आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मानवाच्या इतिहासातील सर्वांत रक्तरंजित अध्याय म्हणजे दोन वैश्विक महायु*द्ध. हि*टल*र, जनरल तोजो आणि मुसोलिनी यांच्या अनन्वित अत्याचाराने काळवंडलेले हे भाग! ना*झी जर्मनीचा ॲडॉल्फ हि*टल*र त्याच्या ज्यूद्वेषासाठी प्रसिद्ध आहेच. तेव्हा अनेक विरोधाभासी विचारधारांच्या या संघर्षात सामान्य जनता भरडली गेली होती. शांततेचं महत्त्व लक्षात येऊनच पुढे युनायटेड नेशन्ससारख्या संस्था स्थापन झाल्या.
खरंतर औषधे, वैद्यकीय उपचार यांच्याशी सामान्यतः कोणत्याही राजकीय सत्तेचे शत्रुत्व नसते. मात्र, ना*झी विचारधारेत औषधे शरीराला प्रदूषित करणारे हानिकारक विष म्हणून पाहिले जात होते. ना*झी पक्षाने या विचारसरणीचा चांगलाच गैरफायदा घेतला. त्यांनी ज्यू हे जर्मन समाजासाठी औषधासारखे आहेत हे ठरवून तसं चित्रित केलं आणि याचाच वापर करून ना*झी पक्षाने हि*टल*रला “कधीही मद्यपान न करणारा” म्हणून त्याचे चित्र तयार केले होते. इतकंच काय तर हि*टल*र पूर्णतः शुद्ध शाकाहारी आणि ‘नॉन-अल्कोहोलिक’ असल्याचं सांगण्यात येत होतं.
पण वस्तुस्थिती काही वेगळीच होती. जेव्हा ना*झी पक्ष सत्तेवर आला तेव्हा कॉन्सन्ट्रेशन कॅंप्स ड्र*ग ॲडिक्ट्सने भरू लागली. तरीही, जर्मन सैन्य, हवाई दल, नौदल आणि स्वतः हि*टल*रने ड्र*ग्सचा व्यापक वापर केला होता. ॲडॉल्फ हि*टल*रचे वैयक्तिक चिकित्सक डॉ. थिओडोर मोरेल यांनी त्याला अनेक वर्षे व्यसनाधीन पदार्थांनी भरलेली औषधं दिली. मोरेलची ही औषधं हि*टल*रच्या वेडेपणाचे आणि बिघडलेल्या आरोग्याचे कारणही असू शकते.
डॉ. थियोडोर मोरेल हे बर्लिनमधील एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ होते. त्यांनी अनेक प्रतिष्ठित राजकारणी आणि सेलिब्रिटींवर उपचार केले होते. हि*टल*रचे प्रमुख छायाचित्रकार हेनरिक हॉफमन यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉ. मोरेल यांना ना*झी कार्यालयातून त्वरित त्यांच्या मुख्यालयात येण्याचा फोन आला. डॉ. थिओडोर मोरेल यांनी हेनरिक हॉफमनला इंजेक्शनच्या स्वरूपात काही वैद्यकीय मिश्रण देऊन उपचार केले आणि त्याला बरे वाटले. या घटनेनंतर डॉ. थिओडोर मोरेल हे हेनरिक हॉफमनचे वैयक्तिक डॉक्टर बनले.
संध्याकाळच्या एका जेवणाच्या वेळी हेनरिक हॉफमनने डॉ. थिओडोर मोरेल यांची ओळख हि*टल*रशी करून दिली. ओळख झाल्यानंतर हि*टल*रने जास्त जेवण केल्यावर त्याच्या पोटदुखीबद्दल डॉ. थिओडोर मोरेल यांना सांगितले. डॉ. मोरेलने या समस्येवर उपाय म्हणून ग्लुकोज आणि व्हिटॅमिनचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. हि*टल*रने मान्यता दिल्यानंतर डॉ. मोरेलने त्याला इंजेक्शन दिले. हि*टल*र त्वरित बरा झाला.
डॉ. थिओडोर मोरेलच्या या इंजेक्शनमध्ये ग्लुकोज आणि व्हिटॅमिनच्या मिश्रणाबरोबरच मेथ किंवा मेथाम्फेटामाइन नावाच्या अंमली पदार्थाची काही प्रमाणात मात्रा होती. मेथाम्फेटामाइन एक शक्तिशाली, अत्यंत व्यसनाधीन उत्तेजक अमली पदार्थ आहे. हा पदार्थ थेट मज्जासंस्थेवर परिणाम करत असल्याने त्वरित वेदना होणे बंद होते. हा पदार्थ पांढऱ्या, गंधरहित, कडू पावडरच्या स्वरूपात असतो जो सहजपणे पाण्यात किंवा मद्यात विरघळतो. मेथॅम्फेटामाइन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्याच्या मूळ औषधापासून, म्हणजेच एम्फेटामाइनपासून विकसित केले गेले होते. मूलतः सर्दीवरील विक्स सारखे औषध आणि ब्रोन्कियल इनहेलर्समध्ये वापरले गेले होते.
लगेच बरं वाटल्याने हि*टल*रला डॉ. थिओडोर मोरेलचे कौतुक वाटले, त्याच्या उपचाराने हि*टल*र अतिशय प्रभावित झाला आणि त्याने डॉ. मोरेलला आपला वैयक्तिक डॉक्टर म्हणून रुजू करून घेतले. सन १९४० पासून डॉ. थिओडोर मोरेलने हि*टल*रला मल्टीविटामिन घटक, ग्लुकोज आणि इतर कार्यक्षमता वाढवणाऱ्या औषधांचे अनेक इंजेक्शन्स दिली.
या औषधं आणि इंजेक्शन्सपैकी बहुतेक घटक अत्यंत व्यसनाधीन ड्र*ग्स होते. इतकंच काय, मोरेलने आपल्या पदाचा गैरवापर करून त्याची मल्टीविटामिन बिस्किटे आणि ड्रग्ज मिश्रित चॉकलेट्स अनेक ना*झी अधिकाऱ्यांना विकले. कोणत्याही महत्त्वाच्या बैठकीपूर्वी हि*टल*र मोरेलकडून इंजेक्शन टोचून घेत असे. ना*झी पक्षाच्या आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांनाही हि*टल*रच्याच पातळीच्या उत्साहाने काम करायचे असल्याने त्यांनीही स्वतःला तेच इंजेक्शन टोचून घेतले.
मोरेलला त्याच्या या अद्भुत कामगिरीसाठी बक्षीस देण्यात आले. ते बक्षीस म्हणजे एका ज्यू कुटुंबाकडून लुटलेल्या आलिशान अपार्टमेंटचा ताबा डॉ. थिओडोर मोरेलला अगदी स्वस्त दरात मिळाला. मोरेल नेहमीच हि*टल*रच्या आजूबाजूला असायचा. ज्याने हि*टल*रला रोज पहिले असा एकमेव माणूस मी आहे असं सांगत तो बढाई मारायचा. पोलंडवरील आक्र*मण, रशियावरील आक्र*मण, डी-डेला दिलेला प्रतिसाद असे नाट्यपूर्ण निर्णय हि*टल*रने ड्र*ग्सच्या प्रचंड प्रभावाखाली घेतले होते.
जेव्हा पोलंडवर आक्र*मण सुरू झाले, तेव्हा हि*टल*रने आपले मुख्यालय आघाडीवर नेले आणि डॉ. थिओडोर मोरेलही त्याच्यासोबत गेले. ज्या ट्रेन मधून हि*टल*रने प्रवास केला होता, ती ट्रेन काही काळासाठी थांबली होती, जेणेकरून हि*टल*रला मेथचा डोस देता येईल. मेथच्या प्रचंड नशाच्या प्रभावाखाली हि*टल*रने पोलंडचे यु*द्ध सुरु ठेवले. या दरम्यान इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी-हि*टल*रची भेट घेण्यासाठी आला, त्याच्यावरही डॉ. थिओडोर मोरेलने उपचार केले.
हि*टल*रच्या निकटवर्तीय लोकांना डॉ. थिओडोर मोरेलच्या वैद्यकीय पद्धतींविषयी संशय येऊ लागला होता. डॉ. मोरेलने काही प्राण्यांच्या शरीराचे अवयव विशिष्ट घटक काढण्यासाठी वापरले आणि तेच घटक हि*टल*रला इंजेक्शनद्वारे दिल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. हि*टल*रच्या निकटवर्तीयांनी डॉ. मोरेलला काढून टाकण्याचा प्रयत्नही केला, पण तेव्हा उशीर झाला होता. ड्र*ग्सचं प्रचंड व्यसन हि*टल*रला लागलं होतं. आता त्याला काढून टाकणे जवळ जवळ अशक्यच होते.
एके दिवशी ना*झीचे सैन्याधिकारी बार्बरोसा मोहिमेबद्दल हि*टल*रची भेट घेण्यासाठी आले होते. ना*झींची बार्बरोसा मोहिम म्हणजे सोव्हिएत युनियनवर केलेले आक्र*मण. पण यावेळी हि*टलरला मेथचा दुहेरी डोस मिळाला असल्याने त्याचा जोश अत्यंत चढत्या स्तरावर होता. यामुळे त्याचा आत्मविश्वास भलत्याच पातळीवर वाढला. याच परिस्थितीत त्याने आपल्या सैन्याधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सैन्याधिकारी त्याचा अति-आत्मविश्वास पाहून थक्क झाले होते.
दोस्तराष्ट्र इटलीत उतरल्याने इटलीचा चिंतीत हुकूमशहा हि*टल*रला भेटण्यासाठी आला होता. हि*टल*र खूप थकलेला होता आणि नेहमीचा मेथ त्याला उत्साही ठेवण्यासाठी पुरेसा नव्हता. मेथ प्रभावी ठरत नाही हे समजल्यावर मोरेलने आणखी प्रभावशाली ड्र*ग, मॉर्फिनचा वापर करायचे ठरवले. मॉर्फिन हे अ*फूपासून तयार झालेले औषध असून ते अत्यंत व्यसनाधीन आहे. मॉर्फिनचा एक डोस झाल्यावर, हि*टल*र मुसोलिनीला मित्र राष्ट्रांच्या सैन्याविरूद्ध यु*द्ध सुरू ठेवण्यास सक्षम करण्यात यशस्वी झाला.
मोरेलची हि*टल*रशी जवळीक असल्याने ना*झींनी जिंकलेल्या युक्रेनमधील औषधनिर्मिती कारखान्यांना त्याने फसवले आणि त्या कंपन्यांचा वापर प्राण्यांच्या अवयवांपासून ड्र*ग्स आणि इतर औषधे तयार करण्यासाठी केला.
हि*टल*रच्या मॉर्फिन इंजेक्शनचा दर दिवसातून तीन इंजेक्शन्सपर्यंत वाढला. त्याला प्रचंड खाज सुटायला सुरुवात झाली. हि*टल*रची प्रतिकारशक्ती जवळ जवळ संपली होती. त्याने दुसऱ्या आर्डनेस आक्र*मणाचा आदेश दिल्यानंतर बल्जची लढाई झाली. हा निर्णय घेताना हि*टल*रचे मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हते, कारण आत्तापर्यंत ड्र*ग्सची प्रचंड मात्रा झाली होती. हि*टल*रचा डावा हात अनियंत्रितपणे थरथरू लागला आणि त्याने त्याच्या डाव्या पायावरील नियंत्रण पूर्णतः गमावले होते.
डॉ. थिओडोर मोरेलने दिलेल्या रसायनांच्या मिश्रणाच्या इजेक्शन्समुळे हि*टल*र त्याच्या प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त वयस्कर दिसत होता. ड्र*ग्सद्वारे हि*टल*रची ऊर्जा टिकवून ठेवल्याने हि*टल*र जादुई शस्त्राने यु*द्ध जिंकतो की काय असे अनेकांना वाटू लागले. कारण त्याचे बोलणे आणि आत्मविश्वासच इतक्या मोठ्या प्रमाणात असायचा.
अखेरीस डॉ. थिओडोर मोरेलचा हा ड्र*ग्सचा प्रकार बाहेर पडलाच. बर्लिनमध्ये मित्रराष्ट्रांनी आक्र*मण केल्याने डॉ. थिओडोरला ड्रग्सची कमतरता भासू लागली. त्यामुळे डॉ. थिओडोर मोरेलने हि*टल*रसाठी कॅफीन इंजेक्शनचा प्रयत्न केला. हे मात्र हि*टल*रच्या लक्षात आले आणि त्याने डॉ. थिओडोर मोरेलला पदच्युत केले.
यु*द्ध संपल्यानंतर, मोरेलला अमेरिकन सैन्याने अटक केली आणि हि*टल*रला विष देण्यात आल्याच्या शक्यतेबद्दल कसून चौकशी केली. पण डॉ. मोरेलविरुद्ध काही ठोस पुरावे नसल्याने त्याची १९४८ मध्ये मुक्तता करण्यात आली आणि पुढच्याच वर्षी त्याचा मृत्यू झाला. डॉ. थिओडोर मोरेलने हि*टल*रला ड्र*ग-ॲडिक्ट बनवले आणि त्याच्या निर्णय क्षमतेवर तसेच विचारशक्तीवर त्याचा घातक परिणाम झाला. डॉ. थिओडोर मोरेलच्या औषधांनी अप्रत्यक्षपणे मित्र राष्ट्रांना दुसरे महायु*द्ध जिंकण्यास मदत केली.
एखाद्या सैनिकाला ताकद आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणत्याही ड्र*गची गरज पडत नाही, पण यु*द्धाचा हेतूही तितकाच शुद्ध असायला हवा. भारत देश आणि त्याच्या संस्कृतीच्या रक्षणार्थ लाखो सैनिक कोणत्याही ड्रग शिवाय अनेक लढाया लढले. एकतर जिंकले किंवा आपल्या प्राणांची आहुती दिली, पण भारतीय सैन्याने रणांगणातून पळ काढला असे कधीच झाले नाही, या पराक्रमासाठी ड्र*ग्सची आवश्यकता नसते. शुद्ध सैनिकी भाषेत सांगायचं झालं तर ‘जज्बा’ असायला हवा. देशरक्षणाचं किंवा स्वराज्यनिर्मिती सारखी शुद्धं ध्येय समोर असतील तरच तो ‘जज्बा’ सैनिकांमध्ये येतो. कोणाच्या स्वार्थासाठी लढायचं असल्यास त्याची कमतरता जाणवते. मग प्रत्यक्ष किंवा शाब्दिक ‘ड्र*ग्स’ची आवश्यकता भासते!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










