The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोका कोलाला भारताबाहेर काढून जनता सरकारने “सरकारी कोला” बाजारात आणला होता

by द पोस्टमन टीम
1 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


७५-८५ च्या दशकातील लोक नक्कीच आठवत असेल त्याकाळी “हर रिश्ता बोला, मेरे नाम की कोका कोला” या टॅगलाईनने आणि आपल्या तरतरी आणणाऱ्या चवीने लोकांची मने जिंकणारा कोका कोला भारतीय बाजारपेठ सोडून गेला होता. तेव्हा लोकांची ही “गरज”, हो! याला गरजच म्हणावे लागेल, कारण कोका कोलाने भारतीय ग्राहकांच्या मनात आपली अशी एक विशिष्ट जागाच बनवली होती, भागवण्यासाठी, सरकारने “77” नावाचे कोकाकोला सारखेच ड्रिंक बाजारात आणले जे लोकांना फारसे रुचले नाही.

लोकशाही वाचवण्यासाठी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मोरारजी देसाईंच्या जनता पार्टीने १९७७ साली इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा निवडणुकीत पराभव केला. याच वर्षी, भारतातील कोका कोला एक्सपोर्ट कॉर्पोरेशन (CCEC)ने फॉरेन एक्स्चेंज रेगुलेशन ऍक्ट (FERA) अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)कडे, भारतात आपला बिझनेस कायम ठेवण्याचे लायसन्स मिळवण्यासाठी विनंती केली. उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आपल्या यूएस मुख्यालयातून आयात करण्यासाठीचे हे लायसन्स होते.

ज्यात त्यांच्या मालाची स्पष्ट माहिती दिली नव्हती, त्याऐवजी “सिक्रेट इंग्रेडींयंट” असा उल्लेख होता. या पदार्थाचा उपयोग कोका कोला बनवण्यात केल्या जात होता पण याच ‘सिक्रेट इंग्रेडींयंट’मुळे कोका कोलाला त्याची, ती हटके, चरचरणारी चव मिळायची.

मोरारजी देसाईंच्या नवीन सरकारने RBIला FERAचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले. ज्यानुसार कोका कोलाला आपल्या शेअर्सपैकी ६०% शेअर्स भारतीयांना हस्तांतरित करणे व कंपनी चालवण्याचे सगळे बारकावे व लागणारे सगळे सामान याची इत्यंभूत माहिती इथल्या भारतातल्या शाखेला देणे अनिवार्य होते. कोका कोलाला सरकारच्या या अटी अमान्य होत्या ज्यामुळे त्यांनी भारतीय बाजारपेठेतून काढता पाय घेतला.

कोका कोलाची ही माघार बऱ्याच सरकारी अधिकाऱ्यांना रुचत होती. त्याचे कारण असे की त्यांच्या कामाच्या व्यापातून एका मल्टी नॅशनल कंपनीची कटकट सुटणार होती. तेव्हा इंडिया टुडेची हेडलाईन हीच होती, “जे अधिकारी हे कोका कोला प्रकरण हाताळता आहेत, त्यांना कोका कोला जाण्याचा आनंदच आहे”.



कोका कोलाच्या अचानक झालेल्या एक्झिटनंतर आणि त्याला टक्कर देणारा, लोकांच्या मनावर राज्य करणारा असा कोणताही मोठा ब्रँड त्या काळात  नसल्याने, १०० करोडची ही बाजारपेठ एका नव्या संधीसारखीच होती.

याच संधीचा फायदा घेण्याचे मोरारजी सरकारने ठरविले व “77” ची मार्केटमध्ये एन्ट्री झाली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मॉडर्न फूड इंडस्ट्रीज या सरकारी कंपनीच्या मॉडर्न ब्रेड्सने कोका कोलासारखेच असणाऱ्या 77च्या उत्पादनाची धुरा सांभाळली. या ड्रिंकचे काँसंट्रेट बनविण्याची जबाबदारी कर्नाटकच्या मैसूर येथील सेंट्रल फूड अँड टेक्नॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CFTRI) वर सोपाविण्यात आली. मोरारजी सरकार याला आपला एक विजयच समजत होती ज्यामुळे १९७७ वरून ७७ नाव ठेवण्याचे ठरले. हे नाव जनता पार्टीचे एक आमदार हरी विष्णु कामात यांनी हे नाव सुचवले.

पण पुण्याच्याच एका अशाच कोल्ड ड्रिंक प्रोडक्शन कंपनीचे नावसुद्धा 77च होते.

ही कंपनी या नावाने चालवली जात असली तरीही तिची नोंद कुठेही केली नसल्यामुळे, त्या मालकांची बोलून या नावाचे मालकी हक्क मिळविण्यात आले आणि अखेर 77चे उत्पादन सुरू झाले.

ही कंपनी मोठ्या स्केलवर सुरू करण्यात आली होती. देशभरात 22 प्रॉडक्शन प्लांट आणि जवळपास दोन लाख रिटेलर्सचे नेटवर्क उभारण्यात आले. स्वदेशी उत्पादन आहे त्यामुळे आपण कोका कोलाच्या विक्री दरालाही मात देऊ शकू असा समज सगळ्यांचा झाला होता. पण ग्राहक एकदा जे पसंत करतात तशी क्वालिटी त्यांना दुसरीकडे मिळाली नाही तर ते प्रॉडक्ट पूर्णपणे अयशस्वी ठरते.

77चेही असेच काहीसे झाले.

“या ड्रिंकमध्ये ती किक नाही. कोका कोलासारखे बुडबुडे व फेस याला येत नाही, याला कोका कोला पेक्षा कमी चरचर आहे, याची चव कोक सारखी नाही 77 अतिशय गोड आहे”, अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या. कोका कोलाच्या दर्ज्यापुढे ७७चा दर्जा कमी होता. 

तसेच कोका कोला गेल्यानंतर कॅम्पा कोला, थम्स अप, ड्यूकसारखे ब्रँड बाजारात उतरले व पाहता पाहता 77 साठी मोठी स्पर्धा निर्माण झाली. या सगळ्यामुळे वर्षभरातच 77च्या खप वाढण्याऐवजी चांगलाच घटला.

मार्च १९७८ मध्ये ३.८७ लाखांचा तोटा झाला. मार्च १९७९ मध्ये कंपनीचा खर्च वाढून ३९ लाख इतका झाला व नफा फक्त ९३००० रू. इतका झाला. १९८३ येता येता सरकारने 77 संबंधी अजून कोणतेही रिपोर्ट्स व अकडे जाहीर करणे बंद केले.

पण या आधीच १९७९मध्ये मोरारजी देसाई सरकार कोसळले व इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने पुन्हा विजय मिळवला. या विजयाबरोबरच, ७७चे भविष्य संपूर्णपणे धोक्यात आले. मोरारजी देसाईं प्रमाणे, इंदिरा सरकार या कंपनीला फार प्रोत्साहन देत नव्हते. अखेर, ७७च्या एकूणच बाजारातील परफॉर्मन्स मुळे कंपनी बंद झाली. व लोकांचे लाडके ड्रिंक कोका कोला १९९३ साली पुन्हा भारतात आले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हिंदूंचा होळीचा सण मुघल शासकही तितक्याच हौसेने साजरा करायचे

Next Post

डॉ. रमन यांनी नोबेल जाहीर व्हायच्या चार महिने आधीच स्वीडनचं तिकीट काढलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

डॉ. रमन यांनी नोबेल जाहीर व्हायच्या चार महिने आधीच स्वीडनचं तिकीट काढलं होतं

भारतात विकसित केलेलं 'भाभा कवच' एके ४७पासूनसुद्धा आपल्या सैनिकांचं रक्षण करणार

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.