The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुई बनवणारा उद्योग पुढे चालून ‘बुलेट’ बनवेल असं सांगूनही कोणाचा विश्वास बसला नसता

by द पोस्टमन टीम
15 July 2021
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


विस्तिर्ण मैदानं, लांब-लचक रस्ता, स्वच्छ आणि निरभ्र आकाश, हिमालयाची गगनचुंबी शिखरं, टुमदार गावं, लहानशी घरं, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे मोठी मनं असलेली माणसं, या सौंदर्यात भर घालतात ती बौद्धविहार आणि तिथली निर्मळ, निर्व्यसनी, उपभोगनिवृत्त भिक्षु आणि साधू मंडळी. अशाच महान संस्कृतीच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ सदैव सज्ज असलेल्या भारतीय थल-सेनेच्या अनेक तुकड्या, जवान, यंत्रसामुग्री यांचं दर्शन जिथे अगदी सहज होतं.

एव्हाना समजलंही असेल, वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत अशा धरतीवरील स्वर्गाचंच हे अत्यल्प शब्दातलं वर्णन. लद्दाख!

खऱ्याखुऱ्या अर्थाने पर्यटक असलेल्या व्यक्तीला आपण एकदा तरी लद्दाखला जाऊन यावं, अशी इच्छा होतेच. पार योगीजनांपासून ते मनात कपट असलेले शत्रुही इथे यायची इच्छा व्यक्त करतात. पण सह्यगिरीप्रमाणेच हा हिमालय शत्रुंना जणू मारक ठरतो.

तर लद्दाखला जायचं म्हटल्यावर पहिला विचार मनात येतो तो बुलेटचा! समुद्रसपाटीपासून १७ ते १८ हजार फुट उंचीवर बसचा प्रवास सहसा टाळला जातो. अशा ठिकाणी दाट लोकवस्ती नाही, बाल्य आणि वृद्धावस्थेतील ज्या लोकांना अशा भौगोलिक परिस्थितीत काही त्रास होऊ शकतो, कारण शरीराला त्या हवामानाच्या परिस्थितिशी जुळवून घ्यायला अवघड जातं. अशा आणि यांसारख्या कारणांमुळे तिथे सर्व वयोमानाचे लोक जाऊ शकत नाहीत.



पण तरुणांना तिथे जाण्यासाठी ओपन जीप अथवा मोटरसायकल असे दोन पर्याय सर्वोत्तम वाटतात. त्यातल्या त्यात मोटरसायकल आणि तीही कार्यक्षम, म्हणजे “परफॉर्मन्स” चांगला असणारी. मग रॉयल एनफिल्डच्या “बुलेट”शिवाय आणखी दुसरी गाडी कोणती!

काळ आजचा असो वा या पूर्वीची काही दशकं असो, सुरुवातीला “फटफटी” ते “बुलेट” असा या गाडीचा भारतातला प्रवास.

अभियांत्रिकीमध्ये प्रगती होत नव्हती तोपर्यंत ही बुलेट सहसा पैलवान लोकांकडेच असायची, पुढे याचीच “फॅशन” बनली. जसा काळ पुढे सरकत गेला तेव्हा कधीतरी दिसणारी ही विशेष बुलेट प्रत्येकाकडे दिसू लागली, सण-उत्सवांमध्ये सामील होऊ लागली. चांगल्या-वाईट सगळ्या प्रकारच्या लोकांकडे ही गाडी असते, आज जवळपास सगळे बुलेट वापरतात.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

आज जगाच्या कानाकोपऱ्यात बुलेट पोहोचली, पृथ्वीवरील सर्वांत अवघड भूभागावरही ही बुलेट चालते, तर अशी ही जगभरात प्रसिद्धी पावलेली बुलेट ही रॉयल एनफिल्ड कंपनीची मोटरसायकल आहे, ज्याचा आजवरचा प्रवास सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरेल. मनात आणलं तर माणूस यशाची किती उत्तुंग शिखरं गाठू शकतो, याचं हे मूर्तिमंत उदाहरण! चला तर मग भूतकाळात डोकावून भविष्यकाळासाठी प्रेरणा घेता आली तर बघू..

आज या उद्योगाने प्राप्त केलेलं यश हे सुमारे शंभर वर्षांच्या व्रताचं उद्यापनच म्हणावं लागेल.

कधी प्रश्न पडलाय, एनफिल्ड म्हणजे काय? कुठून आल्या असतील अशा “भन्नाट बाईक्स”? शोधूया अशाच काही प्रश्नांची उत्तरं..

इसवी सन १७६० नंतर जगाने औद्योगिक क्रांती बघितली होती. त्यानंतर औद्योगिक विकासात प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या औद्योगिक क्रांतीचा प्रभाव किती तीव्र होता हे आपल्याला कळेलच.

इसवी सन १८६१ मध्ये जॉर्ज टाउनसेन्डने ब्रिटनच्या रेडिच शहरात शिवणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सुई तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे इसवी सन १८८२ मध्ये त्याचा मुलगा, जॉर्ज याने सायकल तयार करण्यासाठी आवश्यक असलेले लहान-मोठे भाग, उदाहरणार्थ खोगीर (सीट), फोर्क, पेडल तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.

प्रगतीचा एकेक टप्पा पार करत इसवी सन १८८६ पर्यंत म्हणजेच अवघ्या चार वर्षांत टाउनसेन्ड अँड इकोसायस या नावाने सायकल्स बनू लागल्या.

पण संकटांचा सामना करायला लागला नाही असा कोणताही यशस्वी व्यवसाय अथवा उद्योग नाही आणि जरी असला तरी तो प्रगतीशील नसतो. अपयश हा अनुभव ठरतो, त्यातून सावरत असताना ज्या चुकीमुळे हा वाईट अनुभव आला ती तर होऊ द्यायची नाहीच, पण पूर्वीपेक्षा दर्जेदार काम करायचं. टाउनसेन्ड अँड इकोसायस या कंपनीला सुद्धा अशाच एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, इसवी सन १८९१ मध्ये. पण कंपनीतील लोक कुठेही डगमगले नाहीत. धैर्याने काम केलं, आणि उकल सापडली.

रॉबर्ट वॉकर स्मिथ, “डी. रज आणि कंपनी” या सायकल तयार करणाऱ्या कंपनीत काम करणारा अभियंता आणि ब्रिहिंगम येथील पेन तयार करणाऱ्या “पेरी अँड कम्पनी लिमिटेड” या कंपनीत विक्री व्यवस्थापक (सेल्स मॅनेजर) पदावर काम करणारा अल्बर्ट ईडी या दोघांना टाउनसेन्ड अँड इकोसायस कंपनीच्या अर्थतज्ज्ञांनी आपला उद्योग या आर्थिक संकटातून बाहेर काढायला आणि पुढे सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी निवडलं. या दोघांपैकी अल्बर्ट ईडीने यापूर्वीच सायकलच्या लहान-मोठ्या भागांचा पुरवठा सुरू केला होता.

पुढे इसवी सन १८९२ साली टाउनसेन्ड अँड इकोसायस या कंपनीची “ईडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड” या नावाने, ब्रिहिंगम शहरातील स्नो-हील येथे पुर्नस्थापन करण्यात आली.

कालांतराने इसवी सन १९०७ मध्ये एनफिल्ड ऑटोकार या त्यांनीच नव्याने सुरू केलेल्या सहाय्यक उद्योगामुळे ईडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पुन्हा तोट्यात गेली.

या तोट्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आमच्याकडे आहे असं सांगत ब्रिहिंगम स्मॉल आर्म्स (बी.एस.ए.) कंपनीने १९०७ मध्ये ईडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विकत घेतली. काही वर्षांनंतर “सायकल विभागाच्या बाबतीत आश्चर्य घडलंय!” असं सांगत बी.एस.ए.च्या तत्कालीन अध्यक्षांनी आपल्या भांडवलधारकांना सुखद धक्का दिला.

पुढे राले या सायकल कंपनीने १९५७ मध्ये बी.एस.ए.चा सायकल उद्योग विकत घेईपर्यंत ईडीने आपली स्वतंत्र ओळख तयार करून ठेवली होती.

एका उद्योगाला किती चढ-उतारांना सामोरं जावं लागतं, तेव्हा कुठे ते उद्योग एक यशस्वी उद्योग बनून जगाच्या समोर येतात, आज तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जग आधुनिक बनलंय, ही वाटचाल अशीच सुरू राहील, पण प्रत्येक उद्योगाला आपापले संघर्ष आहेत, प्रश्न आहेत, त्यांच्यावर धैर्याने मात करून जो उद्योग टिकेल, तोच वाढेल. डार्विनचं सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे उद्योग जगतालाही लागू होणारं सूत्र आहे.

आता, ब्रिटनच्या मिडलसेक्स येथील एनफिल्डमध्ये असलेल्या सरकरस्थापित रॉयल स्मॉल आर्म्स कंपनीच्या एका शाखेला बंदुका तयार करण्यासाठी आवश्यक भागांचा पुरवठा करण्याचा करार ईडीने जिंकला होता. ही शाखा ब्रिहिंगममध्येच स्पार्कबुक या ठिकाणी होती आणि त्या शाखेचं व्यापारी नाव होतं रॉयल एनफिल्ड.

विशेषत्वाने सायकलींचं काम बघण्यासाठी म्हणून १८९६ मध्ये रॉयल एनफिल्ड कम्पनीने एका सहाय्यक कंपनीची स्थापना केली, द न्यू एंफिल्ड सायकल कम्पनी लिमिटेड, आणि १८९७ साली द न्यू एनफिल्ड सायकल कम्पनी लिमिटेडने सायकलींचं सगळं काम स्वतःकडे घेतलं.

इसवी सन १९०१ मध्ये एनफिल्डने मोटरसायकल तयार करायला सुरुवात केली, तर सन १९०२ मध्ये मोटरकार तयार करायला सुरुवात केली. या “मोटर” विभागाचं पुढं एका सहाय्यक कंपनीत रूपांतर करण्यात आलं आणि १९०६ मध्ये एनफिल्ड ऑटोकार कंपनीची स्थापना करण्यात आली. एनफिल्ड ऑटोकार कंपनीने आपलं काम हंट एन्ड, रेडिच येथे सुरू केलं.

वर सांगितल्याप्रमाणे १९०७ मध्ये, म्हणजेच स्थापनेनंतर फक्त एकोणवीस महिन्यांत एनफिल्ड ऑटोकार कंपनी बरोबरच इडिला मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागलं आणि ब्रिहिंगम स्मॉल आर्म्स कंपनीने एनफिल्ड ऑटोकार कंपनी विकत घेतली. तत्पूर्वी रोबर्ट वॉकर स्मिथ आणि अल्बर्ट ईडी यांना बी.एस.ए.च्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.

नव्याने सुरू झालेल्या बी.एस.ए आणि ईडी या संयुक्त व्यवसायांनी सैन्यात आणि क्रिडा स्पर्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रायफल्स, सायकल आणि सायकलीचे भाग, मोटरकार या गोष्टी तयार करायला सुरुवात केली. कालांतराने एंएनफिल्ड ऑटोकार या सहाय्यक उद्योगाचा यंत्रसंच (प्लांट) आणि माल यांसह एनफिल्ड ऑटोकार उद्योग ब्रिहिंगमच्या ऑलडेज् अँड ऑनियन्स न्युमॅटिक इंजिनिअरिंग या कंपनीला विकण्यात आला. आणि एनफिल्ड सायकल कंपनीने हंट एन्ड, रेडिच येथे आपलं काम सुरू ठेवलं.

एव्हाना भारतात औद्योगिक विकासाची हवा पोहोचली होती, मुंबईसारखं शहर आकार घेत होतं, तसंच भारतातील इतर भागातही आधुनिकीकरणाने आपले पाय रोवले होते. स्वातंत्र्योत्तर नेहरू सरकारने विज्ञान-तंत्रज्ञान आणि उद्योगधंद्यांच्या विकासाला चालना दिल्याने आधुनिकीकरणाचा वेग वाढत होता.

इसवी सन १९५५ मध्ये एनफिल्ड सायकल कंपनीने आजच्या चेन्नई येथील मद्रास मोटर्स कंपनीसोबत भागीदारी करून “एनफिल्ड ऑफ इंडिया”ची स्थापना केली आणि त्यांनी एकत्रितपणे ३५०सी.सी. रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकलची बांधणी (असेम्बली) सुरू केली. पहिल्या काही मोटरसायकलींची बांधणी ब्रिटनमधून आयात केलेल्या घटकांपासून झाली. तर १९५७ पासून एनफिल्ड ऑफ इंडियाकडे मोटरसायकल तयार करण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध होती. विशेष म्हणजे १९६२उगवेपर्यंत तर सर्वच घटक भारतात तयार होऊ लागले.

एनफिल्ड ऑफ इंडियाने आपला बुलेट तयार करण्याचा उद्योग तसाच सुरू ठेवला आणि १९९९ मध्ये या मोटरसायकल्सचा रॉयल एनफिल्ड या नावाने व्यापार सुरू केला.

एनफिल्डच्या व्यापार चिन्हाचा मालक डेव्हिड होल्डर याने ‘रॉयल’ या शब्दावर आक्षेप घेऊन एनफिल्ड ऑफ इंडियावर खटला दाखल केला, पण या खटल्याचा निकाल एनफिल्ड ऑफ इंडियाच्या बाजूने आला.

आजही रॉयल एनफिल्ड अनेक प्रकारच्या मोटरसायकल्स तयार करते. बुलेट, इंटरसेप्टर, कॉंटिनेंटल जी.टी., हिमालयन, क्लासिक, मेटिऑर हे त्या मोटरसायकल्सचे सुप्रसिद्ध प्रकार.

या कंपनीची बीजं सुमारे शंभर वर्षांपूर्वी पेरली गेली, आज त्याला वटवृक्षाचं भव्य स्वरूप प्राप्त झालंय. यामागे निश्चितच अनेकांचे प्रयत्न, कष्ट, तळमळ आहे. २१व्या शतकात, विद्युत मोटरसायकल्सच्या युगातही या बुलेट्स आपली विशिष्ट ओळख निर्माण करतील हे त्याचा इतिहासाचा आढावा घेऊन सिद्ध होतं.

तर पुन्हा लद्दाखला जाताना आपण प्रवास करत असलेल्या बाइकचा शंभर वर्षांचा प्रवास विसरता येणार नाही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पोस्टमन ज्याने रस्त्यात लागलेल्या दगडांपासून सर्वांगसुंदर महाल बनवला

Next Post

पैलवान नरसिंह यादवचं करियर संपवण्यासाठी सुशील कुमारने त्याच्या जेवणात भेसळ केली होती

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

पैलवान नरसिंह यादवचं करियर संपवण्यासाठी सुशील कुमारने त्याच्या जेवणात भेसळ केली होती

'रेड बुल' पिऊनही पंख फुटले नाहीत म्हणून एका कार्यकर्त्याने कंपनीला कोर्टात खेचलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.