The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेशाने शेतकरी असलेला ‘सिमो’ देशासाठी स्नाय*पर बनला आणि ५५० शत्रूंचा खा*त्मा केला

by द पोस्टमन टीम
9 October 2025
in विश्लेषण, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


शेतकरी म्हटलं की, आपल्या समोर व्यक्तीची एक साधी सरळ प्रतिमा उभी राहते. दिवस-रात्र आपल्या शेतात काबाड कष्ट करून अन्न-धान्याचं उत्पादन घेणं, इतकचं काम एक शेतकरी करू शकतो, असा साधारण वैश्विक समज आहे. मात्र, जगाच्या इतिहासामध्ये एक असा शेतकरी होऊन गेलेला आहे, ज्याला साक्षात मृत्यूचा दर्जा दिला गेला होता.

१९३९-१९४० च्या दरम्यान सोव्हिएत युनियन आणि फिनलँड एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. त्या यु*द्धात फिनलँडमधील या शेतकऱ्यानं ५०० ते ५५० जणांचा जीव घेतला होता! शत्रूंनी त्याचा इतका धसका घेतला होता की, त्याला ‘व्हाईट डे*थ’असं टोपण नावच देऊन टाकलं होतं. ‘सिमो हायहा’ असं या शेतकऱ्याचं नाव होतं. इतिहासातील सर्वात घातक स्नाय*परर्समध्ये सिमोचा समावेश होतो. एका साध्या शेतकऱ्याचं स्नाय*परमध्ये कसं रुपांतर झालं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…

१७ डिसेंबर १९०५ रोजी फिनलँडमधील किस्केन नावाच्या गावामध्ये सिमो हायाहाचा जन्म झाला. सध्या हे ठिकाण रशियाच्या ताब्यात आहे. सिमोचे आई-वडील शेतकरी होते. त्यामुळे लहानपणापासून त्याला शेतीचं ज्ञान होतं. याशिवाय त्याला स्नो-स्कीइंग, शिकार आणि नेमबाजीचाही छंद होता. त्याचं शिक्षण मिटिल्ला गावातील शाळेत पूर्ण झालं होतं.

शाळेत असल्यापासून तो एक उत्तम नेमबाज होता. असं म्हटलं जातं की, सिमोच्या घरी त्यानं जिंकलेल्या अनेक ट्रॉफी होत्या. १९२५ साली, वयाच्या १९व्या वर्षी त्यानं वीपुरी प्रांतातील सायकल बटालियन क्रमांक दोनमध्ये १५ महिन्यांची अनिवार्य लष्करी सेवा देखील केली होती. त्यानंतर तो शेतीमध्ये रमला. मात्र, जेव्हा दुसऱ्या महायु*द्धाच्या पार्श्वभूमीवर फिनलँड आणि सोव्हिएतमध्ये यु*द्धाची शक्यता निर्माण झाली तेव्हा त्याला प्रशिक्षण केंद्रात स्नाय*पर म्हणून रितसर प्रशिक्षण घेण्यासाठी बोलवण्यात आलं.



सिमोचं चरित्र लिहिणाऱ्या मेजर टॅपिओ सारलेनिन यांच्या म्हणण्यानुसार, सिमोकडं १५० मीटर दूर असलेलं सावज देखील अचूक टिपण्याची क्षमता होती. प्रशिक्षणादरम्यान त्यानं एका मिनिटाच्या कालावधीत १६ वेळा १५० मीटर अंतरावरील लक्ष्य भेदलं होतं. आपल्या बोल्ट ॲक्शन रायफलसह त्यानं ही अविश्वसनीय कामगिरी केली होती.

सिमो जेव्हा ३३ वर्षांचा होता तेव्हा त्याला यु*द्धासाठी पाचारण करण्यात आलं. त्याने सहाव्या बटालियनमधील ३४व्या रेजिमेंटमध्ये ९८ दिवस सेवा दिली. त्यानं आपला ३४वा वाढदिवस क्वॉलाच्या यु*द्धभूमीवरच साजरा केला होता. यु*द्धाच्या अंतिम टप्प्यात मात्र, तो जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

आपल्या ९८ दिवसांच्या कारकिर्दीत शत्रू पक्षातील कुणीही सिमोला ना पाहू शकलं, ना ऐकू शकलं! बर्फाच्या लाद्यांमधून कुठून तरी अचानक गोळ्या येऊन आपला वेध घेतात इतकंच रशियन सैनिकांना समजत होतं. सिमोचं लक्ष्य अतिशय प्राणघातक होतं. एकदा तर त्यानं एका दिवसात सलग २५ जणांचा जीव घेतला होता. सिमो रशियन्ससाठी खऱ्या अर्थानं ‘द व्हाईट डेथ’ बनला होता.

एका प्रसंगी, सिमोचा पहिला शॉट चुकला म्हणून त्याने पुन्हा एकदा एका शॉट मारला आणि शत्रूच्या स्ना*यपरला ठार मारलं. मात्र, यामुळं रशियन्सला त्याच्या ठिकाणाचा थोडाफार अंदाज आला आणि त्यांनी सिमोच्या फायरिंग पोझिशनच्या आसपास गोळी*बार केला. याशिवाय मोर्टार बॉ*म्ब फेकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्यातून सिमो सुखरूप बाहेर पडला. त्याला साधा एक ओरखडा देखील आला नव्हता!

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

एखादा शिकारी जसं त्याच्या सावजाला पाहतो, अगदी त्याचं दृष्टीकोनानं सिमो आपल्या शत्रूला पाहत असे. स्ना*यपरची नोकरी शिकारीकाम केल्यासारखीचं असल्याचं त्याचं म्हणणं होतं. शत्रूला कशा प्रकारे मूर्ख बनवता येईल यासाठी तो कायम नवीन मार्गांचा शोध घेत असे.

त्यानं यु*द्ध क्षेत्राच्या नकाशाचा अतिशय बारकाईनं अभ्यास केला होता. याचा फायदा त्याला सुरक्षित जागा शोधण्यासाठी झाला. तो आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित होता. इतकं की त्याला वेडं म्हटल तरी वावगं ठरणार नाही. अनेकदा रात्रीच्या वेळी तो त्याच्या ‘आवडत्या’ फायरिंग पोझिशन्सला भेट देत असे. त्याठिकाणी त्याला आवश्यक वाटणारे फेरबदल देखील करून ठेवत असे. इतर स्नाय*पर्सच्या तुलनेत तो जास्त वेळा आपली शस्त्रं स्वच्छ करत असे. फिनलंडमधील २० डिग्री सेल्सियस तापमानात आपल्या बंदु*कीने धोका देऊ नये यासाठी त्याचा हा सगळा आटापीटा असायचा.

एक स्नाय*पर होण्याअगोदर सिमो एक उत्तम शिकारी होता. सावज आणि आपल्यातील अंतराचा अंदाज कसा लावायचा, हे कौशल्य त्याला अवगत होतं. त्याच्या वडिलांनी त्याला ही गोष्ट शिकवली होती. त्यासाठी त्यानं खूप सराव केला होता. हीच गोष्ट त्यानं यु*द्धभूमीवर देखील वापरली होती. लक्ष्य भेदण्यासाठी त्याचा अंदाज परिपूर्ण असायचा.

बालपणापासूनची तालीम आणि सिमोचं अनोखं व्यक्तिमत्त्व, फिनलंडच्या गोठलेल्या जंगलांमध्ये सोव्हिएत सैन्याला पडलेलं एक भयानक स्वप्नंच होतं. ६ मार्च १९४० रोजी क्वालातील जंगलात तो जखमी झाला. रशियन ह*ल्ल्यादरम्यान त्याला गो*ळी आणि स्फो*टकांचे काही तुकडे लागले होते. त्यानंतर तो कोमामध्ये गेला. त्याच्या या दुखापतीमुळं त्याच्या चेहऱ्याचा काही भाग जायबंदी झाला.

यु*द्धाची सांगता झाल्यानंतर सिमो आपल्या शेतात परतला. यु*द्धातील त्याचे कारनामे फिनलंडमध्ये प्रसिद्ध झाले होते आणि तो एक सेलिब्रिटी बनला होता. परंतु, त्यानं स्वत:ला प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. लोकांच्या गराड्यामध्ये राहण्यापेक्षा निसर्गात रमणं त्याला जास्त आवडत असे. तोंडाला झालेल्या दुखापतीमुळं त्याच्यावर लहानमोठ्या अशा २६ शस्त्रक्रिया झाल्या होत्या.

उतारवयात तो ‘किमी इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड वेटरन्स’ या संस्थेमध्ये दाखल झाला होता. २००२ साली ९६ व्या वर्षी सिमोचं निधन झालं. दीर्घकाळ जिवंत राहणारा सिमो हा सर्वांत यशस्वी स्नाय*पर होता. त्याचं एकूण व्यक्तिमत्त्व पाहता त्याचा जन्म फक्त शिकारीसाठीचं झाला होता. मग ती प्राण्यांची असो किंवा माणसांची. आपल्या कौशल्याचा वापर करून त्यानं यु*द्धाच्या कठीण प्रसंगी देशाची सेवा केली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या हेराने दिलेली माहिती जर्मनीने गांभीर्याने घेतली असती तर दुसऱ्या महायु*द्धाचा निकाल बदलला असता

Next Post

कोसोवा आणि सर्बियामध्ये वाद झाला आणि त्यात युरोपची सहा मिनिटे गहाळ झाली

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

कोसोवा आणि सर्बियामध्ये वाद झाला आणि त्यात युरोपची सहा मिनिटे गहाळ झाली

एकेकाळी खेळाचे पत्ते छापणारी कंपनी आज ६५हुन अधिक देशांच्या नोटा छापतेय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.