The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘किस ऑफ लाइफ’ या फोटोनं जगभरातील लोकांचा वीज कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला

by द पोस्टमन टीम
30 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दरवर्षी एप्रिल महिन्यात अनेक अमेरिकन लोक देशभरातील एनर्जी कोऑपरेटिव्हज् व युटिलिटीजमध्ये सामील होतात आणि ‘नॅशनल लाइनवर्कर ॲप्रिसिएशन डे’ साजरा करतात. ३३ कोटी अमेरिकन लोकांच्या घरांमध्ये वीज पोहोचावी यासाठी जवळपास १ लाख १५ हजार वीज कर्मचारी बाराही महिने अखंडपणे झटतात.

अनेकदा काम करत असताना अपघात होऊन काही कर्मचाऱ्यांना आपले प्राणही गमवावे लागतात. अशा घटनांनी खचून न जाता इतर वीज कर्मचारी आपली सेवा सुरू ठेवतात. इतर सरकारी कर्मचारी सणाच्या दिवशी कुटुंबासोबत सुटीचा आणि सणाचा आनंद घेऊ शकतात. वीज कर्मचाऱ्यांना मात्र सब स्टेशन्स बंद ठेवता येत नाहीत.

अशा या वीज कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचं वर्णन करण्यासाठी रोको मोराबितोच्या ‘द किस ऑफ लाइफ’ या पुलित्झर-पारितोषिक विजेत्या फोटोपेक्षा दुसरी अप्रतिम गोष्ट असूच शकत नाही. ‘द किस ऑफ लाइफ’ नावानं प्रसिद्ध असलेल्या फोटोमागची घटना काय होती हे आपण जाणून घेऊया…

जुलै १९६७ मध्ये रोको मोराबितो नावाचा तरूण फोटोग्राफर जॅक्सनव्हिलच्या ‘वेस्ट २६ स्ट्रीट’वर गाडी चालवत होता. नेहमी प्रमाणं तो आपल्या एका असाइनमेंटसाठी निघाला होता. तो ज्या रस्त्यावरून चालला होता त्यावर जॅक्सनव्हिल इलेक्ट्रिक अथॉरिटीचे काही लाइनमन युटिलिटी पोलवर नियमित देखभालीचं काम करताना त्याला दिसले होते.



दुपारी मोराबितो आपली असाइनमेंट पूर्ण करून परत आला. त्यावेळी सुद्धा वीज कर्मचारी कामच करत होते. जरा वेळ थांबून या कर्मचाऱ्यांचे थोडेफार फोटो काढावेत असा विचार त्याच्या मनात आला. तो आपली गाडी थांबवतचं होती की, त्याला अचानक एक किंचाळी ऐकू आली. ती जीवघेणी किंचाळी ऐकून, काही तरी भयानक घडल्याची कल्पना मोराबितोला आली.

रँडल जी चॅम्पियन नावाच्या लाइनमनची ती किंचाळी होती. चॅम्पियन खांबावर चढून काम करत होते. काम करत असतानाच त्यांचा विद्युत प्रवाह असलेल्या वायरला स्पर्श झाला होता. त्यांच्या अंगात वीजप्रवाह गेल्यानं ते लगेच बेशुद्ध पडले. सुदैवानं, त्यांनी सेफ्टी हार्नेस बांधलेला होता. त्यामुळं ते जमिनीवर पडण्यापासून वाचले. मात्र, ते अजूनही बेशुद्धावस्थेत वरती लटकत होते. कुणीतरी पटकन त्यांना मदत करणं आवश्यक होतं.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

अशा कठीण परिस्थितीमध्ये चॅम्पियनचा सहकारी जेडी थॉम्पसन देवदूताप्रमाणं धावून आला. ज्यावेळी चॅम्पियननं किंचाळी ठोकली त्यावेळी थॉम्पसन त्याच्यापासून ४०० फूट दूर असलेल्या खांबाजवळ काम करत होते. आपल्या सहकाऱ्याची किंचाळी ऐकताचं थॉम्पसननं त्याच्याकडे धाव घेतली. जीवाच्या आकांताने अगदी काही सेकंदातच थॉम्पसन चॅम्पियनच्या खांबावर चढला. बाकीचे कर्मचारी त्यांच्यापासून काहीसे दूर होते. त्यामुळं खांबावर उलट्या लटकलेल्या चॅम्पियनला खाली उतरवणं एकट्या थॉम्पसनला शक्य नव्हतं आणि तितका वेळही हातात नव्हता.

चॅम्पियनला जिवंत ठेवण्यासाठी तत्काळ सीपीआर (कृत्रीम श्वासोच्छवास) देणं गरजेचं होतं. थॉम्पसननं उलट्या लटकलेल्या चॅम्पियनची मान पकडली आणि आपलं सर्व बळ एकवटून त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली. जोपर्यंत स्वत:ला धाप लागत नाही तोपर्यंत थॉम्पसन आपल्या सहकाऱ्याला श्वास देत राहिला. काही वेळातच त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि चॅम्पियनच्या नाडीचे ठोके जाणवू लागले. त्यानंतर थॉम्पसननं चॅम्पियनला सेफ्टी हार्नेसमधून मोकळ केलं आणि स्वत:च्या खांद्यावर टाकून खांबावरून खाली उतरवलं. त्यानंतर जमिनीवर देखील थॉम्पसन आणि अन्य एका कर्मचाऱ्याने पॅरामेडिक्स येईपर्यंत सीपीआर दिला.

या सगळ्या घडामोडी सुरू असताना फोटोग्राफर मोराबितो देखील तिथेचं होते. ज्यावेळी थॉम्पसन खाबांवर चढले त्याचं वेळी प्रसंगावधान राखून मोराबितो यांनी आपल्या कारमधील टू-वे रेडिओवरून रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदत मागवली. मदत मागितल्यानंतर त्याचं लक्ष खांबाच्या दिशेने गेलं. तेव्हा थॉम्पसन आपल्या साथीदाराला सीपीआर देत होते. तो क्षण मोराबितो यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. याच छायाचित्राला आता संपूर्ण जग ‘किस ऑफ लाइफ’ या नावानं ओळखतं. त्यानंतर १९६८ साली मोराबितोनं काढलेला हा फोटो पुलित्झर-पारितोषिकासाठी निवडला गेला.

मोराबितोला पुरस्कार मिळाल्यानंतर, फक्त अमेरिकेत प्रसिद्ध असणारी ही घटना जगप्रसिद्ध झाली. अनेक वृत्तवाहिन्यांनी आणि वर्तमान पत्रांनी मोराबितो, थॉम्पसन आणि चॅम्पियन यांच्या मुलाखती घेतल्या.

‘जेव्हा मी चॅम्पियनची किंचाळी ऐकली तेव्हा मला काही सुचलं नाही. मी सरळ त्याच्या दिशेनं धाव घेतली. तो बेशुद्ध अवस्थेत लटकत होता. त्याचे गाल निळे पडले होते. मी तत्काळ त्याला सीपीआर द्यायला सुरुवात केली. मला आठवतं त्यानं एक हलकीशी उचकी देऊन पुन्हा श्वास घ्यायला सुरुवात केली होती. चॅम्पियन श्वास घेत असल्याचं पाहता क्षणी मी त्याला खांबावरून खाली उतरवलं’, अशा शब्दांत थॉम्पसननं आपला अनुभव सांगितला होता.

हवामान खात्यानं वादळाचा इशारा दिला होता. वादळ येऊन वीज खंडित होण्या अगोदर लाइनची दुरुस्ती करणं गरजेचं होतं. त्यामुळं आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवल्यानंतर, थॉम्पसन पुन्हा शांतपणे आपल्या कामावर गेले. थॉम्पसनचा नि:स्वार्थीपणा पाहून आपण भारावून गेल्याचं मोराबितो यांनी म्हटलं होतं.

‘किस ऑफ लाइफ’च्या घटनेनंतर, १९९१ साली चॅम्पियनला पुन्हा दुसऱ्यांदा दुखापत झाली. दुर्दैवानं यावेळी थॉम्पसन त्यांच्या सोबत नव्हते. लाईनमन म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना हाय व्होल्ट विजेचा झटका बसला. या दुर्घटनेत त्यांचा चेहरा आणि हात भाजला. चॅम्पियन पाच आठवडे ओरलँडो प्रादेशिक वैद्यकीय केंद्रातील बर्न युनिटमध्ये उपाचारासाठी दाखल होते.

त्यानंतर त्यांनी जवळजवळ सहा महिने मेमोरियल रिहॅबिलिटेशन हॉस्पिटलमध्ये घालवले. त्याठिकाणी त्यांची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. या सहा महिन्यांच्या काळात थॉम्पसन नियमितपणे आपल्या सहकाऱ्याला भेटण्यासाठी जात होते. २००२ साली वयाच्या ६४व्या वर्षी चॅम्पियनचं निधन झालं. मोराबितोनं जॅक्सनव्हिल जर्नलसाठी ४५ वर्षे काम केलं आणि १९८२ साली ते निवृत्त झाले. ५ एप्रिल २००९ रोजी त्यांचं निधन झालं. आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर  १९९४ साली थॉम्पसन निवृत्त झाले.

‘किस ऑफ लाइफ’ या फोटोनं जगभरातील लोकांचा वीज कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. या फोटोमुळं वीज कर्मचाऱ्यांना आदर आणि सन्मान मिळाला. आजही अमेरिकेत नवीन लाइनवर्कर्ससाठी आयोजित केलेल्या ओरिएंटेशन ट्रेनिंगमध्ये मोराबितोचा हा आयकॉनिक फोटो आणि त्यामागची अविश्वसनीय कथा सांगितली जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

 

ShareTweet
Previous Post

मुहम्मद अली बॉक्सिंगमध्ये किंग तर होताच पण त्याला दोन वेळा ग्रॅमी’चं नामांकनही मिळालं होतं

Next Post

अमेरिकन शेअर बाजारात लिस्ट झालेल्या या भारतीय कंपनीने ५०० कर्मचाऱ्यांना करोडपती बनवलंय

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

अमेरिकन शेअर बाजारात लिस्ट झालेल्या या भारतीय कंपनीने ५०० कर्मचाऱ्यांना करोडपती बनवलंय

स्टॅलिनच्या या मुलीला सगळं आयुष्य रशियापासून दूर पळत वनवासात काढावं लागलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.