The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जॉर्ज बुशला फेकून मारलेल्या बुटाचा इराकी लोकांनी भला मोठा पुतळा बसवला होता

by द पोस्टमन टीम
18 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जगभरात अनेक स्मारकं, शिल्पं, पुतळे उभारले जातात. कुठे महापुरुषांचा पुतळा असतो, कुठे एखाद्या नेत्याचा, कुठे शहीद झालेल्या सैनिकांचा तर कुठे साधू-संतांचा. काही ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्राण्यांचीही शिल्पं उभारली जातात.

यापेक्षा वेगळा पुतळा इराकमधील तिक्रित नावाच्या शहरात उभारण्यात आला होता. हा पुतळा वेगळा यासाठी होता कारण तो कोणा माणसाचा पुतळा नव्हता तर चक्क एका बुटाचा होता!! एक ६ फुटी बुटाचा पुतळा बनवण्यामागेही एक कारण आहे. ते कारण समजून घ्यायला आपल्याला २००८ सालात जावं लागेल.

२००८ साली १४ डिसेंबर रोजी इराकमधल्या बगदाद शहरात एक पत्रकार परिषद भरवण्यात आली होती. त्यात इराकचे तत्कालीन पंतप्रधान नुरी अल-मलिकी उपस्थित होते. नुरी अल-मलिकीसोबत जॉर्ज बुशही होते. जॉर्ज बुश हे नाव आपल्या सर्वांनाच परिचित आहेच.

तर, ही परिषद चालू असताना त्यात जॉर्ज बुश भाषण करत होते. विषय होता – इराक आणि अमेरिकेचा संघर्ष! इराक आणि अमेरिकेत झालेला संघर्ष का महत्वाचा होता, हा संघर्ष होणं जगाच्या शांततेसाठी महत्वाचं का आणि कसं होतं हे सांगत असतानाच समोरच्या गर्दीतून अचानक २ बूट एकामागोमाग त्यांच्यावर भिरकावले गेले.

ही घटना सगळ्यांसाठीच अनपेक्षित होती. जॉर्ज बुश ह्यांनी पटकन खाली वाकून ते बूट डॉज केले, बाजूलाच उभ्या असणाऱ्या नुरी अल-मलिकीनीही बुशना वाचवण्याचा प्रयत्न केला. जॉर्जना बुटाचा मारा लागला नसला तरी भिरकावला गेलेला दुसरा बूट मागे उभ्या असलेल्या अमेरिकेच्या झेंड्याला जाऊन लागला.



हा प्रसंग अर्थातच खळबळजनक होता. एका बलाढ्य देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाला कोणीतरी बूट फेकून मारतं ही घटना सर्वांनाच अस्वस्थ आणि आश्चर्यचकित करणारी होती. हे बूट नेमके कोणी फेकून मारले आणि त्या रागामागे नेमकं काय कारण होतं, असे अनेक प्रश्न लोकांना सतावू लागले.

हा बूट फेकून मारणारा माणूस होता मुंतधर अल-झईदी. मुंतधर अल-झईदी २८ वर्षांचा एक पत्रकार, ‘अल बगदादीया’ या न्यूज चॅनेलमध्ये काम करत होता.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

जेव्हा त्याने जॉर्ज बुशवर बूट भिरकावले तेव्हा त्याने अरेबिक भाषेतून एक वाक्य उच्चारलं. ते वाक्य होतं “आम्हा इराकमधल्या लोकांकडून हे तुला गिफ्ट आहे, फेअरवेल किस!! हे बूट त्या विधवा स्त्रिया, अनाथ बालकं आणि जे लोक इराकमध्ये यु*द्धांत मारले गेले त्यांच्याकडून आहेत”

इतक्यात तिथे असलेल्या बॉडीगार्ड्सने त्या पत्रकाराला पकडलं आणि खेचत बाहेर नेलं. बाहेर जाताना त्याचा आरडाओरडा चालूच होता. त्यानंतर त्याला बगदादमधल्या तुरुंगात डांबण्यात आलं. या घटनेनंतर जॉर्ज बुश यांनी आपलं भाषण परत सुरू केलं. या अनपेक्षित प्रसंगातून स्वतःला सावरून मिश्कीलपणे ते म्हणाले “जे बूट माझ्यावर भिरकावले गेले त्यांचा नंबर १० होता इतकंच मी सांगू शकतो.” या प्रसंगानंतर अनेक इराकी पत्रकारांनी झालेल्या प्रकाराबद्दल जॉर्ज बुश यांची माफी मागितली.

या घटनेनंतर झईदीला शिक्षा झाली असली तरी रातोरात इराकमध्ये तो चांगलाच प्रसिद्ध झाला. त्याचा बूट भिरकावतानाचा व्हिडीओही जगभरात पसरला. त्याच्या समर्थनार्थ जगभरात अनेक मोर्चे निघाले, त्याला तुरुंगातून लवकरात लवकर सोडून देण्याची मागणी व्हायला लागली.

जगभरातले अनेक वकील त्याची केस लढायला स्वेच्छेने तयार झाले. त्याच्यावर अनेक व्हिडीओ गेम्स, गाणी, सिनेमे निघाले. तो इतका प्रसिद्ध झाला की त्याला लग्नासाठी अनेक स्थळं येऊ लागली. इराकच्या सरकारने झईदच्या मालकाकडून माफीनामा मागितला. त्यांनी माफीनामा तर दिला नाहीच उलट त्याच्या वागण्याचं आपण समर्थन करतो हे दाखवण्यासाठी आपण झईदला 4BHK घर देत आहोत अशी घोषणाही केली!!

झईदचे बूट ज्या माणसाने बनवले होते त्याला आठवड्याभरात हजारो बुटांच्या ऑर्डर्स आल्याचंही बोललं जातं.

इतक्या सगळ्या प्रसिद्धीनंतर, काही महिन्यांनी २००९ साली इराकच्या लईथ अल-अमारी या शिल्पकाराने त्या भिरकावलेल्या बुटाचं ६ फुटी, ब्रॉंझचं शिल्प बनवलं. ते शिल्प तिक्रित शहरातल्या एका अनाथाश्रमासमोर नेऊन उभं केलं.

त्या अनाथाश्रमाच्या चालकाला याबद्दल विचारलं असता तो म्हणाला,

“जेव्हा आपल्या पुढच्या पिढीतली मुलं हे बुटाचं शिल्प बघतील तेव्हा ते आपल्या पालकांना त्याबद्दल प्रश्न विचारतील, तेव्हा त्यांचे आई-बाबा त्यांना त्या ‘हिरो’बद्दल सांगतील ज्याने निर्भीडपणे जॉर्ज बुशवर बूट भिरकावला होता.”

पण याच्या दुसऱ्याच दिवशी इराकच्या सरकारने हे शिल्प काढून टाकलं. यानंतर झईदीला ३ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली, पण सप्टेंबर २००९ मध्येच त्याला त्याचा पूर्वीचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नसल्यामुळे सोडून देण्यात आलं. शिक्षा होऊनही झईदीला कोणताच पश्चात्ताप झाला नाही, तो अजूनही त्याने केलेल्या कृत्याचं समर्थन करतो.

त्याच्या बूट फेकून मारण्याच्या कृतीमागे मनात खदखदत असलेला राग होता, इराकमध्ये यु*द्धांत अनेक निष्पापी माणसंही मृत्युमुखी पडली याच संतापाची परिणीती म्हणजे त्याचं हे कृत्य होतं. म्हणूनच की काय इराकी जनता त्याला व्हिलन न मानता एक ‘हिरो’ समजते. त्याला जनतेने इतकी प्रसिद्धी दिली की २००९च्या ‘अरेबियन बिजनेस पॉवर’च्या टॉप १०० लोकांच्या लिस्टमध्ये तो ‘तिसऱ्या’ स्थानावर होता आणि ही लिस्ट होती ‘जगभरातल्या १०० सुप्रसिद्ध अरब माणसांची’!!!

तिक्रितमध्ये एकेकाळी उभारलं गेलेलं बुटाचं शिल्प आजही लोकांच्या उत्सुकतेचा विषय आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

लाखो लोकांना भिकेला लावणारा ‘डॉट कॉम बबल’ काय होता माहिती आहे का..?

Next Post

कोकणातल्या गणेशोत्सवाबद्दलचे हे इंटरेस्टिंग किस्से वाचाच..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

कोकणातल्या गणेशोत्सवाबद्दलचे हे इंटरेस्टिंग किस्से वाचाच..!

...म्हणून क्रिकेटर्स चेहऱ्यावर पांढरं क्रीम लावतात..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.