The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या हेराने दिलेली माहिती जर्मनीने गांभीर्याने घेतली असती तर दुसऱ्या महायु*द्धाचा निकाल बदलला असता

by द पोस्टमन टीम
9 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अंकारा येथील जर्मन दूतावास एका पाहुण्याची वाट पाहत होता. अपेक्षेप्रमाणं टर्कीश वंशाचा माणूस एका फोल्डरसह दूतावासाच्या इमारतीत गेला. पाहुण्याच्या येण्यानं जर्मन अधिकारी खूश झाले आणि त्यांनी फोल्डरमधील माहिती त्वरित बर्लिनला पाठवली. मात्र, बर्लिनमधील हाय कमांडनं अंकारातून आलेल्या माहितीच्या सत्यतेवर शंका घेतली आणि काहीही हालचाल केली नाही.

जर जर्मनीनं मिळालेल्या माहितीच्या आधारावर कार्यवाही केली असती तर कदाचित दुसऱ्या महायु*द्धाचा निकाल वेगळा लागला असता! हो, अंकारातून बर्लिनला पाठवलेली माहिती अतिशय गुप्त होती. जर्मन दुतावासात आलेल्या त्या टर्कीश पाहुण्यानं ब्रिटिशांच्या कार्यालयात घुसून ती गुप्त माहिती मिळवलेली होती. टर्कीश असूनही जर्मनीसाठी काम करणारा हा व्यक्ती होता तरी कोण? हा व्यक्ती होता ‘एलेसा बाझना’. या जर्मन लोक त्याला ‘सिसेरो’ या सांकेतिक नावानं तर, ब्रिटिश इंटेलिजन्स त्याला दुसऱ्या महायु*द्धातील सर्वात धोकादायक गुप्तहेर म्हणून ओळखायचे.

जर्मनीनं बहुतेक युरोपियन देशांना महायु*द्धाचा झटका दिल्यानंतर ब्रिटिशांना आशियातील वसाहतींकडून मदतीची आस लागली होती. आशियाचं प्रवेशद्वार असलेला टर्की यु*द्धाच्या सुरुवातीला तटस्थ राहिला होता. ब्रिटिशांना टर्कीला आपल्या बाजूनं ठेवायचं होतं कारण त्यांना भीती होती टर्कीचा वापर करून जर्मनी इराकमधील तेल क्षेत्रांमध्ये प्रवेश करेल. 

तर जर्मनीसाठी टर्की महत्त्वाची होती. कारण दारूगो*ळ्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल (क्रोमाईट) मिळवण्यासाठी जर्मनी टर्कीवर मोठ्या प्रमाणावर विसंबून होती. जर्मनीच्या क्रोमाईट गरजेपैकी ९० टक्के माल टर्की पुरवत होता. एकूणच अक्ष राष्ट्रे आणि मित्र राष्ट्रांमध्ये टर्कीला आपल्या बाजूनं आणण्याची स्पर्धाच लागली होती.

टर्कीची राजधानी असलेल्या अंकारामध्ये जर्मनी आणि ब्रिटनचे दूतावास होते. या दोन्ही ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात हेरगिरीचं नेटवर्क हाताळलं जात असत. याठिकाणावरूनच एलेसा बाझनानं एक साधा कर्मचारी म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. अगोदर त्यानं लोहारकाम, ऑपेरा सिंगर, ड्रायव्हर अशी कितीतरी कामं केली होती.



ब्रिटिश दूतावासाचे सचिव डग्लस बस्क यांचा मदतनीस म्हणून तो काम करू लागला. टर्कीश असलेल्या बाझनाला फ्रेंच भाषा अस्खलितपणे येत होत्या. जेव्हा ब्रिटीश राजदूत सर ह्युज नॅचबुल-ह्युजसन यांना ड्रायव्हरची गरज होती तेव्हा तेव्हा डग्लस बस्कनं बाझनाच्या नावाची शिफारस केली. सचिव डग्लस बस्कनं शिफारस केल्यामुळं ब्रिटिश दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी बाझनाची पार्श्वभूमी तपासली नाही आणि त्याला ड्रायव्हर म्हणून रूजू करून घेतलं.

त्यानंतर अल्पावधीतच बाझना ह्यूजसनचा विश्वासू कर्मचारी बनला. त्यानं ब्रिटिश राजदूताच्या अनेक वैयक्तिक कामकाजाची जबाबदारी देखील स्वीकारली. सर ह्यूजसनला एक वाईट सवय होती. कार्यालयातील गोपनीय कागदपत्रं वाचनासाठी तो घरी आणत असे. या कागदपत्रांमध्ये ब्रिटिश लष्करी योजना, यु*द्धाची रणनीती आणि गुप्त वाटाघाटींचा तपशील इत्यादींचा समावेश असे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

टर्कीतील ब्रिटीश राजदूताचा सेवक म्हणून काम करून जगण्यात एलेसा बाझना असमाधानी होता. आपण जर ब्रिटिश दूतावासातील कागदपत्रे ना*झींना विकली तर नक्कीच त्याची मोठी किंमत मिळेल असा विचार त्याच्या डोक्यात आला. अन् त्यानं लगेच त्याची अंमलबजावणी केली.

त्यानं सर्वांत अगोदर ब्रिटिश दूतावासाचे सचिव डग्लस बस्क (अगोदर यांचा मदतनीस म्हणून बाझना काम करत होता) यांच्या घरातून काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढले. मात्र, त्याला इंग्रजी वाचता येत नसल्यानं आपण काढलेले फोटो त्याला वाचता आले नाहीत. त्यानं ते फोटो घेऊन सरळ जर्मन दूतावास गाठलं. ते फोटो पाहून जर्मन राजदूत फ्रान्झ व्हॉन पापेननं बाझनाला तब्बल २० हजार पौंड इतकी मोठी रक्कम दिली. फोटोंना मिळालेली किंमत पाहून ते किती महत्त्वाचे असावेत याची बाझनाला कल्पना आली. 

बाझना आपल्यासाठी फायद्याचा ठरू शकतो याची एव्हाना जर्मनांना कल्पना आली होती. त्यांनी त्याला आपल्यासाठी काम करण्यास सांगितलं आणि जास्त पैशाचं आमिषही दाखवलं. त्यानंतर बाझनाला थेट ब्रिटीश राजदूत सर ह्युज नॅचबुल-ह्युजसनसोबत काम करण्याची नामी संधी मिळाली.

एक दिवस आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणं ह्युजसननं काही महत्त्वाची कागदपत्रे घरी आणली. ती कपाटात बंद करून तो अंघोळीला गेला. हीच संधी साधून बाझनानं आपलं काम चोख पार पाडलं. त्यानं अगोदर लोहार काम केलेलं होतं. त्यामुळं बनावट चाव्या तयार करणं त्याच्यासाठी सहज सोपं होतं. त्यानं आपल्या साहेबाच्या कपाटाच्या चाव्यांचे मेणावर ठसे घेतले. बनावट चाव्यांचा वापर करून कितीतरी वेळा बाझनानं महत्त्वाच्या ब्रिटश कागदपत्रांचे फोटो काढून जर्मन लोकांना दिले.

पहिल्या वेळेस त्यानं जर्मनीला तिसऱ्या मॉस्को परिषदेचं इतिवृत्त असलेली कागदपत्रे दिली. या परिषदेत यु*द्धातील प्रगती आणि नियोजनावर चर्चा करण्यासाठी मित्र राष्ट्रांचे वरिष्ठ नेते भेटले होते. ही माहिती जर्मनीला देऊन बाझनानं त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा दरवाजाच उघडला होता.

डिसेंबर १९४३ मध्ये मित्र राष्ट्रांच्या इंटेलिजन्स विभागाला गुप्त माहिती बाहेर जात असल्याचा संशय आला. याचा इशारा देणारा एक संदेश त्यांनी ब्रिटिश राजदूत ह्युजसन यांना पाठवला होता. गंमत म्हणजे बाझनानं याचा देखील कागदपत्र म्हणून फोटो काढला होता. ब्रिटीश काउंटर इंटेलिजन्स ऑफिसर्स जेव्हा दूतावासातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी बाझनाकडं दुर्लक्ष केलं. कारण बाझनासारखा व्यक्ती एक चांगला गुप्तहेर बनूच शकत नाही, असा त्यांचा समज होता. याच गोष्टीनं ब्रिटिशांचा घात केला.

मात्र, ब्रिटिशांपेक्षाही जर्मनी कमनशीबी समजावी लागेल. कारण, गुप्त माहितीचा इतका मोठा स्त्रोत हाती लागत असूनही त्यांनी कधी त्यावर गांभीर्यानं अंमलबजावणी केली नाही. बाझनानं जर्मन्यांना विकलेली माहिती, ना*झी राजवटीचं वैशिष्ट्य असलेल्या नोकरशाहीच्या भांडणात गुरफटून राहिली. जर जर्मनीनं बारकाईने लक्ष दिलं असते, तर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असतं की १९४३ च्या उत्तरार्धात, बाझना आणि त्याचा हँडलर लुडविग कार्ल मॉयझिच यांनी पश्चिम युरोपमधील मोठ्या आक्र*मणाची माहिती त्यांना पुरवली होती.

१९४४ च्या जानेवारीत, बाझनाचा हँडलर कार्ल मॉयझिचनं एक नवीन सेक्रेटरी कामावर घेतली. तिचं नाव एलिझाबेथ होतं. मात्र, प्रत्यक्षात ती क्लीव्हलँड, ओहायोतील जर्मन वाणिज्यदूताची मुलगी ‘कॉर्नेलिया नेले कॅप’ होती. काही आठवड्यांपूर्वीचं तिला अमेरिकन स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेससाठी जर्मनीच्या विरोधात हेरगिरी करण्याची ऑफर दिली गेली होती. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात कॅपनं बाझना आणि मॉयझिचवर लक्ष ठेवलं. तिने बाझना विरोधात व्यापक परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. मात्र, ते मित्र राष्ट्रांना सादर करण्यापूर्वीच बाझनानं ब्रिटिश दूतावासातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

बाझनानं आपलं पुढील आयुष्य एकदम अंध:कारात घालवलं. पेन्शनसाठी केलेली त्याची याचिका पश्चिम जर्मनीतील लोकांनी नाकारली होती. उतारवयात त्यानं म्युनिकमध्ये रात्रीचा पहारेकरी म्हणून काम केलं. एलेसा बाझना २१ डिसेंबर १९७० रोजी वयाच्या ६६व्या वर्षी मरण पावला.

दुसरं महायु*द्ध संपल्यानंतर जेव्हा ब्रिटिश इंटेलिजन्स सर्व घडामोडींचा उहापोह करत होतं तेव्हा त्यांच्या हाती, एजंट एलिझाबेथ कॅपनं जमा केलेली बाझनाची माहिती पडली. दुसऱ्या महायु*द्धातील सर्वांत धोकादायक गुप्तहेर तर आपणच पाळल्याचं लक्षात आल्यानंतर ब्रिटिशांना मोठा धक्का बसला होता!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हा नियम आडवा आला, नाहीतर महेंद्र सिंग धोनी मुंबईचा कप्तान म्हणून दिसला असता..!

Next Post

पेशाने शेतकरी असलेला ‘सिमो’ देशासाठी स्नाय*पर बनला आणि ५५० शत्रूंचा खा*त्मा केला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

पेशाने शेतकरी असलेला 'सिमो' देशासाठी स्नाय*पर बनला आणि ५५० शत्रूंचा खा*त्मा केला

कोसोवा आणि सर्बियामध्ये वाद झाला आणि त्यात युरोपची सहा मिनिटे गहाळ झाली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.