The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने पेप्सी-कोलापेक्षा दूध पिणं ‘कुल’ आहे हे लहान मुलांच्या मनावर ठसवलं

by द पोस्टमन टीम
26 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अर्धा ग्लास दुधाच्या बळावर एक ब्रँड मोठा झाला होता, इतका की आजही त्या ब्रॅंडचे ‘दूध दूध दूध दूध’ हे जाहिरातीचे शब्द ऐकून ९०च्या दशकातील लोक आपले कान टवकारतील. आज त्या ब्रँडच्या त्या जाहिरातीला प्रदर्शित होऊन २० वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे, तरीदेखील अजूनही ती जाहिरात लोकांच्या मनावर कोरली गेली आहे. आजही ९० च्या दशकात बालपण घालवलेल्या कुठल्याही व्यक्तीचे या जाहिरातीशी तितकेच ऋणानुबंध जोडलेले आहेत.

९० च्या दशकातील आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळात भारतात लहान मुलांसंदर्भात एक नवीन समस्या उभी राहिली. कोको कोला व पेप्सी या दोन सॉफ्ट ड्रिंक ब्रॅंड्सने शाळकरी मुलांना आपल्याकडे आकर्षित करायला सुरुवात केली. अनेक मुलं या सॉफ्ट ड्रिंक्सकडे आकर्षित होऊ लागले.

भारताची तरुण पिढी जगभरातील इतर देशात राहणाऱ्या तरुणांप्रमाणे यांच्या आहारी जाते की काय असं वाटत असताना, अचानक एका माणसाने संपूर्ण खेळ पालटला, त्या व्यक्तीचे नाव होते व्हर्गिस कुरियन!

गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने व भारताच्या धवलक्रांतीचे जनक असलेल्या व्हर्गिस कुरियन यांच्या “अमूल”ने अमेरिकन सॉफ्ट ड्रिंक विक्रेत्या कंपन्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. ज्यावेळी मार्केटमध्ये आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्या येत होत्या त्यावेळी हेल्थ ड्रिंक व सॉफ्ट ड्रिंकचे शेकडो परदेशी ब्रँड भारतात आले. त्या ब्रँड्सना लोकांची पसंती देखील मिळू लागली होती, नेमकं त्याच वेळी अमूल व नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने ‘दूध’ हा ब्रँड मार्केटमध्ये या सर्व सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांच्या विरोधात उतरवण्याचा निर्णय घेतला.

१९९६ साली आर्थिक उदारीकरणाच्या पाच वर्षांनी दुधाचा ब्रँड मोठा करण्यासाठी अमूलने मोठ-मोठ्या जाहिराती देण्यास सुरुवात केली, त्यात त्यांनी “दूध हैं वंडरफुल, पी सकते हैं रोज ग्लास फुल” व “गर्मी में डालो दूध में आईस, दूध बन गया व्हेरी नाईस” अशा टॅगलाईन्सचा वापर करायला सुरूवात केली. अमूलच्या या जाहिराती फार लोकप्रिय ठरल्या, कथ्थक करून दमुन दूध पिणारी मुलगी व दुध पिऊन आपल्या तोंडावर दुधाची मिशी दाखवणारी मुले अनेकांच्या पसंतीस उतरले.



खरंतर ही दुधाची जाहिरात तयार करायला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने पैसे पुरवले होते आणि त्यांच्या माध्यमातून हा दुधाचा प्रचार केला जात होता. पण, या जाहिरातीमुळे अमूलचा मात्र मोठाच फायदा झाला. अमूलच्या खपात यानंतर विक्रमी वाढ नोंदवण्यात आली.

या जाहिरातीने त्याकाळी भारतात दूध पिणे हे एक ‘कुल’असण्याचे प्रतीक म्हणून लोकांसमोर उभे केले.

फक्त लहान मुलांनाच नाहीतर थोरामोठ्यांना देखील दुधात असलेल्या कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचे फायदे कळावे व त्यांच्यात देखील बदल घडत जावा व दूध पिण्याचा ट्रेंड रुजावा म्हणून ही जाहिरात पद्धती फारच यशस्वी ठरली होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळात भारतीय लोकांच्या खरेदी क्षमतेत मोठी वाढ नोंदवण्यात आली. भारतीय लोक मोठ्या प्रमाणात पैसा कमवू लागले. जेवढा पैसा लोक कमवत तेवढा जास्त कामाचा ताण, मग त्यातून आजारपण ही मागे लागायचे, अशावेळी दूध हे एक उत्तम पर्यायी एनर्जी ड्रिंक म्हणून समोर ठेवण्यात या जाहिरातीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या जाहिरातीमुळे भारतात दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली होती.

व्हर्गिस कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली एफसीबी उल्का या जागतिक स्तरावरील जाहिरात एजन्सीने या संपूर्ण जाहिरातीच्या कॅम्पेनची रचना केली होती. दुधाला एक फॅन्सी पेय म्हणून लोकांसमोर ठेवणे ही प्राथमिक आवश्यकता समोर ठेवण्यात आली होती. त्यासाठी कंपनीने हिंदी इंग्रजीचे ‘हिंग्लिश’ भाषेचा आधारावर या संपूर्ण कॅम्पेनची रचना केली होती.

लहान मुलांना टीव्हीवर चॅनल बदलण्याऐवजी ही जाहिरात बघायला आवडेल इतकी सुंदर या जाहिरातीची रचना करण्यात आली होती. आशिष सोनी आणि इशा कोप्पीकर यांच्यासारख्या सिने तारकांनी या जाहिरातीतून आपल्या करियरला बुस्ट दिला होता. ही जाहिरात व ते कॅम्पेन त्याकाळी प्रचंड गाजले.

लोकांनी मोठ्या प्रमाणात दूध खरेदी केले नाही तर या जाहिरातीला देखील प्रचंड पसंती दिली.

आजदेखील असंख्य लोक या जाहिरातीचे चाहते आहेत, गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये देखील लोकांनी या जाहिरातीला सर्वांत आठवणीत राहिलेली जाहिरात म्हणून प्रचंड मतदान केले होते.

तेव्हाच नाही तर, आजही अमूलच्या जाहिराती सगळ्यात हटके असतात यात दुमत नाही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अपघाताने कृत्रिम जांभळ्या रंगाचा शोध लागला आणि फॅशनच्या जगात क्रांतीच झाली

Next Post

सिंहालाच कुस्तीत हरवणारा पैलवान म्हणजे युजेन सॅंडो ..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

सिंहालाच कुस्तीत हरवणारा पैलवान म्हणजे युजेन सॅंडो ..!

उजवी आणि डावी विचारसरणी म्हणजे काय..? त्यांना ही नावं कशी पडली? जाणून घ्या!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.