The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतःची नोकरी धोक्यात घालून या जपानी अधिकाऱ्याने ६००० ज्यूंची होलोकॉस्टपासून सुटका केली

by द पोस्टमन टीम
13 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


मानवी अस्तित्वाच्या चक्रात परिस्थिती अनेकदा लोकांची परीक्षा घेते. त्यातील अगदी बोटावर मोजण्याइतकेचं लोक दया, विचारशीलता मनात ठेऊन मानवतेच्या भल्यासाठी काम करतात. त्यांच्या या कामामुळंच त्यांना मोठेपणा प्राप्त होतो. आजची गोष्ट देखील अशाच एका परोपकारी पुरुष आणि त्याच्या पत्नीची आहे. या व्यक्तीनं अनेक वाईट गोष्टींचा सामना करून आणि सरकारच्या आदेशांचं उल्लंघन करून दयाळूपणा दाखवला. शिऊने सुगीहारा आणि युकिको सुगीहारा असं या दाम्पत्याचं नाव आहे. दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीला, शिऊने सुगीहारा यांनी आपली नोकरी, कुटुंबाचं भविष्य आणि जीव धोक्यात घालून सहा हजारपेक्षा जास्त ज्यू लोकांची ना*झींपासून सुटका केली होती.

दुसरं महायु*द्ध सुरू होण्याअगोदर ना*झी जर्मनी आणि सोव्हिएत युनियननं ‘नो ॲग्रेशन’ करार केला होता. त्यानुसार, जेव्हा सप्टेंबर १९३९ मध्ये जर्मननी पोलंडवर आक्र*मण केलं, त्याचं वेळी सोव्हिएत युनियननं पोलंडच्या पूर्वेकडील भागांवर कब्जा केला. पोलंडवर ह*ल्ला करून जर्मनीनं तेथील ज्यू लोकांचा छळ सुरू केला. त्यामुळं जवळपास १५ हजारपेक्षा जास्त ज्यूंनी अजूनही स्वतंत्र असेलेल्या लिथुआनियामध्ये आसरा घेतला.

नाझी आणि सोव्हिएतच्या कचाट्यात सापडलेले हे ज्यू निर्वासित होण्यासाठी मार्ग शोधत होते. १९४० मध्ये जेव्हा सोव्हिएत संघानं लिथुआनियावर कब्जा केला, तेव्हा ज्यूंची दुर्दशा आणखी तीव्र झाली. मात्र, त्याचं वेळी एक जपानी देवदूत लिथुआनाच्या भूमिवर उपस्थित होता. फक्त तोपर्यंत ज्यूंना याची कल्पना नव्हती.

नोव्हेंबर १९३९, मध्ये शिऊने सुगीहारा या जपानी अधिकाऱ्याची कॉन्सुलेट म्हणून लिथुआनियाची तत्कालीन राजधानी कोव्हनो (कौनास) येथे नियुक्ती करण्यात आली होती. जर्मन सैन्य आणि सोव्हिएतच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सुगीहारा यांच्याकडे होती. जेणेकरून जपानी मुख्यालयाला यु*द्ध परिस्थितीची आगाऊ माहिती असेल. मात्र, जेव्हा १९४०च्या उन्हाळ्यात सोव्हिएतनं लिथुआनियावर ताबा मिळवला तेव्हा सर्व विदेशी अधिकाऱ्यांना ऑगस्ट महिन्याअखेर कोव्हनो सोडण्यास सांगितलं गेलं.

सुगीहारा यांनी देखील आपल्या सामानाची बांधाबांध सुरू केली होती. त्यावेळी ज्यू लोकांचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला आल्याची माहिती शिपायानं त्यांना दिली. या शिष्टमंडळाचं नेतृत्व झेराच वॉरहॅफ्टिग यांनी केलं होतं. झेराच त्यावेळी ज्यू निर्वासित होते. (जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा ते मंत्री झाले) सुगीहारा यांनी झेराच यांच्या शिष्टमंडळाची भेट घेण्याचं मान्य केलं.



त्यावेळी लिथुआनियामधील ज्यू निर्वासितांची प्रचंड दैना झाली होती, कारण जगाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. जगात कुठेही जाण्यासाठी इमिग्रेशन व्हिसा मिळणं व्यावहारिकदृष्ट्या अशक्य झालं होतं. ते अशा ठिकाणाच्या शोधात होते जिथे त्यांना प्रवेश करण्यास परवानगीची लागणार नाही. त्यांना ‘कुराकाओ’ या एक डच वसाहतीबद्दल माहिती मिळाली. त्याठिकाणी जाण्यासाठी एन्ट्री व्हिसाची आवश्यक नव्हती. मात्र, यु*द्धामुळं प्रवास करण्याच्या शक्यता रोखल्या गेल्या होत्या. त्यासाठी ट्रान्झिट व्हिसा असणं आवश्यक होतं. हीच विनंती घेऊन ज्यू शिष्टमंडळ जपानी अधिकारी सुगीहारा यांच्याकडं आलं होते.

सुगीहारा ट्रान्झिट व्हिसा देऊ शकत होते मात्र, त्याला वरिष्ठांचा अधिकृत दुजोरा आवश्यक होता. त्यासाठी सुगीहारा यांनी ज्यूंकडे वेळ मागितला. जपानी परराष्ट्र मंत्रालय या असामान्य विनंतीला सहमती देईल याबाबत शंकाच होती. निर्वासितांची दुर्दशा पाहून सुगीहारा खूप व्यथित झाले. म्हणून त्यांनी मंत्रालयाच्या परवानगीशिवाय स्वत:च्या जबाबदारीवर व्हिसा देण्यास सुरुवात केली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

नऊ दिवसांनंतर जपानवरून सुगीहारा यांना अपेक्षित असलेला नकारात्मक प्रतिसाद आला. जपाननं परवानगी नाकारल्यानंतरही सुगीहारा यांनी व्हिसा वाटप थांबवलं नाही. सुरुवातीच्या काही दिवसातच सुगीहारांनी जवळपास ३ हजार ५०० ट्रान्झिट व्हिसा प्रदान केले होते. त्यावेळी दूतावास सोडण्याची मुदत देखील जवळ आली होती आणि कर्मचारी वर्ग देखील कमी होता. अशा परिस्थितीत सुगीहारा यांनी स्वतः काही पासपोर्टवर शिक्के मारले होते.

असं सांगितलं जातं की, जेव्हा ते स्वत: लिथुआनियामधून जात होते तेव्हा अगदी रेल्वे स्थानकावर गेल्यानंतरही ते पासपोर्टवर शिक्के मारत होते. पासपोर्टवर शिक्के करण्यासाठी त्यांनी काही ज्यूंची देखील मदत घेतली होती. मात्र, ज्यूंना जपानी भाषेचं ज्ञान नसल्यामुळे, काही शिक्के उलटे देखील लागले होते. हा सर्व गोंधळ सुरू असताना, योग्य प्रक्रियेशिवाय व्हिसा न देण्याच्या चेतावण्या सुगीहारा यांना टोकियोतून मिळत होत्या.

सुगीहारांनी दिलेल्या व्हिसामुळे अनेक ज्यूंची होलोकॉस्टपासून सुटका झाली. जून १९४१ मध्ये ना*झी जर्मनीनं लिथुआनियावर आक्र*मण केलं. जर्मनीनं ताब्यात घेतलेल्या प्रदेशांतील बहुसंख्य ज्यूंची ह*त्या केली होती. कोव्हनोमधून सुगीहाराला कोएनिग्सबर्ग (कॅलिनिनग्राड) आणि नंतर बुखारेस्ट येथील दूतावासात पाठवण्यात आलं.

दुसरं महायु*द्ध संपल्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त काळ सुगीहारा आणि त्याचं कुटुंब युरोपमध्ये यु*द्ध कैदी होते. १९४७ मध्ये आपल्या देशात परतल्यानंतर सुगीहारा यांना जपानी परराष्ट्र सेवेतून काढून टाकण्यात आलं.

परराष्ट्र सेवेतून काढून टाकल्यानंतर अनेक छोटी-मोठी कामं करून त्यांनी आपल्या कुटुंबाचं पालन पोषण केलं. कित्येक वर्ष सुगीहारा अज्ञातवासात आयुष्य जगले. त्यांनी किती लोकांना मदत केली याची त्यांना देखील कल्पना नव्हती. मात्र, जगात काही अशी देखील लोकं अस्तित्वात आहेत जे उपकार विसरत नाहीत.

१९६८ मध्ये सुगीहारा यांच्याकडून व्हिसा मिळालेल्या एका व्यक्तीनं त्यांचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर त्यांनी एकदा इस्रायलला भेटही दिली होती. इस्रायलची अधिकृत होलोकॉस्ट स्मारक समिती, याद वाशमनं सुगीहारांना ‘राईटस अमंग दी नेशन्स’ ही पदवी देऊन सन्मानित केलं. ३१ जुलै १९८६ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी जपानमधील कामाकुरा या ठिकाणी सुगीहारा यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिऊने सुगीहारा यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी युकिको सुगीहारा यांनी एका मुलाखतीमध्ये कोव्हनो दूतावासातील परिस्थितीचं वर्णन केलं होतं. सुरुवातीला २००-३०० ज्यू निर्वासीत लोक जपानी दूतावासात आले होते नंतर त्यांची संख्या वाढत गेली. दिवसभर ते प्रतिसादाच्या अपेक्षेत उभे राहत. पोलंडमधून कसाबसा स्वत:चा जीव वाचवून ते लोक तिथपर्यंत आले होते. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं देखील होती. त्यांना मदतीची आस होती.

टोकियोतून काही प्रतिसाद न मिळाल्यानं शिऊने काहीही करू शकत नव्हते. युकिको खिडकीतून त्या लोकांना बघायच्या, ते अक्षरश: हात जोडायचे. दोन दिवस अशीच परिस्थिती होती. दोघांनाही रात्री झोप देखील लागत नसे. तिसऱ्या दिवशी मात्र, शिऊनेनं आपलं सर्वस्व पणाला लावून ज्यू निर्वासितांना व्हिसा देण्यास सुरुवात केली, असं युकिको यांनी सांगितलं.

महायु*द्धासारख्या कठीण काळात विदेशात आपली नोकरी, कुटुंब आणि जीव संकटात टाकून सुगीहारा यांनी ज्यू लोकांची मदत केली. त्यांच्या या कार्यासाठी संपूर्ण ज्यू समुदाय आजन्म त्यांचा ऋणी राहिल. सुगीहारांची ही गोष्ट ऐकल्यानंतर माणुसकी शिल्लक असल्याची जाणीव होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या स्त्रीने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अणुप्रकल्पाची माहिती रशियाला पुरवली होती

Next Post

विराट कोहलीची फेव्हरेट ऑडी R8 पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात का पडली आहे..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

विराट कोहलीची फेव्हरेट ऑडी R8 पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात का पडली आहे..?

या खटल्यानंतर स्त्री आणि पुरुषांच्या पलीकडची ओळख आपल्या देशाने मान्य केली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.