The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आफ्रिकेत मांत्रिकाच्या सल्ल्याने एका भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा नर*बळी दिला होता..!

by द पोस्टमन टीम
17 August 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू-नेटल किनारपट्टीवर पोवन गोवेंडर हे विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जी मुलं त्यांच्या देखरेखीखाली आहेत ती काही तुमच्या आमच्यासारखी सामान्य बुद्धिमत्तेची नाहीत. ज्या मुलांचा मानसिक विकास झालेला नाही, अशा मुलांना शिकवण्याचं काम पोवन करतात. २००२ साली एक दहा वर्षांचा मुलगा त्यांच्याकडे आला. या मुलाला विशेष मुलांच्या शाळेत येण्याअगोदर इयत्ता पहिली बसवण्यात आलं होतं. मात्र, त्याच्या काहीही लक्षात राहत नसल्याचं त्याच्या शिक्षकांच्या लक्षात आलं.

त्यांनी त्याला मानसिक चाचण्यांसाठी पाठवलं असता त्याच्या बुद्ध्यांक त्याच्या वयाच्या मानानं खूपच कमी असल्याचं लक्षात आलं. त्यामुळं त्याची बौद्धिकदृष्ट्या अपंग म्हणून नोंद झाली. मात्र, त्याच्याकडे प्रचंड उर्जा आणि उत्साह होता. त्याच्या योग्य दिशा देण्यासाठी पोवन यांनी त्याला क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यशही आलं. मात्र, एका घटनेनं क्षणात त्या मुलाचं आयुष्य बदलून गेलं किंबहुना होत्याचं नव्हत झालं! हा मुलगा होता तरी कोण आणि त्याच्या सोबत नेमक काय झालं? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या विशेष मुलाच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न…

नोव्हेंबर २०१५ मध्ये एका नवोदित क्रिकेटपटूच्या हत्येनं दक्षिण आफ्रिका क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. एका क्रू*र आणि धक्कादायक घटनेत, बौद्धिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूचा त्याच्या जवळच्या मित्रानेच बळीच्या विधीमध्ये शिर*च्छेद केला. नवाज खान असं या २३ वर्षीय क्रिकेटपटूचं नाव होतं. एक बौद्धिकदृष्ट्या दुर्बल मुलगा ते प्रतिभावंत नवोदित खेळाडू होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा होता.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नवाजच्या पणजोबांनी साखर कामगार म्हणून दक्षिण आफ्रिका गाठली होती. त्यांनी विविध ठिकाणी मजूरी केली. पुढे १९९५ साली, क्वाझुलू-नेटलपासून काही अंतरावर एक साधी वसाहत बांधण्यात आली होती. या ५०० घरांमध्ये भारतीय वंशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाली. याच ठिकाणी नवाज आणि त्याचं कुटुंब देखील गांधीनगर नावाच्या या वसाहतीमध्ये राहण्यास आलं. तेव्हा नवाज पाच वर्षांचा होता. त्यानंतर त्याला पोवन सर भेटले आणि त्यानं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याला क्रिकेटचं वेड होतं. अल्पावधीतचं त्यानं प्रचंड प्रगती केली होती. वयाच्या १४ वर्षीचं त्याच्या खेळामध्ये कमालीचा दर्जा होता त्यामुळं त्याला वरिष्ठ गटामध्ये सामिल करून घेतलं होतं.

विशेष मुलांच्या शाळेपासून त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला होता. शिक्षक असलेल्या पोवन गोवेंडर यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. नवाजमध्ये क्रिकेटची भूक होती. तो आपल्यासोबत शाळेतील इतर मुलांना देखील शिकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याची क्षमता आणि धडपड पाहून पोवन यांनी निधी जमा करून या मुलांसाठी फोल्ड-अप पीचसह संपूर्ण क्रिकेट कीट खरेदी केली. त्यानंतर नवाजचा खेळ आणखी बहरत गेला.



गोलंदाजी आणि फलंदाजीशिवाय त्यानं यष्टीरक्षक म्हणून देखील उत्तम कामगिरी केली होती. त्याच्याच बळावर त्याच्या क्लबनं २००७ आणि २००८ मध्ये नॅशनल चॅम्पियनशीप जिंकली होती. २००७ मध्ये नवाजला दक्षिण आफ्रिकेच्या ‘बौद्धिकदृष्ट्या दुर्बल संघा’त स्थान मिळालं होतं. तेव्हापासून तो या संघाचा नियमित खेळाडू होता.

२०१३ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत विक्रमी धावा केल्यानंतर नवाजला दक्षिण आफ्रिकेचा ‘बौद्धिकदृष्ट्या दुर्बल असेलेला प्रतिभावंत क्रिकेटपटू’ म्हणून निवडण्यात आलं होतं. मात्र, त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण अद्याप येणं बाकी होतं. साऊथ आफ्रिकन क्रिकेट बोर्डनं आयोजित केलेल्या एका ब्रेकफास्ट प्रोग्राममध्ये नवाजला हा पुरस्कार मिळाला होता आणि तोही त्याचा आयडॉल असलेल्या हाशिम आमलाच्या हातून. भरीस भर म्हणजे आमलानं त्याच्यासोबत एक फोटोशूट देखील केलं होतं.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

जो मुलगा आयुष्यात काहीही करू शकणार नाही, या चिंतेत असलेल्या त्याच्या कुटुबियांना नवाजच्या प्रगतीमुळं जणू आभाळ ठेंगण झालं होतं. त्यांना खुश पाहून नवाज देखील आनंदी होता. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळचं होतं. ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी नवाज घरातून ड्युमा नावाच्या मित्रासोबत बाहेर गेला आणि अचानक गायब झाला. गांधीनगरसारख्या कमी लोकवस्तीच्या ठिकाणी त्याला शोधन कठीण नव्हत. त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही.

दुसऱ्या दिवशी, गांधीनगरपासून ७५ किलोमीटर दूर असलेल्या एका शहरातील मार्केटमध्ये ड्युमाला पाहिल्याची खबर घेऊन गावातील एक ड्रायव्हर नवाझच्या घरी आला. ड्युमा मार्केटमध्ये नवाजचे शूज विकण्याचा प्रयत्न करत होता. याबाबत नवाजची आई झाकियानं तपास अधिकाऱ्यांना सांगितलं. पण, पोलीस त्याला पकडण्याआधीच ड्यूमा स्वत:च झाकीयाला भेटण्यासाठी आला. ३१ ऑक्टोबरला सोबत सॉकर खेळल्यानंतर नवाजसोबत काहीही संपर्क झाला नसल्याचं ड्युमानं सांगितलं. मात्र, त्याच्या शरीरावर असलेले आरखडे पाहून झाकियाला संशय आला होता.

गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिस बरोबर त्याला बाटलीमध्ये उतरवतात. ड्युमाच्या बाबतीत देखील हीच गोष्ट घडली. एका ऑफ ड्यूटी पोलिसानं बरोबर त्याच्या तोंडून नवाजबाबत माहिती मिळवली. अधिक तपासात ड्युमानं एक धक्कादायक कबुली दिली.

त्यानं त्याच्या कौटुंबिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी एका स्थानिक मांत्रिकाच्या सल्ल्यानं नवाजची हत्या केली होती. मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार ड्युमाला एका भारतीय व्यक्तीची आवश्यकता होती आणि त्यासाठी नवाजपेक्षा योग्य व्यक्ती त्याला सापडणं शक्यच नव्हतं. म्हणून त्यानं आपल्याचं मित्राचा बळी घेतला. जेव्हा ड्युमाच्या सांगण्यावरून पोलिसांनी नवाजचा मृतदेह शोधला तेव्हा फक्त त्याचं धडच सापडलं. त्याचं शीर गायब होतं. डोकं नसलेल्या अवस्थेतच नवाजचा दफनविधी करण्यात आला होता.

एक नवोदित खेळाडू म्हणून नवाजची आकडेवारी प्रभावी तर होतीच. मात्र, मैदानावरील त्याचा उत्साह दांडगा होता. त्यामुळं त्याला ‘पॉवर रेंजर’ हे टोपणनाव देखील मिळालं होतं. योग्यरित्या बौद्धिक वाढ न झालेल्या मुलांना सामान्य परिस्थितीशी जुळवून घेण्यात अनेक अडचणी येतात. मात्र, नवाजनं या सर्वांच्या पलिकडे जाऊन आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, क्रिकेटमधील हा उगवता तारा अंधश्रद्धेसारख्या अंधाराचा बळी ठरला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

हे वाचा, अफगाणिस्तानची परिस्थिती जाणून घेण्यासाठी दुसरं काहीही वाचण्याची गरज पडणार नाही

Next Post

मार्लबोरो सिगारेट्सची जाहिरात करणाऱ्या चार ‘मार्लबोरो मॅन’चा लंग कॅन्सरने मृत्यू झालाय

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

मार्लबोरो सिगारेट्सची जाहिरात करणाऱ्या चार 'मार्लबोरो मॅन'चा लंग कॅन्सरने मृत्यू झालाय

२००० वर्षे वय असलेल्या 'महावतार बाबाजी'चा सुपरस्टार रजनीकांतसुद्धा भक्त आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.