The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग २

by द पोस्टमन टीम
9 June 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
1
charlie chaplin 6 postman

TheBL.com

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

१६ एप्रिल १८८९ रोजी चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन याचा जन्म दक्षिण लंडन मध्ये वाल्वर्थ इथे एका जिप्सींच्या कोचमध्ये
(वाहनातले घर) झाला.

लंडनचा हा भाग म्हणजे १९व्या शतकाच्या शेवटी शेवटी अस्तित्वात असलेल्या विकटोरीयन कर्मठ इंग्लिश समाज जीवनावरचा उतारा होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अनिर्बंध जुगार, वेश्याव्यवसाय, दारू आणि इतर नशापाण्याचे अड्डे ह्याने हा भाग गजबजलेला असे.



 

तिथे असलेल्या म्युझिक हॉल मध्ये अनेक अप्रसिद्ध, गरीब कलावंत आपली कला – गाणी नाटक एकपत्री प्रयोग सादर करत आणि उपजीविका चालवत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

तिथेच अशी सटर फटर कामं करून उपजीविका चालवणारा चार्लीचा बाप चार्ल्स स्पेन्सर चाप्लीन सिनियर हा एका खाटकाचा मुलगा तर आइ हाना चाप्लीन ही एका चांभाराची मुलगी हे ही होते.

हे दोघे नवरा बायको वाल्वर्थ इथल्या गजबजलेल्या म्युझिक हॉलमध्ये गाणी नाच नाटक नकला वगैरे करून लोकांचे मनोरंजन करीत व गुजराण करीत.

 

आता ह्या माहितीला तसा पुरावा काही नाही पण स्वत: चार्लीनेच ही माहिती सांगितली आहे कि चार्लीचा मोठा भाऊ सिडने हा त्यांच्या लग्नाच्या आधीच तिला झालेला होता आणि त्याचे वडील कोण हे ठावूक नव्हते.

तो म्हणजे सिडने १४ आठवड्यांचा असताना हाना आणि चार्ल्स ने लग्न केले आणि नंतर चार वर्षानी चार्ली चा जन्म झाला.

काही लोकांच्या म्हणण्या प्रमाणे तो जे सांगतो तेच त्याचे वडील होते किंवा काय, या संदर्भातही प्रश्न आहेत. जो कोणी गृहस्थ वडील म्हणून सांगितला जातो तो व्यसनी, दारूडा बाईल वेडा होता.

 

charlie chaplin 6 postman
TheBL.com

अन ३८व्या वर्षीच तो दारू पिऊन मेला. चार्लीच्या आईसंदर्भातही काही गंभीर शंका आहेत.

काही काळ तिला लिली हार्ली ह्या नावाखाली बऱ्यापैकी प्रसिद्धी आणि कामं मिळाली खरी पण अतिरिक्त मद्यपानाने तिचा आवाज खराब झाला, मस्तकशूळाचा विकार जडला आणि मग तिला काम मिळेनासे झाले.

नंतर चार्लीच्या आईनं जगण्यासाठी नर्सची काम, कपडे शिवायची काम अशी पडेल ती कामं केली. प्रसंगी चरितार्थासाठी देहविक्रयही केला.

 

charlie chaplin 7 postman
India Today

ती ही व्यसनी होती आणि बेकारी,अपयश, गरिबीमुळे लवकरच नैराश्यग्रस्त झाली आणि पुढे तर मनोरुग्णच झाली. त्यामुळे वेगवेगळय़ा पुनर्वसन केंद्रांवर तिला वारंवार दाखल करावं लागलं होतं.

चार्लीचा बराचसा शालेय काळ अनाथ मुलांच्या केंद्रांत वा सरकारी वसतिगृहांतच गेला.साधारण एकुणात तो २ वर्षे शाळेत गेला. बास पुढे नाही.

१९०१ साली दारू पिऊन बाप मेल्यानंतर आणि आई आधीच मनोरुग्ण म्हणून वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाल्यामुळे हे दोघे भाऊ आता खरेच रस्त्यावर आले.

 

अत्यंत गरीबी आणि उपासमारीमुळे नाईलाजाने तो आणि त्याचा भाऊ सिडने अक्षरश: रस्त्यावर येऊन लोकांचे हरतर्हेने मनोरंजन करून चार दिडक्या मिळवत आणि पोटाची खळगी भरत.

या सगळय़ा प्रतिकूल परिस्थितीनच चार्ली चॅप्लिनला घडवलं. असल्या निराशाजनक वातावरणात राहून स्वत: न बिघडता, न वाया जाता त्याने पुढे जे कर्तृत्व गाजवलं, जी प्रसिद्धे आणि यश मिळवलं ते पाहून त्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहवत नाही.

आधी मोठा भाऊ सिडने हा बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला आणि त्याला फ्रेड कार्णो थियेटर्स ह्या तेव्हाच्या बर्यापैकी प्रसिद्ध नाटक कम्पनीत काम मिळाले.

 

त्याने लगेच आपल्या भावाला चार्लीला त्या कंपनीत ज्युनियर कलाकार म्हणून लाऊन घेतले.

तिथे तो नाटकातल्या दोन प्रवेशांच्या मधल्या काळात नकला वगैरे करून लोकांचे मनोरंजन करीत असे आणि वेळ पडेल तशी इतर कुठलीही कामे करीत असे.

१९१० साली तो कंपनी तर्फे कार्यक्रमाच्या दौऱ्याच्या निमित्तानं संधी मिळून इंग्लंडमधून अमेरिकेत गेला. तिकडे तो छोटे छोटे सिनेमे बनवायला लागला.

त्याच्या दारू पिऊन तर्र झालेल्या माणसाच्या विनोदी करामती भलत्याच लोकप्रिय झाल्या. त्यात त्याचा साथीदार होता नंतर लॉरेल हार्डी ह्या अतिशय गाजलेल्या दुक्कलीतला स्टेनली लॉरेल (मराठीत हीच जोडगळ जाड्या- रड्या म्हणून प्रसिद्ध आहे).

ज्याचा बाप दारू पिऊन मेला आणि आई मनोरुग्ण झाली त्या चार्लीने दारुड्याच्या भमिका करण्यात निपुणता मिळवली. पण तो तिथेच थांबला नाही.

अशा अनेक भूमिका करता करता त्याला त्याच्या आयुष्यातले सर्वात प्रभावी पात्र सापडले, तेच ते.. वेंधळय़ा चार्लीचे.. ज्यात तो पडतो, धडपडतो.. त्याच्यावर काही ना काही आदळतं.. किंवा तो कोणावर तरी आदळतो.

असा सगळा मसाला असलेले. हसवणारे पण आतून मात्र सहृदय, परोपकारी.विचित्र वाटणारे कपडे घातलेलं. छोटी बोलर टोपी आणि मोठाले बूट,काठी आणि फेंगडी चाल.

ढगळ विजार आणि तंग कोट, फाटका विटलेला शर्ट आणि बेंगरूळ वाटणारा टाय आणि मुख्य म्हणजे आखूड मिशा.हे विचित्रतेने भरलेले रसायन लोकाना फारच भावले.

 

आश्चर्य म्हणजे ह्या अशाच मिशा दुसरा अत्यंत प्रसिद्ध- कुप्रसिद्ध माणूस म्हणजे हिटलरने ठेवल्या होत्या. – अथात तेव्हा हिटलर आजून जागतिक पटलावर प्रसिद्धीला यायचा होता.

पण तरीही चार्लीला नंतर सुद्धा त्या मिशा आपल्या पात्रातून कमी करायची गरज पडली नाही.

हा लिटल ट्रॅम्प लोकाना इतका भावला आणि प्रसिद्ध झाला कि चार्लीने ट्रॅम्पची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ४५ छोट्या
छोट्या फिल्म्स फक्त जवळपास १७ महिन्यात बनवल्या. आणि त्या सगळ्या धडाक्यात खपल्या देखिल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Charlie ChaplinComedianHollywoodLife Story
ShareTweet
Previous Post

या दोन भावांच्या प्रयत्नातून पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता

Next Post

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग ३

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग ३

केप्लरने सांगितलं की सूर्य पृथ्वीभोवती नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.