The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी या देशातील लोकांनी बनवले शेवाळापासून छप्पर

by द पोस्टमन टीम
8 February 2025
in विश्लेषण, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


युरोपियन देश डेन्मार्क २०१६ साली जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून गणला गेला. जगातील सर्वांत कमी भ्रष्टाचार देखील डेन्मार्कमध्ये आहे, कदाचित यामुळेच हा एक आनंदी देश आहे. डेन्मार्क केवळ यासाठीच प्रसिद्ध नाही. अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या डेन्मार्कला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. येथील लाईसो बेटांवरील शेवाळाचे छत असलेली घरे हे देखील एक वैशिष्ट्य आहे.

डेन्मार्कच्या लाईसो नावाच्या बेटावर घरांचे छत फार मोठे असतात. लक्षपूर्वक बघितल्यावर ते गवताने तयार केले असल्याचे स्पष्ट होते. खरंतर हे गवत नाही, समुद्री शेवाळ असते. हे फार टिकाऊ असतं आणि तापमान नियंत्रण करण्यात मदत करतं. असं मानलं जातं की भविष्यात बहुतांश घरांची निर्मिती अशाप्रकारेच करण्यात येणार आहे.

सतराव्या शतकात बेटावर अशी घरे बांधायला सुरुवात करण्यात आली. या बेटावरच्या लोकांचा पारंपारिक व्यवसाय मीठ उत्पादन करणं हाच होता. हा व्यवसाय मोठा करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. यामुळे घर बांधायला लाकडं मिळणं अवघड झाले, त्यावेळी लोकांनी हा उपाय शोधून काढला.

समुद्राच्या मध्यभागी असल्याचा या बेटाला मोठा फायदा झाला होता. जेव्हा एखादे जहाज दुर्घटनेत सापडल्यानंतर, त्याचे अवशेष किनाऱ्यावर यायचे त्यावेळी लोक या जहाजाच्या लाकडांचा वापर करायचे व छतावर शेवाळ टाकायचे. १९२० मध्ये एका फंगल इन्फेक्शनमुळे लोकांनी याचा वापर करणं कमी केलं. आता त्यांची संख्या फार कमी झाली आहे. आज १८०० जनसंख्या असलेल्या या बेटावर फक्त ३६ घरं अशी आहेत ज्यांच्यावर शेवाळाचे छत आहे.

२०१२ साली पुन्हा एकदा या शेवाळाच्या छताचे निर्माण करण्यास सुरुवात झाली. याबद्दल BBC ने एक रिपोर्ट तयार केला. या बेटावर राहणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा शेवाळाच्या छताच्या घरांच्या निर्मितीला पुढाकार घेतला आहे. लोक म्हणतात की पक्क्या छतापेक्षा शेवळाचे छत लावणे जास्त परवडते.



शेवाळाच्या छताचा शोध लावण्याचं काम महिलांनी केलं होतं. एखादा नाविक समुद्रावर गेला की महिला घरी बसून घरासाठी टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करायच्या उद्योग करायच्या. असाच त्यांनी सतराव्या शतकात छत बनवलं. एकाच वेळी ४० ते ५० महिला छत बांधायच्या कामात मदत करायच्या. सर्वांत आधी त्या किनाऱ्यावर आलेलं शेवाळ गोळा करायच्या. त्यानंतर त्या शेवाळ्याला सुकवायच्या. एकत्रित केलेल्या शेवाळाला कमीतकमी ६ महिने सुकवण्यात यायचं. यानंतर ते छतावर पसरवलं जायचं. यामुळे एका छताचे वजन ३५ ते ४० टन इतके होते.

समुद्री शेवाळाच्या खास पद्धतीच्या प्रजातींचा इथे वापर केला जायचा. त्यांना ईलग्रास म्हटले जायचे. जगभरातील समुद्र किनाऱ्यावर ही शेवाळ फार खास आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या शेवाळाला आग लागत नाही, ती गंजत नाही आणि याला कुठल्याही प्रकारची किड लागत नाही. हे शेवाळ कार्बन डायॉक्साईडचे शोषण करते त्यामुळे याच्या छताखाली राहणाऱ्याला अत्यंत शुद्ध हवा मिळते.

एकवेळ चांगलं सिमेंट वापरून बांधलेल्या घरात पाणी झिरपेल पण या शेवळाचे छत असलेल्या घरात असं होत नाही. या शेवळाची अजून एक चांगली बाब म्हणजे हे शेवाळ १०० वर्षांहून अधिक काळ जिवंत राहतात. शेवाळाची छते असलेली बहुतांश घरे ३०० वर्षं जुनी आहेत, यांच्या तुलनेत सिमेंटची घरं ५० वर्षांत हार मानतात.

लाईसो बेट अनेक पर्यटकांना यशस्वीपणे आकर्षित करत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण घरांना बघितल्यावर कॅथरीन लार्सन नावाची महिला त्यांचा अभ्यास करत आहे. भविष्यात या प्रकारची घरे वापरल्यास ग्लोबल वॉर्मिंगची समस्या सुटणार आहे.

ही घरे सध्या डेन्मार्कमध्येच असून इतर देशात अशी घरे नाहीत. कदाचित भविष्यात अशी घरे सर्वत्र बांधली जातील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मध्यमवर्गीय स्त्रियांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या स्कुटरची गोष्ट

Next Post

ना*झी सैन्याच्या जाचाला कंटाळून पळालेल्या ज्यू संशोधकामुळे झाला होता हि*टल*रचा पराभव !

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

ना*झी सैन्याच्या जाचाला कंटाळून पळालेल्या ज्यू संशोधकामुळे झाला होता हि*टल*रचा पराभव !

ओयोच्या २१ वर्षीय मालकावर एकदा व्यवसाय बंद करण्याची नामुष्की ओढावली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.