The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘स्टार वॉर्स’च्या फॅन्सनी एकत्र येऊन सुरु केलेला मर्चन्डाईझ ब्रँड म्हणजे ‘द सोल्ड स्टोअर’

by Heramb
16 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सुरुवातीपासूनच भारत हे कापड उद्योगाचे जागतिक केंद्र आहे. ब्रिटिशांच्या कपाशीच्या उत्पादनानंतर तर भारतातील कापड उद्योग भरभराटीला आला. भारत हे स्वदेशी पोशाख ब्रँडचे केंद्र बनले आहे. आजमितीस देशात पोशाख उद्योगातील काही नामांकित ब्रॅण्ड्स बनले आहेत. सतत वाढत्या मागण्यांमुळे आपल्या प्रॉडक्ट्सच्या अद्वितीय रेंजसह अनेक स्वदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला.

२०१३ साली स्थापित, ‘द सोल्ड स्टोअर’ (The Souled Store) हा असाच एक ब्रँड भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला. पॉप कल्चर मर्चेंडाईज ब्रँड्सचे हे ऑनलाइन मार्केटप्लेस २९ वर्षीय मुंबईकर मित्रांनी एकत्र येऊन सुरु केले होते. यावेळी ते नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडले होते. कंपनी एका गॅरेजमध्ये सुरू झाली आणि लवकरच एका चाळीत स्थलांतरित झाली. ते सर्वच जण ‘स्टार वॉर्स’ सीरिजचे मोठे चाहते होते.

त्या मित्रांच्या मनात एक कल्पना होती: एक छोटी परंतु फायदेशीर, कॅरेक्टर्स वापरण्याचे लायसेन्स विकू शकेल अशी ईकॉमर्स कंपनी तयार करणे. देशात पॉप-कल्चरच्या मालाची मोठी मागणी असल्याचे या मित्रांच्या लवकर लक्षात आले. आंतरराष्ट्रीय खरेदीदाराकडून हॅरी पॉटर किंवा स्टार वॉर्स-थीम असलेले टी-शर्ट मिळविण्यासाठी लोक अनेकदा जास्त पैसे मोजत असत. यावरच उपाय म्हणून मित्रांच्या या ग्रुपने ‘द सोल्ड स्टोअर’ कंपनी सुरु केली.

‘द सोल्ड स्टोअर’ कंपनीची स्थापना वेदांग पटेल, रोहीन समताने आणि आदित्य शर्मा यांनी केली. त्यांची सुरुवातीची केवळ ५ ते ६ लाखाची गुंतवणूक होती आणि नंतरच्या चार ते पाच वर्षांत ती सुमारे ३० कोटींपर्यंत वाढली. ग्राहकांची मागणी काय आहे यावर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे, हा ब्रँड वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात वाढू शकला.

ज्या वेळी त्यांनी ऑनलाइन माल विकायला सुरुवात केली, तेव्हा ई-कॉमर्स मार्केट वेगाने वाढायला सुरुवात झाली होती. ई-कॉमर्स मार्केटची लोकप्रियता पाहून त्यांनी ऑनलाईन स्टोअर सुरु करण्याचा निर्णय घेतला, यासाठी आवश्यक गुंतवणूकही मोठी होती. पण आज आज, द सोल्ड स्टोअर त्यांच्या वेबसाइटवर १५० पेक्षा जास्त कॅरेक्टर्स आणि त्यांचे लायसेन्सस विकतो.



कोरोना महामारीच्या काळातही कंपनी बाजारात मजबूतपणे टिकून होती. शिवाय, याच काळात ब्रँडच्या उलाढालीत वाढ झाली होती. फॅशन ईकॉमर्स हे अशा क्षेत्रांपैकी एक होते ज्याने कोरोनाव्हायरस महामारी आणि लॉकडाऊनमध्ये शून्य कमाई केली. पण पॉप कल्चर ईकॉमर्स स्टार्टअप “द सोल्ड स्टोअर”ने मात्र याच काळात प्रगतीची नवी शिखरे गाठली.

ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या ईकॉमर्स स्टार्टअपचे गोदाम, ‘द सोल्ड स्टोअर’, अत्यंत शांत होते: पॅकेजेस आणि कार्टन्स सर्वत्र पडलेले होते आणि माल बनवणारी मशीनसुद्धा चालू नव्हती. महिनाभरापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा, ‘द सोल्ड स्टोअर’ दर महिन्याला एक लाखाहून अधिक ऑर्डर्स घेत असत. २०१४ पासून दरवर्षी दोन ते तीन पटीने वाढून २०२० पर्यंत कंपनीची स्थिर वाढ होत होती. लॉकडाऊनमुळे काम आणि शिपमेंट थांबले होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पण लॉकडाऊन आणि कोरोना महामारी संपल्यानंतर त्यांनी फेस मास्क तयार करण्यास सुरुवात केली आणि ग्राहकांना ३०% सवलत देऊ केली. संस्थापकांनी चार महिने पगार घेतला नाही. या काळात कंपनीला रेग्युलर आणि लॉयल ग्राहकांची बरीच मदत झाली. ग्राहक ऑनलाइन ऑर्डर देत असत आणि लॉकडाऊन संपेपर्यंत शिपमेंटची वाट पाहत असत.

कंपनीच्या कस्टमायझेशनद्वारे ग्राहकांना संतुष्ट करण्याच्या कल्पनेला या प्रगतीचे श्रेय जाते. हॅरी पॉटरमधील एका पर्सनलाइझ्ड अधिकृत “हॉग्वार्ट्स” स्वीकृती पत्रापासून ते “बिग बँग थेरी”मधील अस्सल शेल्डनच्या रूममेटअग्रीमेंटपर्यंत, तुम्ही त्यावर तुमच्या नावासह काहीही कस्टमाइझ करू शकता.

आजमितीस हा ब्रँड वाढीच्या मार्गावर आहे आणि त्याच्या सह-संस्थापकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये विविध ठिकाणी आपली दुकाने सुरु केली आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चर्चिलच्या एका पुस्तकामुळं ब्रिटनसाठी दुसरं महायु*द्ध अवघड होऊन बसलं होतं

Next Post

या स्त्रीने तिच्या मुलीचं अपहरण करून ह*त्या करणाऱ्या दहा गुंडांना शोधून त्यांना संपवलं होतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या स्त्रीने तिच्या मुलीचं अपहरण करून ह*त्या करणाऱ्या दहा गुंडांना शोधून त्यांना संपवलं होतं

अमेरिकेवर ह*ल्ला करण्यासाठी जपानने आत्मघा*तकी कामिकाझे तयार केले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.