The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल ५००० झाडे लावून तिने बरड माळरानावर नंदनवन फुलवलंय!

by द पोस्टमन टीम
4 November 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लोकांना एखाद्या ध्येयाने पछाडलं की ती व्यक्ती त्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःला पणाला लावून घेत असते. असंच एका तरुणीला एका ध्येयाने पछाडलं आणि तिने काही काळातच एक मोठा चमत्कार घडवून आणला.

१.३ एकराच्या शेतात या तरुणीने २० वेगवेगळ्या प्रजातींच्या ५००० झाडांची लागवड केली असून यात विविध खाद्यान्न पदार्थांचा समावेश आहे.

यातून शेतात काम करणाऱ्या ६ लोकांच्या कुटुंबाची वर्षभरातील ७०% अन्नधान्याची गरज पूर्ण होत आहे. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतात हे धान्य उत्पादन करण्यात आलं आहे, त्याठिकाणी जमिनीची धूप झाली होती, जमिनीचा भाग प्रदूषित झाला होता. यामुळे त्याठिकाणी साधी गवताची काडी उगवणे दुरापास्त होते.

पण या तरुणीने सर्व समस्यांवर यशस्वीपणे मात करून लोकांना आपल्या कामाने अचंबित करून सोडले आहे. मालविका सोळंकी असे या तरुणीचे नाव असून स्वयम ट्रस्ट नावाच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ती हे काम करत आहे.

हे काम निश्चितच सोपे नव्हते, हे काम पूर्णत्वास नेण्यास मालविका सोळंकीला अनेक वर्ष पाण्यासारखा घाम गाळावा लागला, त्यातून हे शक्य झालं आहे. तिने ४०० प्रजातीच्या ५००० वृक्षांची लागवड केलेली असून त्यात विविध फळं, वेल आणि अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.



मालविकाचा हा प्रवास सुरु होऊन बरीच वर्षे झाली होती. ती एकदा आपल्या बंगलोरजवळच्या गावी सुट्टीनिमित्त आली होती. आधी गावातील निसर्गसौन्दर्य बघून ती हरखून गेली, गावातील इतर कामांत तिने स्वतःला गुंतवून घेतले होते, तिला म्हशीचे दूध काढणे, शेतात रपेट मारणे, गांडूळखत तयार करणे इत्यादी गोष्टी करायला फार आवडत असे.

पण तिला गावात असलेल्या अल्प उत्पादनाच्या समस्येची जाणीव झाली. तिला तिथल्या महिलांच्या आणि सामाजिक समस्यांची जाणीव देखील या माध्यमातून झाली. पुढे त्यांनी माया नावाच्या संस्थेत काम केलं. जिथे त्यांना सामाजिक कामाचा अनुभव आला. यातूनच स्वयम या ससंस्थेच्या उभारणीची प्रेरणा त्यांना मिळाली.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

स्वयमच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्याला उभारणी देण्याचं काम मालविका करत असून यात तिला बऱ्यापैकी यश देखील प्राप्त झाले आहे.

ती सांगते की स्वयमच्या स्थापनेमागचा उद्देश एकच होता, शेतीचे आणि शेती संबंधित उद्योगांचे पुनरुज्जीवन .

या कामासाठी लोकांच्या सहाय्याने ती हे पुनर्निर्माणाचं कार्य करत आहे.

लोकांचे नेटवर्क्स उभे करून त्या माध्यमातून योजनाबद्ध विकासाचा प्रयत्न ती करत आहे. तिला तिच्या  गावाजवळ एक ओसाड पडलेलं माळरान आणि जमीन दिसली. तिने मनाशी निश्चय केला की या जागेचं रूपांतर जेवढं लवकर शक्य होईल तितक्या लवकर एका सुपीक जमिनीत करायचं आणि त्यातून उत्पन्न प्राप्तीचं साधन तिथल्या गावकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे. यासाठी लोकांना एकत्र करायला तिने सुरुवात केली.

तिने नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याची स्वतःची एक पद्धत विकसीत केली. या पद्धतीला परमाकल्चर म्हणून ओळखले जाते. ही पद्धती विकसित करण्याची प्रेरणा तिला मोन्सॅबू फुकोका यांच्या ‘वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन’ या पुस्तकातून मिळाली. शूमाकरच्या स्मॉल इज ब्युटीफुल या पुस्तकातून तिला नवीन कल्पना मिळाल्या, यातून त्यांनी ही पद्धत विकसित केली.

२०१३ साली ती ही पद्धत घेऊन काम करू लागली. परमाकल्चर या पद्धतीच्या तत्वानुसार एकाच प्रकारचं पीक एकावेळी शेतात न घेता वेगवेगळी पिकं गरजेनुसार एकाच वेळी शेतात घेऊन त्यांची एक इको सिस्टम तयार करायची. या कामासाठी तिला तिच्या बंगलोरच्या मित्रांचे सहकार्य लाभले. अनेक स्वयंसेवक देखील तिच्या कार्यात सहकार्य करायला आले. 1000-ट्री प्रोजेक्ट असे त्यांनी याला नामकरण देखील केले.

या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या काही समूहांना मदत करण्याची रणनीती तयार केली. हवामानाच्या विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम या माध्यमातुन केलं जात आहे. त्यांनी दुष्काळ व रोगप्रतिकारक अशा पिकांची निवड यासाठी केली असून ॲग्रोकॉलॉजी, ॲग्रोफॅक्टरी, मिक्स क्रॉपिंग, वॉटर हार्व्हेस्टींग या अशा प्रकारच्या विविध आधुनिक पद्धतींचा वापर यासाठी केला आहे.

यातून धान्य उत्पादन, औषधी वनस्पती, खत, पशुखाद्य अशा प्रकारची शेती उत्पादने त्यांनी घेतली. तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी २० कुटुंबांना या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे.

आता ५० एकरच्या जमिनीच्या विकासाचे कार्य स्वयम या संस्थेने हाती घेतले असून, आज त्याला मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त होताना दिसत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

फ्रेंच आणि इटालियन लोक भारतातील ह्या ८० वर्षांच्या आजीबाईंच्या कलाकृतीचे ‘जबरा फॅन’ आहेत

Next Post

सिक्कीम भारतात सामील कसा झाला? भाग १: भौगोलिक रचना

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

सिक्कीम भारतात सामील कसा झाला? भाग १: भौगोलिक रचना

या महिलेने हि*टल*रच्या तावडीतून केली होती २५०० ज्यू वंशाच्या मुलांची सुटका

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.