The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वित्झर्लंडने आत्महत्या कायदेशीर केली आहे आणि त्यासाठी मशीनही आणलंय..!

by Heramb
7 December 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगभरामध्ये आत्महत्या ही एक गंभीर समस्या आहे. अनेक देशांमध्ये आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाय केले जातात. आत्महत्येचं प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे ‘नैराश्य. नैराश्यावर समुपदेशन करणारे अनेक तज्ज्ञ आज उपलब्ध आहेत. त्यामुळे आत्महत्या हा कोणासाठीही पर्याय नसावा.

आत्महत्या रोखण्यामध्ये समुपदेशनापासून ते कडक कायद्यांच्या अमंलबजावणीपर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. आपल्या देशात ‘भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९’ नुसार आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा मानला जातो. अशा गुन्ह्यासाठी आरोपीला एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षांची तरतूद आहे.

ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, युनायटेड स्टेट्समधील काही राज्ये आणि इतर काही देशांमध्ये आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न बेकायदेशीर असून तो एक गुन्हा मानला जातो. नॉर्थ कोरिया हे जगातील सर्वांत क्रूर राष्ट्र असल्याने, त्याठिकाणी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबालाच मृत्युदंड दिला जातो.

आत्महत्येला कायदेशीर आणि फायदेशीर बनवणारे लोक:



विसाव्या शतकात जगातील बहुतेक प्रत्येक देशातच आत्महत्या हा एक गंभीर गुन्हा मानला जात असे. पण नेदरलँड्स देशाने २००२ साली आत्महत्या आणि इच्छामृत्यूला कायदेशीर मान्यता दिली. आत्महत्या आणि इच्छामृत्यूला कायदेशीर मान्यता देणाऱ्या देशांमध्ये नेदरलँड्सशिवाय स्पेन, लक्झेम्बर्ग, बेल्जीयम, कॅनडा आणि कोलंबिया या देशांचाही समावेश होतो. आजच या देशांच्या यादीमध्ये आणखी एका देशाच्या नावाचा समावेश झाला आहे, तो देश म्हणजे ‘स्वित्झर्लंड’.

‘एक्झिट इंटरनॅशनल’ या कंपनीने आत्महत्या करण्यासाठी मदत करणारी एक मशीन तयार केली आहे. आत्महत्या करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ‘सार्को’ मशीनमध्ये ठेऊन कोणत्याही त्रासाविना मृत्यू दिला जातो. या मशीनला नक्कीच कायदेशीर मान्यता मिळेल असे सार्को मशीन तयार करणाऱ्या ‘एक्झिट इंटरनॅशनल’ या कंपनीचे मत आहे. 

२०२० साली स्वित्झर्लंडमधील सुमारे १३०० लोकांनी देशातील ‘एक्झिट’ (या ‘एक्झिट’ कंपनीचा आणि ‘एक्झिट इंटरनॅशनलचा’ काही संबंध नाही) आणि डिग्नीटास या दोन मोठ्या आत्महत्या करण्यास सहाय्य करणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने आत्महत्या केली. सध्या वापरात असलेली पद्धत म्हणजे ‘सोडियम पेंटोबार्बिटल’ ग्रहण करणे. या औषधाच्या अतिवापराने कोणताही माणूस आधी कोमात जाऊ शकतो आणि काही काळाने त्याचा मृत्यूही होऊ शकतो. ‘सोडियम पेंटोबार्बिटल’ म्हणजेच ‘नेम्बुटल’ हे अनेकदा ऑपेरेशन थिएटर्समध्ये रुग्णाला गाढ झोप यावी यासाठी योग्य प्रमाणत वापरले जाते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पण एक्झिट इंटरनॅशनल कंपनीने तयार केलेल्या मशीनद्वारे कोणतेही औषध न घेता शांततापूर्ण आणि कोणत्याही त्रासाविना मृत्यू शक्य आहे असे अनेक माध्यमातून सांगितले जात आहे. या मशीनची ३-डी प्रिंट तयार असून ते पुढच्या काही महिन्यांतच वापरात आणलं जाईल. कमी त्रासदायक मृत्यू देणारं हे मशीन कोठेही ठेवता येऊ शकतं आणि अतिशय सामान्य माणूसही ते सहजरित्या ऑपरेट करू शकतो. तसेच हे मशीन बाहेर ठेवता येण्यासारखंही आहे. 

या मशीनच्या साहाय्याने आत्महत्या करणे अतिशय सोपे आणि आरामदायक होते. ज्यांना आत्महत्या करायची आहे त्यांना या मशीनमध्ये ठेवलं जाईल आणि त्यांना काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे मेकॅनिजम सुरु करण्यासाठी मशीनच्या आतील एक बटण दाबू शकतात.

या मशीनच्या खाली नायट्रोजनने भरलेले एक उपकरण ठेवलेले असते. ते बटण दाबल्यानंतर ३० सेकंदांमध्ये मशीनमध्ये फक्त १% ऑक्सिजन राहते. व्यक्तीचं संपूर्ण देहभान हरपण्याआधी किंचित उत्साह येईल. देहभान गमावल्यावर ५ ते १० मिनिटांनंतर व्यक्तीचा मृत्यू होतो. या मशीनमध्ये असलेल्या व्यक्तीला कोणतीही भीती जाणवत नाही अथवा गुदमरल्यासारखेही वाटत नाही. कारण मशीनमध्ये हायपोक्सिया आणि हायपोकॅप्निया प्रक्रियांचा वापर केला गेला आहे.

मागील वर्षी एक्झिट इंटरनॅशनल कंपनीने ‘सार्को’ मशीन वापरण्याच्या कायदेशीर परवानगीबद्दल वरिष्ठांचा सल्ला मागितला होता. त्यामुळे अद्यापतरी या प्रोजेक्टमध्ये कोणत्याही कायदेशीर अडचणी नाहीत. आतापर्यंत ‘सार्को’चे दोन थ्री-डी प्रिंटेड प्रोटोटाईप्स तयार केले गेले आहेत. तिसरा थ्री-डी प्रिंटेड प्रोटोटाइप नेदरलँड्समध्ये तयार केला जात असून एक्झिट इंटरनॅशनल कंपनीच्या मते, सगळं काही सुरळीतपणे पार पडल्यास ‘सार्को’ मशीनचे तिसरे प्रोटोटाइप २०२२ साली वापरण्यासाठी तयार असेल.

पहिले ‘सार्को’ मशीन सप्टेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान जर्मनीतील ‘कॅसेल’ येथील ‘सेपल्क्रल कल्चर संग्रहालया’त प्रदर्शनासाठी ठेवललेले आहे. दुसरे ‘सार्को’ मशीन पाहिजे तसे कार्यक्षम नव्हते. त्यामुळे ते वापरण्यास योग्य नाही असे कंपनीचे मत आहे. सार्कोसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक उपकरणांच्या डेव्हलपमेंटमध्ये कोविड-१९ महामारीमुळे बराच उशीर झाला आहे.

‘सार्को’चे भवितव्य:

आत्महत्येसाठी व्यक्तीची मानसिक क्षमता आणखी दृढ करण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्क्रीनिंग सिस्टीम’ विकसित करण्याचे ध्येय सध्या कंपनीसमोर आहे. मानसोपचार तज्ज्ञांमध्ये मात्र या मशीनबद्दल अनेक मतभेद आहेत. तरी कंपनीच्या मते, ज्यांना आत्महत्या करायची आहे त्यांना एक ‘ऑनलाईन’ चाचणी द्यावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना ‘सार्को’ मशीनमध्ये प्रवेश करण्यासाठी एक ‘कोड’मिळेल.

एक्झिट इंटरनॅशनल ही कंपनी मूळची नेदरलँड्सची आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये आपले मार्केट उभे करण्यासाठी या कंपनीची स्थानिक आत्महत्या करण्यास सहाय्य करणाऱ्या कंपन्यांशी सहकार्य करत काम करण्याची योजना आहे. मानवी मृत्यूसाठी मदत करणाऱ्या या कंपन्यांची वाढ कशाप्रकारे होते हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे असेल..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सर रवींद्र जडेजा म्हणजे भारतीय संघासाठी रजनीकांतपेक्षा कमी नाहीत…!

Next Post

CDS जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला २०१५ सालीही अपघात झाला होता..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

CDS जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला २०१५ सालीही अपघात झाला होता..!

भारताच्या ICC ट्रॉफींचा दुष्काळ हिटमॅन रोहित शर्मा संपवणार का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.