The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिन्यांनी ‘स्पॅनिश फ्लू’वर औषध म्हणून सापाचं तेल आणलं होतं ज्याने हजारो लोकांचा बळी गेला

by द पोस्टमन टीम
31 December 2025
in आरोग्य, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


कोरोना. सगळ्या जगाला अनिश्चित काळासाठी थांबवणाऱ्या कोरोना या विषाणूने सगळ्यांनाच आपल्या जीवनपद्धतीचा विचार करण्यास भाग पाडले. याच कोरोनावर उपचार शोधण्यासाठी सगळं जग एकत्र आलं. अशा वेळी काही घरगुती उपचार सुचवले जात. परंतु ही पहिली वेळ नाही जेव्हा अशा घरगुती उपचारांच्या बातम्याचं पेव फुटलंय.

कोरोनाप्रमाणेच १९१८ यावर्षी स्पॅनिश फ्लू नावाच्या आजाराने धुमाकुळ घातला होता. यावर उपचार म्हणुन चीनच्या लोकांनी सापाचे तेल वापरण्याची विचित्र शक्कल लढवली होती असं म्हटलं जातं.

१८ व्या शतकाच्या मध्यकाळात चीनचा व्यापार वाढीस लागला. अशा वेळी चीनी व्यापारी इतर मालाबरोबरच एका वेगळ्या तेल उत्पादनाला विकत असत. बाटलीत असणाऱ्या या तेलाची निर्मिती चीनमधील समुद्री सापांच्या तेलातुन केल्याचा चिनी व्यापाऱ्यांचा दावा होता. त्याच्या वेगवेगळ्या गुणधर्माबद्दल ते अगदी मोकळेपणाने सांगत असत.

सापाच्या तेलामध्ये असलेल्या ओमेगा-३ या स्निग्ध आमलांमुळे सापाचे तेल सांधेदुखीसाठी उपयुक्त होते. परंतु लगेच अमेरिकन कंपन्या आपले स्वत:चं तेल उत्पादन करु लागल्या ज्यात सापाचे तेल असण्याचा खोटा दावा करण्यात येत होता.

१९१७ साली अमेरिकन कंपनी ‘क्लार्क स्टैनले स्नेक ऑइल लिनीमेंट’ हिच्यावर छापा टाकला असता त्या तेलात सापाचे तेल नसल्याचा आणि औषधी गुणधर्म नसल्याचं स्पष्ट झालं. तरीही स्पॅनिश फ्लूच्या काळात अनेक कंपन्यांनी फ्लूवर उपचार म्हणुन सापाच्या तेलाची विक्री केली.

याची लाट एवढी पसरली की त्याची जाहिरात आता वर्तमानपत्रातसुध्दा यायला लागली. “फ्लूच्या ह*ल्ल्याच्या वेळी तेलाची बाटली घेऊन तयार रहा” अशा प्रकारच्या जाहिराती ‘मिलर अँटीसेप्टीक ऑइल’ या कंपनीने प्रकाशीत केल्या. त्यामुळे या कंपनीच्या तेलविक्रीमध्ये भरमसाठ वाढ झाली.



तेलाबरोबरच अनेक भयानक घरगुती उपचार त्यावेळी पसरले होते. त्यातीलच एक म्हणजे गरम पाण्यात मीठ घालून हाथ-पायावर लावावे. फ्लूने संक्रमित झालेलं रक्त जोपर्यंत एका जागेवर गोळा होत नाही तोपर्यंत असं करत रहावं. नंतर एका जागी गोळा झालेलं रक्त सिरिंजद्वारे ओढून काढावे असा समज होता. याचा वापर केल्याने फ्लू ठीक न होता रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक मृत्यू झाले.

अशा घातक उपचारांमुळे स्पॅनिश फ्लू कधीच बरा होणार नाही असं वक्तव्य त्यावेळी अमेरिकन तज्ञ ‘रुपर्ट ब्लू’ यानी संगितले होते. परंतु त्यांच्या या निर्देशाकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि मृत्युंमध्ये वाढ होत राहिली.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

स्पॅनिश फ्लूचा प्रभाव आणि भिती एवढी होती की त्याच्या उपायांची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये येत असत. जसं की मोन्टानाचे वर्तमानपत्र ‘ग्रेट फाल्स ट्रिब्युन’ ने एका लाईटचा उपाय सांगितला होता ज्याने फ्लूचे रुग्ण ठीक होतात असा दावा केला गेला होता. आणि याचा उल्लेख जाहिरात म्हणुन नाही तर महत्त्वाच्या संपादकीय पानावर केला गेला होता. अशा वेळी रुग्ण दवाखान्यात जाऊन या लाईटची मागणी डॉक्टरकडे करु लागले.

परंतु बाकी उपायांसारखेच हा उपाय ही खोटा आणि निकामी ठरला. आयोडिन आणि क्वीनीन यांच्या मिश्रणाने फ्लू ठीक होतो असा दावाही करण्यात आला. याबद्दल अमेरिकी दैनिक ‘द अर्डमोराइट’ यामध्ये जाहिरात प्रकाशीत केली होती.

सन १९१८ साली मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात स्पॅनिश फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता. ‘अल्बेर्ट गिशेल’ नावाचा हा रुग्ण अमेरिकन सैन्यात स्वयंपाकघरात काम करत होता. १०४ फैरेनहाइट ताप असताना त्याला कैन्सासच्या दवाखान्यात भरती केले गेले. लवकरच हा ताप सेनेच्या ५४,००० तुकड्यांमध्ये पसरला. मार्चच्या शेवटपर्यंत हजारो सैनिक दवाखान्यात भरती झाले, तर ३८ सैनिकांचा गंभीर न्यूमोनियामुळे मृत्यू झाला.

आजार सैनिकांमध्ये पसरायला सुरुवात झाली ती पहिल्या महायु*द्धाच्या वेळी. खंदकांमध्ये, छावण्यांमध्ये घाणेरड्या परिस्थितीमध्ये राहिल्यामुळे सैनिकांना या आजाराची लागण झाली असं म्हटलं जातं.

त्यानंतरही ४ वर्ष या जागेची साफसफाई न झाल्यामुळे स्पॅनिश फ्लू वाढतच गेला. फ्रांसमध्ये सीमावर्ती भागात असणारया खंदकांमुळे विषाणू सैनिकांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहचला असं समजलं जातं. यु*द्ध संपल्यानंतर सैनिक हा आजार आपल्या घरी घेऊन गेले. येथूनच या फ्लूची लागण सामान्य जनतेला होण्यास सुरुवात झाली.

त्यावेळच्या तज्ञांच्या मते हा आजार ‘पायफर बेसिलस’ या जीवाणूमुळे होत होता, परंतु हा आजार पसरवणारा स्त्रोत जीवाणू नसुन ‘इन्फ्लुएन्झा ए वायरस सब टाइप H1 N1’ नावाच्या विषाणूमुळे होत होता.

जीवाणूजन्य आजार म्हणुन त्यावेळी वैज्ञानिकांनी या आजारावरील उपचारासाठी करोडो रुपयांचा खर्च केला. फुफ्फुसांना होणाऱ्या या आजारामुळे जगात ५० करोडपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले. तसेच जवळ जवळ ५ करोड लोकांचा मृत्यू झाला.

मृत्यूची भिती वाटणे साहजिक मानवी स्वभाव आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी मानव कोणत्याही थराला जाऊ शकतो हे सुद्धा खरं. पण अशा वैश्विक आजारांवर जगातील अनेक तज्ञ लोक काम करत आहेत याचंही भान असावं.

कोरोनासारख्या विषाणूला हरवण्यासाठी सध्यातरी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हाथ सतत धूत राहणे हेच प्रतिबंधात्मक उपाय आहेत.

कोणताही उपचार घेत असताना तो पुर्णपणे डॉक्टरच्या निगराणी खालीच घेतला जावा याची काळजी घ्या. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोरोनालाही हरवता येतं एवढं लक्षात ठेवा. स्वत: सुरक्षित रहा, दुसऱ्यांना सुरक्षित राहु द्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारताची पहिली महिला जवान असलेल्या शांती तीग्गाने गळफास घेतला होता

Next Post

भारत-नेपाळ सीमावाद नेमका काय आहे…?

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
Next Post

भारत-नेपाळ सीमावाद नेमका काय आहे...?

संजय गांधी आजवरचे गांधी परिवाराचे सर्वात वादग्रस्त सदस्य आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.