The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही बाई रण*गाडा घेऊन ना*झींवर चाल करून गेली होती

by द पोस्टमन टीम
3 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘बदला’, ‘बदलापूर’, ‘बदले की आग’सारख्या अनेक चित्रपटांमधून बदल्याची भावना माणसांना काय काय करायला लावते, हे आजवर तुम्ही पाहिलं असेलच. प्रेम, राग, ईर्ष्या, लोभ या भावनांचा अतिरेक झाल्यावर व्हायचा तो विनाश होतोच. मात्र, सर्वच भावना केवळ विध्वंसच करतात असंही नाही.

दुसऱ्या महायु*द्धात एका महिलेनं जे केलं, ते पाहून बदल्याच्या भावनेचा एक नवा पैलू जगासमोर उलगडला. यु*द्धात ना*झी सैन्याकडून पतीची ह*त्या झाल्यानंतर मारिया ओक्त्याब्रस्काया सोव्हिएत सैन्यात दाखल झाली आणि त्यानंतर तिनं जे केलं तो इतिहास ठरला.

मारियाचा पती इलया ओक्त्याब्रस्काया सोव्हिएत सैन्यात अधिकारी होता. दुसऱ्या महायु*द्धादरम्यान ना*झींविरोधात लढताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा बदला घेण्याचं मारियानं ठरवलं. आपली सर्व संपत्ती विकून तिनं ‘टी-३४’ हे टँ*क विकत घेत सैन्याला दान केलं आणि जर्मनीविरुद्ध यु*द्धात उतरण्याचा निश्चय केला.

१९०५ साली युक्रेनमधील एका गरिब शेतकरी कुटुंबात मारियाचा जन्म झाला. ९ भावंडांसह गरिबीत जीवन कंठत असताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. १९२५ साली इलया ओक्त्याब्रस्कायाशी तिचा विवाह झाला. इलयाशी विवाह झाल्यानंतर सैन्याविषयी तिच्या मनात आकर्षण निर्माण झालं. लष्करातर्फे आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ती हिरीरीनं सहभाग घेऊ लागली. या दरम्यान तिनं लष्करी पारिचारिकेचं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्करी गाड्या, शस्त्रात्र चालवण्यातही तिनं अल्पावधीतच प्राविण्य मिळवलं.

दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरवातीला मारिया सर्बियामध्ये स्थलांतरीत झाली. १९४१ साली सोव्हिएत सैन्याकडून पूर्व आघाडीवर लढत असताना तिच्या पतीचा यु*द्धात मृत्यू झाला. पतीच्या निधनाची बातमी मारियाला तब्बल २ वर्षांनंतर मिळाली. आपल्या दु:खाला आवरत पतीच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निश्चय तिनं केला.



त्यासाठी तिनं सोव्हिएत सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. मात्र, वाढतं वय आणि टीबीच्या आजारामुळे तिला सैन्यात प्रवेश नाकारण्यात आला. मारियाच्या जिद्दीपुढे सोव्हिएत सैन्याचा नकार फार काळ टिकला नाही. सैन्यात दाखल होऊ शकत नसल्याचं कळताच मारियानं एक साहसी पर्याय निवडला. तिनं तिच्या नावावरची सर्व संपत्ती विकली आणि त्यातून आलेले पैसे टी-३४ टँ*कच्या निर्मितीसाठी दान केले. त्यानंतर तिनं सोव्हिएत संघाचा नेता जोसेफ स्टॅलिनला एक टेलिग्राम पाठवला. त्यात तिनं यु*द्धात हा टी-३४ टँ*क चालवू देण्याची विनंती स्टॅलिनकडे केली.

‘मातृभूमीची सेवा करताना माझे पती शहीद झाले. त्यांच्या मृत्यूचा बदला मला ना*झींकडून घ्यायचा आहे. टँ*कच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय बँकेत मी ५० हजार रबल्स जमा केले आहेत. या टँ*कचं नाव फायटिंग गर्लफ्रेंड ठेवावं, अशी माझी विनंती आहे. यु*द्धात हा टँ*क चालवण्याची माझी इच्छा आहे’ अशा आशयाचं पत्र मारियानं स्टॅलिनला लिहिलं. ही विनंती स्टॅलिननं मान्य केली आणि अशाप्रकारे पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मारिया दुसऱ्या महायु*द्धात उतरली. मारियाच्या विनंतीप्रमाणे या टँ*कचं नाव फायटिंग गर्लफ्रेंड असं ठेवण्यात आलं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

शत्रुशी थेट सामना होण्यापूर्वी सोव्हिएत सैन्याकडून तिनं टँ*क चालवण्यासाठीचं ६ महिन्यांचं खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलं.

सैन्यातील इतर टँ*क चालकांना हा तिचा पब्लिसिटी स्टंट वाटला होता. मात्र, या सर्व आलोचकांना पुढं तिनं तिच्या शौर्यानं प्रत्युत्तर दिलं. यु*द्धात तिच्या टँ*कनं शत्रू सैन्याचे मशिन गन्स आणि तोफखाने उद्ध*वस्त केले. तिच्या या शौर्यानं प्रभावित होऊन ‘सार्जेंट’ या पदावर तिला  बढती मिळाली.

घमासान यु*द्धादरम्यान तिच्या टँ*कवर शत्रू सैन्यानं हल्ला चढवला. यात तिच्या टँ*कचे काही भाग निकामी झाले होते. चौफेर होत असलेला ना*झींचा गोळीबार चुकवत ती टँ*क खाली उतरली आणि तिनं तो दुरुस्त केला. त्यानंतर शत्रूवर तुटून पडून तिच्या टँ*कनं अनेक ना*झींना यमसदनी धाडलं.

या घटनेनंतर बहिणीला पाठवलेल्या पत्रात ना*झींवरचा राग मारियानं व्यक्त केला. ‘मी शत्रुचा पराभव केला. यु*द्धात शत्रुला पाहिल्यावर मला कधीकधी इतका राग येतो की मी नीट श्वास देखील घेऊ शकत नाही’ असं तिनं या पत्रात लिहिलं. या घटनेनंतर अनेक दिवस तिनं शत्रू सैन्याशी दोन हात केले.

एका रात्री यु*द्धादरम्यान तिच्या टँ*कवर शत्रू सैन्यानं पुन्हा ह*ल्ला चढवला. या हल्ल्यात तिचा टँ*क निकामी झाला. त्याच्या दुरुस्तीसाठी मारिया टँ*कच्या खाली उतरली. इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली, मात्र यावेळी मारिया दुर्देवी ठरली. टँ*क दुरुस्त करताना शत्रुच्या ह*ल्ल्यात तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ती कोमात गेली. घटनेच्या २ महिन्यानंतर १५ मार्च १९४४ साली तिचा कोमात असतानाच मृत्यू झाला.

यु*द्धातील शौर्यासाठी सोव्हियत युनियनचा ‘हिरो ऑफ द सोव्हियत युनियन’ हा पुरस्कार तिला मरणोत्तर प्रदान करण्यात आला. या ह*ल्ल्यात उद्ध*वस्त झालेला फायटिंग ‘गर्लफ्रेंड टँ*क’ पुढे नव्या रुपात त्याच नावानं पुन्हा बनवण्यात आला. मारियाचं शौर्य आठवणीत जिवंत ठेवण्यासाठी हा टँ*क पुढे रशियन सैन्यानं जतन केला.

१९३९ ते १९४५ दरम्यान दुसरं महायु*द्ध झालं. जर्मनीनं पोलंडवर केलेल्या ह*ल्ल्यानंतर हे यु*द्ध १ सप्टेंबर १९३९ साली अधिकृतरित्या सुरु झालं. ब्रिटन, फ्रांस, अमेरिका, रशिया या मित्र राष्ट्रांनी जर्मनीविरुद्ध यु*द्ध पुकारलं. जर्मनीच्या बाजूनं जपान आणि इटली हे देश लढले. सुरूवातीला अमेरिका या महायु*द्धापासून दूर होता. मात्र, अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’ या बेटावर जपानने केलेल्या हल्ल्यानंतर सर्व ताकदीनिशी अमेरिका या महायु*द्धात उतरला. या महायु*द्धात जवळजवळ ६ कोटींवर माणसं मा*रली गेली.

इतिहासात डोकावलं तर मुठभर लोकांच्या महत्वाकांक्षेपोटी अगणित लोक जीवाला मुकल्याचं भीषण वास्तव आपल्या समोर येतं. आपल्या देशाच्या प्रेमापोटी अनेकांनी आपला जीव अक्षरश: ओवाळून टाकला. मारियानंही आपल्या पतीवर जीवापाड प्रेम केलं. त्याच्या प्रेमाखातर यु*द्धात दाखवलेला तिच्या शौर्यामुळं ती खऱ्या अर्थानं ‘फायटिंग गर्लफ्रेंड’ ठरली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कॅथलिक चर्चने इंटरनेटचं रक्षण करण्यासाठी इसवीसन ५६० मध्ये जन्मलेल्या एका संतांची नेमणूक केलीये

Next Post

ज्या प्राचीन ‘सिल्क रूट’चं पुनरुज्जीवन करायचा चीन प्रयत्न करतोय, तो नेमका काय आहे..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

ज्या प्राचीन 'सिल्क रूट'चं पुनरुज्जीवन करायचा चीन प्रयत्न करतोय, तो नेमका काय आहे..?

चिनी प्रवासी ह्वेन त्सांगने भारतातील बौद्ध धर्माच्या ऱ्हासाच्या महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.