The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीलंकेच्या वर्ल्डकप विनिंग टीमचा हिस्सा असलेला सुरज सध्या ऑस्ट्रेलियात बस चालवतोय

by द पोस्टमन टीम
24 May 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


क्रिकेट म्हणजे भरपूर पैसा मिळवून देणारे क्षेत्र. आजच्या अनेक आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंची कमाई कोट्यवधीच्या घरात आहे, हे तर आपल्याला माहिती आहेच. पण आपला चरितार्थ चालवण्यासाठी कधी कोणत्या क्रिकेटरला क्रिकेट सोडून वेगळे काही तरी काम करताना पहिले आहे काय? क्रिकेटरना वेगळे काही तरी काम करण्याची गरजच काय पण? त्यांच्या व्यवसायातून त्यांना रग्गड पैसा मिळतो अशीच आपली समजूत असते. हो ना? पण श्रीलंका आणि झिम्बाव्वेतील या तीन खेळाडूंना आपल्या चरितार्थासाठी क्रिकेट सोडून बस ड्रायव्हिंगचे काम करावे लागत आहे. ते ही स्वतःचा देश सोडून ऑस्ट्रेलियामध्ये. कोण आहेत हे तीन खेळाडू आणि ते क्रिकेट सोडून बस ड्रायव्हिंगचे काम का करत आहेत? जाणून घेऊया या लेखातून.

श्रीलंका संघामधील आघाडीचा स्पिनर सुरज रणदिवचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. आज सुरज रणदिव कुठे आहे? काय करतो? माहित आहे का? आयसीसीच्या २०११च्या वर्ल्डकपमध्येही सुरज श्रीलंका संघाकडून खेळला होता. आज तो आपला चरितार्थ चालवण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करतोय.

फक्त सुरजच नाही तर श्रीलंकेचा क्रिकेटर चिंतका नमस्ते आणि झिम्बाब्वेचा क्रिकेटर वॅडिंग्टन म्वाएंगा हे देखील सध्या ऑस्ट्रेलियामधेच राहत असून त्यांनीही हेच बस ड्रायव्हिंगचे काम स्वीकारले आहे. फ्रांसमधील ट्रान्सडेव नावाच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बसवर हे तिघेही ड्रायव्हिंगचे काम करतात.

तिघेही ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट क्लब्जच्या वतीने खेळतात मात्र त्यांचा उदरनिर्वाह या बस ड्रायव्हिंगच्या जोरावरच चालतो.

ट्रान्सडेव या ट्रान्सपोर्ट कंपनीने वेगवेगळ्या क्षेत्रातील १२०० लोकांना आपल्या कंपनीत सामावून घेतले आहे. त्यामध्ये या तिन्ही क्रिकेटर्सचा समावेश आहे. नजीकच्या भविष्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडेही त्यांच्या स्वतःच्या क्रिकेट टीम असतील असा त्यांचा अंदाज आहे. ट्रान्सडेवही भविष्यात स्वतःची क्रिकेट टीम तयार करू शकते.



श्रीलंकन टीमकडून सुरज रणदिवने एकूण १२ कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यात सरासरी ३.०७ याप्रमाणे त्याने एकूण ४३ विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय, सरासरी ९.२ याप्रमाणे त्याने १४७ धावा केल्या आहेत. सुरज एक चांगला स्पिन बॉलर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने एकूण ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने सरासरी ५.०६ प्रमाणे ३६ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ७ टी-ट्वेंटी खेळले असून त्यातही ७ विकेट घेतल्या आहेत.

रणदिव सध्या ऑस्ट्रेलियाच्या जिल्हा स्तरावरील क्रिकेटमध्येही खेळतो आहे. व्हिक्टोरिया प्रीमिअर क्रिकेटशी संलग्न असणाऱ्या डँडॉंग क्रिकेट क्लबसाठीही तो खेळला आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टेट कॉम्पिटिशनसाठीही तो खेळत असतो. रणदिव आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने खेळला होता. 

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

सुरजने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत नेट प्रॅक्टिस बॉलर म्हणूनही काही दिवस काम केलं आहे. यापुढेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला प्रॅक्टिस बॉलर म्हणून काम करण्याचं आमंत्रण दिलं आहे, यावर तो म्हणतो, “मला ऑस्ट्रेलियन संघासोबत खेळण्याची संधी मिळत आहे आणि ही संधी मला अजिबात दवडायची नाही.”

क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी सुरजने खूप लहानपणापासून मेहनत घेतली होती. पंधरा वर्षे आणि एकोणीस वर्षाच्या गटांतही तो खेळला होता. २००३-०४ मध्ये तेवीस वर्षाखालील सामन्यात त्याने भाग घेतला होता आणि या सामन्यात त्याने एकूण २३ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या दमदार खेळामुळेच त्याला श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले.

२०१० साली भारताविरुद्ध सामना खेळत असताना त्याने एक चुकीचा बॉल टाकून प्रसार माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळवून घेतले होते. १६ ऑगस्ट २०१० रोजी भारताविरुद्धच्या त्या सामन्यात वीरेंद्र सेहवागला सुरज बॉलिंग करत होता. भारताला विजयासाठी  एका बॉलमध्ये एक धाव हवी होती आणि बॅटिंग करत असलेल्या सेहवागला शतक पूर्ण करण्यासाठीही एका धावेची गरज होती. तर यावेळी सुरजने जाणीवपूर्वक नो बॉल टाकून सेहवागचं शतक रोखलं होतं. यावरून बराच गदारोळ झाला. आणि त्यासाठीच त्याच्यावर काही सामन्यांसाठी बंदी देखील घातली होती.

बस चालवणारा दुसरा क्रिकेटर चिंताकाने श्रीलंकेच्या वतीने ५ टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. पाच सामन्यात त्याने ४९ धावा केल्या आहेत. आणि वॅडींग्टन हा तर झिम्बाब्वे संघाचा फास्ट बॉलर होता. त्यानेदेखील २००५ आणि २००६च्या दरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळले होते.

तिघांनीही क्रिकेटसोडून सध्या बस ड्रायव्हिंगचा व्यवसाय निवडला आहे. पण, तिघेही पुन्हा एकदा क्रिकेटमधे परततील अशी त्यांच्या चाहत्यांना (जर असतील तर) आशा असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

एकेकाळी लहानग्यांचे भावविश्व रंगवणारे टार्गेट मासिक आता फक्त आठवणीत उरले आहे!

Next Post

मॅरेथॉनची सुरुवात होण्यामागे हा इतिहास आहे

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

मॅरेथॉनची सुरुवात होण्यामागे हा इतिहास आहे

ही आहे जगातील सगळ्यात महागड्या चहांची यादी, यातला तुम्ही कुठला प्यायला आहे का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.