The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या सौंदर्यवतीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर कित्येक ज्यूंना यमसदनी पोहोचवलं होतं!

by द पोस्टमन टीम
1 July 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एखाद्याचं किंवा खरंतर ‘एखादीचं’ सौंदर्य हे तिच्यासाठी एक जमेची बाजू असतं असं म्हटलं जातं. ते सौंदर्य हे समोरच्याला भुरळ पाडू शकतं. पण समजा याच सौंदर्यानं किंवा सौंदर्यवतीनं भुरळ न पडता, सरळ सरळ घात केला तर? सौंदर्य हे आकर्षक न बनता मारक ठरू शकतं.

दुसऱ्या महायु*द्धाच्या काळातली ही गोष्ट आहे. हि*टल*रने ज्यूंना संपवण्याचा विडा उचलला होता, ज्यामध्ये अनेकानेक (ज्यू नसलेले) जर्मन त्याच्या या मोहिमेत सामील होत होते. यातूनच जन्माला आली ती एक भयंकर कल्पना, ज्यात लाखो ज्यू लोकांनी आपले प्राण गमावले, ते ठिकाण होतं हि*टल*रच्या विविध छळछावण्या.

ज्यूंना जर्मनीतूनच नव्हे तर लांबलांबच्या देशातून वेगवेगळ्या मार्गाने अगदी त्यांची यादी करून जर्मनीमध्ये घेऊन यायचं. मग त्यांना या छळछावण्यांमध्ये पाठवून त्यांच्यावर शारीरिक, मानसिक असे अ*त्याचार करणं आणि त्यांना मारणं हेच या ठिकाणी होत असे.

हि*टल*रचे सहकारी आणि सल्लागार लोक हि*टल*रला ज्यूंना मारण्याच्या नवनवीन कल्पना देत असत, ज्यातून कल्पकतेने ज्यूंना कसं मारावं याचेही प्रयोग इथे होत असत.

यातून आणखीही एक कल्पना येऊ शकते की जर हि*टल*र नुसता विचाराने एवढा क्रू*र असेल तर प्रत्यक्ष त्या छळछावणीमध्ये ज्यूंचा छळ करणारे, मारणारे किती थंड डोक्याचे आणि हि*टल*रहूनही अधिक क्रू*र असू शकतील.



यापैकी अशाच एका ‘बर्गन-बेल्सन’ नावाच्या छळछावणीमध्ये एक सुंदरी होती, तिचं नाव इर्मा ग्रेस. बघताक्षणी मोहात पडेल असं सौंदर्य. पण तिच्या एका आदेशावर कोणताही ज्यू मृत्युमुखी पडेल असं तिचं क्रौ*र्य! कारण ही इर्मा ग्रेस दुसरी तिसरी कोणी नसून हि*टल*रच्या ना*झी पक्षातली एक सदस्य आणि मुख्य म्हणजे छळछावणीमधली वॉर्डन, सर्वाधिकार तिच्याकडे होते. जिच्या देखरेखीखाली अनेक ज्यू मारले गेले.

बर्गन-बेल्सनची रचना एका निवासी शिबिरासारखी होती. याठिकाणी काही दिवस, काही महिने ज्यूंची राहण्याची व्यवस्था केली जात असे आणि रोज जिवंतपणी मरणयातना देऊन एक दिवस ठार मारलं जात असे आणि अशा भरपूर निवासी छळछावण्या हि*टल*रने उभारल्या होत्या.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

नंतरच्या काळात जेव्हा या सगळ्याचा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की हि*टल*रच्या सर्वच छळछावण्यांमध्ये जे काही असे क्रुराहून क्रू*र असे वॉर्डन होते त्यात सर्वात भयंकर इर्मा होती. ती सुंदर तर होतीच पण सौंदर्याबरोबर येणारं शहाणपण तिच्याकडे नव्हतं, त्याऐवजी बाकी नकारात्मक गोष्टी जास्त आल्या होत्या. इर्माच्या कर्मामुळे तिला सर्वच छावण्यांमध्ये ‘सुंदर पशु’ असं संबोधलं जायचं, एवढा तिचा दबदबा होता.

उत्तर जर्मनीच्या बर्गन-बेल्सन छावणीत सर्वाधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली तेव्हा ती अगदी तरुण होती. हिच्याकडे नुसतं बघून ‘ही सुंदर पोरगी’ काय करणार मोठं इथे येऊन असं सुरवातीला काहींना वाटलं पण ही त्यांच्याही वरचढ निघाली.

या छावणीत काम केलेल्या सर्व स्त्रियांमध्ये इर्मा ग्रेस ही सर्वात तरुण आणि सर्वात सुंदर होती. त्यावेळी अशी अफवाही पसरली होती की ग्रेसचे एका उच्चस्तरीय ना*झी अधिकार्‍याशी संबंध होते ज्यामुळे तिला लहान वयात वॉर्डन बनणं शक्य झालं.

मुख्य म्हणजे बर्गन-बेल्सन ही छावणी फक्त महिलांसाठी होती. ज्या ज्या महिलांनी ज्यू म्हणून जन्माला येण्याचा गुन्हा केला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी विशेष व्यवस्था केली गेली होती. ही व्यवस्था पाहणारी इर्मा होती. यापैकी बऱ्यापैकी महिला या ज्यू असल्या तरी सोबतच मूळच्या रोमन असलेल्या महिलाही होत्या. निसर्गाच्या विरुद्ध जाणाऱ्या समलैंगिक महिलाही होत्या आणि शरीरात अनेक व्यंग असलेल्या अपंग महिलाही होत्या. या सर्वांना रोज वेगवेगळ्या प्रकारे करण्याचं छळण्याचं काम याठिकाणी होत असे, ज्यांची संख्या हजारांमध्ये होती.

या छावणीत सुरवातीला एखाद्याला मारण्याची सुरवात ही अन्नापासून होत असे. कित्येक दिवसांपासून पडून असलेलं, जुनं, शिळं, अन्न या बायकांना खायला दिलं जात होतं आणि पिण्यासाठी मिळणारं पाणी तसच साचलेलं, गढूळ असे. त्यामुळे दर महिन्याला आपला जीव गमावणाऱ्या महिलांचा दर हा शेकड्यामध्ये होता.

यांची राहण्याची व्यवस्था ही फक्त एके ठिकाणी त्यांना एकत्र करणं एवढ्याच उद्देशाने होती. त्यामुळे तिथे स्वच्छता हा विषयच नव्हता. कित्येक महिने स्वच्छ न केलेला परिसर, त्यातली घाण, त्यातून पसरलेली रोगराई, आजारी पडणाऱ्या महिला असं चित्र होतं आणि त्या रोगराईमुळे मरणाऱ्यांची संख्याही त्यातून वाढत होती.

वॉर्डन झाल्यानंतर लवकरच इर्मा ग्रीस ही नियमांचे पालन न करणार्‍या अपराधी ज्यूंशी तिच्या क्रू*र आणि अक्षम्य अशा असणाऱ्या वागणुकीसाठी कुप्रसिद्ध झाली. त्याकाळात अनेक त्रास भोगून तिथून निसटलेल्या ज्यू कैद्यांनी ग्रेसच्या क्रू*रतेच्या धक्कादायक कथा सांगितल्या आहेत. ज्यात कैद्यांना तिच्या जाड स्टील बसवलेल्या बुटाने जोरदारपणे लाथ मारणे आणि कैद्यांवर तिचा रक्षक कुत्रा सोडून त्याने कैद्यांना जास्तीत जास्त चावणे याचा जास्त वेळा उल्लेख येतो.

तिला राग येईल तेव्हा त्या ठिकाणी जे काही शस्त्र उपलब्ध असेल त्याने कैद्यांना वारंवार मारहाण करत असे (ते बहुतेक वेळा रॉड किंवा चाबूक असे). ती महिलांना त्यांच्या डोक्यावर मोठे, जड असे दगड धरून तासंतास उभं ठेवून त्यांचा छळ करत असे. 

सुंदर कैद्यांबद्दलची तिची ईर्षा सर्वांनाच माहीत होती कारण जेव्हा जेव्हा नवीन ट्रेन कैद्यांसह येई तेव्हा ती सर्वात सुंदर कैद्यांना सर्वात आधी मारण्यासाठी निवडायची. ऍलिस लोक कॅहान नावाची एक ज्यू कैदी, जी या छावणीतून कशीबशी जिवंत बाहेर पडली होती, ती म्हणते, “बर्गेन-बेल्सन हा पृथ्वीवरील नरकासमान होता. कॅहानने छावणीचे भयानक तपशीलवार वर्णन केले. तिथले कैदी अन्न- पाण्यासाठी सतत ओरडत असत, गोंधळ घालत असत. कसेतरी बसलेले असल्यामुळे फ्लोअरबोर्ड, बेड तुटून कैद्यांना दुखापत होत असे. विशेषतः जेव्हा कैद्यांनी झोपण्याचा प्रयत्न करत तेव्हा असं हमखास घडे.”

जेव्हा मित्र राष्ट्रांनी या छळछावणीतून सर्व ज्यूंची जेव्हा मुक्तता केली तेव्हा बर्गेन बेल्सनच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सर्व फायली जाळून टाकल्या आणि त्यांच्या कारवायांचे पुरावे नष्ट केले. हजारो ज्यूंना मारून त्याच छावणीच्या आसपास कबर बांधून किंवा तसंच त्या जमिनीत एकाच वेळी अनेक मृतदेह पुरण्यात येई आणि अशा मोठमोठ्या कबरी तिथे दिसून येत असत. त्यादेखील बुलडोझरने सपाट करण्यात आल्या.

दुसऱ्या महायु*द्धानंतर, विजयी राष्ट्रांनी ना*झी अधिकाऱ्यांवर लष्करी कोर्टात खटले भरले आणि त्यात इर्मा ग्रेसला तिच्या सहकाऱ्यांसोबत साक्ष द्यावी लागली. तिच्या सौंदर्य आणि तारुण्यामुळे वर्तमानपत्रांनी ग्रेसला भरपूर कव्हरेज दिलं, सगळ्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर ग्रेसच झळकत होती. 

फोटोग्राफर समोर आल्यावर ती नेहमी दुसरीकडे बघत असे, फोटोबद्दल तिला राग होता त्यामुळे बहुतांशी फोटोंमध्ये ती कॅमेऱ्याकडे बघताना दिसत नाही. असंख्य प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला की कोणी अन्न किंवा एखादी गोष्ट चोरली तर ग्रेस त्यांना मारत असे, बाकी इतरवेळी त्यांनी ग्रेसला कैद्याला मारहाण करताना पाहिले नाही. तिने तर स्वतःकडे कुत्रा होता हेही नाकारलं आणि आपण एक दयाळू आणि चांगली वॉर्डन आहोत असं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

तिने कैद्यांना नग्न अवस्थेत छावणीच्या आवारात बाहेर काढून त्यांचा अपमान करत सगळ्यांसमोर करण्यासाठी कॅम्पमध्ये परेड करायला लावली, याचा शेवट कैद्यांच्या मृत्यूने झाला. याबद्दल विचारलं असता ती सांगते की या परेडमुळे कैद्यांचा मृत्यू झाला याची आपल्याला अजिबातच कल्पना नव्हती. बर्गेन-बेल्सनच्या बहुतेक ना*झी अधिकार्‍यांनी तर परेडचा उद्देश माहीत असल्‍याचंही नाकारलं. तरीही, जवळपास ४५ ना*झी कर्मचार्‍यांपैकी कोणालाही कैद्यांच्या मृत्यूबद्दल काहीच माहीत नव्हतं यावर कोणीही विश्वास ठेऊ शकत नाही.

इर्मा ग्रेस ही छावणीची मुख्याधिकारी होती आणि छावणीत जे काही घडलं त्याला पूर्णपणे जबाबदार होती. तिच्या साक्षीवर एकाही न्यायाधीशाने विश्वास ठेवला नाही.

इर्मा ग्रेस फक्त २२ वर्षांची असताना तिच्या गुन्ह्यांसाठी आणि क्रौ*र्यासाठी तिला फाशी देण्यात आली. कदाचित एखाद्या गुन्हेगाराच्या क्रू*र वागणुकीसाठी एवढ्या कमी वयात फाशी दिलं गेलेलं हे एकमेव उदाहरण असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा एकमेव खेळाडू आहे जो भारत आणि इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळलाय!

Next Post

या अभिनेत्रीने एक नाही दोन नाही तब्बल ४ ऑस्कर जिंकले आहेत!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या अभिनेत्रीने एक नाही दोन नाही तब्बल ४ ऑस्कर जिंकले आहेत!

...आणि त्या दिवसानंतर ब्रॅड हॉगला सचिनची विकेट कधीच मिळाली नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.