The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“उरलेली भजनं वर जाऊन म्हण” असं म्हणत दाऊद गँगने गुलशन कुमारला गोळ्या घातल्या होत्या

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अत्यंत श्रवणीय अशा भक्तीगीतांची निर्मिती करणाऱ्या आणि असंख्य श्रोत्यांच्या मनावर आपल्या संगीताची छाप सोडणाऱ्या ‘गुलशन कुमार’ या दिवंगत संगीतकाराशी आपण सर्व परिचित आहोतच. अनेकांना त्यांचे नाव माहिती नाही पण त्यांनी त्यांची भक्तिगीते नक्कीच कधी न कधी ऐकलेली असतील. आज जी हनुमान चालिसा सगळीकडे ऐकली जाते, ती स्वरबद्ध करण्याचे काम हे गुलशन कुमारांनीच केले होते.

‘टी सिरीज’ या भारतातील एका नामांकित म्युझिक कंपनीची स्थापना त्यांनी केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीने त्यांची भर दिवसा १९९७ साली हत्या केली होती. याच हत्येच्या कटाची माहिती काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांना मिळाल्याचा खळबळजनक दावा निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाउ’ या पुस्तकात केल्यामुळे सर्वत्र हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं असून ‘गुलशन कुमार’ यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

कॅसेट किंग म्हणून भारतात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या गुलशन कुमार यांचा जीवनप्रवास असंख्य अडचणींनी भरला होता. सुरुवातीच्या काळात गुलशन कुमार यांचा संगीताशी काहीच संबंध नव्हता.

ते दिल्लीच्या दरियागंज भागात आपल्या वडिलांसोबत ज्यूस सेंटर चालवायचे, परंतु कालांतराने त्यांच्या नशिबाने अशी पलटी खाल्ली की ते भारताचे कॅसेट किंग बनले.

८० च्या दशकात त्यांनी टी सिरीजची स्थापना केली आणि ९० च्या दशकात ते ‘कॅसेट किंग’ या नावाने प्रसिद्ध झाले. काही काळातच त्यांची ‘टी सिरीज’ कोट्यवधीची उलाढाल करणारी कंपनी बनली.



गुलशन कुमार हे फक्त भावगीतांची निमिर्ती करायचे नाही तर ते एक मोठे वैष्णोदेवीचे भक्त देखील होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांच्या सुविधेसाठी अनेक प्रकल्प हाती घेतले होते. ते रोज अंधेरीच्या जितेश्वर मंदिरात पूजनासाठी जायचे.

१२ ऑगस्ट १९९७ च्या दिवशी ते असेच जितेश्वर मंदिरात पूजनासाठी गेले होते. मंदिरात जाण्याच्या काही वेळ अगोदर त्यांनी एका निर्मात्याला फोन केला होता, त्यावेळी ते म्हणाले की एका सिंगर आणि मित्राची भेट घेतल्यावर ते पुन्हा मंदिरात परत जाणार आहेत. त्यानंतरची वेळ त्यांनी त्या निर्मात्याचा भेटीसाठी आरक्षित केली होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

गुलशन कुमार यांचा हा फोन कॉल त्यांचा शेवटचा होता. या फोन कॉलच्या तीन तासानंतर बातमी आली की त्यांची दिवसा ढवळ्या जितेश्वर मंदिराच्या समोरच त्यांची ह*त्या करण्यात आली होती. ही बातमी पसरताच बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.

गुलशन कुमारांवर झाडण्यात आल्या होत्या १६ गोळ्या

कॅसेट किंग गुलशन कुमाराना १६ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मंदीरातील पूजा संपवून ते साडे दहा वाजेच्या आसपास ते मंदिराच्या आवारातून बाहेर आले आणि तेव्हाच त्यांचा पाठीवर कोणीतरी बंदूक ठेवल्याचे जाणवले.

त्यांना एक व्यक्ती म्हणाला ‘ खूप झाली पूजा अर्चना, आता देवाघरी जाऊन कर’ यानंतर त्या व्यक्तीने गुलशन कुमार काही बोलणार याच्या आतच त्यांना १६ गोळ्या झाडल्या.

गुलशन कुमारांच्या पाठीवर आणि मानेवर सोळा गोळ्या होत्या, अशा परिस्थितीतही ते आसपासच्या लोकांकडे मदत मागत होते. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले, ह*त्याऱ्यांवर कलश मारून फेकला पण त्याचा उपयोग झाला नाही. गोळीबार सुरूच होता. एक गोळी ड्रायव्हरच्या पायाला लागली, ज्यात तो जखमी झाला आणि गुलशन कुमार गतप्राण झाले.

राकेश मारिया यांच्या पुस्तकात करण्यात आलेला खळबळजनक दावा

राकेश मारिया आपल्या पुस्तकात लिहितात की ‘गुलशन कुमार यांच्या ह*त्येचा कट रचला जात असल्याची माहिती त्यांना २२ एप्रिल १९९७ रोजी त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने त्यांना सुरक्षा देखील पुरवली होती.

परंतु काही दिवसांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ‘कमांडो’ लेव्हल सिक्युरिटी दिल्यामुळे मुंबई पोलिसांनी आपली सिक्युरिटी काढून घेतली होती. ज्या दिवशी गुलशन कुमारांची ह*त्या झाली त्यावेळी त्यांचा बॉडीगार्ड आजारी पडला होता व त्याने सुट्टी घेतली होती, याचाच फायदा ह*त्याऱ्यांनी उचलला होता.

दाऊद इब्राहिम टोळीने केली होती ह*त्या

गुलशन कुमार यांच्या ह*त्येत कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम यांचा हात होता. ह*त्येच्या काही दिवस अगोदर दाऊद गॅंगने गुलशन कुमारांकडे १० कोटींची खंडणी मागितली होती.

गुलशन कुमारांनी यासाठी नकार दिला होता. ते म्हणाले होते तुम्हाला देण्यापेक्ष्या हे पैसे आम्ही वैष्णोदेवीच्या चरणी अर्पण करू!

यामुळेच गुलशन कुमारांची ह*त्या करण्यात आली होती. अबू सालेमच्या सांगण्यावरून दोन शार्प शूटर्स दाऊद मर्चंट आणि विनोद जगताप यांनी गुलशन कुमार यांची ह*त्या केली.

९ जानेवारी २००१ रोजी विनोद जगताप याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, पुढे त्याचा हस्तक दाऊद मर्चंट याला देखील अटक करण्यात आली. आज दोघेही जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

गुलशन कुमार यांच्या ह*त्येची अजून एक थियरी

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या प्राथमिक तपासानंतर गुलशन कुमार यांच्या ह*त्येसाठी संगीतकार नदीम सैफी यांनी दाऊद गॅंगला सुपारी दिल्याचे म्हटले होते.

गुलशन कुमार आणि नदीम सैफी यांच्यात अनेक वर्षे शत्रुत्व होते. ज्यावेळी गुलशन कुमार यांची ह*त्या करण्यात आली त्यावेळी नदीम सैफी लंडनला होते. ज्यावेळी या प्रकारणात त्यांचे नाव असल्याची खबर त्यांना मिळाली, ते लंडनमध्येच राहिले. पुढे त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांना पुरावे मिळाले नाही आणि त्यांच्या वरील संशय दूर झाला.

आज गुलशन कुमार यांना जाऊन वीस वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला, पण अजूनही त्यांच्या गीतांची मोहिनी आणि त्यांच्या खुनाच्या चर्चा तशाच सुरु आहेत..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चीनला एकसंध करणाऱ्या या सम्राटाने अमरत्वाचा ध्यास घेतला होता

Next Post

या जादुगाराने केवळ एका फुग्याच्या साहाय्याने २५००० फुट उंच उडण्याचा विक्रम केला आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या जादुगाराने केवळ एका फुग्याच्या साहाय्याने २५००० फुट उंच उडण्याचा विक्रम केला आहे

असं काय कारण आहे ज्यामुळे आजही बक्सरच्याच दोरीने गुन्हेगारांना फासावर लटकवलं जातं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.