The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही आहे जगातील सर्वांत कठीण परीक्षा

by द पोस्टमन टीम
30 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


परीक्षा म्हटले की अनेकांना अक्षरशः घाम फुटतो. शालेय जीवनातील परीक्षेचा मौसम म्हणजे तर अतिशय तणावाचा काळ. त्यानंतरही करिअरसाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. मेडिकल आणि इंजिनियरिंगसाठी असलेली प्रवेश परीक्षा देशातील सर्वांत मोठी परीक्षा मानली जाते.

त्यासोबतच आयएएस, आयपीएससाठी घेतली जाणारी युपीएससीसारखी नागरी सेवा परीक्षाही कठीण असते. दरवर्षी लाखो परीक्षार्थी या परीक्षेला बसतात. पण, खूप कमी परीक्षार्थ्यांना यात यश मिळते.

परंतु तुम्हाला माहिती आहे का जगात एक अशीही परीक्षा आहे, ज्यात गेल्या ५० वर्षात फक्त २७४ लोकं पास झाली आहेत? हो! ही जगातील सर्वात अवघड परीक्षा समजली जाते. ज्यात फक्त हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या व्यक्तींनाच आजवर यश मिळाले आहे. कधीकधी तर या परीक्षेला बसणारा एकही परीक्षार्थी पास होत नाही.

जगातील या सगळ्यात अवघड परीक्षेचे नाव आहे मास्टर सोमिलीअर डिप्लोमा एक्झाम.



या परीक्षेचा एखादा राउंड पूर्ण करतानाही अनेक जण घायकुतीला येतात. काय अभ्यासक्रम असतो या परीक्षेचा आणि कशावर आधारित असते ही परीक्षा? या परीक्षेचा अभ्यासकर्म ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

या परीक्षेच्या अभ्यासक्रमात दारू, दारूचे विविध प्रकार आणि दारूसोबत खायचे पदार्थ यांचा अभ्यास करावा लागतो. या परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात परीक्षार्थीला फक्त दारूचा वास घेऊन ती कुठे तयार झाली आणि किती वर्षापूर्वी तयार झाली याची माहिती द्यावी लागते.

आता तुम्हाला कळले असेलच यात पास होणाऱ्यांची संख्या कमी का आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

शौकीन मद्यपींनी १९७७ साली एक संस्था स्थापन केली. याच संस्थेद्वारे ही परीक्षा घेतली जाते. यामागे एकच उद्देश होता की, पिताना योग्य त्या पेयाचे मिश्रण करून ते सर्व्ह करण्याऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. मद्याचे असे मिश्रण तयार करता आले पाहिजे, जेणे करून त्याचा आनंद आणखी द्विगुणीत व्हावा.

शिवाय, दारूसोबत खाण्यासाठी कोणते पदार्थ चांगले ठरतील याचाही अभ्यास झाला पाहिजे. यातील जाणकार व्यक्ती मद्यपींना यानुसार सल्ले देतील. १९६९ साली पहिली मास्टर सोमेलिअर परीक्षा घेण्यात आली होती.

नंतर मात्र ही परीक्षा घेण्यासाठी एक संस्थाच स्थापन करण्यात आली. याच संस्थेच्या वतीने ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला थोडे आखीव-रेखीव रूपही देण्यात आले.

या वाईन प्रोफेशनल लोकांना सोमेलीअर म्हटले जाते. अनेक मोठमोठ्या हॉटेलमध्ये जसे स्टार शेफ असतात, तसेच हे सोमेलीअर असतात.

ते आलेल्या ग्राहकांना उत्तम मद्य सर्व्ह करतात. कोणत्या माद्यासोबत कोणते पेय घ्यावे, कोणत्या दोन मद्यांचे मिश्रण अधिक टेस्टी लागेल आणि मद्य पिण्याची मजा वाढेल हे त्यांना माहित असते.

यानुसारच ते लोकांना सल्ला देतात. शिवाय, कोणत्या मद्यासोबत कोणता पदार्थ खाणे चांगले ठरेल हे देखील सांगितले जाते. यासाठी खास अशा सोमेलिअरची नेमणूक केलेली असते.

या सोमेलीअरना वाईन प्रोफेशनमधील ट्रेनिंग दिली जाते. खरे तर या परीक्षेचीही एक निश्चित पद्धती आहे. ज्यामुळे ही जगातील सर्वांत कठीण परीक्षा मानली जाते.

या परीक्षेचे चार टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात फक्त विषयाची ओळख करून घ्यायची असते. या टप्प्यात ज्याला रेस्टॉरंट किंवा हॉटेल क्षेत्रातील काही अनुभव आहे अशाच व्यक्तीला ही परिक्षा देता येते. यासाठी दोन दिवस तयारी करवून घेतली जाते.

यात बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. ज्यात दारू बनवण्याची प्रक्रिया, दारू कुठे बनवली जाते, द्राक्षे, सफरचंद, अशा फळांचे प्रकार, दारू आणि त्यासोबत खाण्याच्या पदार्थांची योग्य जोडी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या टप्प्यावर पास होणाऱ्या व्यक्तीला इंट्रोडक्टरी सोमेलिअर म्हटले जाते.

या टप्प्यावर पास झालेली व्यक्ती पुढील टप्प्यासाठी पात्र समजली जाते. या टप्प्यावर पास होणारे पुढील टप्प्यासाठी तयारी करू लागतात. या परीक्षेचेही अनेक भाग असतात. यात एक लेखी परीक्षा असते आणि दुसरी परीक्षा डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली जाते.

यात दारूचा वास घेऊन त्याचा स्वाद, ती कोणत्या फळापासून तयार झाली, कधी तयार झाली, तिचा रंग कसा आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सांगायची असतात, ते ही डोळे बांधून.

या परिक्षेसाठी चार प्रकारची वाईन वापरली जाते. यात जवळपास ६६% परीक्षार्थी पास होतात. या टप्प्यावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टिफाइड सोमेलिअर म्हटले जाते.

यानंतरच्या टप्प्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत ६० प्रश्न विचारण्यात येतात. यानंतर वाईन टेस्ट घेतली जाते. यातही डोळ्यांवर पट्टी बांधून प्रश्न विचारले जातात. यासाठी सहा प्रकारच्या वाईनचा वापर केला जातो.

डोळे बांधलेल्या अवस्थेत या सहा वाईनबद्दल जे काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे द्यायची असतात. यासाठी फक्त २५ मिनिटांचा वेळ दिला जातो. याला ऍडव्हान्स सोमेलिअर म्हटले जाते. युरोपमध्ये ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. या परीक्षेसाठी पाच दिवसांचा कालावधी दिलेला असतो.

या परीक्षेचा शेवटचा टप्पा असतो तो मास्टर सोमेलिअर. या टप्प्यावर तेच लोक पोहोचू शकतात, ज्यांना या क्षेत्रात सुमारे दहा वर्षांचा तरी अनुभव असेल. या परीक्षेसाठी तुम्ही स्वतःहून फॉर्म भरू शकत नाही. यासाठी तुमच्या वरिष्ठांनी तुमच्या नावाची शिफारस करायला हवी.

या परीक्षेत जगभरातील वाईन, कॉकटेल, अशा सर्व प्रकारच्या मद्याची चर्चा केली जाते. इतकेच नाही तर मद्याचे एक तत्त्वज्ञान आहे, त्यावरही प्रश्न विचारले जातात. प्रत्येक टप्प्यानंतर, परिक्षार्थींना थोडा वेळ दिला जातो त्यामुळे ही परिक्षा दीर्घकाळ चालत असते.

एक परीक्षा तीन वर्षांपर्यंत तरी चालते. काही लोक या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वरचेवर परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांचे तर अख्खे आयुष्य ही परिक्षा देण्यातच जाते. गेल्या ५० वर्षात फक्त ९ लोकांनी एकाच प्रयत्नात ही परीक्षा पास केली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

लोकसभेत हिरवे आणि राज्यसभेत लाल गालिचे का अंथरलेले असतात..?

Next Post

यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पहिली “सिक्रेट रेडीओ सर्विस” सुरु केली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पहिली "सिक्रेट रेडीओ सर्विस" सुरु केली होती

इंदिराजींना अटल बिहारी वाजपेयींनी दुर्गेची उपाधी दिली होती का...?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.