The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या सेनापतीने मौर्य साम्राज्य संपवून वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन केलं होतं..!

by द पोस्टमन टीम
30 January 2026
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मौर्य साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर भारतात शुंग वंशाचे राज्य सुरू झाले. राजा पुष्यमित्र हा शुंग वंशातील पहिला राजा, ज्याने मौर्य साम्राज्याचा पाडाव करून आपली सत्ता स्थापन केली. पुष्यामित्राने त्याकाळात लुप्त होत चाललेल्या वैदिक धर्माची पुनर्स्थापना केली असे म्हटले जाते.

देशावर परकीय आक्र*मणे होत असताना मौर्य शासकांनी अहिं*सेचा मार्ग स्वीकारल्याने समाजातील लढवय्या वृत्तीच नष्ट झाली होती. अहिं*सेच्या प्रभावामुळे सर्वत्र मरगळ पसरली होती. परकीय आक्र*मणांना रोखणे अशक्य झाले होते. ग्रीक सैनिक ठिकठिकाणी लूट करत होते, यु*द्ध करत होते पण त्यांना विरोध करण्याची वृत्तीच नाहीशी झाली होती. अशा काळात पुष्यमित्र शुंगने पुन्हा एकदा समाजातील लढाऊ वृत्ती जागृत केली.

पुष्यमित्र शुंगने बृहद्रथ राजाची ह*त्या केली आणि मौर्य साम्राज्याचा अंत केला. भारतात वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली. राजा पुष्यमित्रामुळे पुन्हा एकदा भारताचा वचक निर्माण झाला.

भारतात चंद्रगुप्त मौर्याच्या शासन काळात जैन धर्माचा प्रसार झाला होता. चंद्रगुप्ताचे गुरु चाणक्यने नेहमीच हिंदू धर्माच्या विस्ताराची प्रेरणा दिली. चाणक्याच्या मृत्यूनंतर चंद्रगुप्ताने स्वतः जैन धार्माचा स्वीकार केला होता. त्याने जैन धर्माला राजाश्रय दिला आणि त्याच्या प्रसाराला प्रोत्साहन दिले. चंद्रगुप्तानंतर मौर्य साम्राज्याची सूत्रे त्याचा मुलगा राजा बिंदुसार याच्याकडे आली. बिंदुसाराने आजीविक संप्रदायाची दीक्षा घेतली. तो वेदांचा विरोधक बनला.

बिंदुसारानंतर त्याचा मुलगा चंड अशोक, मौर्यांचा पुढचा शासक बनला. सम्राट अशोकाने सत्ता हाती घेताच राज्य विस्ताराच्या लालसेने अनेक यु*द्धे केली. प्रत्येक यु*द्धात त्याला विजय मिळत होता. कलिंगच्या यु*द्धात झालेल्या प्रचंड न*रसं*हाराने राजा अशोकाचे मन खिन्न झाले. त्याला त्या रक्ताच्या थारोळ्यांनी, जखमी सैनिकांच्या विव्हळण्याने, विधवांच्या आक्रोशाने, पूर्णतः बदलून टाकले. कलिंग यु*द्धावरून परतल्यावर राजा अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. त्याने आजन्म बौद्ध विचारांचा प्रचारप्रसार करण्याची शपथ घेतली. ही शपथ पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या सत्तेचा आणि प्रभावाचा वापर केला.



संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्याने विहारे बांधली, बौद्ध धर्माचे शिक्षण देणारी विद्यापीठे स्थापन केली. बौद्ध भिक्खुंना त्यांच्या धम्मप्रसाराच्या कार्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचा सन्मान केला. हळूहळू सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण भारत देश बौद्धमय होण्याकडे वाटचाल करू लागला होता.

म्यानमारपासून इराण आणि काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत सम्राट अशोकाच्या राज्याचा विस्तार झाला होता. कलिंगच्या यु*द्धानंतर मात्र त्याने सीमावृद्धीची लालसा सोडून दिली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

इतर देशांवर आक्र*मण करण्याचा विचार तर दूरच पण इतर कुणी आक्र*मण केले तरी त्याला प्रत्युत्तर न देण्याचे धोरण स्वीकारले.

अशोकाच्या अखत्यारीत येणाऱ्या छोट्या छोट्या राजांना अशा प्रकारे अहिं*सेचे पालन करणे अवघड होऊ लागले. त्यांनी स्वतःची राज्ये स्वतंत्र घोषित केली आणि बौद्ध धर्माच्या अहिं*सेच्या तत्त्वातून मोकळे झाले. अशोकाच्या काळात या अहिं*सेच्या प्रभावामुळे कुठेच लढाया होत नव्हत्या. त्यामुळे शस्त्रास्त्रांची निर्मिती, यु*द्धाची तयारी, लढाईची प्रात्यक्षिके, मुष्टीयु*द्ध, अशा सगळ्याच गोष्टींना पूर्णविराम मिळाला. सैनिक सुस्त झाले आणि राज्यातील आयुधांवरही गंज चढला. भारतीय राजाचे हे अहिं*सेचे धोरण म्हणजे अनेक परकीय आक्र*मकांना आयती संधीच वाटली.

अशोकाच्या मृत्युनंतर बृहद्रथ मौर्य साम्राज्याच्या गादीवर बसला. आतापर्यंत संपूर्ण मौर्य साम्राज्य बौद्धमय झाले होते. अहिं*सा तत्त्वाच्या प्रभावाने समजातून लढाऊ वृत्ती गायब झाली होती. याच कारणाने परकीय आक्र*मकांना चांगलीच संधी मिळत होती. भारताची तेजस्वी, लढाऊ आणि पराक्रमी देश ही ओळख लयाला गेली होती. याची पुनर्स्थापना होणे आवश्यक होते आणि तेव्हाच पुष्यमित्र शुंग नावचा एक सेनापती राजा बृहद्रथच्या दरबारात हजर झाला.

ग्रीक सैनिकांनी राज्यावर आक्र*मण करण्याच्या हेतूने राज्यातील बौद्ध मठांचा आधार घेतल्याची बातमी पुष्यमित्राच्या कानावर आली. त्याने राजाकडे बौद्ध मठांची झडती घेण्याची अनुमती मागितली पण राजाने ती नाकारली. धार्मिक आचरण करणाऱ्या व्यक्तींना त्रास होता कामा नये असा राजाचा दृष्टीकोन होता.

पुष्यमित्राने राजाच्या अनुमतीशिवायच जेव्हा बौद्ध मठांवर धाड टाकली तेव्हा तिथे त्याला ग्रीक सैनिक लपून बसल्याचे आणि बौद्ध भिक्खुंनी त्यांना आश्रय दिल्याचे आढळले. ग्रीक सैनिकांना पुष्यमित्राने तिथेच यमसदनी धाडले. शत्रूच्या सैनिकांना आश्रय देणाऱ्या बौद्ध भिक्खुंचा आणि त्यांच्या मठांचीही पुष्यमित्राने पर्वा केली नाही.

राजा बृहद्रथाने पुष्यमित्राच्या या कृत्याची चौकशी करण्यासाठी दरबार भरवला तेव्हा दोघांमध्ये खूप वादविवाद झाले. याच वादविवादात पुष्यमित्राने राजा बृहद्रथावर वार केला आणि बृहद्रथ जागीच ठार झाला.

यानंतर रिक्त झालेल्या राज सिंहासनावर पुष्यमित्राने स्वतःचा राजाभिषेक करवून घेतला.

शुंग वंशाच्या राजवटीचा पाया पुष्यमित्राने रचला. पुष्यमित्र एक ब्राह्मण होता असे म्हटले जाते. त्याने अहिं*सेचा अतिरेक रोखला आणि आक्र*मकांना तोडीसतोड उत्तर दिले. बौद्ध भिक्खूंनी राजद्रोह केल्यावरून त्यांच्याबद्दल पुष्यमित्राच्या डोक्यात राग होता. त्याने याचा वचपा काढण्यासाठी बौद्ध मठांची नासधूस केली. बौद्ध धर्मियांचा छळ केला.

मंदिरांची उभारणी केली. लोप पावलेली वैदिक संस्कृतीला नवसंजीवनी दिली. वैदिक धर्माच्या विस्तारासाठी राजा पुष्यमित्राने अश्वमेध यज्ञ देखील केला होता. भारतात पुन्हा एकदा वैदिक धर्माचा विस्तार जोमात होऊ लागला. पुष्यमित्राने ३६ वर्षे राज्यकारभार पहिला. त्याच्या काळात त्याने वैदिक धर्माची पताका उंचावली.

शुंग वंशीय राजांनी जवळपास ११२ वर्षे राज्य केले. शुंग वंशाचा शेवटचा राजा होता राजा देवभूती. मंत्री वसुदेवने त्याची ह*त्या केली आणि शुंग वंशाची राजवट समाप्त होऊन पुढे कण्व वंशाची राजवट सुरू झाली.

बौद्ध धर्म स्वीकारलेल्या लोकांनी पुन्हा आपला मोर्चा हिंदू धर्माकडे वळवला. त्यांना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घेतले जाऊ लागले.

पुष्यमित्राला बौद्ध धर्माबद्दल लहानपणापासूनच आकस होता असे म्हटले जाते. कारण जेव्हा बृहद्रथाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार केला जाऊ लागला तेव्हा अनेकांना जबरदस्तीने बौद्ध बनवण्यात आले होते.  पुष्यमित्राचे वडील ब्राह्मण होते. त्यांच्यावरही बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची सक्ती केली. पण, त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यास विरोध केला तेव्हा त्यांची ह*त्या करण्यात आली.

पुष्यमित्राने बौद्ध धर्मियांकडून आपल्या आई-वडिलांचा खू*न होताना आपल्या डोळ्यांनी पहिले. तेव्हा पुष्यमित्र एक लहान मुलगा होता. पण, मोठे झाल्यावर याचा बदला घेण्याची शपथ त्याने लहानपणीच घेतली होती, असेही म्हटले जाते. बृहद्रथाच्या दरबारात प्रवेश मिळवण्यात यश मिळाल्यानंतर त्याची पुढची वाटचाल सोपी झाली.

पुष्यमित्राची वैदिक धर्माचा पुनरुज्जीवक ही ओळख आजही कायम आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या दोन मुलांनी एलियन्सनी त्यांचं अपहरण केल्याचा दावा केला होता, नार्को टेस्टही दिली..!

Next Post

फ्रान्समध्ये झालेल्या एका कोर्ट मार्शलमुळे इज्राइलच्या निर्मितीची सुरुवात झाली होती..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

फ्रान्समध्ये झालेल्या एका कोर्ट मार्शलमुळे इज्राइलच्या निर्मितीची सुरुवात झाली होती..!

ग्रीक दंतकथा - या बारा अशक्यप्राय कामांमुळे हर्क्युलस अजरामर झाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.