The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐश्वर्यासारखी दिसते म्हणून सलमानने लॉन्च केलेल्या स्नेहा उल्लालचं पुढे काय झालं..?

by द पोस्टमन टीम
17 December 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


असं म्हणतात, की जगात एकसारखे दिसणारे सात लोक असतात. कित्येक वेळा सेलिब्रिटींसारखे दिसणारे लोक आपल्याला दिसूनही येतात. विराट कोहली, नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान अशा अनेक लोकांसारख्या दिसणाऱ्या लोकांचे फोटो अधूनमधून व्हायरल होत असतात. सेलिब्रिटीसारखं दिसण्याचा या लोकांना प्रसिद्धीपलीकडे म्हणावा असा फायदा होत नाही. यांपैकी काहीच कार्यक्रमांमध्ये वगैरे नकला करुन या गोष्टीचा फायदा करुन घेताना दिसतात. मध्यतंरी हर्मन बावेजा या अभिनेत्यानेही ऋतिक रोशन प्रमाणे दिसण्याचा फायदा करुन घेत काही सिनेमांमध्ये काम केलं होतं. मात्र, नंतर तो गायबच झाला.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, स्नेहा उल्लाल या अभिनेत्रीनं केलेलं नवं फोटोशूट. या ‘ब्रायडल’ फोटोशूटमध्ये ती पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयप्रमाणे दिसत आहे. होय! पुन्हा एकदा. कारण मागे २००५ साली ती जेव्हा पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती, तेव्हाही लोकांनी तिला ‘ऐश्वर्याची डुप्लिकेट’ असंच म्हणून ओळखलं होतं.

स्नेहा उल्लालनं काही वर्षांपूर्वी एक ब्रायडल फोटोशूट केलं होतं. यामध्ये ती हुबेहूब ऐश्वर्या रॉयप्रमाणे दिसत होती. काही नेटकऱ्यांनी कौतुकानं, तर काहींनी उपहासानं तिला ‘ऐश्वर्याची झेरॉक्स कॉपी’ही म्हटलं. अशीच काहीशी प्रतिक्रिया तिला मागे २००५ साली देखील मिळाली होती, जेव्हा तिचा पहिला चित्रपट ‘लकी : नो टाईम फॉर लव्ह’ प्रदर्शित झाला होता. यामध्ये ती चक्क सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत होती. सलमान आणि ऐश्वर्या रॉयमधील भांडण तर सगळ्यांनाच माहिती आहे. ती केवळ ऐश्वर्यासारखी दिसते म्हणूनच सलमानने तिला लाँच केलं, अशी चर्चाही या चित्रपटावेळी केली जात होती.

ऐश्वर्या रॉयसारखं दिसण्याचा स्नेहाला तेवढा फायदा झाला नाही. मात्र, त्यामुळे तिला पहिला ब्रेक, पुढील काही चित्रपट आणि भरपूर प्रसिद्धी मिळाली हे नक्की!

स्नेहाचा जन्म एका तेलुगू कुटुंबामध्ये झाला. तिचे वडील मूळचे मँगलोरचे होते, तर आई सिंधी होती. तिनं आपलं प्राथमिक शिक्षण ओमानमधील एका शाळेतून पूर्ण केलं. त्यानंतर ती आपल्या आईसोबत मुंबईला शिफ्ट झाली. पुढे हायस्कूल आणि कॉलेज तिने मुंबईमधूनच पूर्ण केलं. कॉलेजनंतर तिला सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केलं.



‘लकी’ नंतर ती सलमान खानचा भाऊ सोहेल खानसोबत ‘आर्यन’ या चित्रपटामध्ये दिसली. ऐश्वर्यासारखी दिसते, यापलीकडे तिच्याकडे विशेष असं काही नव्हतं. तिचा अभिनयही ठीकठाकच होता. सोहेलही म्हणावा असा यशस्वी अभिनेता नाही. त्यामुळे या दोघांचा आर्यन बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. यानंतर तिला समजलं, की आपल्याला अभिनयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे तिनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला.

यानंतर तिनं तिची मातृभाषा तेलुगूकडे आपला मोर्चा वळवला. २००८ साली आलेल्या ‘उल्लासाम्गा उत्साहम्गा’ या चित्रपटातून तिनं टॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यामध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या यशो सागर याचाही हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट तुफान चालला. यानंर तिने ‘नेनू मीकू तेलुसा..?’ या दुसऱ्या तेलुगूपटात काम केलं. हा चित्रपटही बऱ्यापैकी चालला. पुढे मग तिने नागार्जुनाच्या ‘किंग’ चित्रपटात ‘नुव्वू रेड्डी’ या गाण्यात काम केलं. तिनं पुढंही काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

२०१० साली ‘क्लिक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये री-एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला तेही कोणाला समजलं नाही. एकंदरीत हे वर्ष खराब जाईल असं दिसत असतानाच, तिला तेलुगू सुपरस्टार बालासुब्रमण्यमसोबत ‘सिम्हा’ चित्रपट मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.

मध्यंतरी एका मुलाखतीत तिनं स्पष्ट केलं होतं, की ऐश्वर्या रॉयसोबत होणारी तुलना तिला आजिबात रुचत नाही. ऐश्वर्या रॉयची आपण मोठी चाहती आहोत, असंही तिने म्हटलं होतं. तिचं मत आहे, की ऐश्वर्या रॉयची झेरॉक्स किंवा कार्बन कॉपी म्हणून नव्हे, तर आपली स्वतःची अशी एक ओळख असावी. ती म्हणते, “मी ऐश्वर्यासारखी दिसते याबाबत मी काहीच करू शकत नाही. मला बऱ्याच वेळा तिच्यासारखं दिसायचं नसतं. मात्र, माझे लुक्स तर मी बदलू शकत नाही. ऐश्वर्याप्रमाणे दिसते यापेक्षाही माझ्या कामामुळे ओळखलं जाणं मला जास्त आवडेल.” स्नेहा एकदा ऐश्वर्या रॉयला भेटली देखील आहे. ऐश्वर्याने आपल्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्याचं स्नेहानं सांगितलं.

ऐश्वर्यासारखं दिसण्याने तिच्या करिअरला मोठा फायदा झाला नसला, तरी किकस्टार्ट मिळाली हे नक्की! पुढे मग तिने आपल्या कामाच्या जोरावरच टॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे.

विशेष म्हणजे, टॉलिवूडसोबतच स्नेहा ‘गांधी पार्क’ नावाच्या इंग्रजी, ‘देवी’ या कन्नड आणि ‘मोस्ट वेलकम’ या बंगाली चित्रपटातही दिसली आहे. तिचा शेवटचा हिंदी चित्रपट ‘बेजुबान इश्क’ हा २०१५ मध्ये आला होता. 

त्यानंतर २०२० साली आलेल्या ‘एक्सपायरी डेट’ या वेबसीरीजमध्येही स्नेहा दिसली होती. झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरीज रिलीज झाली होती. हळूहळू का होईना, पण ३३ वर्षांच्या स्नेहाची गाडी रुळावर येत आहे. प्रत्येकाला आयुष्यात एकतरी संधी मिळतेच. स्नेहाच्या आयुष्यात ‘लकी’च्या रुपाने ती संधी आली होती. तिनंही या संधीचा फायदा करुन घेतला. अर्थात, यामध्ये तिची मेहनतही होतीच. वेळीच बॉलिवूडमधून ब्रेक घेऊन तेलुगूकडे जाण्याचा निर्णय असो, वा इतर गोष्टींवर घेतलेली मेहनत असो. स्नेहा हळूहळू आपली ओळख निर्माण करत आहे. अन्यथा, बॉलिवूडमध्ये मग मोठ्या सेलिब्रिटिंसारखे दिसणारे कितीतरी आलेत आणि गेलेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जगातलं पहिलं एक्स्पेरिमेंटल व्हिलेज ‘ऑरोविल’ आपल्या स्वागतासाठी तयार आहे

Next Post

…म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून सप्टेंबर महिन्यातील ११ दिवस कमी केले होते

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

...म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून सप्टेंबर महिन्यातील ११ दिवस कमी केले होते

जेव्हा एका भारतीय राजाचं लॉर्ड माउंटबॅटनच्या घरी डिनर टेबलवरच निधन झालं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.