The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘पॉस्को’मुळे आज कोरियाच्या स्टीलची जगभरात दादागिरी आहे..!

by द पोस्टमन टीम
14 April 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


ही गोष्ट आहे कोरियात औद्योगिकीकरणाचा पाया रचणाऱ्या पार्क चुंग याची. आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टील पुरवठादार कंपनी म्हणजे पॉस्को. या कंपनीची सुरुवात कुठून झाली, आणि पार्कचे कोणते धोरण पॉस्कोच्या चढत्या आलेखाला पूरक ठरली त्याची ही गोष्ट.

कोरियाला एक औद्योगिक देश म्हणून नावारूपास आणणे हेच पार्क यांचे ध्येय होते. त्यासाठी ते पुरेसे सक्षम होते. अमेरिकेच्या मदतीची वाट न पाहता पार्क यांनी कोरियात स्टील इंडस्ट्रीची पायाभरणी केली. या अवघड कामात ती जून यांनी मदतनीस म्हणून काम केले.

पार्क कोरियन सैन्यात नोकरीला होते. त्यानंतर १९५० साली त्यांनी अमेरिकेत मॅनेजमेंट ट्रेनिंगचे धडे गिरवले आणि पुन्हा कोरियात परतले ते एका नव्या दृष्टिकोनासह! तेव्हा त्यांनी तर्कसंगत कार्यक्षमतेवर जास्त भर दिला.

पार्क यांनी राष्ट्र उभारणीसाठी संघटना स्थापन केली. त्यांच्या या संघटनेत अनेक महान व्यक्तींचा समावेश होता. याशिवाय पार्ट्यांची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले होते. त्यासाठी कितीही कष्ट करण्याची त्यांची तयारी होती. महत्त्वाचे म्हणजे इतर उद्योजकांप्रमाणे फक्त ओझ्याचे बैल बनवणे किंवा होईल तेवढे स्वस्तात काम करणे हा त्यांचा स्वभाव मुळीच नव्हता. कारण पार्क हे स्वतः एक परफेक्शनिस्ट होते.



साहजिकच सुरुवातीला त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी वर्ल्ड बँक आणि अमेरिकेच्या एक्झिम बँक यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केले.

ते स्वतः जपानमध्ये वाढले होते त्यामुळे त्यांनी जपानमधील आपल्या वैयक्तिक संबंधांचा वापर केला. त्यांनी जपान यांनाही पटवून दिले की कोरियाच्या बांधणीसाठी मदत केली तर तुम्हाला १९१० ते १९४५ या काळात तुमचा गेलेल्या सन्मान पुन्हा परत मिळवण्याची सुवर्णसंधी सापडेल. पारखी यांची नियुक्ती कामात आली आणि त्यांना हवे असणारे कर्ज १९६९ साली मिळाले देखील.

पोहांग हे कोरियातील छोटंसं खेडं होतं. पारकर यांच्या प्रयत्नांनी अल्पावधीतच तिथे, Pohang Iron and Steel Company (पॉस्को)ची स्थापना झाली. बघता बघता पोहांग या छोट्याशा खेड्याचे रूपांतर जगातील एकमेव मोठ्या स्टील उत्पादन कंपनीत झालं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१९९०च्या मध्यापर्यंत पॉस्कोने आपला दुसरा मोठा प्लांट सुरू केला आणि जपानच्या निप्पॉन स्टीलनंतर पॉस्को जगातील सर्वांत मोठी स्टील उत्पादक ठरली. सध्या चीन आणि भारतातील अनेक कंपन्यांनी पॉस्कोचे शेअर्स विकत घेतले आहेत आणि पॉस्को सध्या जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरियाची जी प्रगती झाली त्याबद्दल कुणीही कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. कोरियासाठी स्टील नेहमीच महत्त्वाचे होते. १९५० ते १९५३च्या कोरियन यु*द्धामुळे स्टील उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले. १९५३च्या दरम्यान कोरियाने स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न केला पण तिथल्या नोकरशहांची इच्छाशक्ती फारच तोकडी होती. त्यांनी तर नेहमीच्या पायाभूत गरजांकडेही लक्ष दिले नाही.

पार्क यांनी १९६१ साली लष्करी सत्ता प्रस्थापित केली. पार्क सत्तेत आल्यानंतर त्यांनी कोरियासाठी पंचवार्षिक योजना आखली.

या योजनेत एका मोठ्या स्टील कंपनीचा आराखडा मांडला होता. त्या कंपनीचे वार्षिक उत्पादन तब्बल तीन लाख टन एवढे असणार होते. पण त्या वेळी जागतिक बँक आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांना हा प्लॅन अति महत्त्वाकांक्षी वाटला होता. त्यात कोरियन लोक नवीन तंत्रज्ञानात पारंगत नाहीत आणि कोरियातील स्टीलची मागणी या प्रोजेक्टला पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे ही मोठी योजना रद्द केली गेली आणि त्या जागी छोटे स्टील प्रोजेक्ट आणि भट्ट्या सुरू करण्यात आल्या.

ही पंचवार्षिक योजना संपल्यानंतर पार्क यांनी पुन्हा एक मोठी कंपनी सुरू करण्याचा निश्चय केला. या वेळी वार्षिक सहा लाख टन उत्पादन देणारी योजना होती. १९६७ साली कोरियन सरकारने वेस्टर्न स्टील मेकर कंपन्यांशी करार केला आणि कोरिया इंटरनॅशनल स्टील असोसिएट जन्माला आली. त्यानंतर त्यांनी पॉस्कोसोबत करार केला. मात्र ही कंपनी ठरवलेली वार्षिक उलाढाल प्राप्त करू शकली नाही, त्यामुळे ती कंपनी बरखास्त करावी लागली. पण, पार्क एवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी इतर देशांतून कर्ज उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

कोरियाच्या उभारणीसाठी जपानने पुढाकार घेतला. त्याच वर्षी जपान या प्रोजेक्टसाठी ७५ टक्के रकमेचे कर्ज देण्यास तयार झाला. जपानच्या मत्स्यूबीसी इंडस्ट्रीजने आराखडा तयार करण्यात मदत केली. आणि त्यासाठी तंत्रज्ञान निप्पॉन ने पुरवले.

१९७० सालात या कंपनीच्या उभारणीला सुरुवात झाली आणि अपेक्षित वेळेच्या आठ महिने आधीच ही कंपनी उभी राहिलीसुद्धा.

या दरम्यान कोरियन नागरिक जपानमधे ट्रेनिंगसाठी जात होते. १९७९ पर्यंत कंपनी पूर्ण क्षमतेने उत्पादन घेऊ लागली. त्यावेळी क्रूड स्टीलचे वार्षिक उत्पन्न ८५ लाख टनाच्या घरात जाऊन पोहोचले. पार्क टी जून यांनी जवळपास पंचवीस वर्षे कंपनी स्वतः चालवली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. किम यंग सेम यांच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी नामांकन झाले. या गोष्टीला पार्क यांनी विरोध दर्शवला. कीम विजयी झाले.

पार्क जपानला निघून गेले. त्यानंतर पार्कवर फंड जमविण्याचे आरोप केले गेले. त्यात किती तथ्य होते ते माहीत नाही, पण निवडणूक करणाऱ्याला कोरियात हमखास आरोपांची भेट दिली जाते.

यानंतर पार्क १९९७ साली राजकारणात परतले आणि कोरियाचे पंतप्रधान बनले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मायक्रोसॉफ्टला उभं करण्यात बिल गेट्सपेक्षा या माणसाचं योगदान जास्त होतं !

Next Post

पुस्तकं चोरीला जायला नको म्हणून साखळदंडाने बांधून ठेवायला लागायचं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पुस्तकं चोरीला जायला नको म्हणून साखळदंडाने बांधून ठेवायला लागायचं

'ट्राफिक जॅम'मुळे लंडनमध्ये १८६३ सालीच भूमिगत मेट्रो सुरु झाली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.