The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाशी लढताना स्क्रॅप बसेस पासून बनवलेल्या सॅनिटायझेशन बसेस ठरताहेत वरदान

by द पोस्टमन टीम
20 April 2020
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
sanitizer buses
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, विविध राज्यातील सरकार या आजाराला अटकाव घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोना रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत.

अशा परिस्थितीत या सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची आणि परिवाराच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारवर आहे. यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर व्हॅन सॅनिटायझर बस, अशा वेगवेगळ्या व्यवस्थेची उभारणी करण्यात आली आहे, ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो.

या सॅनिटायझर बस, व्हॅनच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी स्वतःचे निर्जंतुकीकरण करून घेत आहेत, जेणेकरून विषाणूचा प्रसार रोखता येईल व त्यांचा घरापर्यंत कोरोना पोहचू शकणार नाही. ही सॅनिटायझर बस एका विशिष्ट तंत्रज्ञानाच्या आधारावर तयार करण्यात आली असून या बसमध्ये कर्मचारी वर्गाच्या संपूर्ण शरीराचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जाते.

अनेक सामाजिक संस्था या सॅनिटायझर बसेस व व्हॅनच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत असून पुण्यात तर एका शववाहिनीला सॅनिटायझर व्हॅनमध्ये रूपांतरित करून, जीवनवाहिनी म्हणून वापरलं जात आहे.

कर्नाटक राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा असून आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या सुरक्षेसाठी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या जुन्या बसेसचे सॅनिटायझर बसेसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी वर्गच नव्हे तर लोकांच्या निर्जंतुकीकरणासाठी या बसेसचा वापर केला जाणार आहे.



शनिवारी अशाच एका बसचे उद्घाटन करण्यात आले आहे. या सॅनिटायझर बसेसचे नामकरण ‘सरिजे संजीवनी’ असे करण्यात आले असून त्यांचा वापर हा शहरी हद्दीत केला जाणार आहे.

Coronavirus sanitizer buses
sanitizer buses (the hindu)

बसेसच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांचे लॉक डाऊन दरम्यान निर्जंतुकीकरण केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे, त्याचाच एक भाग सॅनिटायझर बसेस आहेत. सॅनिटायझर बसेसच्या माध्यमातून १००% निर्जंतुकीकरणं शक्य आहे असं नाही. इतर अनेक आरोग्य विषयक सूचना आणि निर्देशांचे पालन अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाला करावे लागणार आहे, ज्यात वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे इत्यादी क्रियांचा समावेश आहे. पण सॅनिटायझर बस हे देखील एक उपयुक्त माध्यम आहे.

कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या या बसेसचे रूपांतरण करण्याची प्रक्रिया ही बंगळुरू येथील सेंट्रल वर्कशॉपमध्ये सुरू असून प्रति बस याठिकाणी २० हजार रुपये खर्च येतो आहे. यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा आधार घेण्यात आला असून तुषारांच्या माध्यमातून सॅनिटायझरचा शिडकाव केला जात आहे. बसमध्ये दोन दरवाजे असून एकातून आत जायचे व दुसऱ्यातून निर्जंतुकीकरण करून बाहेर पडायचे, अशी प्रक्रिया आहे.

कर्नाटकच्या म्हैसूर, मंगळुरू, चिक्कबल्लापूर आणि इतर कोरोना बाधित जिल्ह्यात अनेक पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्यामुळे या भागांना कोरोना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी सॅनिटायझर बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असून दिवसाला १८-२० जुन्या बसेसची रूपांतरण प्रक्रिया पार पाडली जात आहे.

कर्नाटकचे मोठी बाजारपेठ असलेले रामनगर, मंडया आणि इतर जिल्ह्यात जागोजागी सॅनिटायझर बोगदे देखील तयार करण्यात आले आहेत. येथील बाजारपेठांमध्ये शेतकरी आणि होलसेल विक्रेते मोठ्या संख्येने एकत्र येत असतात, यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे सध्या भारतात सर्व सरकारी व्यवस्थांसमोरील आव्हान आहे, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Corona VirusCOVID19Fight Against Corona
ShareTweet
Previous Post

पालघरचा व्हिडीओ पाहिला, मग आता हे वाचा..

Next Post

जग इकडचं तिकडं झालं तरी चहा सोबतची ‘पार्ले-जी’ची जागा दुसरं कोणी घेऊ शकणार नाही

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

जग इकडचं तिकडं झालं तरी चहा सोबतची 'पार्ले-जी'ची जागा दुसरं कोणी घेऊ शकणार नाही

म्हणून हि*टल*रने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.