The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सयीदा अल हुरा – तब्बल तीस वर्षे या स्त्रीने समुद्री डाकूंचं नेतृत्व केलं होतं

by Heramb
28 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगातला सर्वांत मोठा देवाणघेवाण किंवा दळणवळणाचा मार्ग म्हणजे सागरी मार्ग. प्राचीन काळापासून डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीजांनी यात आपापल्या परीने योगदान दिलं आहे. मसाले, कलाकुसरीच्या वस्तू, तंत्रज्ञान, गुलाम, मौल्यवान वस्तू अशा अनेक गोष्टींची वाहतूक मोठ्या प्रमाणावर जहाजाद्वारे केली जायची हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

जसा जमिनीवर वाटमाऱ्या आणि लुटपाट करणाऱ्यांचा धोका असतो तसाच काहीसा किंवा त्यापेक्षा जास्त धोका समुद्रात असतो. समुद्री लुटेरे ज्यांना आपण चाचे म्हणतो त्यांचा फार मोठा धोका त्याकाळीही होता. हेन्री एव्हरी, एडवर्ड ब्लॅक बिअर्ड अशा अनेक कुख्यात समुद्री डाकूंचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे.

प्राचीन काळी जहाज लुटणं आजच्या मानाने सोपं होतं. कांस्य युगातील व्यापारी जहाजांकडे फारच कमी शस्त्रसाठा असे. त्याचबरोबर अशा जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, मसाले किंवा अन्य काही मालाचे साठे असत. त्यामुळे समुद्रात खोलवर हरवण्याच्या भीतीने अशी व्यापारी जहाजे सहसा खोल समुद्रात न जाता किनाऱ्याच्या जवळूनच प्रवास करीत असत.

समुद्री पायरेट्सना अशा व्यापारी जहाजांवरून लूट मिळवणे खूप सोपे होते, कारण समुद्री डाकूंची जहाजे खूप हलकी आणि वेगवान होती. तसेच लूटपाट करण्यासाठी प्रशिक्षित असलेल्या लुटारूंनी आणि छापाखोरांनी अशी जहाजे सज्ज असत. ह*ल्लेखोर अनेकदा व्यापारी जहाजांच्या मार्गांमध्ये इनलेट्स (खाडी) किंवा बेटांवर लपून बसत असत आणि अचानक व्यापारी जहाजांवर आ*क्रमण करीत असत. त्यावेळी जहाजांची नासधूस आणि लुटमारीच्या शक्यतेमुळे समुद्री लेन जवळपास नेहमीच व्यस्त असत.



या पायरेट्सनासुद्धा मोठा जागतिक इतिहास आहे. यांच्या इतिहासविश्वातील एक अविश्वसनीय स्त्री म्हणजे ‘सय्यदा अल हुर्रे’.

टेटुआन हे उत्तर मोरोक्कोमधील एक शहर आहे. हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आणि संपन्न असून जगातील कोणताही इतिहासप्रेमी या शहराच्या समृद्ध इतिहासात रमून जाईल. या शहराची स्थापना तिसऱ्या शतकात रोमन आणि फिनिशियन व्यापाऱ्यांनी केली. त्यानंतर काही वर्षांनी मोरोक्कोच्या ‘इद्रीसीड’ राजवटीने हे शहर उ*द्ध्वस्त केले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

कालांतराने ‘राजा अबू थाबिट’ने या शहराची पुनर्बांधणी केली. परंतु, पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला भूमध्यसागरात दह*शत निर्माण करणाऱ्या पोर्तुगीज जहाजांचा सामना करताना टेटुआनच्या भिंती फार काळ तग धरू शकल्या नाहीत. ‘कॅथोलिक रिकॉन्क्विस्टा’ आणि विशेषतः १४९२ साली ग्रॅनाडाच्या पतनानंतर पळून गेलेल्या “अंडालुसियन” निर्वासितांनी शहराची पुनर्बांधणी केली. पण या दरम्यान तब्बल एक शतक संपलं होतं.

टेटुआनच्या दक्षिणेला काही मैल अंतरावर ‘चौऑन शहर’ नावाचे राज्य होते. १४७१ साली स्थापन केलेले चौऑन हे पोर्तुगीज सैन्याविरूद्धच्या यु*द्धाचे केंद्र होते. एल्गारवे मुकुटासाठी डझनभर लोकांना ठा*र मारणे आणि इबेरियन द्वीपकल्पाच्या दक्षिणेस  इतर अनेक लोकांना विस्थापित करणे अशी कामे या राज्यातून झाली.  पण शेवटी पोर्तुगालने समुद्रापासून सर्व मोरक्कन बंदरांवर नियंत्रण ठेवले.

यामुळे पोर्तुगीज साम्राज्याच्या विस्ताराची सुरुवात झाली आणि ईस्ट इंडीजबरोबर व्यापार मार्ग तयार करण्याचा एक उपाय पोर्तुगीजांना सापडला. पूर्वेकडील ऑटोमन्सच्या मजबूत नौदल उपस्थितीमुळे आणि भूमध्य तसेच लाल समुद्रावरील त्यांच्या नियंत्रणामुळे ईस्ट इंडिजच्या लोकांबरोबर व्यापार करणे अवघड झाले होते.

अशा भूराजकीय परिस्थितीमध्ये, अल हुर्रेचा जन्म मुरीश वडिलांच्या पोटी झाला. यालाच ‘सेंट मौले अली इब्न रशीद’ म्हणून ओळखले जाते. त्याने मुस्लिम संदेष्टा मोहम्मद यांचा वंश शोधून काढला, त्यामुळे ‘अल हुर्रे’चे नाव आणि जीवनकार्य इस्लामिक आणि मोरक्कन संस्कृतीत श्रेष्ठ ठरले.

१४८५ साली जन्मलेल्या, अल हुर्रेचे पालन पंधराव्या शतकात शिक्षण आणि धार्मिकतेच्या वातावरणात झाले. अनेक वर्षांपर्यंत, तिला भूमध्य जगातील अनेक शास्त्रज्ञ आणि धार्मिक व्यक्तींकडून शिक्षण मिळाले. ‘अल हुर्रे’ हे नाव कसे पडले यावर अनेक मतमतांतरे आहेत. परंतु, सय्यदा अल हुर्रे हे “फ्री लेडी” चे शाब्दिक अरबी लिप्यंतरण आहे यावर अनेकांचे एकमत होते.

दुसरी शक्यता म्हणजे, तिच्या आईवडिलांना ग्रॅनाडाच्या शेवटच्या राजाची (नास्रीद राजवंशातील बोअबदील) आई आयशा अल हुर्रे नावाच्या प्रभावशाली राणीकडून या नावाची प्रेरणा मिळाली असावी.

त्याकाळी जगामध्ये राजकारणात स्त्रियांचा सहभाग दुर्मिळ होता पण काही अरब राष्ट्रांमध्ये असे नव्हते. इजिप्त, येमेन आणि ट्युनिशियासारख्या देशांमध्ये राज्य करणाऱ्या अशा स्त्रियांचा मोठा इतिहास आहे. शिवाय, त्यांच्या सामर्थ्याच्या अत्त्युच्च शिखरावर, अंडालुसियाच्या लोकांनी समाजात महिलांचे स्थान मोलाचे मानले. धर्म आणि विज्ञान दोन्हीमध्ये त्यांना योग्य शिक्षणाचे त्यांचे हक्क देण्यात आले.

सय्यदा अल हुर्रेची सत्तेवर येण्याची सुरुवात ‘अली अल मंड्री’ नावाच्या ग्रॅनडन गव्हर्नरशी तिच्या पहिल्या लग्नापासून झाली. अली अल मंड्री हा टेटुआन शहर-राज्याची प्रत्यक्ष पुनर्बांधणी करणार होता. दरम्यान, अली अल मंड्री १५१५ साली मरण पावला. त्यामुळे तिचे तिचे राजगादीवर येणे सहज आणि व्यापकपणे स्वीकारले गेले. तिचा भाऊ चौवेनचा राजकुमार आणि वट्टासीद राजाचा ग्रँड विझीर म्हणून राज्य करत होता.

याचवेळी अनेक व्यापारी ताफ्यांनी अल्जीयर्स, लिव्होर्नो आणि रोमपर्यंत प्रवास केला. सय्यदा अल हुर्रेने टेटुआनचे नौदल अतिशय सशक्त केले. यामुळे त्यांनी ख्रिश्चन जहाजांवर, विशेषतः पोर्तुगीज जहाजांवर ह*ल्ले केले आणि मिळवलेल्या लुटीद्वारे ते अधिक श्रीमंत झाले.

सिंहासनावर तिच्या पहिल्या वर्षांपासून, तिने कुख्यात तुर्क समुद्री पायरेट बाबा ओरूशी (बार्बरोसा) घनिष्ठ संपर्क साधण्यात यश मिळवले. बार्बरोसा इबेरियन द्वीपकल्पातून मुस्लिम मुर्सची वाहतूक करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याला स्पेनची राणी इसाबेला आणि राजा फर्डिनांड यांनी उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यांवर बेदखल केले होते.

सय्यदा अल हुर्रेच्या सतत होणाऱ्या ह*ल्ल्यांनी तिची कीर्ती वाढली. काही काळातच, ही ‘पायरेट क्वीन’ टँगियरपासून कॉन्स्टँटिनोपलपर्यंत प्रसिद्ध झाली आणि ख्रिश्चन खलाशांमध्ये तिची द*हशत पसरली. तिला भूमध्य जगाच्या भूगोलाची, मुत्सद्दीपणाची आणि राजकारणाची चांगली महिती होती.

जरी तिचे ह*ल्ले लबाडीचे आणि विश्वासघातकी होते, तरीही सेउटाचा पोर्तुगीज गव्हर्नर टेटुआनशी खूप जवळचे व्यापारी संबंध ठेवत असत. त्यामुळे ख्रिश्चन दूत अनेकदा टेटुआन, फेझ किंवा अगदी साले येथे असलेल्या यु*द्ध कैद्यांच्या मुक्ततेसाठीची खंडणीची चर्चा करताना दिसत असत.

१५३० च्या दशकाच्या उत्तरार्धात, अल हुर्रे आणि बार्बरोसाच्या संयुक्त सैन्यांनी त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम राबवली. जिब्राल्टरच्या चौकीवर ह*ल्ला करून, त्यांनी खडक पूर्णपणे नष्ट केले आणि अनेक ख्रिश्चन सैनिकांना गुलाम बनवले. या ह*ल्ल्याने भूमध्यसागरातील राजकीय शक्तींचे संतुलन पूर्णतः बिघडले.

१५४१ साली तिने मोरक्कन वट्टासीद राजवंशाचा सुल्तान, अहमद अल-वट्टासीकडून लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने फेझ ते टेटुआनपर्यंत प्रवास केला. मोरोक्कोच्या राजाने त्याच्या राजधानीच्या बाहेर लग्न केल्याची ही एकमेव ऐतिहासिक घटना होती. तिच्या राजकीय शक्ती आणि प्रभावाचा हा मजबूत पुरावा आहे. सुलतानाशी लग्न होऊनही टेटुआनचा कारभार सोडणार नाही, हे तिने सर्वांना दाखवून दिले.

जोपर्यंत वट्टासीदने पोर्तुगीज सेउटाशी सर्व व्यापार संबंध तोडले नाहीत तोपर्यंत ‘युती’ असूनही तिने वट्टासीदवर ह*ल्ले थांबवले नाहीत. सुदूर दक्षिणेला, फेजचे राज्य सादी जमातीशी खुले यु*द्ध करत होते. पूर्वीच्या वासल राज्याने बंडखोरी केली आणि फेजमधील सत्ताधारी राजघराण्याची सर्व शक्ती आणि अधिकार ताब्यात घेण्याची धमकी दिली.

सगळीकडे असा राजकीय गोंधळ माजलेला असताना, १५४२ साली, तिच्या दिवंगत पतीच्या नातवाने सादी सैन्यात प्रवेश केला. एका विशाल सैन्याच्या प्रमुखाच्या रूपात त्याने टेटुआनवर आक्र*मण करून अल हुर्रेला पदच्युत केले. येथेच तीस वर्षांहून अधिक काळ टिकलेला इतिहासाचा एक मोठा अध्याय संपला.

उत्तर आफ्रिकेच्या आणि अरब जगातील महिला राज्यकर्त्या असामान्य नाहीत. अक्षरशः इतिहासाची पाने बदलून टाकणाऱ्या दहा महिलांची नावे सांगता येतील. अशा स्त्रियांनी फक्त त्यांच्या परिसरालाच नव्हे तर संपूर्ण भूमध्य जगाला प्रभावित केले आहे. जगात जेव्हा महिला सक्षमीकरण हा खूप मोठा विषय असताना, या शूर स्त्रियांना लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इंग्रजांशी लढण्यासाठी टिपूने नेपोलियनकडे मदत मागितली होती, नेपोलियन निघालाही होता, पण..

Next Post

कुंबळेचा १० विकेट्सचा विक्रम व्हावा म्हणून श्रीनाथने चुकूनही विकेट मिळू नये अशी बॉलिंग केली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कुंबळेचा १० विकेट्सचा विक्रम व्हावा म्हणून श्रीनाथने चुकूनही विकेट मिळू नये अशी बॉलिंग केली

अमेरिकेत कृष्णवर्णीय बाळांचा वापर मगरींच्या शिकारीसाठी 'चारा' म्हणून केला जात असे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.