The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने नाहीतर एका चष्मा बनवणाऱ्या डच माणसाने लावला होता

by द पोस्टमन टीम
16 December 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एकदा लोकप्रिय टीव्ही शो कौन बनेगा करोडपतीमध्ये एका स्पर्धकाला दुर्बिणीचा शोध कोणी लावला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या स्पर्धकाने ‘गॅलिलिओ गॅलिलि’ हा पर्याय निवडला. प्रेक्षकांना देखील गॅलिलिओ गॅलिलि हेच योग्य उत्तर मानले होते, पण ज्यावेळी योग्य उत्तर जाहीर झाले तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले कारण गॅलिलिओ गॅलिली हे उत्तर चुकीचे होते. दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने नाही लावला हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांनीच बालपणापासून गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला व त्याद्वारे ग्रहताऱ्यांचे निरीक्षण केले हेच माहिती होते. त्यामुळे हे उत्तर चुकीचे नाही हे कळल्यावर सगळे चकित होणे स्वाभाविकच होते.

दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने नाही, नेदरलँडमधील एक माणसाने लावला होता. गॅलिलियोने याच दुर्बिणीत बदल करून तिला अधिक चांगले रूप प्रदान केले होते, पण दुर्बिणीचा शोध हा नेदरलॅंडच्या व्यक्तीनेच लावला होता, त्यामुळे गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला होता, हे उत्तर चुकीचे आहे.

हॅन्स लीपर्शे या नेदरलँडमध्ये राहणाऱ्या चष्मा बनवणाऱ्या व्यक्तीने पहिल्या दुर्बिणीची निर्मिती केली आहे.

लीपर्शे जास्त शिकलेला नव्हता. त्याच्याकडे पैसे देखील नव्हते, पैशाच्या विवंचनेतूनच तो चष्मा बनवण्याच्या व्यवसायात उतरला होता. त्याने हा व्यवसाय उभारण्यासाठी मोठे कष्ट घेतले होते. त्याला प्रयोग करण्याची आवड होती. तो चष्म्याच्या लेन्सपासून काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करत होता. यात बऱ्याचदा अनेक नव्या गोष्टी निर्माण करायचा.

लीपर्शेजवळ अनेक प्रकारच्या लेन्स होत्या. त्याने एके दिवशी तीन वेगवेगळ्या लेन्स समोरासमोर जोडून एका उपकरणाची निर्मिती केली. या उपकरणातून तो लांबच्या वस्तूंना स्पष्ट आणि अगदी जवळ बघू शकत होता. आणि बास! अशी झाली जगातील पहिल्या दुर्बिणीची निर्मिती. दुर्बीण तयार केल्यानंतर त्याने लगेचच १६०८ साली नेदरलँड सरकारकडून त्या दुर्बिणीचे पेटंट मिळवले. आता त्याने दोन्ही डोळ्यांचा वापर करून बघता येईल अशा दुर्बिणीची निर्मिती केली. त्याने या दुर्बिणीत कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला होता.



लीपर्शेच्या दुर्बिणीच्या शोधाबाबत अजून एक किस्सा अनेक पुस्तकांमध्ये वाचायला मिळतो.

असे म्हणतात की दुर्बिणीचा शोध लीपर्शेने नाही, तर त्याच्या लहान मुलाने लावला होता, जो त्याच्या दुकानात खेळत बसला होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी तो आपल्या पित्याला भेटायला त्याच्या दुकानात आला होता. त्यावेळी तिथे खूप भिंग पडले होते, त्यांच्या वैविध्यपूर्ण रंगांमुळे तो त्याकडे आकर्षित झाला. त्याने वेगवेगळ्या रंगाच्या भिंगांमधून पाहण्याचा प्रयत्न केला. खेळता खेळता त्याने काही भिंगांना समोरासमोर लावले आणि खिडकीच्या बाहेर पहिले तर समोरच्या इमारतीचा मिनार त्याला जवळ आलेला भासला. तो यामुळे फारच आश्चर्यचकित झाला आणि त्याने ते नेऊन आपल्या पित्याला दाखवले, यातून पुढे लीपर्शेने दुर्बिणीचा आविष्कार केला.

दुर्बिणीचा उपयोग हा लांबच्या गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी करण्यात येतो. दुर्बिणच्या मदतीने लांबच्या गोष्टींचे निरीक्षण करणे हे सहज शक्य होते.  जेव्हा दुर्बिणीचा शोध लावण्यात आला त्यावेळी लोकांना हा एक चमत्कार वाटला होता. दुर्बिणीचा शोध ठरवून लावण्यात आला नव्हता, तो अपघाताने लागला होता, त्यामुळे त्यावेळी दुर्बिणीने अनेकांना आकर्षित केले होते, यापैकीच एक होता गॅलिलियो गॅलिली.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

गॅलिलियोने दुर्बिणीच्या रचनेत बदल करत अजून ताकदीच्या दुर्बिणीची निर्मिती केली होती. या दुर्बिणीच्या मदतीने तो लांबच्या वस्तुंना २० ते ३० पट जवळ आणून त्यांचे निरीक्षण करू शकत होता. या दुर्बिणीच्या बळावर गॅलिलिओने खगोलशास्त्राचा अभ्यास केला होता. गॅलिलिओ हा पहिला व्यक्ती होता, ज्याने दुर्बिणीच्या मदतीने आकाशातील अनेक रहस्यांचा वेध घेतला होता.

आज जगभरात अनेक वेधशाळा आहेत, या वेधशाळांमध्ये अनेक अत्याधुनिक दुर्बिणी बसवण्यात आल्या आहेत, आज त्या दुर्बिणींच्या मदतीने शास्त्रज्ञ अवकाशातील ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करत असतात. नासाच्या हबल दुर्बिणीचा यासाठी मोठ्याप्रमाणात वापर केला जातो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

लग्नाच्या आधी वाईट स्वप्न पडले तर ‘नागा’ जमातीच्या मुली लग्न मोडतात!

Next Post

जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या लेहमन ब्रदर्सचे एकाएकी दिवाळे कसे निघाले ?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या लेहमन ब्रदर्सचे एकाएकी दिवाळे कसे निघाले ?

महाराजा रणजितसिंहाच्या बॅटींगपुढे इंग्रज गोलंदाज अक्षरशः नांग्या टाकायचे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.