The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नुसत्या भाजीत मीठ टाकण्याच्या स्टाईलमुळे हा ‘आचारी’ इंटरनेट सेन्सेशन बनलाय

by द पोस्टमन टीम
18 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एक संस्कृत सुभाषित आहे. ‘घटं भिन्द्यात, पटं छिन्द्यात, कुर्याद्रासभरोहणम । प्रसिद्धः पुरुषो भवेत् ।।’ याचा अर्थ असा – (माणसाने) मडके फोडावीत, कपडे फाडावेत, प्रसंगी गाढवावरही बसावे. पण काहीही करून माणसाला “प्रसिद्धी” हवी असते. सध्याच्या व्हायरलच्या जमान्यात तर प्रसिद्धी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप ही समाजमाध्यमे एका रात्रीत प्रज्ञावंत आणि प्रतिभावंतांसाठी प्रसिद्धीची दारं खुली करून देत आहेत. गरज आहे ती फक्त व्यक्तीच्या अंगी एखादे विशेष कौशल्य असण्याची. अशाच प्रकारे स्वतःच्या अंगी असलेल्या एका विशेष कौशल्यामुळे इंटरनेट सेलिब्रिटी बनलेल्या ‘सॉल्ट बे’ नावाच्या तुर्कस्तानी शेफची ही गोष्ट.

‘सॉल्ट बे’ हे या माणसाचे खरे नाव नाही. त्याचे नाव आहे ‘नुसरत गोक’. चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेला हा मनुष्य टर्किश शेफ आहे. याशिवाय फूड एंटरटेनर आणि इंटरनेट सेलिब्रिटी ही त्याची नवीन ओळख आहे. मांसाहारी पदार्थ तयार करणे आणि विशेषतः त्यात हे पदार्थ तयार करण्याचे आणि सिझनिंगचे तंत्र ही त्याची खासियत आहे.

त्यातूनच जानेवारी २०१७ साली त्याच्यावर इंटरनेट मीम्स व्हायरल झाली होती. आजघडीला सॉल्ट बेची स्टेक हाऊसेसची साखळी आहे. ‘नुसरत एत’ या नावाने ही उपहारगृहे प्रसिद्ध आहेत. तुर्कस्तानव्यतिरिक्त ग्रीस, युएस, युके, संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया यांसारख्या देशांमध्ये ही रेस्टॉरंट्स आहेत. ‘नुसरत एत’ हे नाव त्याचे नाव (नुसरत) आणि टर्किश भाषेत मांस (एत) या दोन शब्दांपासून बनलेले आहे. पण ही उपहारगृहे काही एका रात्रीत उभी राहिलेली नाहीत.



गोकचा जन्म तुर्कस्थानात एका कुर्दिश कुटुंबात झाला. त्याचे वडील खाणकामगार होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्याला सहाव्या इयत्तेत असतानाच शाळा सोडावी लागली. पैसा कमावण्यासाठी त्याने एका खाटीकखान्यात खाटकाच्या हाताखाली नोकरी करायला सुरुवात केली.

हळूहळू त्याच्या लक्षात आले, की या कामाला बऱ्यापैकी संधी आहे. याव्यतिरिक्त शेफ म्हणून किंवा हॉटेल व्यवसायात एकंदरीतच करिअरच्या बऱ्याच संधी आहेत. आता ठरले.. काम करायचे तर याच क्षेत्रात. फक्त सुरुवात कशी आणि कुठून करायची हेच बघायचे होते. मग त्याने अनेक ठिकाणी उपाहारगृहांमध्ये कामे केली. २००७ ते २०१० या काळात अर्जेंटिना, युएससारख्या देशांमधील अनेक हॉटेल्समध्ये त्याने तेथील शेफस्-च्या हाताखाली काम केले. तेही अक्षरशः मोबदला न घेता. यामागे एकच हेतू होता: जमेल तितका अनुभव गाठीशी बांधणे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पुरेसा अनुभव घेतल्यानंतर २०१० साली तो इस्तंबूलला परतला आणि त्याने तेथे आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. इस्तंबूलमध्ये त्याने पहिले उपाहारगृह सुरू केले. यानंतर २०१४ साली त्याने दुबई येथे अजून एक रेस्टॉरंट सुरू केले. मग या सगळ्यात त्याला ‘सॉल्ट बे’ हे नाव कुठून मिळाले? हे नाव त्याला मिळायला कारणीभूत झाले इंटरनेटवरचे त्याचे व्हायरल व्हिडिओज.

जानेवारी २०१७ मध्ये इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओजनी त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. डिशेस तयार करण्याआधी अत्यंत सफाईदारपणे मांसाचे तुकडे करून त्यावर विशिष्ट पद्धतीने मीठ शिंपडण्याचे तंत्र दाखवणारे त्याचे व्हिडिओज् त्याच्या रेस्टॉरंटच्या ट्विटर अकाउंटवरून व्हायरल झाले आणि त्यांनी इतिहास घडवला.

त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टला तब्बल १ करोडपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. यासाठी त्याची मीठ शिंपडण्याची विशिष्ट पद्धत हिट ठरली. मीठ बोटाने थेट न शिंपडता ते चिमटीत घेऊन नंतर हातावरून ओघळू देत ते कोपरावरून खाली मांसावर शिंपडणे हे त्याचे टेक्निक चांगलेच प्रसिद्ध झाले. त्यामुळे त्याला ‘सॉल्ट बे’ हे टोपणनाव मिळाले. या प्रसिद्धीच्या पाठोपाठ त्याच्यासाठी संधींचे महाद्वारही खुले झाले. त्यातून त्याला आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी लोकांना खिलवण्याची संधी मिळाली आहे.

नाण्याप्रमाणे प्रसिद्धीच्या देखील दोन बाजू असतात. त्यामुळे सॉल्ट बे चे टीकाकारही कमी नाहीत. अनेकांच्या मते त्याने बनवलेल्या डिशेसमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. तर काही जणांच्या मते याची रेस्टॉरंट्स महागडी आहेत. थोडक्यात चवीच्या बाबतीत सॉल्ट बे ला आणि त्याच्या पदार्थांना उत्तम हा दर्जा देता येत नाही.

पण दुसऱ्या बाजूला त्याची उपहारगृहे केवळ खाण्यापिण्याचे ठिकाण न राहता मनोरंजनाची ठिकाणे म्हणून जास्त लोकप्रिय आहेत. जर तुम्हाला खाण्याच्या बरोबरीने हटके असे काही अनुभवायचे असेल तर ‘नुसरत एत’ हा चांगला पर्याय आहे. मात्र त्या वेळेस सॉल्ट बे तिथे हवा!

कोणत्याही सेलिब्रिटी प्रमाणे गोकला देखील आयुष्यात अनेकदा वादग्रस्त परिस्थितींचा सामना करावा लागला. सप्टेंबर २०१८ मध्ये त्याच्या इस्तंबूलमधल्या स्टेक हाऊसमध्ये फायर शो च्या दरम्यान आग लागून त्यात अनेक जण जखमी झाले होते. त्यामध्ये एका झेक इंटरनेट सेलिब्रिटीचाही समावेश होता.

याशिवाय न्यूयॉर्कच्या त्याच्या उपहारगृहातील काही वेटर्सनी त्याच्याविरोधात बंड पुकारले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार गोक त्यांना मिळालेल्या टिपमध्ये देखील वाटा मागत असे आणि या संदर्भात त्या वेटर्सनी जेव्हा त्याला विचारले तेव्हा त्या वेटर्सची हकालपट्टी करण्यात आली. गोकने अर्थातच टीपच्या गोष्टीचा इन्कार केला. त्याच्या मते त्या वेटर्सची कामगिरी चांगली नसल्यामुळे त्यांना काढून टाकले होते.

काही वर्षांपूर्वी व्हिएतनामच्या एका कम्युनिस्ट नेत्यावर सॉल्ट बे ने ‘सर्व्ह’ केलेल्या ‘गोल्ड प्लेटेड स्टेक’ या महागड्या डिश वरून टीका केली गेली. या पदार्थाची किंमत या मंत्र्यांच्या मासिक वेतनापेक्षाही जास्त आहे. शिवाय व्हिएतनाममध्ये तेव्हा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्कील होते.

अशा परिस्थितीत कम्युनिस्ट म्हणवणार्‍या नेत्याने असे २४ कॅरेट सोन्याने मढवलेले मांस सेवन करणे बरोबर आहे का हा वाद निर्माण झाला. याशिवाय कोरोनाकाळात सुरक्षितता नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत त्याचे बोस्टनमधील रेस्टॉरंटही काही काळासाठी बंद करण्यात आले होते.

पण म्हणून गोक मागे हटलेला नाही. निदान जोवर खाण्याचा संबंध आनंद, मौजमजा यांच्याशी जोडलेला आहे तोवर तरी या अवलियाची चलती असणार हे नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या ‘बिजनेस जेट’ने अमेरिकन यु*द्धनौकेवर ह*ल्ला केला होता

Next Post

सततच्या दुष्काळाने केनियातील २५ लाख लोकांवर स्थलांतराची नामुष्की आलीये

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सततच्या दुष्काळाने केनियातील २५ लाख लोकांवर स्थलांतराची नामुष्की आलीये

लॉर्ड माउंटबॅटनच्या डायरीची विल्हेवाट लावण्यासाठी ब्रिटिश सरकार ८ लाख डॉलर्स खर्च करतंय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.