The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रिटनने जर्मनीच्या हवाई ह*ल्ल्यातून वाचण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली होती

by Heramb
15 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धाचा काळ हा यु*द्धात गुंतलेल्या जवळजवळ सर्वच देशांसाठी अतिशय विनाशकारी काळ होता. विशेषतः ब्रिटन साठी. ब्रटिशांनी अनेक ना*झी ह*ल्ल्यांचा सामना केला होता. ब्रिटन संपूर्णतः उ*द्ध्वस्त होऊन त्याचा कायमचाच पाडाव होईल याची मोठी शक्यता होती. पण साहस आणि धोरणांची योग्य अंमलबजावणी यांचे पालन करणाऱ्या अनेक सैन्याधिकाऱ्यांनी ब्रिटनच्या सुरक्षेची व्यवस्था करून विजय खेचून आणला. अशीच एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक योजना म्हणजे स्टारफिश साइट्सची निर्मिती..

स्टारफिश साईट्स म्हणजे ब्रिटनने तयार केलेली खोटी शहरे. ‘स्टारफिश साईट्स’ या जर्मन हवाई दलाची दिशाभूल करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. अनेक मोठ्या शहरांच्या रक्षणार्थ आणि तीन हजार लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सुमारे सातशेहून अधिक जर्मन हवाई ह*ल्ल्यांची दिशाभूल करणाऱ्या या ‘भन्नाट’ स्टारफिश साईट्सच्या योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा प्रपंच..

जर्मनी आणि ब्रिटनमधील यु*द्ध अत्यंत रक्त*रंजित होते. ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्स बरोबरच्या हवाई यु*द्धामध्ये हि*टल*रचा प्रचंड पराभव झाला होता. लुफ्तवाफने (ना*झी हवाईदल) आता फक्त ‘एरियल लायटनिंग ॲ*टॅक्स’वर लक्ष केंद्रित केले होते. या ह*ल्ल्यांद्वारे लुफ्तवाफे मोठ्या शहरांवर एअरस्ट्राईक्स करून ब्रिटनला नामोहरम करण्याचा प्रयत्न करणार होते. १९४०च्या सप्टेंबरपासून, सलग ५६ दिवस असे हवाई ह*ल्ले होत राहिले आणि ब्रिटनची अनेक प्रमुख शहरे नष्ट झाली.

ब्रिटनमधील प्रमुख शहरांवर सतत बॉ*म्बिंग होत असतानाच हिट*लरने रशियाविरुद्ध यु*द्ध घोषित केले होते, हे ऑपरेशन पूर्वीसारखे विनाशकारी नव्हते. लुफ्तवाफने देखील दिवसा होत असलेले हवाई ह*ल्ले थांबवून रात्री ह*ल्ले करण्यास सुरुवात केली. या युक्तीमुळे लढाऊ विमानांचे अस्तित्व हवाई क्षेत्रात आहे हे देखील ब्रिटनला कळणार नाही असं ना*झींना वाटत होतं. परंतु, ब्रिटनमधील काही बुद्धिवानांच्या मते, ही एक सुवर्णसंधी होती.



ब्रिटनवर ह*ल्ले चालूच होते आणि त्यात प्रचंड नुकसान झाले असले तरी तेथील लोकांचे मनोधैर्य मात्र अबाधित होते. जीवितहानी कमी करण्याच्या दृष्टीने सैन्याने काही युक्त्या सुचवल्या. ब्रिटिश रॉयल एअर फोर्स जर्मन सैन्याविरुद्ध प्रतिह*ल्ला करण्याची योजना आखत असताना, कर्नल जॉन टर्नरने लुफ्तवाफेच्या ह*ल्लेखोरांना प्रमुख शहरांपासून दूर ठेवण्यासाठी ‘डिकोय सिटी’ची कल्पना सुचवली.

कर्नल जॉन टर्नर हा हवाई मंत्रालयाचा निवृत्त अधिकारी होता, शिवाय तो एक उत्तम अभियंताही होता. हवाई दलाच्या आणि एअरफील्ड इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रचंड ज्ञानामुळे त्याला या योजनेचे नेतृत्वपद सोपवण्यात आले. आपल्या कौशल्याचा उपयोग करून, त्याने लुफ्तवाफेची दिशाभूल करण्यासाठी चित्रपट स्टुडिओमधील काही सेट डिझायनर्ससह काम केले. त्यांच्या मदतीने आणि आपल्या दांडग्या हवाई अनुभवाचा तसेच कौशल्याचा वापर करून त्याने ‘स्टारफिश साईट्स’ तयार केल्या.

या स्टारफिश साईट्स नेमक्या कशा प्रकारे काम करतात हे समजावून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जर्मन हवाई आक्र*मण कसे होत होते हे समजून घेणे आवश्यक आहे. लुफ्तवाफेचे लढाऊ विमान शहरांवर दोन विविध लाटांमध्ये ह*ल्ला करीत असत. विमानाच्या लाटांचा पहिला संच शहराच्या एका छोट्या भागावर ह*ल्ला करीत असे. हा ह*ल्ला मागून येणाऱ्या मुख्य, दुसऱ्या विमानांच्या लाटेसाठी मार्गदर्शक ठरत. मागून येणारी विमानांची लाट पहिल्या लाटेमुळे लागलेली आग पाहून आजूबाजूच्या भागावर जोरदार बॉ*म्बफेक  करत असत. यामुळे जर्मनांनी ठरवलेली लक्ष्येच भेदली गेली नाहीत तर ब्रिटनच्या इन्फ्रास्ट्रक्चरचेही मोठे नुकसान झाले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

कर्नल जॉन टर्नरने नेमकं यावरच लक्ष केंद्रित केलं आणि आपली योजना आखली. त्याच्या योजनेनुसार, विमानांच्या पहिल्या लाटेद्वारे होणारा ह*ल्ला ब्रिटनने सहन करायला हवा, परंतु, जीवित हानी आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे नुकसान टाळण्याच्या हेतूने विमानांच्या दुसऱ्या लाटेचा ह*ल्ला ‘डायव्हर्ट’ करायला पाहिजे. त्यासाठी बॉ*म्बरच्या पहिल्या लाटेने शहरावर ह*ल्ला केल्यानंतर, आग त्वरीत विझवण्यात आली आणि लोकवस्तीपासून दूर अंतरावर असलेल्या फेक सिटीजना आग लावण्याचा सिग्नल देण्यात आला.

यामुळे लढाऊ विमानांची दुसरी लाट आल्यावर ते या बनावट शहरांना लागलेली नवीन आग पाहतील आणि प्रमुख शहरांवर नाही तर फेक सिटीजवरही ह*ल्ला करतील याची खात्री झाली. त्यांनी ह*ल्ला केला तरी, ही बनावट शहरे प्रमुख शहरांपासून मैलो-मैल दूर असल्याने, हे बॉम्बर्स त्या बनावट शहरांच्या आसपास असलेल्या बनावट पायाभूत सोयीसुविधांवरच ह*ल्ला करतील. यामुळे मानवी वस्ती नसलेल्या ठिकाणांवर ह*ल्ला होईल हे निश्चित झाले.

पहिल्या विमानांच्या वेव्हचा हवाई ह*ल्ला झाल्यानंतर उंच पृष्ठभागांवरील टाक्यांमधून बनावट शहरांवर मोठ्या प्रमाणात पॅराफिन आणि डिझेल टाकण्यास सुरुवात होत असे. हे इंधन जळत्या कोळश्यावर जाऊन प्रचंड आग भडकत असत आणि ह*ल्ल्यानन्तर, भडकलेल्या उग्र आगीवर पाणी टाकण्यात येत असे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे स्तंभ तयार होत असत. यामुळे मागून येणाऱ्या बॉम्बर्स विमानांना हवाई ह*ल्ल्याची “अचूक” जागा कळत असे आणि अशा प्रकारे ही योजना लुफ्तवाफेला मूर्ख बनवण्यासाठी पुरेशी होती.

रात्रीच्या वेळी होणार्‍या ह*ल्ल्यांमुळे अंधाराच्या साहाय्याने ब्रिटन ही बनावट शहरे वसवू शकला. हजारो जीव आणि लाखो पाउंड्सच्या पायाभूत सुविधा वाचण्याचे श्रेय कर्नल जॉन टर्नर आणि स्टारफिश साइट्सवर काम करणाऱ्या प्रत्येकाला दिले पाहिजे. आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि मनाच्या खंबीरतेवर ब्रिटिशांनी आक्र*मकांच्या जवळ जवळ अजिंक्य हवाई शक्तीपासून स्वतःचे रक्षण केले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

व्हायरल फोटोत जोकोविचच्या घरात दिसणाऱ्या कृष्णाच्या पेंटिंगचं सत्य काय आहे..?

Next Post

डेटालॉव्ह खिंडीत झालेल्या ९ गिर्यारोहकांच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ अजूनही उलगडले नाही

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

डेटालॉव्ह खिंडीत झालेल्या ९ गिर्यारोहकांच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ अजूनही उलगडले नाही

मौलवींच्या फतव्यांना झुगारून सानिया मिर्झाने आपला खेळ निर्भीडपणे चालूच ठेवला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.