The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरबस्तानातील टोळ्यांना एकत्र करणारा ब्रिटिश ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in विश्लेषण, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जीवनात वेळोवेळी आपण ‘माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावेत’ ही म्हण ऐकत आणि बोलत आलेलो आहोत. माणसाला जणू त्याच्या क्षमतांची आठवण करून देणारा हा मराठीतला सुप्रसिद्ध वाक्प्रचार. पण याच वाक्प्रचाराला अपवाद ठरणारे अनेक व्यक्तिमत्वही आपण पाहतो, आणि त्यातील कैक कर्तुत्ववान माणसे आपल्याला आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावतात. आपल्या नैसर्गिक क्षमतांच्या पलीकडे जाऊन प्रगतीशील काम करणं हा माणसाचा स्वभाव आहे, नव्हे, यामुळेच माणसाचं माणूसपण सिद्ध होतं असं म्हणायला हरकत नाही.

आज आपण अशाच एका असामान्य ब्रिटिश व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचं नाव आहे कर्नल थॉमस एडवर्ड लॉरेन्स अर्थात, कर्नल टी. इ. लॉरेन्स, ऑगस्ट १८८८ मध्ये जन्मलेल्या या ब्रिटिशाने आयुष्यात अनेक मोठ्या कामगिरी पार पाडल्या. पुरातत्वशास्त्र, सैन्य अधिकारी, लेखक आणि उत्कृष्ट मुत्सद्दी अशा अनेक भूमिका त्याने जीवनाच्या रंगभूमीवर साकारल्या.

अरबस्तानातील त्याच्या असामान्य कार्यामुळे आणि परखड लिखाणामुळे त्याला लॉरेन्स ऑफ अरेबिया (अरेबियाचा लॉरेन्स) अशी ओळख प्राप्त झाली, पुढे सन १९६२ मध्ये याच नावाने त्याच्या युद्धजन्य परिस्थितीतील कार्यांवर आधारित एक चित्रपट प्रदर्शित झाला.

पहिल्या महायु*द्धादरम्यान ऑटोमन साम्राज्यविरोधातील सिनायी-पॅलेस्टाइनच्या मोहीमेतही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अशा या बहुरूपी व्यक्तित्वाचा जन्म मात्र अनेक कठीण परिस्थितीत, विवाहबाह्य संबंधांतून झाला. कर्नल थॉमसची आई, साराह ही एक राज्यपाल आणि वडील सर थॉमस चॅपमॅन हा एक श्रीमंत ब्रिटिश-आयरिश सरदार होता. आपली पत्नी आणि कुटुंब आयर्लंडमध्ये सोडून चॅपमॅन साराहबरोबर राहण्यासाठी ब्रिटनमध्ये आला होता. साराह आणि चॅपमॅन हे स्वतःला मिस्टर अँड मिसेस लॉरेन्स संबोधत.

तर असे हे लॉरेन्स दाम्पत्य सन १८९६ मध्ये ऑक्सफर्डमध्ये स्थलांतरित झालं. याच ठिकाणी थॉमसने, म्हणजे टी. इ. लॉरेन्सने आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण करून ऑक्सफर्डच्याच जेसस कॉलेजमध्ये सन १९०७ ते १९१० दरम्यान इतिहासाचा अभ्यास केला. १९१० ते १९१४ दरम्यान त्यानं सिरियातील कारकेमिश येथील ब्रिटिश संग्रहालयात मुख्य पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून काम केलं.



सगळं काही सुरळीत चालू असताना युद्धाच्या अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्याच आणि १९१४ मध्ये यु*द्धाचा बिगुल वाजला, या यु*द्धात कर्नल लॉरेन्सने ब्रिटिश सैन्यासाठी काम करण्याचं ठरवलं आणि पुढे त्याला इजिप्तमधील अरब ब्युरो या १९१६ मध्ये सुरू झालेल्या गुप्तहेर तुकडीत तैनात करण्यात आलं.

याच गुप्तहेर खात्यात असताना त्याने अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. गुप्तहेर खात्यांतील मोहिमांसाठी त्याने मेसोपोटेमिया (म्हणजेच ज्या भागाला सध्या मिडल ईस्ट म्हटलं जातं तो भाग) आणि अरब देशांमध्ये प्रवास केला. या दरम्यानच कर्नल थॉमस आपल्या काही ब्रिटिश सहकाऱ्यांसह अरबस्तानातील हेजाझच्या राज्याला सहकार्य करत अरब बंडामध्ये सहभागी झाला. अरबस्तानातील हे बंड हेजाझच्या राज्याने ऑटोमन साम्राज्यविरोधात स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी पुकारलेलं बंड होतं.

वर सांगितल्याप्रमाणे कर्नल टी. इ. लॉरेन्सने या बंडात सहभाग तर घेतलाच शिवाय, त्याने बंड यशस्वी व्हावं म्हणून फैजल-ए-बीन अल्-हुसैन बीन अल्-हशेमी अर्थात एमिर फैजल बरोबर काम केलं. एमिर फैजल अरबस्तानातील बंडाचा प्रमुख नेता होता, तसेच १९२०मध्ये तो आजच्या सिरियामधील अरब राज्याचा राजा बनला आणि १९२१ ते १९३३ दरम्यान त्याने इराकची राजगादी चालवली.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या बंडादरम्यान अरबस्तानासारख्या परदेशातही आपल्या बौद्धिक सामर्थ्याने कर्नल लॉरेन्सने स्वतःचा इतका मोठा प्रभाव पाडला होता, काही वेळा तो स्वतः बंडाचे नेतृत्व करत. सन १९१८ मध्ये अरबस्तानातील बंडात कर्नल लॉरेन्सने नेतृत्व केलेल्या ऑटोमन साम्राज्यविरोधातील सैन्य कारवाईत हेजाझच्या राज्याने दमास्कस शहरावर मोठा विजय मिळवला.

पहिल्या महायु*द्धानंतर कर्नल लॉरेन्स ब्रिटिश फॉरेन ऑफिस मध्ये अर्थात ब्रिटिश परराष्ट्र खात्यात ब्रिटिश सरकार आणि एमिर फैजलसोबत काम करू लागला. त्यानंतर सन १९२२ मध्ये त्याने सार्वजनिक आयुष्यातून माघार घेतली आणि सन १९३५ पर्यंत मुख्यतः रॉयल एअर फोर्स (ब्रिटनच्या वायुसेनेत) आणि काही प्रमाणात ब्रिटनच्या भूदलात “एनलिस्टड मॅन” म्हणून काम केलं. सैन्य परिभाषेत एनलिस्टड मॅन, नोंदणीकृत व्यक्ती म्हणजे अशी एक व्यक्ती, जे एका विशिष्ट क्षेत्रात तज्ज्ञ असतात आणि हे लोक त्या क्षेत्रात आपल्या सैन्य तुकडीला काम करण्यात मदत करतात.

याच काळात कर्नल लॉरेन्सने त्याचं बहुचर्चित आणि प्रसिद्ध असं अरब बंडातील घटनांवर आधारित आत्मचरित्र लिहिलं, सेव्हन पिल्लर्स ऑफ विसडम! त्याने या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद देखील केला, द मिंट, आणि या मध्ये कर्नल लॉरेन्सने रॉयल एअर फोर्समधील अनुभवकथन केले आहे.

कर्नल लॉरेन्सला ७ ऑगस्ट १९१७ या दिवशी ब्रिटिश सैन्यातील “मोस्ट ऑनरेबल ऑर्डर ऑफ बाथ”चा सहकारी म्हणून बढती मिळाली, तर १० मे १९१८ या दिवशी ब्रिटिश सैन्यातील “डिस्टींग्वीश्ड सर्विस ऑर्डर” चा सहकारी म्हणून बढती मिळाली.
तर ३० मे १९१६ रोजी फ्रेंच सैन्यातील सर्वोत्कृष्ट “नाईट ऑफ लिजन ऑफ ऑनर” सन्मान मिळाला आणि १६ एप्रिल १९१८ रोजी फ्रेंच सैन्यातील “क्रोईक्स दे ग्यूर” हा सैनिकी सन्मान मिळाला.

३० ऑक्टोबर १९१८ रोजी किंग जॉर्ज (पाचवा) या ब्रिटनच्या राजाने त्याला सरदारपद घोषित केले, पण कर्नल लॉरेन्सने ते स्वीकारलं नाही, कारण सरकारने अरब लोकांशी कपट केलं असं त्याचं मत होतं. अशा या असामान्य कर्नल लॉरेन्सचा मृत्यू सन १९३५ मध्ये एका मोटरसायकल अपघातात गंभीररित्या जखमी होऊन झाला.

कर्नल लॉरेन्सची त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ एरीक केनिंगटन याने तयार केलेली कांस्यप्रतिमा लंडन मधील सेंट पॉल कॅथेड्रल येथे २९ जानेवारी १९३६ रोजी बसवण्यात आली.  अलीकडेच, सन २०१८ मध्ये ५ युरोच्या सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यांवरही कर्नल लॉरेन्स झळकला. ही नाणी पहिल्या महायु*द्धाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने पाडण्यात आली आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

देशभर महामार्गांचं जाळं विणण्यात या मराठी माणसाचा सिंहाचा वाट आहे..!

Next Post

स्वतःला पुन्हा चालता यावं म्हणून पैसे जमवले, परंतु एका लहानग्याच्या उपचारासाठी दान केले

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

स्वतःला पुन्हा चालता यावं म्हणून पैसे जमवले, परंतु एका लहानग्याच्या उपचारासाठी दान केले

इंटरनेट सेन्सेशन बनलेली ग्रम्पी कॅट करोडो डॉलर्सची मालकीण बनली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.