The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिटकॉइन चोरून लोकांना गंडा घालणारं हे जोडपं एका छोट्याश्या चुकीमुळे अखेर पकडलं गेलं

by द पोस्टमन टीम
13 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एका हॅकरने सन २०१६ मध्ये बिटफिनेक्स नावाच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून तब्बल १ लाख १९ हजार ७५४ बिटकॉइन चोरले. या गुन्ह्याचा माग सुमारे ५ वर्ष घेतल्यानंतर त्या मागच्या गुन्हेगारांचा पर्दाफाश झाला आणि मॅनहॅटनमध्ये इल्या लिक्टेनस्टारईन आणि हीथर मॉर्गन या तरुण विवाहित जोडप्याला जेरबंद करून फेडरल न्यायालयात हजर करण्यात आलं. एक्सचेंज हॅक झालं तेव्हा चोरीला गेलेल्या बिटकॉइनची किंमत सुमारे सत्तर दशलक्ष डॉलर्स होती. आज त्याची किंमत पाच अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

रशियन-अमेरिकन असे दुहेरी नागरिकत्व असलेला ३४ वर्षीय लिक्टेनस्टीन स्वतःला ‘तंत्रज्ञान उद्योजक,’ ‘एक्सप्लोरर’ आणि जादूगार म्हणवतो. त्याच्या ट्विटर फीड (@unrealdutch) वर क्रिप्टोकरन्सी, वेब 3.0 आणि नॉन-फंजिबल टोकन्सवर मुबलक मजकूर उपलब्ध आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, त्याने एडवर्ड स्नोडेनचे क्रेमलिनवरील फटाक्यांचे चित्र रिट्विट केले.

एकतीस वर्षांच्या मॉर्गनने लिक्टेनस्टीनशी लग्न केलं. इतर अनेक व्यवसाय करत असतानाच ती एक पत्रकार आहे. फोर्ब्ससाठी तिने लिहिलेल्या चरित्रात, मॉर्गनने स्वतःचे वर्णन आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ, मालिका उद्योजक आणि गुंतवणूकदार असं केलं आहे. त्याचप्रमाणे ती आपण मानसिक सल्लागार, सामाजिक अभियांत्रिकीमधील तज्ज्ञ आणि गेम सिद्धांतातील तज्ज्ञ असल्याचा दावाही करते. फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी रिव्हर्स-इंजिनियरिंग उपयुक्त असल्याचं तिचं म्हणणं आहे. तिला रॅपिंग आणि ‘स्ट्रीटवेअर फॅशन डिझाइन’ करणं आवडतं.

मॉर्गन खरोखरच रॅपिंगचा आनंद घेत असल्याचं दिसून येतं. ती ‘रज्जलेखान’ या नावाने ठिकठिकाणच्या बारमध्ये जाते आणि स्वत:ला ‘क्रोकोडाईल ऑफ वॉल स्ट्रीट’ म्हणवून घेते. ‘रज्जलेखान’चा Versace Bedouin नावाचा ट्रॅक आहे. त्यामध्ये फॅशन, संस्कृतीपासून आर्थिक गुंतवणूक आणि सट्ट्यापर्यंत सगळ्याबद्दल भाष्य केलेलं असतं.



मॉर्गन स्वतःला ‘बहुकारकिर्दी’ म्हणवते. मी एक रॅपर आहे. एक अर्थशास्त्रज्ञ आहे. एक पत्रकार आहे. एक लेखक आहे. एका कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहे, असं ती म्हणते. 

“Versace Bedouin” साठी केलेल्या एका व्हिडिओमध्ये मॉर्गन gold lamé जॅकेट आणि बेसबॉल कॅप परिधान केली आहे. या छायाचित्राला ØFCKS’ हे स्लोगन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ जिथे हे जोडपं भाड्याने घेतलेल्या दोन बेडच्या सदनिकेत राहतात तिथेच, वॉल स्ट्रीटवरच चित्रित करण्यात आला आहे.

मॉर्गन आणि लिचटेनस्टाईन यांच्यावर मनिलॉण्डरिंग आणि अमेरिकन प्रशासनाची फसवणूक करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. या नंतर या जोडप्याच्या ‘रंगीन’ आयुष्याचं वर्णन करण्यावरच बहुतेक सर्व माध्यमांनी लक्ष केंद्रित केलं. मात्र, प्रत्यक्षात या प्रकरणाचं महत्व आणि व्याप्ती अधिक होती. कारण ते गुन्हेगारी उपद्व्यापांसाठी डिजिटल चलनाच्या वापराची शक्यता आणि त्याचे तोटे स्पष्टपणे दाखवून जातात.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

मॉर्गन आणि लिक्टेनस्टाईन विरुद्धच्या खटल्यात तपास यंत्रणेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एका मोठ्या गुन्ह्याचं तपशीलवार वर्णन करण्यात आलं आहे. मात्र, बिटफिनेक्सची यंत्रणा हॅक झाल्यानंतर सन २०१६ मध्ये चोरीचे बिटकॉइन बाहेरच्या वॉलेटमध्ये हस्तांतरित केले गेले. 

लिक्टेनस्टाईन आणि मॉर्गन यांनी एक्सचेंज हॅक केल्याचे तपास यंत्रणांनी म्हटलेले नाही. त्यांच्यावर केवळ यंत्रणा हॅक करून हडपलेली रक्कम गैरमार्गाने वापरल्याचा (मनी लॉंडरिंग) आरोप आहे. प्रत्यक्षात असं दिसून येतं की या जोडप्याने चोरीच्या नाण्यांपैकी ९४ हजार ६३६ बिटकॉइन अर्थात, एकूण लुटीपैकी सुमारे ऐंशी टक्के आभासी चलन लाटण्याचा प्रयत्न केला नाही. कारण डिजिटल चलनाचे गैर व्यवहार करणं ही अवघड बाब आहे. जसजशी रक्कम मोठी होते तसतशी अडचण जास्तीतजास्त वाढत जाते.

अनेक देशाचं प्रशासन शत्रू राष्ट्रांमधल्या आस्थापनांच्या यंत्रणा हॅक करण्यासाठी हॅकर्सना प्रोत्साहन देत असल्याचं दिसून आलं आहे. उदा. उत्तर कोरियाच्या हॅकर्सकडून डिजिटल चलनाच्या एक्सचेंजमधून चोरीच्या घटना चिंताजनक म्हणाव्या एवढ्या प्रमाणात घडतात. उत्तर कोरियाचे प्रशासन विशेषत: दक्षिण कोरियामधील डिजिटल व्यवहार हॅक करण्यासाठी हॅकर्सना प्रोत्साहन देतात आणि संरक्षणही!

मागच्या वर्षी एप्रिलपर्यंत ‘बिथंब’ या एका एक्सचेंजवर चार वेळा छापे टाकण्यात आले होते. एक्सचेंजेस असुरक्षित असतात कारण ते अनेकदा तथाकथित ‘हॉट वॉलेट’मध्ये कॉईन्स असलेली एस्क्रो खाती ठेवतात, जी इंटरनेटशी जोडलेली असतात.

इंटरनेटशी न जोडलेल्या ‘कोल्ड वॉलेट’मध्ये कॉईन्स ठेवणे हा अधिक सुरक्षित परंतु कष्टाचा मार्ग आहे. मागील वर्षी, टॉम रॉबिन्सन या ‘ब्लॉकचेन-अ‍ॅलिप्टिक फर्म’च्या मुख्य शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, एकदा निधी एक्सचेंजमधून बाहेर पडला की, तुम्ही ते व्यवहार रद्द करू शकत नाही.

पारंपारिक बँक देयकांमध्ये ते शक्य असते. आभासी चलनातले पैसे एकदा ते गेले की ते गेले. या व्यवहारात कोणताही मध्यस्थ नसतो. बिटकॉइनला कोणताही नियंत्रक नाही. माझे पैसे चोरीला गेले आहेत. ते मला परत द्या, हे सांगण्यासाठी इथे कोणतीही यंत्रणा नाही.

अर्थात, आभासी चलन चोरांसाठी संधी निर्माण करते त्याचप्रमाणे अशा भामट्यांसाठी ते मोठे अडथळे देखील उभे करते. बहुतेक एक्सचेंज हॅक करून हडपलेले पैसे अधिकृत चलनात म्हणजेच पाउंड, युरो, डॉलर. रुपये यामध्ये रूपांतरित करणं ही सोपी बाब नाही. एक्स्चेंजमध्ये K.Y.C. किंवा अँटी-मनी-लाँडरिंग (A.M.L.) यंत्रणा कार्यरत असेल तर असे पैसे रूपांतरित करणं महाकठीण आहे.

सध्या भारतात देखील आभासी चलनाचा मोठा बोलबाला आहे. या चलनातील नफेखोरी अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेत आहे. आभासी चलनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा मानस केंद्र सरकारने व्यक्त केला आहे त्याचप्रमाणे अनियंत्रित आणि अनोळखी आभासी चलनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पर्याय देण्यासाठी देशाची नियंत्रक बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेने आपले आभासी चलन उपलब्ध करून द्यावे या साठीही प्रयत्न सुरु आहेत. योग्य प्रकारचे नियंत्रण, नियमन आणि अधिकृतता मिळेपर्यंत आभासी चलनाच्या मायाजालापासून दूर राहणेच इष्ट!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवलेल्या ‘द अमेरिकन फाईल्स’!

Next Post

रोनाल्डो हे फुटबॉलप्रेमींच्या लाडक्या खेळाडूचं आडनाव नाहीये!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

रोनाल्डो हे फुटबॉलप्रेमींच्या लाडक्या खेळाडूचं आडनाव नाहीये!

या माणसाने पहिल्या महायुद्धाच्या १७ वर्ष आधीच त्याची भविष्यवाणी केली होती!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.