The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या टीव्ही कंपनीने ‘ब्रँडिंग’ची संकल्पना भारतात रुजवली होती

by द पोस्टमन टीम
13 July 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


७० च्या दशकात सिनेमा हे एका प्रसिद्ध मनोरंजनाचे साधन होते. त्या काळात सिनेमागृहाच्या बाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या. टेलिव्हिजन विकत घेणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. त्या काळी टेलिव्हिजनवर फक्त एकच वाहिनी प्रदर्शित व्हायची त्या वाहिनीचे नाव होते दूरदर्शन, त्यावर छाया गीत हा हिंदी गीतांचा कार्यक्रम सकाळी असायचा आणि संध्याकाळी त्याच्यावर हिंदी बातम्या प्रसारित केल्या जात होत्या.

ज्यांच्या घरी टेलिव्हिजन असायचा त्यांच्याकडे लोक मोठ्या संख्येने एकत्र जमायचे आणि त्या घराला एखाद्या मिनी थियेटरचे रूप प्राप्त व्हायचे. टेलिव्हिजनचे अनेक ब्रँड त्याकाळी होते, या ब्रॅंड्सपैकी टेलिव्हिस्टा हा देखील एक प्रसिद्ध ब्रँड होता. या व्यतिरिक्त ऑस्कर, बेल्टेक, वेस्टन, नेलको, सालोरा, बेस्टव्हिजन आणि क्राऊन हे देखील ब्रॅण्ड्स त्याकाळी अस्तित्वात होते.

पण टेलिव्हिस्टाची गोष्टच वेगळी होती. ज्या काळात विस्टन आणि जेके इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडसने भारतीय बाजरपेठेवर पकड मजबूत केली होती, त्यावेळी त्या ब्रँड्सना टेलिव्हिस्टाने आव्हान दिले होते. नुसते आव्हानच दिले नव्हते तर आपल्या अत्यंत आक्र*मक अशा प्रसिद्धी तंत्रांच्या बळावर त्यांनी या इतर ब्रँडसच्या बाजारपेठेवर कब्जा केला होता.

१९७२ साली टीव्हीवर ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ हा प्रसिद्ध टॉक शो सुरु करण्यात आला. हा कार्यक्रम फार प्रसिद्ध झाला.



हा टॉक शो सुरु झाला त्याच वर्षी ‘टेलिव्हिस्टा- अ बिग नेम इन टीव्ही’ अशी मोठी पानभर जाहिरात टेलिव्हिस्टाने वृत्तपत्रात छापून आणली.

त्याच वेळी टेलिव्हिस्टाने अजून एक जहिरात काढली, या जाहिरातीनुसार टेलिव्हिस्टाने चित्रपटगृहासारखा अनुभव आमच्या टीव्हीद्वारे मिळतो अशा पद्धतीची मार्केटिंग करायला सुरुवात केली. अनेक चित्रपट आणि मालिका यांच्यातही त्यांनी ब्रॅण्डिंग करायला सुरुवात केली होती. त्यांच्या जाहिरातीतून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या ब्रँडचे प्रमोशन केले.

त्यांच्या एका जाहिरातीत त्यांनी आपल्या ब्रँडच्या टीव्हीच्या झूम करण्याच्या क्षमतेची ब्रॅण्डिंग केली. यात त्यांनी सतारवादक रवि शंकर यांचे सतार वादन दाखवले होते आणि त्यात सांगितले होते की जर तुम्हाला सतारवादकाच्या बोटांची हालचाल नजरेत टिपायची असेल तर तुम्हाला टेलिव्हिस्टाचा टीव्ही घेण्यावाचून दुसरा पर्याय नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

टेलिव्हिस्टाच्या या अप्रतिम स्ट्रॅटेजीचा त्यांना मोठा फायदा झाला. त्यांच्या ब्रँडने तीन वर्षातच सगळ्या ब्रॅंड्सला पिछाडीवर टाकत, दुसऱ्या स्थानी झेप घेतली. टेलिव्हिस्टाचा टीव्ही प्रसिद्ध होता त्याच्या दोन्ही बाजूने बंद होणाऱ्या स्लायडिंग लाकडी दरवाज्यासाठी, हा दरवाजा त्यांनी डायोनारा या एका ब्रॅण्डच्या मॉडेलची कॉपी करून तयार केला होता.

परंतु टेलिव्हिस्टा फक्त मार्केटिंग करत नव्हता तर त्यांचे टीव्ही हे खऱ्या अर्थाने उत्तम दर्जाचे होते, त्यांची पिक्चर क्वालिटी देखील इतर ब्रँड्सच्या तुलनेत उत्तम होती.

टेलिव्हिस्टाने त्या काळात खरेदीनंतरची सर्व्हिसिंग आणि एका वर्षाची वॉरंटी आपल्या प्रॉडक्टवर दिली होती, यामुळे लोकांचा ओढा टेलिव्हिस्टाकडे फार होता.

टेलिव्हिस्टा ही कंपनी भारतात आर्थिक उदारीकरणाचे युग येण्यापूर्वी चांगल्या स्थितीत होती. त्याकाळी बहुतेक टेलिव्हिजन कंपन्या या जरी आपल्या उत्पादनांची निर्मिती भारतात करायच्या तरी त्यांचे बहुतांश भाग ते तैवान आणि कोरिया या देशातून आयात करायचे. बऱ्याचदा सर्व सुटे भाग आयात करून त्यांच्या जोडणीचे काम फक्त भारतात केले जायचे.

१९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर परिस्थिती पालटली. ओनिडा, सॅमसंग, एलजीसारख्या अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली. हे सर्व टीव्ही विक्रेते हे भारतीय कंपन्यांच्या तुलनेत अनेक आघाड्यांवर पुढे होते. टेलिव्हिस्टा हा ब्रँड असाच या स्पर्धेत मागे पडत गेला. टेलिव्हिस्टा ही कंपनी आजही अस्तित्वात असली तरी मार्केटवर तिचा आधीसारख ताबा उरलेला नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जेव्हा बाबरने शिखांचे पहिले गुरु गुरुनानक यांना कैदेत टाकलं होतं..

Next Post

आयआयएममधून लागलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून हर्षा ‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’ बनला

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आयआयएममधून लागलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून हर्षा 'व्हॉइस ऑफ क्रिकेट' बनला

जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.