The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकाच सामन्यात भारताच्या ८ विकेट, आणि इंग्लंडच्या कर्णधाराचा हात मोडणारा पाकिस्तानचा सिकंदर

by द पोस्टमन टीम
21 October 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


कधीकाळी एकत्र असणाऱ्या भारत आणि पाकिस्तान देशांमध्ये कायम या न त्या कारणांमुळं तणाव असतो. विशेषत: भारत-पाक सीमा आणि क्रिकेटच्या मैदानावर तणाव शीगेला पोहचलेला असतो. ज्या दिवशी उभय राष्ट्रांमध्ये क्रिकेटचा सामना असतो, तो दिवस प्रत्येक नागरिकाला कठिण परिक्षेप्रमाणं वाटतो. जर आपल्या संघानं प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला तर मग विचारायलाचं नको.

अगदी सणाप्रमाणं तो दिवस साजरा केला जातो. मैदानावरील तणावातून दोन्ही देशांसाठी आजवर अनेक प्रतिभावान खेळाडू समोर आलेले आहेत. असाच एक पाकिस्तानी खेळाडू होता. ज्यानं दिल्लीच्या मैदानावर भारतीय संघाची दैना केला होती. सिंकदर बख्त असं या खेळाडूचं नावं आहे. सिंकदर उल्लेखनीय कौशल्य पातळी असलेला वेगवान गोलंदाज होता. त्याच्या गोलंदाजीच्या भात्यात प्राणघातक आउटस्विंगरचा भरणा होता. मात्र, संघातील इतर स्टार खेळाडूंच्या गर्दीत तो झाकोळून गेला. सिंकदर बख्त नेमका कसा खेळाडू होता हे जाणून घेण्यासाठी त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणं गरजेचं आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा सदस्य असलेला सिकंदरचा जन्म २५ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. उंच शरीरयष्टी असलेला सिकंदर सपाट खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजी करण्यात निपुण होता. विशेषत: त्याची नैसर्गिक आउटस्विंगर बॉल टाकण्याची पद्धत बहुतेक फलंदाजांसाठी एका भयानक स्वप्नासारखी होती.

त्यानं १९७४-७५ च्या हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेट आणि लिस्ट-ए क्रिकेटमध्ये पदार्पण करून आपल्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर वर्षभरातच म्हणजे १९७६ साली त्याला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली मात्र, त्यानं जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणं सुरूचं ठेवलं.

आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत त्यानं १८६ सामने खेळून २५.६१ च्या सरासरीनं तब्बल ५५३ विकेट्स मिळवल्या. ६९ धावांच्या बदल्यात ८ विकेट्स ही त्याची प्रथम श्रेणीतील त्याची सर्वोत्तम आकडेवारी आहे. संपूर्ण प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत २९ वेळा ‘फाईव्ह विकेट हॉल’ आणि तीन वेळा ‘टेन विकेट हॉल’ मिळवला. सिंकदर गोलंदाज तर उत्तम होताचं मात्र, त्यानं वेळ पडेल तेव्हा चांगली फलंदाजी देखील केली.



त्याने २०२ डावांमध्ये १ हजार ९४४ धावा केल्या होत्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी कारकीर्दीत त्यानं ८२ झेल देखील पकडले होते. देशांतर्गत क्रिकेटचा त्याचा प्रदीर्घ आणि प्रभावी प्रवास १९९१ साली संपला. तो पाकिस्तान, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स, युनायटेड बँक लिमिटेड, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंध, कराची आणि इतर संघांसाठी देखील क्रिकेट खेळला.

सिकंदरनं १९७६ साली न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळून पदार्पण केलं. पहिल्याच कसोटी सामन्यात त्यानं तीन विकेटस् घेतल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध त्यानं आपल्या कारकिर्दीत एकूण चार सामने खेळले ज्यामध्ये त्याला १५ विकेट्स मिळवता आल्या. आपल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या. मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यात आठ विकेट्स घेतल्यानंतर तो खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

काही वर्षांपूर्वी सिंकदर बख्तनं एका कार्यक्रमात दिल्लीतील कसोटी सामन्यातील आठवणींना उजाळा दिला. फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात सिंकदरनं आठ विकेट्स घेऊन मजबूत भारतीय संघाची दैना केली होती. कोटलाची खेळपट्टी कमालीची जिवंत वाटत होती. याचं सर्व पाकिस्तानी संघाला आश्चर्य वाटलं होतं. भारतीय फिरकी गोलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी असेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, वस्तुस्थिती एकदम उलट होती. याचाच फायदा सिंकदरला झाला होता.

या सामन्यातील आणखी एक किस्सा त्यानं माध्यमांना सांगितला होता. पहिल्या डावात कपिल देवनं पाकिस्तानच्या पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळं त्याचं अभिनंदन करणारं एक चमकणारं बॅनर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीवर लावण्यात आलं होतं. मैदानातून हॉटेलवर जाताना ते सिंकदर बख्तच्या नजरेत आलं. आपणही पाच विकेट घेतल्या तर आपलही असं बॅनर लावलं जावं, असा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. नंतर त्यानं पाच काय आठ विकेट्स घेऊन दाखवल्या.

त्यानंतर तो खास वेळ काढून टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर आपलं बॅनर लावलं आहे की काय ते पहायला गेला होता! बॅनर तर नाही लागलं मात्र, त्या दिवशी संध्याकाळी त्याचं अभिनंदन करण्यासाठी हॉटेलमध्ये अनेक लोक आले होते. सुनिल गावसकर, टायगर पतौडी, लाला अमरनाथ यांनी देखील त्याचं कौतुक केलं. याशिवाय दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी देखील सिंकदरचं अभिनंदन केलं. ज्या कलाकारांचे आपण चाहते आहोत त्यांच्याकडून कौतुक झाल्यानं मी हवेतचं गेलो होतो, अशी आठवण सिंकदरनं सांगितली. मनोजकुमारांनी सिंकदरसाठी केक पाठवला होता आणि प्राणनी एक सोन्याचं मेडल पाठवलं होतं!

त्यानं आपल्या देशासाठी २६ कसोटी सामने खेळले आणि ४५ डावांमध्ये गोलंदाजीत ३६ च्या सरासरीनं ६५ विकेट्स घेतल्या. त्यानं तीनदा ‘फाईव्ह विकेट हॉल’ मिळवला होता तर दोनदा चार-चार विकेट्स घेतल्या होत्या. कसोटीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सिंकदरनं ३० डिसेंबर १९७७ रोजी सियालकोट येथे इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यानं आपल्या पहिल्या सामन्यात फक्त एका फलंदाजाला बाद केलं. सिकंदरनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात एकदिवसीय सामने खेळले आणि १३ बळी मिळवत यशस्वी गोलंदाजी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सिंकदरचा आणखी एक किस्सा प्रसिद्ध आहे.

इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. एका अटीतटीच्या सामन्यात सिंकदर बख्तचा एक वेगवान बॉल इंग्लंडचा कर्णधार माइक ब्रिअर्लीच्या हाताला लागला. त्या बॉलमुळं माइकचा हात जायबंदी झाला होता. नंतर त्याच्या हाताला प्लास्टर करावं लागलं. ही गोष्ट सामना संपल्यानंतर लक्षात आली. दुसऱ्या दिवशी ‘पाकिस्तानी वेगवान गोलंदाजानं इंग्लंडच्या कर्णधाराचा हात मोडला’, अशा मथळ्यांखाली माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

विविध संघाविरुद्ध संधी मिळूनही सिंकदरला आपली कारकीर्द प्रदीर्घ करता आली नाही. सिकंदर सध्या क्रिकेट विश्लेषक म्हणून काम करतात. क्रीडा विश्लेषक म्हणून त्यांनी समा, सिंधू आणि एक्सप्रेस-न्यूज टेलिव्हिजन सारख्या अनेक टीव्ही चॅनेलसाठी काम केलं. सध्या ते जिओ स्पोर्ट्समध्ये काम करत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कम्प्युटरचा शोध नेमका कोणी लावला यावरून पण बरेच मतभेद आहेत..!

Next Post

जर्मनीने पहिल्या महायु*द्धात झालेल्या कर्जाचा शेवटचा हप्ता २०१० मध्ये भरलाय

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

जर्मनीने पहिल्या महायु*द्धात झालेल्या कर्जाचा शेवटचा हप्ता २०१० मध्ये भरलाय

एक काळ होता जेव्हा फक्त 1.44 MB साठी भलीमोठी फ्लॉपी डिस्क बाळगावी लागायची

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.