The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियातल्या प्रत्येक पिनकोडमध्ये सर डॉन ब्रॅडमनची आठवण दडली आहे..!

by द पोस्टमन टीम
16 June 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस नवे शिखर गाठत आहे. आयपीएलमुळे तर क्रिकेट वेडाला उधाण आले आहे. क्रिकेट खेळाडूंची लोकप्रियताही वाढत आहे. या काळात क्रिकेटच्या डॉनची आठवण येणे तर साहजिकच आहे. ज्या सचिन तेंडूलकरला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते, त्याचीही प्रेरणा असलेल्या डॉन ब्रॅडमनचा क्रिकेट जगताला विसर पडणे निव्वळ अशक्य आहे.

डॉन म्हणजे क्रिकेटचा महानायक! त्याचा जन्म ऑस्ट्रेलियातील कूटमुंड्रा, न्यू साउथ वेल्स येथे २७ ऑगस्ट १९०८ रोजी झाला. त्याचे पूर्ण नाव होते डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन. कसोटी सामन्यात या खेळाडूने ९९.९४च्या सरासरीने धावा काढल्या. याच्या आसपास पोहोचण्याचाही प्रयत्न कुणा खेळाडूने केलेला नाही. सचिनला कदाचित ही सरासरी गाठणे शक्य होईल असा अनेकांचा अंदाज होता, पण त्यालाही ब्रॅडमनचा हा विक्रम मोडणे शक्य झाले नाही.

डॉन ब्रॅडमनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात ३० नोव्हेंबर १९२८ रोजी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून केली होती. त्याने शेवटचा कसोटी सामना देखील १८ ऑगस्ट १९४८ रोजी इंग्लंड विरुद्धच खेळला होता.

ब्रॅडमनने क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय लहानपणीच घेतला होता. त्यावेळी क्रिकेट आजच्या इतका लोकप्रिय खेळ नव्हता. अशा काळात त्याने क्रिकेटची निवड करणे हेही एक आश्चर्यच. खरे तर त्याने क्रिकेटची निवड केली म्हणण्यापेक्षा क्रिकेटने त्याची निवड केली म्हणणे जास्त समर्पक ठरेल. अगदी लहान वयातच त्याने आपली आवड ओळखली होती. लहानपणी घरासमोरील अंगणातच तो क्रिकेटचा सराव करत असे. सुरुवातीला तर त्याच्यासोबत क्रिकेट खेळण्यासाठी कोणी सवंगडी देखील नव्हता. तरीही तो एकटाच क्रिकेट खेळत असे. गंमत म्हणजे त्याच्याकडे क्रिकेटचा बॉल आणि बॅट देखील नव्हती. तो गोल्फच्या बॉलने आणि स्ट्म्पनेच क्रिकेट खेळत असे. स्ट्म्पने बॉल मारला की तो पाण्याच्या टाकीला थडकून परत येत असे मग ब्रॅडमन तोच बॉल परत तितक्याच वेगाने परतवून लावत असे.

या रोजच्या सरावामुळे नेमक्या वेळेवर बॉल हिट करण्याचे कसब त्याला अवगत झाले, नव्हे यात तो माहीर झाला. प्रत्यक्षात जेव्हा तो मैदानात उतरून बॅटिंग करत असे तेव्हा तर त्याला बॉल टाकणाऱ्या बॉलर्सना चांगलाच घाम फुटत असे. याच कौशल्यामुळे त्याने क्रिकेटमध्ये अनेक अत्युच्च विक्रम स्थापन केले.



बारा वर्षांचा असताना ब्रॅडमन पहिल्यांदा आपल्या शाळेच्या वतीने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट संघात सामील झाला. त्याच्यातील क्रिकेट कौशल्य जगाला दाखवून देण्याची ही पहिली संधी होती. हातात क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात उतरलेल्या ब्रॅडमनने प्रेक्षकांना अक्षरश: आश्चर्यचकित करून सोडले. पहिल्याच डावात त्याने शतक ठोकून विरोधी संघाच्या बॉलर्सना आणि प्रेक्षकांनाही निशब्द करून सोडले.

१६ डिसेंबर १९२७ रोजी त्याने फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात प्रदर्पण केले. या सामन्यातही त्याच्या बॅटिंगने कमाल केली होती. हा सामना दक्षिण ऑस्ट्रेलिया विरोधात होता. ११८ धावांचा डोंगर उभारून त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या उरात चांगलीच धडकी बसवली होती. फर्स्ट क्लास सामन्यात शतक ठोकणारा तो ऑस्ट्रेलियाचा विसावा खेळाडू होता.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

अवघ्या विसाव्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय सामने खेळू लागला. त्याच्या बॅटिंगच्या स्किल्सने निवडकर्त्यांना सुद्धा संमोहित करून सोडले होते. १९३० सालच्या इंग्लंड दौऱ्यातील संघात ब्रॅडमनला स्थान दिले गेले. हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता.

या पहिल्याच सामन्यात त्याने इंग्लंड विरुद्ध द्विशतक ठोकले होते. २३६ धावांची उभारणी करून त्याने इंग्लंड संघासमोर मजबूत आव्हान निर्माण केले होते.

त्याने ५२ कसोटी सामन्यात ९९.९४ च्या सरासरीने ६९९६ धावा केल्या. कसोटी सामन्यात या सरासरीने धावा करण्याचा विक्रम आजवर दुसऱ्या कुठल्याच खेळाडूला जमलेला नाही.

ऑस्ट्रेलियाने आपल्या या महान खेळाडूला अविस्मरणीय बनवण्यासाठी एक विशेष सन्मान दिला. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक पोस्ट ऑफिसचा पोस्टल कोड ९९९४ पासून सुरू होतो जो डॉन ब्रॅडमनच्या ९९.९४ या सरासरी धावसंख्येवरून निश्चित करण्यात आला आहे.

कसोटी सामन्यात सर्वाधिक द्विशतक ठोकण्याचा विक्रमही ब्रॅडमनच्याच नावावर आहे. ब्रॅडमनने एकूण बारा द्विशतक ठोकले आहेत.

संपूर्ण क्रिकेट विश्वात ब्रॅडमनच्या या खेळाचे आणि विक्रमांचे कौतुक केले जात. मात्र ब्रॅडमनला एका भारतीय खेळाडूच्या खेळाचे विशेष कौतुक होते. तो खेळाडू म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. १९९४-९५ साली त्याने सचिनचा खेळ पहिला होता. हा खेळ पाहत असताना तो आपल्या पत्नीला म्हणाला होता की, “सचिनची बॅटिंग स्टाईल त्याच्या स्टाईलशी जुळणारी आहे.” स्वतः मास्टर ब्लास्टरने आपल्या, ‘प्लेईंग इट माय वे’ या आत्मचरित्रात या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. सचिनसाठी खुद्द क्रिकेटच्या डॉनने त्याला दिलेली ही प्रतिक्रिया म्हणजे आजवरची ‘सर्वश्रेष्ठ प्रतिक्रिया’ आहे.

२५ फेब्रुवारी २००१ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी ब्रॅडमनने या जगाचा निरोप घेतला.

ब्रॅडमनची इच्छा होती की त्याच्या आवडत्या एडीलेड मैदानात त्याच्या नावाचे एक संग्रहालय बनवले जावे. त्याच्या मृत्यूपश्चात त्याची ही इच्छा पूर्ण करण्यात आली. या संग्रहालयात ब्रॅडमनच्या अनेक वस्तूंसह त्याचा आवडता सोफा आणि रेडीओही ठेवण्यात आला आहे.

आजही क्रिकेट जगतात क्रिकेटच्या या ‘डॉन’चे नाव अत्यंत आदराने आणि सन्मानपूर्वक घेतले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आकाशातून आगीचा लोळ घेऊन आलेली उल्का अंगावर पडूनसुद्धा ही महिला सुखरूप होती

Next Post

हा होता हि*टल*रचा एकमेव फेव्हरेट ‘ज्यू’ ज्याला हि*टल*रने अभय दिलं होतं..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

हा होता हि*टल*रचा एकमेव फेव्हरेट 'ज्यू' ज्याला हि*टल*रने अभय दिलं होतं..!

रोनाल्डोने कोकची बॉटल बाजूला केली आणि कंपनीचं मार्केट कॅप ४ बिलियन डॉलरने पडलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.