The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दाऊदने बॉ*म्बस्फो*ट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

by द पोस्टमन टीम
11 March 2025
in मनोरंजन, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१९९३ साली आर्थिक राजधानी मुंबई साखळी बॉ*म्बस्फो*टाने हादरली होती. या बॉ*म्बस्फो*टात २५७ लोकांनी प्राण गमावले आणि ८०० लोक जखमी झाले. या बॉ*म्बस्फो*टाच्या जखमा आजदेखील भारतीय माणसाच्या हृदयावर आहेत. हे साखळी बॉ*म्बस्फो*ट घडवून आणले होते दाऊद इब्राहिम याने! मुंबईच्या अंडरवर्ल्डवर एकेकाळी अधिराज्य गाजवणाऱ्या या कुख्यात गुंडाचा शोध आजही पोलीस व गुप्तचर यंत्रणा घेत आहे. इंटरपोलने देखील याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये वावरणारा दाऊद दुबईपर्यंत कसा पोहचला, याची कहाणी फारच रंजक आहे.

रत्नागिरीच्या खेड येथे दाऊद इब्राहिमचा जन्म झाला. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर पोलीस खात्यात नोकरीला होते. हेड कॉन्स्टेबलच्या नोकरीचा पगार त्यांना पुरायचा नाही त्यामुळे घरात कायम पैशांची चणचण. घरातील गरिबीच दाऊदच्या मनात पैशाचे प्रेम जागृत करायला कारणीभूत ठरली. त्याला लवकरात लवकर पैसे कमवून श्रीमंत व्हायचे होते. नवव्या इयत्तेनंतर त्याने शिक्षण सोडले आणि गुन्हेगारी जगतात प्रवेश केला.

दाऊदने आपल्या अपराधी आयुष्याची सुरुवात उद्योजक व व्यापाऱ्यांना लुटून केली. यासाठी तो जेलमध्ये देखील गेला. ज्यावेळी त्याच्या गुन्ह्यांची माहिती त्याच्या वडिलांना मिळाली, त्यांनी त्याची घरातून हकालपट्टी केली.

घर सोडल्यावर दाऊदने त्यावेळीचा मुंबईचा डॉन असलेल्या करीम लालाची गॅंग जॉईन केली. करीम लालाकडून अपराधी जगताचे सगळे छक्के पंजे शिकल्यानंतर त्याने ‘करीम लाला’ला सोडचिट्ठी दिली. त्याने त्याचा भाऊ साबिरसमवेत वेगळी गॅंग काढली.

८० च्या दशकात मुंबईवर हाजी मस्तान आणि करीम लालासारख्या गुंडांचे अधिपत्य होते. पण याच काळात दाऊद वेगाने मोठा होऊ लागला. त्याने हळहळू आधीच्या गुंडांचे साम्राज्य नेस्तनाबूत केले आणि स्वतःच्या गँगची सत्ता प्रस्थापित केली.



मीडियाने दाऊद गॅंगला ‘डी कंपनी’ अशी ओळख दिली. दाऊदच्या टोळीने वसुली, सट्टे बाजार, कॉन्ट्रॅक्ट कि*लिंग, ह*त्यार आणि ड्र*ग्ज तस्करी इत्यादी गुन्हेगारी काम करायला सुरुवात केली. दाऊद त्याच्या कृत्यांमुळे चर्चेत आला आणि पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. खंडणी वसूल करण्यामुळे दाऊदवर अनेक पोलीस केस झाल्या होत्या. त्याचे जेलमध्ये येणेजाणे सुरु होते.

याच काळात दाऊदला मन्या सुर्वे या गुंडाने आव्हान दिले होते. अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या पठाणांच्या टोळीला दाऊदची प्रगती खुपत होती. त्यांनी मन्या सुर्वेला हाताशी धरून दाऊदच्या भावाचा काटा काढला. भावाच्या ह*त्येमुळे पेटून उठलेल्या दाऊदने कुठल्याही किंमतींवर भावाच्या मृत्यूचा सूड घेण्याचे प्रयत्न केले. यामुळे मुंबई शहरात गॅंग वॉर भडकले. या गॅंग वॉ*रमध्ये मन्या सुर्वेच्या अनेक साथीदारांना मारण्यात आले.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

काही लोक घाबरून दाऊदच्या गॅंगमध्ये आले. पण मन्या सुर्वे दाऊदच्या हाती लागला नाही. मुंबई पोलिसांपासून मात्र मन्या वाचला नाही. १९८२ मध्ये इन्स्पेक्टर इशाकच्या गोळीने मन्या सुर्वेचा छातीचा वेध घेतला होता.

मन्याच्या एन्काउंटरनंतर दाऊदचे शत्रू संपले होते. हाजी मस्तानची गॅंग संपुष्टात आल्यामुळे तो राजकारणाकडे वळला, त्यामुळे मुंबईत एकच डॉन उरला तो म्हणजे दाऊद इब्राहिम.

दाऊदच्या भयाने लोकांची झोप उडाली होती. पोलीस दाऊदच्या मागावर होती. पोलिसांचा वाढता जाच बघून दाऊदने देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि दाऊद दुबईला गेला. तिथून तो आपल्या टोळीला नियंत्रित करत होता. दाऊदने या काळात बॉलिवूड आणि क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात पैसा लावला होता. त्याला बऱ्याचदा दुबईच्या क्रिकेट मैदानात पाहण्यात आले होते. तो मॅच फिक्सिंग करून सट्टा बाजारातून करोडो रुपये कमवायचा. त्याने हवाला रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा काळा बाजार केला.

१९९३ मध्ये दाऊदने मुंबईत साखळी बॉ*म्बस्फो*ट घडवून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आता भारतच नाहीतर जगभरातील पोलीस फोर्स त्याच्या पाठी लागली आहे. आता या पोलिसांपासून बचावासाठी दाऊदने पाकिस्तानात शरणागती पत्करली.

असे म्हणतात की दाऊद आज आयएसआयच्या निरीक्षणात जीवन जगतोय. मध्यंतरी त्याच्या मरणाच्या बातम्या आल्या होत्या. पण याची कुठलीच पुष्टी झाली नाही. दाऊदचा हस्तक छोटा शकील या सर्वांना अफवा म्हणून उडवून लावत असतो.

दाउदवर अनेक चित्रपट आले आहेत. संजय गुप्ता यांनी दिगदर्शित केलेला ‘शूटआउट ॲट वडाला’ हा चित्रपटदेखील दाऊद आणि त्याचा भाऊ साबीरच्या आयुष्यावर भाष्य करतो. यात मन्या सुर्वेची भूमिका जॉन इब्राहिम आणि दाऊदची भूमिका सोनू सूदने वठवली आहे.

वन्स अपॉन टाइम इन मुंबई या चित्रपटात दाऊदच्या आयुष्याला दाखवण्यात आलं होतं. यात दाऊदची प्रेम कथा दाखवण्यात आली होती. बी टाऊनच्या अनेक ऍक्टरेसशी दाऊदचे चांगले संबंध होते. मंदाकिनी या अभिनेत्रीशी त्याचे प्रेम प्रकरण असल्याची चर्चा रंगली होती. ती त्याच्यासोबत दुबईमध्ये देखील काही काळ होती. दाऊदने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात गुंतवणूक केली होती. सलमानच्या अनेक चित्रपटासाठी त्याने पैसे लावले होते. चोरी चोरी चुपके चुपके ह्या चित्रपटाला तर दाऊदच्या पैशाने तयार करण्यात आले होते.

२०११ मध्ये फोर्ब्जने दाऊदचा जगातील १० मोस्ट वॉन्टेड द*हश*तवाद्यांच्या यादीत समावेश केला होता, असं असलं तरी आजदेखील पोलीस आणि इंटरपोल दाऊदचा तपास लावू शकलेली नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अमेरिकेच्या विरोधात गाणे लिहूनदेखील बॉब डिलनला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता

Next Post

वयाच्या ११ व्या वर्षी पहिली गुंतवणूक करणाऱ्या वॉरेन बफे कसे बनले सर्वात श्रीमंत व्यक्ती..?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

वयाच्या ११ व्या वर्षी पहिली गुंतवणूक करणाऱ्या वॉरेन बफे कसे बनले सर्वात श्रीमंत व्यक्ती..?

आई व मुलाच्या पवित्र नात्यावर बोट ठेवणारा सिग्मंड फ्रॉइडचा 'इडिपस कॉम्प्लेक्स' सिद्धांत काय आहे ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.