The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या मिस्ट्री स्पिनने भल्याभल्या बॅटर्सना बेजार करणारा ‘सुनील नरेन’ अजूनही दोन रूमच्या घरात राहतोय

by द पोस्टमन टीम
29 October 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘Simplicity is the ultimate sophistication,’ लिओनार्डो दा विंचीच्या या वाक्याचं पालन करणं जरा कठीणच आहे नाही? अन् जर तुम्ही कोट्यावधी रुपये कमवणारे एखादे खेळाडू असाल तर मग महाकठीण. घर, गाडी म्हणा किंवा कपडे म्हणा, कुठल्यानं कुठल्या गोष्टीतून आपली श्रीमंत दिसून येतेच. मात्र, एक खेळाडू असा आहे, जो कोट्यवधी रुपयांची कमाई करत असूनही केवळ दोन खोल्यांच्या घरामध्ये राहतो! हो, अतिशयोक्त वाटत असली तरी ही गोष्ट एकदम खरी आहे.

सुनिल नरेन, असं या खेळाडूचं नाव आहे. सुनिल वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटमधील अनेक खेळाडू आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. मात्र, सुनिल नरेन त्यांच्यापेक्षाही वेगळा आहे. शांत आणि संयमी स्वभाव असलेल्या सुनिलचं राहणीमान अतिशय साधं आहे.

इंडियन प्रिमियर लीगमधील कोलकाता नाइटराइडर्सच्या फ्रँचायझीनं सुनिल नरेला १२.५ कोटी रुपये किंमत देऊन रिटेन केलं होतं. कोलकात्यानं रिटेन केलेल्या मोजक्या दोन खेळाडूंमध्ये नरेनचा समावेश होता. कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा कुठलाही व्यक्ती घर आणि गाडी या दोन गोष्टी तर नक्कीच खरेदी करेल. या गोष्टीमध्ये बहुधा कुणाला शंका नसावी.

मात्र, सुनिल नरेन याला अपवाद ठरला आहे. तो आजही आपल्या वडिलांनी खरेदी केलेल्या घरामध्ये राहतो. दोन खोल्या असलेलं हे घर सुनिलचे वडील शादीद नरेन यांनी काही वर्षांपूर्वी खरेदी केलेलं आहे. सुनिलच्या या घराची आणखी एक खासीयत आहे. त्याचं संपूर्ण घर गुलाबी रंगाचं आहे! वस्तुंच्या रंगांबद्दल पॅशनेट असणं ही काही अगदी असामान्य गोष्ट नाही. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री बॉलर सुनिलचं गुलाबी रंगावर असलेलं प्रेम एकदम ‘नेक्स्ट लेवल’ आहे. म्हणून त्यानं आपल्या घराला देखील गुलाबी रंग दिला आहे. त्याचा सहकारी आणि मित्र रोव्हमन पॉवेलनं ही गोष्ट सांगितली होती.

२६ मे १९८८ रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोतील अरिमामध्ये सुनीलचा जन्म झाला. त्याचे वडील शादीद नरीन एका रेस्टॉरन्टसाठी ड्रायव्हरचं काम करत होते तर आई क्रिस्टीना मुलांचा सांभाळ करत होती. सुनीलचे वडील महान भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांचे मोठे चाहते होते. जेव्हा गावस्कर वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात, तेव्हा शादीद आपल्या देशाला सपोर्ट करण्याऐवजी भारतीय संघाला चीयर करत. म्हणून त्यांनी आपल्या मुलाचंही नाव सुनील ठेवलं.



इतकंच काय तर मुलीचं नाव देखील सुनीली ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, त्यांची पत्नी क्रिस्टीना यांनी या गोष्टीला नकार दिला. आपल्या मुलाला देखील क्रिकेटची आवड असून त्याच्या अंगात प्रतिभा आहे, ही गोष्ट त्याच्या वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी सुनीलला वयाच्या सातव्या वर्षापासून क्रिकेट ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली.

स्पायकी हेअरस्टाईल असलेल्या सुनीलनं २००९ साली अंडर-१९ च्या एका चाचणी सामन्यात सर्व दहाच्या दहा विकेट्स घेऊन पहिल्यांदा सर्वांचं लक्ष वेधून घेतल होतं. त्यानंतर त्याला तत्काळ त्रिनिदाद आणि टोबॅगो संघात खेळण्यासाठी बोलवण्यात आलं. उजव्या हाताच्या ऑफ स्पिनर असलेल्या सुनिलनं वेस्ट इंडीज अंडर -१९ संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि लीवार्ड आयलंडविरुद्ध खेळून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

२००९ साली भारतात झालेल्या पहिल्या ट्वेंटी-ट्वेंटी चॅम्पियन्स लीगसाठी त्याला वेस्ट इंडिजच्या मुख्य चमूमध्ये घेण्यात आलं होतं. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. २०११ साली तो कॅरेबियन टी-ट्वेंटी लीगमध्ये खेळला. या स्पर्धेत त्यानं १३.४० च्या सरासरीनं ५ बळी घेतले. मात्र, त्याची बॉलिंग ॲक्शनमध्ये त्रूटी असल्याची चर्चा रंगली.

त्यानंतर त्याला काही दिवस पर्थमधील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील बायो मेकॅनिकल एक्सपर्टकडे पाठवण्यात आलं. चॅम्पियन्स लीगमध्ये त्यानं आपल्या सुधारित बॉलिंग ॲक्शनचा चांगला प्रभाव निर्माण केला. लीगमध्ये त्यानं १०.५० च्या सरासरीनं दहा विकेट्स मिळवल्या होत्या. त्याच वर्षाच्या अखेरीस, त्यानं भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट घेत वेस्ट इंडिजला १६ धावांनी विजय मिळवून दिला.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नरेननं सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याच्या कामगिरीमुळं कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी त्याच्याकडे आकर्षित झाली. २०१२ च्या आयपीएल लिलावात त्याला ७ लाख अमेरिकन डॉलर्स किंमत देऊन कोलकात्यानं खरेदी केलं. त्यानं आपली निवड सार्थ ठरवली आणि सिझनमध्ये २४ विकेट्स घेतल्या. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला होता. त्याच्या योगदानामुळे कोलकात्याला पहिलं आयपीएल विजेतेपद मिळण्यास मदत झाली.

नरेनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवडण्यात आल होतं. त्यानंतर जून २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी दुखापतग्रस्त केमार रोचच्या जागी त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, कसोटी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी विशेष नेत्रदीपक राहिलेली नाही. २०१३ चा आयपीएल सिझन देखील नरेनसाठी चांगला ठरला. त्यानं १६ सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या. मात्र, कोलकात्याच्या खराब कामगिरीमुळे संघ लवकरच बाहेर पडला. नरेनचं गोलंदाजी तंत्र फसवं होतं. त्याच्या बळावर त्यानं अनेक फलंदाजांना चकवलं होतं.

नियमित ऑफ स्पिन, कॅरम बॉल, द दूसरा, नकल बॉल आणि निफ्टी स्ट्रायटर अशा कितीतरी घातक अस्त्रांचा त्याच्या गोलंदाजी भात्यामध्ये समावेश आहे. त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जम बसवल्यानंतर २०१४ च्या चॅम्पियन्स लीग दरम्यान आयसीसीनं संशयास्पद गोलंदाजी ॲक्शन असल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हापासून तो सातत्यानं त्यावर काम करत आहे.

नरेन सध्या जगभरातील वेगवेगळ्या टी ट्वेंटी लीगमध्ये खेळत आहे. परंतु राष्ट्रीय संघानं अद्याप त्याची फारशी दखल घेतलेली नाही. विविध लीगमधून त्याची कोट्यवधी रुपयांची कमाई होते. मात्र, त्यानं आपला राहणीमानातील साधेपणा सोडला नाही. हे त्याच्या दोन खोल्यांच्या घरावरून सिद्ध होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आजही कित्येक लोक ॲझटेकच्या शापित खजिन्याच्या शोधात आपलं आयुष्य पणाला लावतायत

Next Post

दुसऱ्या महायु*द्धात बेपत्ता झालेल्या जपानच्या लाखो सैनिकांचा अजूनही शोध लागलेला नाही

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

दुसऱ्या महायु*द्धात बेपत्ता झालेल्या जपानच्या लाखो सैनिकांचा अजूनही शोध लागलेला नाही

जॉन डॅनियल - या गोरिलाच्या पिलाला माणसाच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.