The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदिवासींचा अभ्यास करायला गेलेला रॉकफेलर घराण्याचा वारस न*रभ*क्षक टोळीचं भक्ष्य बनला होता

by Heramb
4 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


श्रीमंत आणि प्रतिष्ठित असूनही अनेक लोक आपली आवड आणि छंद मात्र जोपासत असतात. पण हे करत असतानाच अज्ञानामुळे किंवा पुरेशी माहिती नसल्याने अनेकदा कित्येकांच्या जीवावरही बेततं. अशीच एक कथा आज आपण अनुभवणार आहोत.

मायकेल क्लार्क रॉकफेलर, न्यूयॉर्कचा गव्हर्नर आणि अमेरिकेचा भावी उपाध्यक्ष, नेल्सन रॉकफेलरचा मुलगा. तो आतापर्यंतच्या सर्वांत श्रीमंत माणसांपैकी एक होता. सगळी सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत असताना आणि तरुण मायकेल प्रतिष्ठित राजकीय पदासाठी तयार होत असताना तो एका ‘ॲडव्हेंचर’वर गेला. १९६१ सालच्या वसंत ऋतूमध्ये (हिवाळा आणि उन्हाळ्याच्या मधील काळ) मायकेलने पश्चिम आफ्रिकेतील न्यू जिनिव्हाला भेट दिली आणि तेथील घनदाट जंगलांमध्ये वास्तव्य केले. त्याने स्थानिक ‘अस्मत’ जमातींशी मैत्री केली आणि त्यांचे अनेक फोटोज् काढले. ते फोटोज् मायकेलला पुस्तकरूपाने प्रकाशित करायचे होते.

अस्मत लोक नैऋत्येकडील न्यू जिनिव्हामध्ये राहतात. त्यांची लोकसंख्या सुमारे ७० हजार आहे. ते समुद्रकिनारी, नद्यांलगतच्या छोट्या गावांत राहतात. १९९० च्या दशकात ‘न*र*भक्षण’ आणि ‘हे*डहं*टिंग’ हे अस्मत संस्कृतीचे प्रमुख भाग होते. आधुनिक भाषेत ‘हे*डहं*टिंग’ म्हणजे रिक्रुटमेंट किंवा नवीन कर्मचाऱ्यांची भरती. परंतु, अस्मत लोकांच्या भाषेत, हेड*हं*टिंग म्हणजे माणसाचे डोके का*पून खाणे. प्रत्येक मृत्यूचा बदला ‘हे*डहं*टिंग’द्वारे घेणे आवश्यक आहे असा अस्मत लोकांचा विश्वास होता. एखाद्याचा मृत्यू रोगाने झाला तरी त्या मृत्यूचा बदला ‘हे*डहं*टिंग’द्वारे घेणे आवश्यक आहे असं अस्मत लोकं मानत.

आपल्या वडिलांच्या न्यूयॉर्कमधील संग्रहालयासाठी, आदिवासींनी तयार केलेले कलाविष्कार गोळा करण्यासाठी नोव्हेम्बर १९६१ साली मायकेल न्यू जिनिव्हामध्ये आला. डच मानववंशशास्त्रज्ञ ‘रेने वॉसिंग’ यांच्याबरोबर, मायकेल ‘कॅटामरन’ बोटमधून न्यू जिनिव्हामधील विविध खेड्यांतून प्रवास करीत होता. ही बोट त्याने स्वतः तयार केली होती. पण, १७ नोव्हेम्बर १९६१ रोजी उंच लाटांमुळे बोट उलटली. त्यावेळी मायकलचे दोन स्थानिक मार्गदर्शक मदत मिळवण्यासाठी किनाऱ्यापर्यंत पोहत आले. १९ नोव्हेम्बर रोजी ही बोट खोल समुद्रात बुडाली होती.

मायकेलचा सहकारी, डच मानववंशशास्त्रज्ञ, रेने वॉसिंगला दुसऱ्या दिवशी वाचवण्यात आले. पण मायकेलचा काहीही मागमूस लागला नाही. सत्तेच्या जवळ असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने व्यापक शोध सुरु केला. मायकेल रॉकफेलर बेपत्ता झाल्याची बातमी जगभरात प्रसिद्ध झाली. पण बचावकर्त्यांना तो किंवा त्याचा मृतदेह सापडला नाही.



मायकेलच्या गायब होण्याबद्दल अनेक वदंता सुरु झाल्या. काही जणांच्या मते, मायकेलला शार्कने खाल्ले असावे, काहींच्या मते, तो खोल समुद्रात बुडाला असावा. तर काहींच्या मते, अस्मत न*रभ*क्षकांनी मायकेलला खाल्ले असेही सांगितले. पण दुर्दैवाने हेच वास्तव आहे. 

१९५८ साली, पश्चिम जिनिव्हाचा डच गव्हर्नर, ‘मॅक्स लाप्रे’ने अस्मत जमातीच्या पाच सदस्यांची दंडात्मक ह*त्या केली होती. अशा दडपशाही उपायांमुळे अस्मत जमातीमधील हे*डहं*टिंगची प्रथा थांबेल असे त्याचे मत होते. म्हणूनच, अस्मत आदिवासींनी ‘पांढऱ्या टोळी’चा बदला घेण्याची शपथ घेतली आणि ते पलटवार करण्याच्या संधीची वाट पाहत होते. १९ नोव्हेम्बर १९६१ रोजी त्यांनी मायकेलला पोहताना पाहिले. तो तब्बल एकोणीस किलोमीटर पोहून थकला होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हे पाहून अस्मत जमातीच्या लोकांनी मायकेलला किनाऱ्यावर ओढले आणि भाल्याने त्याची ह*त्या केली. त्यांनी त्याचे डोके का*पले, ते शिजवले आणि त्याचा मेंदू खाल्ला. त्यानंतर त्यांनी त्याच्या आतड्या काढल्या. त्याचे हात-पाय आगीवर फेकले गेले आणि नंतर उपस्थितांना जेवण म्हणून वाटण्यात आले. तर त्याच्या हाडांचा उपयोग खं*जीर, मासेमारीचे भा*ले आणि काही मुर्त्या  बनवण्यासाठी केला गेला.

मायकेल रॉकफेलरची ह*त्या करून, अस्मत आदिवासींनी तीन वर्षांपूर्वी त्यांच्या सहकारी आदिवासींच्या मृत्यूचा बदला घेतला. मायकेल रॉकफेलर अस्मत लोकांना चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी सापडला.

या आणखी एका कथेने आपल्याला वसाहतवादाचा दुष्परिणाम दाखवून दिला. पण याबरोबरच, जगामध्ये आधुनिकता येऊनही ही आधुनिकता आणि प्रगती सर्वसमावेशक नसल्याचंही आपल्याला या कथेतून दिसतं. एकूणच काय, तर जग जरी ‘वसाहतवाद’ नावाच्या विळख्यातून बाहेर आलं असलं तरी अजूनही अनेक ठिकाणी समाज प्रबोधन आणि सुधारणांची चळवळ होणं आवश्यक आहे. तसं न झाल्यास जगातील बहुतेक भाग अंध:कारातच चाचपडत राहील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

प्रसिद्ध ‘३००’ चित्रपटाची कथा या खऱ्या लढाईवरून घेण्यात आली आहे

Next Post

शिवनारायण चंदरपॉल आपल्या पिढीच्या लक्षात राहिला तो त्याच्या डोळ्याखालील काळ्या पट्ट्यांमुळे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

शिवनारायण चंदरपॉल आपल्या पिढीच्या लक्षात राहिला तो त्याच्या डोळ्याखालील काळ्या पट्ट्यांमुळे

जेव्हा राणी एलिझाबेथच्या ड्राइव्हिंगने सौदी अरेबियाच्या राजकुमाराला घाम फुटला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.