते. फुटबॉल खेळाडूंच्या किट वाहणं आणि त्यांच्या खोल्या स्वच्छ करणं हे त्यांचं काम होतं.

क्रिस्टियानो हे त्यांचं चौथ अपत्य होतं. बरेचसे पालक आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव आपल्या अपत्याला देतात. उदाहरणार्थ, नव्वदच्या दशकात आपल्या देशात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोन क्रिकेटर्सच्या नावाची लाट आली होती. त्या काळात अनेक नवपालकांनी आपल्या मुलांची नावं सचिन आणि राहुल ठेवली होती. रोनाल्डोच्या वडिलांनी देखील हेच केलं. जोस हे अमेरिकन ॲक्टर आणि माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे मोठे चाहते होते. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला क्रिस्टियानो रोनाल्डो असं नाव देण्याचा निर्णय घेतला.



मूळतः एक अमेरिकन अभिनेता असलेले रोनाल्ड रेगन यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला होता. १९८१ ते १९८९ या कालावधीत त्यांनी युनायटेड स्टेट्सचे ४०वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. आपल्या दोन टर्ममध्ये प्रेसिडेंट रोनाल्ड रेगन यांनी अमेरिकन लोकांचं सरकारवरील अवलंबवित्व कमी करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी केला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी टेलीव्हिजन होस्ट म्हणून देशाचा दौरा केला होता. यामुळं त्यांना जनतेच्या जवळ जाण्याची संधी मिळाली.

काँग्रेससोबत कुशलतेनं व्यवहार करून, रेगन यांनी आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी, महागाईला आळा घालण्यासाठी, रोजगार वाढवण्यासाठी आणि राष्ट्रीय संरक्षण मजबूत करण्यासाठी विविध कायदे करून घेतले. जेव्हा संरक्षण दलांच्या बळकटीकरणामुळे मोठी तूट निर्माण झाली तेव्हा त्यांनी कर आणि सरकारी खर्चात कपात करण्याचा मार्ग स्वीकारला.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

एकंदरीत प्रेसिडेंट रोनाल्ड रेगन यांच्या काळात अमेरिका चांगल्या स्थितीमध्ये होती. एक अभिनेता आणि राजकारणी म्हणून, क्रिस्टियानोच्या वडिलांवरती रोनाल्ड रेगन यांचा फार मोठा प्रभाव होता. म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव रोनाल्डो ठेवलं.

गरिबी आणि शिक्षणाच्या अभावामुळं जोस आपल्या आयुष्यात काहीही अर्थपूर्ण साध्य करू शकले नाही. याबद्दल ते स्वतःला दोषी ठरवत होते. गरिबीमुळे ते आपल्या मुलांचं योग्यरित्या पालनपोषण करू शकले नाही. या सर्व काळजींनी त्यांना मद्यपी बनवलं. जोस यांनी आपल्या सर्वात धाकट्या मुलाची आणि फुटबॉलची मैत्री करून दिली. तसंही क्रिस्टियानोला लहानपणापासूनच अभ्यासापेक्षा फुटबॉल खेळण्यात जास्त रस होता.

गरिबीमुळं रोनाल्डोला फुटबॉल खरेदी करणं परवडत नव्हतं. म्हणून रोनाल्डो जुन्या कपड्यांचा बॉल करून रस्त्यावर फुटबॉल खेळत असे. त्याला काहीही करून गरिबीवर मात करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यानं फुटबॉल हाच पर्याय निवडला. कधी-कधी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत सराव करत असे. आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी तो मोठ्या वयोगटातील खेळाडूंसोबत खेळत असे.

नंतर रोनाल्डो, अँडोरिन्हा फुटबॉल क्लबमध्ये सामील झाला. ही तिच जागा होती जिथे त्याचे वडील किट मॅन म्हणून काम करत होते. तिथे रोनाल्डोला त्याच्या सहकारी खेळाडूंकडून अपमान सहन करावा लागला. कारण त्याचे वडील तिथे किट मॅन म्हणून काम करत होते आणि खेळाडूंच्या खोल्या साफ करत होते.

वयाच्या बाराव्या वर्षी त्याने स्पोर्टिंग सीपी नावाच्या फुटबॉल क्लबमध्ये सामील होण्यासाठी आपलं घर आणि कुटुंब सोडलं. त्यानंतर सातत्यानं कष्ट करून हळूहळू यशाच्या शिखराकडे वाटचाल सुरू केली.

दुर्दैवानं, त्याच्या वडिलांना त्याचा हा लौकिक जास्त काळ पाहता आला नाही. अल्कोहोलच्या अति सेवनामुळं यकृत निकामी होऊन रोनाल्डोच्या वडिलांचं २००५ साली निधन झालं. त्यावेळी रोनाल्डो २० वर्षांचा होता. त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावणारा व्यक्ती मरण पावल्यामुळं कुटुंबाला तीव्र गरिबीचा सामना करावा लागला. त्याच्या आईनं आजूबाजूच्या घरात साफ-सफाई आणि स्वयंपाकाचं काम केले. तिच्या तुटपुंज्या उत्पन्नातून कुटुंब चालत असे.

वडिलांच्या मृत्यूच्या दिवशी रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात सामना होता. रोनाल्डोनं वडिलांना गमावल्याचं दुःख सहन करत सामना खेळला आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

रोनाल्डो आणि त्याचे वडिल एकमेकांच्या खूप जवळ होते. सुरुवातीला चौथं अपत्य म्हणून नकोसा असलेला क्रिस्टियानो नंतर त्यांचा सर्वांत लाडका मुलगा झाला होता. म्हणूनच त्यांनी त्याला आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव दिलं होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

बिटकॉइन चोरून लोकांना गंडा घालणारं हे जोडपं एका छोट्याश्या चुकीमुळे अखेर पकडलं गेलं

Next Post

या माणसाने पहिल्या महायुद्धाच्या १७ वर्ष आधीच त्याची भविष्यवाणी केली होती!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

या माणसाने पहिल्या महायुद्धाच्या १७ वर्ष आधीच त्याची भविष्यवाणी केली होती!

ना*झी सैन्याचे गुप्त संदेश उलगडून हिने दोस्त राष्ट्रांच्या विजयाचा पाया घातला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.