The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मात असलेल्या समानता थक्क करणाऱ्या आहेत..!

by Heramb
29 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


२.४ अब्जांपेक्षा जास्त अनुयायी असलेल्या ख्रिस्ती धर्म हा जगातील सर्वांत मोठा धर्म आहे. तर टक्केवारी आणि जगभरात वेगाने पसरण्याच्या बाबतीत इस्लाम हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे. जगभरात इस्लामचे सुमारे १.८ अब्ज अनुयायी आहेत. हे दोन्ही धर्म वरवर पाहता बऱ्याच प्रमाणात वेगवेगळे वाटतील. भौगोलिक दृष्ट्यासुद्धा ख्रिस्ती धर्म हा प्रामुख्याने जगातील पश्चिमी भागात विस्तारणारा आहे तर इस्लाम धर्म मध्य-पूर्व भागात विस्तारत आहे.

या दोन्ही धर्मांवर गेल्या काही दशकांमध्ये द*हशत*वादाचा वापर आणि सक्तीच्या धर्मांतरांसह अनेक टीका झाल्या आहेत. पण या दोन्ही धर्मांमध्ये टीका आणि नकारात्मकतेशिवाय अनेक गोष्टी समसमान आहेत. समान इतिहास, समान श्रद्धा, इत्यादींसाठी ज्यू धर्मासह ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म यांना ‘अब्राहमीक धर्म’ असेही म्हटले जाते.

१. अब्राहमीक धर्म:

यहुदी, इस्लाम आणि ख्रिश्चन हे मुख्य तीन अब्राहमिक धर्म आहेत. या तिन्ही धर्मांमध्ये प्राचीन इस्रायली लोकांच्या यहुदी किंवा ज्यू धर्मातील अब्राहम (इस्लाममध्ये इब्राहिम) देवाची पूजा केली जाते. ख्रिश्चन आणि इस्लाम हे दोन्ही धर्म एकेश्वरवादी असल्याचं दिसून येतं. म्हणजेच या दोन्ही धर्मांचा एकाच देवावर विश्वास आहे. त्यानेच या विश्वाची निर्मिती केली. एकेश्वरवाद हा दोन्ही धर्मांना जोडणारा मूलभूत धागा आहे. शिवाय, या दोन्ही धर्मांतील काही अन्य समानता एकेश्वरवादाच्याही पलीकडे जातात.

या दोन्ही धर्मांमध्ये एकेक प्रेषित आहे. या प्रेषिताने तत्कालीन सर्व अडचणींवर मात करून ईश्वराच्या वचनाचा प्रचार केला. मुस्लिम लोक प्रेषित मुहम्मद यांच्या ग्रंथांवरून त्यांचे न्यायशास्त्र ठरवतात, तर ख्रिश्चन ‘येशू ख्रिस्त’ या प्रेषितावर विश्वास ठेवतात. शेवटी, दोन्ही धर्माचे लोक बहुतेक समान नियम/आदेश पाळतात. ते नियम अथवा आदेश या जगात त्यांच्या नैतिक आचरण आणि वर्तनावर प्रभाव टाकतात. दोन्ही धर्मांमध्ये स्वर्ग, नरक, न्यायाचा दिवस (कयामत किंवा ॲपोकलिप्स) आणि ईश्वरीय बक्षीस या जन्मजात कल्पनांवर श्रद्धा आहे.

२. समान इतिहास आणि धार्मिक स्थळे:

या दोन्ही धर्मांमध्ये वैदिक धर्माप्रमाणे ‘स्थानमहात्म्य’ नसलं तरी मध्य पूर्व किंवा मिडल इस्टचा भाग या दोन्ही धर्मांसाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र आहे. दोन्ही धर्मांची सुरुवात मिडल इस्टमध्येच झाली आणि पुढे हे धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पसरू लागले. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेममध्ये झाला. हे ठिकाण आधुनिक इस्रायलमध्ये आहे.



तर इस्लामचा जन्म अरबस्तानात (आधुनिक सौदी अरेबियाचा प्रदेश), मुख्यतः मक्का आणि मदिना या शहरांमध्ये झाला. या परिसरात ३०० हुन अधिक वेगवेगळ्या टोळ्या होत्या, त्या सर्वांना इस्लाम धर्मात आणले गेले. इस्लाममध्ये मूर्तिपूजा वर्ज्य असल्याने काबाच्या परिसरातील ३६० मूर्ती तोडण्यात आल्या. मक्का-मदिना ही दोन्ही शहरे पैगंबर मुहम्मद यांचे निवासस्थान होते. या सर्व ठिकाणांना मध्यपूर्वेत महत्त्व दिले जाते.

धार्मिक स्थळे आणि इतिहासाच्या समानतेशिवाय प्रमुख प्रेषितांच्या बाबतीतही दोन्ही धर्मांमध्ये अनेक समानता आहेत. दोन्ही धर्मांच्या मते, मानवी इतिहासाची सुरुवात ‘आदम’ नावाच्या एका प्रेषितापासून झाली. त्याचप्रमाणे अब्राहम किंवा इब्राहिमचे बलिदान, मोसेसचा संघर्ष, जॉन द बाप्टिस्टची धार्मिकता आणि प्रेषित येशूचे चमत्कार या गोष्टी दोन्ही धर्मांमध्ये समान आहेत.

कुराण आणि प्रेषित मुहम्मद प्रेषित येशूला श्रेष्ठ मानतात. किंबहुना, इस्लामिक परंपरेत प्रेषित येशूच्या पुनरुत्थानावरही विश्वास आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

३. येशू ख्रिस्त आणि प्रेषित मोहम्मद:

ख्रिस्ती धर्म येशूने सांगितलेल्या परंपरा आणि प्रथांवर आधारित आहे, तर इस्लाम धर्म प्रेषित मुहम्मद यांनी स्थापित केलेल्या परंपरेवर आधारित आहे. दोन्ही धर्मांत आपापल्या प्रेषितांना मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. येशूची कथा प्रेषित मुहम्मद यांच्या कथेसारखीच आहे, हे इस्लामनेसुद्धा मान्य केलं आहे.

येशूचा जन्म हा एक चमत्कार होता, कारण त्याचा जन्म मेरी (इस्लामिक परंपरेतील मरियम) नावाच्या ‘कुमारी स्त्री’पासून झाला होता. देवाचा संदेश सांगताना दोन्ही प्रेषितांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. दोन्ही धर्मांच्या मते, येशूच्या संघर्षाची तुलना केवळ प्रेषित मुहम्मद यांच्याशी होऊ शकते. त्यांनी जेव्हा इस्लामचा प्रसार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्याच लोकांनी त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता.

सर्व सामाजिक संकटांना तोंड देऊनही, दोन्ही प्रेषितांनी आपापल्या धर्माचा उपदेश चालू ठेवला. येशूला रोमन अधिकाऱ्यांनी वधस्तंभावर अडकवले होते. पण तरीही हे दोन्ही प्रेषित आपापला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि जगाच्या पाठीवर दोन मजबूत धर्म स्थापन करण्यात यशस्वी झाले.

४. धर्मग्रंथ – बायबल आणि कुराण

इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांचे ग्रंथ आहेत – इस्लाममध्ये कुराण आणि ख्रिश्चन धर्मामध्ये बायबल. या दोन्ही ग्रंथांना ईश्वराच्या वचनाचा स्रोत मानले जाते. या ग्रंथांमध्ये दोन्ही धर्मांतील प्रेषितांनी ईश्वराचे संदेश सांगितलेले आहेत. कुराण बायबलचे अस्तित्व ‘देवाचे वचन’ म्हणून मान्य करते. पण त्याचा अर्थ काही प्रमाणात बदलला आहे अशीही मान्यता कुराणमध्ये आहे.

मुस्लिम आणि ख्रिश्चन आपापल्या धर्मग्रंथांना नैतिकतेचे स्रोत मानतात. पवित्र धर्मग्रंथांमध्ये सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतांना देवाचे वचन मानले जाते. या वचनांचे सर्वांनी प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे असा नियम दोन्ही धर्मांमध्ये आहे.

५. स्वर्ग, नरक, इत्यादी परलोक आणि कर्मांच्या उत्तरदायित्वावर विश्वास:

सर्व अब्राहमिक धर्मांमधील सर्वात परिभाषित वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे आपल्यावरील जबाबदारीची कल्पना. ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांमध्ये न्यायाच्या दिवशी मनुष्याला त्याच्या कृतींसाठी जबाबदार धरले जाईल अशी मूलभूत कल्पना आहे. यानंतर एखादा  व्यक्ती स्वर्गात जाणार की नरकात हे ठरवले जाईल. यामुळे दोन्ही धर्मांतील अनुयायांना आपल्या कृती शुद्ध ठेवण्यासाठी संबंधित आज्ञांचे पालन करण्यास भाग पाडले जाते.

इस्लाम आणि ख्रिश्चन संस्कृतीतील अनेक मोठे फरक विचारात न घेता, बरेच लोक दोन्ही धर्म एकमेकांच्या जवळ आहेत असे मानतात. शिवाय हे दोन्ही धर्म, त्यांच्या सर्व आपापल्या कट्टरतांसह जगावर प्रभाव टाकत आहेत.

नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच या गोष्टीलाही वाईट बाजू आहेच. ख्रिश्चन आणि इस्लामी संस्कृतीतील लोकांनी गेल्या अनेक शतकांमध्ये उर्वरित जगाचे भाग पादाक्रांत करून तेथील संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. आजही इस्लामी द*हश*तवाद आणि विस्तारवादाच्या माध्यमातून, अनेक समानता असूनही या दोन्ही अब्राहमीक धर्मांमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. इस्लाम धर्मात द*हश*तवाद ही एक गंभीर समस्या असून संबंधित उच्चपदस्थ धर्मगुरूंनी यावर पावले उचलणे काळाची गरज आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवृत्त झाल्यानंतर नेमकं कसं आयुष्य जगतात माहिती आहे का..?

Next Post

हे आहेत आजवर न सापडलेले खजिने, ज्यांच्या शोधात लोक आजही आपलं आयुष्य पणाला लावतात

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

हे आहेत आजवर न सापडलेले खजिने, ज्यांच्या शोधात लोक आजही आपलं आयुष्य पणाला लावतात

फाशीच्या शिक्षेवर असलेले सहा कैदी 'मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन'मधून पळाले होते..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.